आनंदवन

Submitted by अनन्त्_यात्री on 18 July, 2017 - 04:22

मज अवगत आहे उगम तुझ्या दु:खाचा
तू दोषी नसता कलंक का शरमेचा
प्रारब्ध-भयाची रात्र संपते आहे
करुणेचा इथला निर्झर निर्मळ वाहे

नि:शंक निकट ये, हाती दे तव हात
या दु:खार्तान्च्या देशी हाच प्रघात
परवलिची इथली एकच हळवी खूण
जरि जखम तुला, तरी माझे हृदय विदीर्ण

जरि भग्न तुझे कर, घडवू शिल्प अभंग
जरि कभिन्न वास्तव, बदलू त्याचा रंग
या निबिड अरण्यी, उठवू अद्भुत भवने
आनंदवनाचे हेच ब्रीद, अन गाणे
आनंदवनाचे हेच ब्रीद, अन गाणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आनंदवनात मी बाबा असताना गेलो होतो . खरच त्यानीं भग्नतेतुन अभंग शिल्प घडविले आहे . अश्याच छान आणि सहज सुंदर काव्य निर्मिती साठी खुप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद .

दत्तात्रयजी, आपल्या प्रतिसादाबद्दल व शुभेच्छा॑बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

Thanks Santosh!

वा!