Submitted by र।हुल on 24 July, 2017 - 14:29
स्मृतीत साठवून जाती
पावसांत भिजलो आम्ही
चोरपावलानं उन्हं येती
चिंब भिजल्या क्षणांना
स्मृतीत साठवून जाती ॥१॥
धुक्यात हरवलो आम्ही
उगवतीचे किरणं येती
स्पर्श उबदार बाहूंचा
स्मृतीत साठवून जाती ॥२॥
प्रेमात पडलो आम्ही
स्वप्नं उद्याचे पडती
कोमल हळव्या मनांना
स्मृतीत साठवून जाती ॥३॥
विरहात तगमगलो आम्ही
आठवणी सोबतीस येती
नयनी ओल्या आसवांना
स्मृतीत साठवून जाती ॥४॥
―₹!हुल /२४.०७.१७
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!!!
सुंदर!!!
सुंदर!! अप्रतिम!!
सुंदर!! अप्रतिम!!
मस्त कविता
मस्त कविता
छान आहे ......स्मृती
छान........
छान........
सायु, अक्षय, ललिताताई,
सायु, अक्षय, ललिताताई, राजेंद्रजी देवी
मनापासून धन्यवाद