शब्द रुसवा

Submitted by र।हुल on 18 July, 2017 - 14:39

शब्द रुसवा

शब्दब्रह्म आज का रुसले
नाद ब्रह्म अंतरी हेलावले
प्रसवे ना काव्य आता
प्रतिभा ती जातसे लयाला ॥१॥

उगम शब्दांचा अंतरी होईना
प्रसवकळा त्या प्रतिभेस येईना..
मन मारूनी रचना गुंफता
समाधान ते चित्ती मिरवेना ॥२॥

मिटता डोळे सरस्वती आठवे
तिच्या स्मरणे जागृत व्हावे
भाव भक्तीने ह्रदय भरता
सहजी काव्य निर्मित व्हावे ॥३॥

―₹!हुल १९/०७/१७

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान .....

सायुरी, काबेरी, पल्लवीजी, दत्तात्रेय साळुंकेजी आपल्या सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार... Happy