शेअर मार्केट- म्युच्युअल फंड एसआयपी (SIP) बद्दल काही बेसिक प्रश्न

Submitted by कूटस्थ on 12 May, 2017 - 19:53

मी सध्या भारतीय शेअर मार्केट मध्ये म्युच्युअल फंड एसआयपी माध्यमातून गुंतवणूक करायचे योजिले आहे.एसआयपी इन्व्हेस्टमेंट per month असेल तेही ऑनलाईन ब्रोकरच्या माध्यमातून. सध्या यात नवीन आहे व एसआयपी मध्ये प्रथमच गुंतवणूक करत असल्याने काही प्रश्न आहेत ते असे:
१. प्रत्येक महिन्याच्या कोणत्या तारखेला फंड युनिट्स विकत घेतले जातील हे आपल्याला ठरवता येते का? येत असल्यास तारीख बदलता येते का? असल्यास किती वेळा बदलू शकतो?
२. एसआयपी चा कालावधी बदलणे शक्य असते का? म्हणजे मी एसआयपी ५ वर्षासाठी सुरु केली तर नंतर तो कालावधी कमी करता येतो का (जसे कि ३ वर्ष)? त्याचप्रमाणे एसआयपी चा कालावधी वाढवता येतो का? म्हणजे मी एक वर्षाचा एसआयपी सुरु केला आणि ६ महिन्यानंतर वाटले कि कालावधी वाढवून २ वर्ष करावा तर ते शक्य असते का कि नवीन एसआयपी सुरु करावा लागतो?
३. एखाद्या महिन्यात पैसे भरू शकलो नाही तर काय होते? काही penalty असते का?
४. एखाद्या महिन्यात SIP Amount पेक्षा जास्त पैसे भरून SIP फंड मध्येच युनिट्स विकत घेता येतात का?
४. मुदतीपूर्वी युनिट्स विकता येतात का? असल्यास त्यावर exit load पडतो का? आणि short term capital gain असेल तर एसआयपी वर टॅक्स भरावा लागतो का?
५ . SIP आणि Flexi-SIP यात काय फरक आहे? Flexi-SIP मध्ये महिन्याच्या कोणत्याही तारखेला युनिट्स विकत घेण्याची मुभा असते का?
कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

1 प्रत्येक फंड हाऊस प्रमाणे पर्याय वेगवेगळे असतात, जसे 1, 7, 14, 21 किंवा 1, 5, 10,15, इ. ह्यातली कुठलीही एकच तारीख निवडता येते, दर महिन्याला वेगळी तारीख घेता येत नाही, असा बदल करणे sip च्या शिस्तीच्या विरोधात आहे

2 दोन्ही पर्याय कुठलेही अतिरिक्त शुल्क न देता उपलब्ध आहेत

3 ecs bounce झाल्यावर बँक जे चार्ज लावेल तेवढेच, mf कुठली पेनल्टी लावत नाही, मात्र तुमची त्या महिन्याची गुंतवणूक हुकणार जर पुन्हा वेगळी केली नाही तर

4 sip हे recurring deposit सारखे आहे, त्याशिवाय अधिकची गुंतवणूक त्याच फोलिओ मध्ये केव्हाही करू शकता. Mutual fundana मुदत असे काही नसते, मी आज गुंतवलेले उद्याही काढू शकतो, फक्त सहसा 1 वर्षांपूर्वी काढल्यास exit लोड म्हणजे कापले जाणारे पैसे जास्त असतात तसेच आत्ताच्या नियमानुसार इक्विटी फंडाना stcg म्हणजे लघु मुदतीचा नफा कर लागतो

5 flexi sip माझ्या माहितीप्रमाणे, जास्त nav असताना कमी रक्कम व कमी nav असताना जास्त रक्कम गुंतवण्याची 1 पद्धत एका फंडाने काढली होती, अर्थात त्याने जास्त फायदा होईलच याची खात्री नाही

धन्यवाद