श्रावणी सोमवार (विडंबन)

Submitted by र।हुल on 25 July, 2017 - 00:28

एक असे आटपाट नगरी ॥ बोलतसे तिज मायानगरी ॥
जनतेचे पोटभरी॥ समृद्ध असे ॥१॥

तिच्या कोण्या कोपर्यात ॥ राहतसे सतजन लोकांत ॥
ऋन्मेष नामे मिरवीत ॥
अवतारी थोर ॥२॥

ऋन्मेष महिमा अपरंपार ॥ मायबोलीचा शाहरुख धुरंधर ॥
धागे रचयिता भारंभार ॥ प्रश्न सोडवी ॥३॥

ऋन्मेषनी किर्ती सांगावी ॥ गर्लफ्रेंडची महती वर्णावी ॥
एमेनसीची वाट धरावी ॥ दिवसामाजी ॥४॥

तो असे पक्का नास्तिक ॥ की उगाची वेड पांघरीत ॥
सन्मार्गाची कास धरीत ॥ आम्हांसी कळेना ॥५॥

एके दिनी नवल झाले ॥ न घडता ते घडूनी आले ॥
ऋन्मेषचे भाग्य बदलले ॥
धन्य असे ॥६॥

कथा सांगतो मी बापुडा ॥ ऐकावी तुम्ही घ्यावा धडा ॥
उगी न करावा ओरडा ॥
विनवितसे ॥७॥

सकाळचा तो श्रावणी सोमवार ॥ आदल्या दिवशीची धुंद गटार ॥
वर्णावा तिचा हैंग ओवर ॥
नशिल्या डोळ्यांनी ॥८॥

मायानगरीची लोकल ॥ ख्याती तिची धवल ॥
पास ऋन्मेषचा संपेल ॥
योगायोग असे ॥९॥

ऋन्मेष जाता स्टेशनावरी ॥ लोकल आली वेळेवरी ॥
नजर जाता टिसीवरी ॥ भानावर आला ॥१०॥

ईकडून चढला ॥ तिकडून उतरला ॥
टिसीपासुन चुकला ॥ चमत्कार थोर ॥११॥

पोहोचला पासाच्या रांगेत ॥ उभे असे लायनीत सात ॥
खिडकी उघडी एकुलती एक ॥ अन्याय असे ॥१२॥

समोर डोकूनी बघता ॥ आंत पुरूष दिसता ॥
मनामाजी खट्टू होता ॥ काळ लोटतसे ॥१३॥

काळ काम वेगाचे गणित ॥ इंजीनियर डोके लावीत
स्त्रिया टाईमपास न करीत ॥ सिद्धांत सांगितला ॥१४॥

विचार येता मनांत ॥ अप्सरा एक लावण्यवंत ॥
बाजूच्या खिडकीत प्रकटत ॥ मनाजोगे झाले ॥१५॥

सरसावला त्या बाजूस झटकन् ॥ मध्ये आला आडदांड पटकन् ॥
ऋ बोलणार काही सट्कन ॥ सुंदरीनं पास घेतला ॥१६॥

ऋन्मेष मनी चरफडला ॥ मग शाहण्यावानी गप्प बसला ॥
का उगीच त्रागा करा ॥ व्यर्थ शीण टाळे ॥१७॥

पण त्यास नसे माहीत ॥ देव असे साथीत ॥
सदा त्यास राखीत ॥ अज्ञान असे ॥१८॥

एक डोळा लोकलवरी ॥ दुसरा असे सुंदरीवरी ॥
तिसरा लावे घड्याळावरी ॥ डोक्यात गणगण ॥१९॥

एवढ्यात गम्मत झाली ॥ मागून कोणी सुंदरी ओरडली ॥
आधीच दुसरी ऋने ऐकली ॥
शिSSट् आवाजें ॥२०॥

समोर पाहता हसू न आवरे ॥
वर दांडीवरी बसली कबुतरे ॥
एक विष्टले डोईवरे ॥ समोरच्याच्या ॥२१॥

भिजले केस डोईवरचे ॥ शिंतोडे दिसे काचेवरचे ॥
खाली सरकता कबुतराचे ॥ पुढे वाचा ॥२२॥

कबुतरविष्ठा चमचमीत ॥ नासिकाग्राला स्पर्शीत ॥
हनुवटीला चुंबीत ॥
प्रसादे मिरविली ॥२३॥

हसू किळस सहानुभूति ॥ अनेक भावना मनीं येती ॥
ऋन्मेषबाळ केवळ हसू आणती ॥ शाहणे असे ॥२४॥

समोरच्या दांडग्याला काय वर्णावे ॥ चित्र त्याचे सेल्फीने काढावे ॥
ऋ बाळाने मनी हर्षावे ॥
वांचलो म्हणोनी ॥२५॥

बाळाला साक्षात्कार झाला ॥ देव कबुतर बनला ॥
समोरच्याला धडा शिकविला ॥
बाळ गहिवरतसे ॥२६॥

अधिक विचार करता ॥ घटनांची संगती लावता ॥
साथी देव अदृश्य असता ॥ सज्ञान झाला ॥२७॥

मनी भावना उचंबळे ॥ श्रावणाचे करावे सोहळे ॥
जिवनात प्रथम वेळे ॥ संकल्प सोडतसे ॥२८॥

पाळावा श्रावण ॥ पुण्य मिळवून ॥
होऊ भाग्यवान ॥ आयुष्यभरी ॥२९॥

बाळाने संकल्प सोडीला ॥ श्रोते असे साक्षीला ॥
नास्तिक आस्तिक झाला ॥ केला देवाने ॥३०॥

मी कवी प्रेमवेडा ॥ आपणांसी विनवीत देववेडा ॥
घ्या हाती श्रावणाचा विडा ॥ भलेंची होईल ॥३१॥

न पाळता श्रावण जरी ॥ हे आख्यान श्रवण करी ॥
श्रावणाचे पुण्य पडे पदरी ॥
वाचावे नेमेची ॥३२॥

हे आख्यान वाचिता ॥ भेटेल गर्लफ्रेंड तत्परता ॥
एमेनसीत प्रवेश होता ॥
आयुष्य सत्कारणी ॥३३॥

हे असे सत्यकथन ॥ यासी बोल ठेवील चांडाळ जन ॥
तयासी गर्लफ्रेंडचे सुख ॥ नाही कधी ॥३४॥

मुळ कथा ऋन्मेषची ॥ मती माझी पामराची ॥
अनुवाद बोल सत्यची ॥ पडताळून पहा ॥३५॥

श्रावणमासी पहीला मंगळवार ॥
लेखणी प्रसवली धुंवाधार ॥
दंडवत माझा श्रोतियांसी अपार ॥
नतमस्तक होतसे ॥३६॥

इती श्री प्रेमवेडा विरचीत ॥ऋ आख्यान चविष्टीत ॥
कल्याणवंत होऊन ॥ समाप्त करतो ॥३७॥

शुभं भवतू ॥ प्रतिसाद इश्चू ॥

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे व्हॉटसपवर नावासह शेअर करू का?
फार लांब नाही, माझ्या ओळखीच्या मित्रांच्या ग्रूपवर... माझ्या लेखासोबत करेन, म्हणजे वाचणार्‍याला संदर्भही समजेन

पाथ,
अजून चार श्रावणी सोमवार येतील... असेच चार विडंबन मटेरीअल लेख देईन Happy

राहुल,
धन्यवाद Happy

अरारारारारा ... .......
भारीच आहे . चालीत वाचून पाहिलं >>>>>

पाथ,
अजून चार श्रावणी सोमवार येतील... असेच चार विडंबन मटेरीअल लेख देईन Happy
राहुल,
धन्यवाद Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 25 July, 2017 - 21:35

ऋ उद्या सोमवार आला. कबुल केल्याप्रमाणे राॅयल्टी पाहीजे.

छान

Pages