टाईमलाईन.--- हिंदू ते निधर्मी होण्याची.

Submitted by सिंथेटिक जिनियस on 16 July, 2017 - 11:34

बाल्यावस्था( वय १० ते १३)------

धर्म .....प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय.जगात म्हणे १०० पेक्षा जास्त धर्म आहेत. मला लहाणपणी सांगण्यात आले कि तू जन्माने हिंदू आहेस.हिंदू म्हणजे गणेशोत्सव काळात मोदक खाणारे असा माझा समज होता.पुढे दाढी वाढवणारे आणि टोपी घालणारे आपल्यापेक्षा वेगळे आहेत हे लक्षात यायला लागले.एकदा शाळेतून घरी येताना दोन तीन नग्न लोक काही गर्दीबरोबर चालत होते .ह्या लोकांचाही वेगळा धर्म आहे ही माहीती मित्राने पुरवली.

इयत्ता नववी---
इतिहासाच्या पुस्तकात आधुनिक मानवाचा जन्म माकडापासुन उत्क्रांत होऊन झाल्याचे कळले.होमो सेपियन्स हे आधुनिक मानव.आफ्रीकेत उत्क्रांत होऊन जगभर पसरले.

इयत्ता बारावी(विज्ञान शाखा)---
जग कुठल्या धर्म ग्रंथाचे आधारे चालत नाही.वेद,कुराण,बायबल हे कुठल्याही प्रकारे सत्य नाहीत हे वाचनावरुन कळाले.
वेदांमध्ये विज्ञान आहे,कुराणचा आदेश शेवटचा मानावा ,बायबलनुसार जग देवाने आठ दिवसात बनवले वगैरे गोष्टी लिहीणारे व सांगणारे बालबुद्धीचे आहेत हे लक्षात यायला लागले.
वाचन वाढत होते ,धर्म ही अफुची गोळी आहे हे कार्ल मार्क्सचे विधान मनोमन पटायला लागले .

२००१ --- ९/११ हल्ला--
ओसामा बिन लादेन या मुस्लिम दहशतवाद्याने अमेरीकेत हल्ला केला.हजारो लोक निष्प्राण.मुस्लिम दहशतवादाशी पहीली ओळख.कारण काय ,तर कुराणमध्ये काफीर संपवा असा संदेश आहे.हजारो वर्षापुर्वी लिहलेली बाडं, मग ते वेद असोत वा कुराण बायबल आजहि प्रचंड स्फोटक असल्याची जाणीव.

२००२गुजरात दंगल----
हिंदूनी भरलेली एक ट्रेन गोध्राजवळ मुस्लिम मॉबने जाळली.कारण काय तर ट्रेनमधले ते अयोध्येत राममंदिर बनवायला गेलेले कारसेवक होते.याची रिॲक्शन उमटली...हजारो मुसलमान घराबाहेर काढून मारण्यात आले.जाळण्यात आले.मुस्लिमबहुल भागात हिंदूंना मारण्यात आले.
आमचा केमिस्ट्रीचा पेपर पुढे ढकलण्यात आला व अभ्यासाला वेळ मिळाला.
हिंदू मरु देत वा मुस्लिम, वेळ मिळाल्याने आपला केमिस्ट्रीचा पेपर यामुळे नक्की सुटणार हा स्वार्थी विचार मनात आला.आपण निधर्मी होत आहोत याची पहील्यांदा झालेली जाणीव.

कॉलेज २००४--
फर्राट चर्चा घडवून आणायला लागलो.कॉलेज्च्या कट्ट्यावर नास्तिक निधर्मी अशी ओळख तयार झाली.चर्चांमध्ये तावतावाने भांडणाऱ्या मित्रांवरुन धर्म हा कॅन्सर कीती खोलवर रुजला आहे व माणसाची मती तो कशी हायजॅक करतो याचा अनुभव येत गेला.जग धर्ममुक्त झाले पाहीजे हा विचार बळावला.

२०१७ ,वय ३१----
Richard Dawkins foundation for reason and science शी संलग्न.धर्म या गोष्टीकड परतायची शक्यता शून्य.

टाईमलाईन समाप्त.

जग धर्ममुक्त झाले पाहीजे हा माझा विचार कसा बळावत गेला याची ही टाईमलाईन.
आपल्याला काय वाटते??
१. धर्म कालबाह्य झाले आहेत काय?
२.मुस्लिम दहशतवादाने जगभर मांडलेला हैदोस ,उगवता हिंदू दहशतवाद यावर जग धर्ममुक्त होणे हाच उपाय आहे काय?
३.तुमचा पाल्य निधर्मी विचारांचा व्हावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता?

प्रस्तुत लेख संस्थळाच्या नियमात बसत नसल्यास डिलिट करावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धर्म म्हणजे नियम. माझा नियम चांगला कि तुझा नियम चांगला ह्यावरुन हाणामारी होणे म्हणजे बालिशपणाच होय. धर्मसत्ता जेव्हा प्रबळ होते तेव्हा त्याचा सर्वाथिक त्रास हा स्त्रिया आणि गरीब वर्गालाच होतो. तरीही धर्मावर निष्ठा ठेवणार्या स्त्रिया व शोषित बघितले तर नवल वाटते.

३ शब्द आहेत.

उगवता = आक्षेप मान्य. हा काही उगवता दहशतवाद नव्हे. हा जुना व चांगलाच बोकाळलेला आहे.
हिंदू = धर्माच्या नावावर इतर धर्मियांवर दहशत गाजवणे, या अर्थाने "धर्माचा" उल्लेख मान्य.
दहशतवाद = गोराक्षस हे मानवतावादी, मानवाधिकारवादी इ. आहेत, हे मान्य करणे.

वगैरे.

तेव्हा नक्की कोणत्या शब्दावर आक्ष्रेप ते सांगावे ही विनंती.

माझ्या पाल्याला हिंदू धर्म काय आहे याबद्दल माहिती आहे. ती व मी निधर्मी व्हायचे चान्सेस शून्य आहेत. धर्म, देव व स्थानिक परंपरेने चालत आलेल्या पूजा, व्रत वैकल्ये हे सगळे वेगवेगळे आहे याची पहिल्यापसून पाल्याला जाणीव करून दिल्याने अमुक एक व्रत पालन म्हणजे धर्म पालन हा गोंधळ डोक्यात नाहीये.

सिंजी, तुम्ही फक्त निधर्मि झालात का नास्तिक देखील? नास्तिक झाला असाल तर निधरमी व नास्तिक एकत्रच झालात की टप्प्या टप्प्याने?

२०१७ वय ३१
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त !
>>>
+१११

धर्म स्वतः आणि विधात्याच्या मधे ठेवला आणि त्यावतिरिक्त त्याचा इतर कोणालाही त्रास होऊ नये एवढे एकदा ठरवले तर मग कोणताही धर्म असायला हरकत नाही.

धर्म स्वतः आणि विधात्याच्या मधे ठेवला आणि त्यावतिरिक्त त्याचा इतर कोणालाही त्रास होऊ नये एवढे एकदा ठरवले तर मग कोणताही धर्म असायला हरकत नाही.
>>>
समजा मी एक धर्म 'मानतो' आणि एक 'विधाता' (सर्वशक्तिमान अथवा 'सर्वनिर्माता') आहे असेदेखील मानतो. आता त्या विधात्याने मला सांगितले की मला जो मानत नाही त्याचा खून कर. जर मी विधाता मानला तर त्याचा शब्दपण मानला पाहिजे.
जर विधात्याचा शब्द नाही मानला तर मग विधाता/सर्वशक्तिमान कुणी आहे यालाच काय अर्थ उरत नाही. कारण तुम्ही स्वतःची बुद्धी वापरून निर्णय घेत आहात, मग तिथे विधाता अन धर्म कशाला हवा?

तेव्हा तुमचे वरचे वाक्य कितीही सद् असले तरी पोकळ आहे.

तेव्हा तुमचे वरचे वाक्य कितीही सद् असले तरी पोकळ आहे. <<<< धन्यवाद टवणे सर...
(विधाता मला कुणाचे अमुक कर , कुणाचा खून कर, वगैरे सांगत नाही... त्यामुळे मी तसे म्हणालो.. कुणाला सांगत असेल तर 'इतर कोणालाही त्रास होऊ नये' हे वाक्य मी मानतो.. )

२००२ गोध्रा ट्रेन घटनेने पेपर पुढे गेला आणि पास होणार यातील (असलाच तर) स्वार्थी विचाराने निधर्मी बनायला सुरुवात. आणि मग २००४ मध्ये फर्राट चर्चा (कोणत्या ते काही सांगितलच नाही तुम्ही) आणि मग डायरेक्ट २०१७ ला डकिन्सला संलग्न.
यामध्ये काही झालं असेल ना? ते लिहिलत तर वाचायला आवडेल आणि समजेल की नक्की काय झालं ते.

श्री. सचिन पगारे यांच्या प्रतिसादास अनुमोदन.
हिंदू तत्वज्ञानात एकच देव आहे व तो फक्त श्रद्धा पूर्वक स्मरण करणार्‍याकडेच लक्ष देतो, बाकी कुणाहिकडे नाही. कुणाची श्रद्धा नसेल, ते मानत नसतील तर त्या देवाचे काहीहि बिघडत नाही. तो तुम्हाला शिक्षा वगैरे काही करणार नाही.
श्रद्धा असणारे जे करतात त्यांच्या वर्तनाचा जगाला झाला तर फायदाच होतो, पण त्रास नाही.
धर्माच्या नावाखाली आचरटपणा करायचा, लोकांना त्रास होईल असे वागायचे, ही आज सर्व जगाची एकच संस्कृति आहे. धर्मावरून वाद घालणे, भांडणे हा त्यातलाच प्रकार.

जर मी विधाता मानला तर त्याचा शब्दपण मानला पाहिजे.
कुणाला विधाता मानायचे? तो काय सांगतो त्याचा अर्थ कळतो का?
कुठल्याच धर्मातल्या विधात्याने काय सांगितले आहे, त्यातले महत्वाचे काय, इ. काही कळत नसेल, तर त्याच्या नावाखाली काहीहि करायचे त्याला काय करणार नि काय बोलणार?
<<'इतर कोणालाही त्रास होऊ नये' >> हे उत्तम.

जीवनात येणारे वेगवेगळे अनुभव, चढ उतार इ. निभावण्यास मनात एक श्रद्धा असली, (ती कुठल्याशा शक्तीवर / कुणीतरी विधाता असेल असे मानून त्यावर, अथवा लोकांनीच निर्माण करुन ठेवलेल्या एखाद्या देवावर) की तो / ती / ती शक्ती पाठीशी आहे, आपण खंबीर राहुन आपले योग्य ते कार्य करत रहावे, तोल ढळु नये, इ. तर ते अशी श्रद्धा ठेवणाऱ्या व्यक्तीच्या मानसीक स्वास्थ्यासाठी फायद्याचेच आहे. पण अशा श्रद्धेचे / आस्तिकतेचे जाहीर प्रदर्शन करत रहाणे, इतरांकडुन त्याची अपेक्षा ठेवणे यात समाजाचे नुकसान आहे.

तसेच अशा श्रद्धेने त्यांना होणारा फायदा / पाळणाऱ्या व्यक्तींसाठी त्याचे महत्व लक्षात न घेता आपल्या नास्तिकतेचे जाहीर प्रदर्शन करत रहाणे यात सुद्धा समाजाचे नुकसान आहे.

समजा तुम्ही एक क्ष धर्म मानता.
सकाळी चहा पिता पिता तुम्ही पेपर वाचत आहात. एक बातमी असते की नायजेरीयातील एका शहरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. चार ईकडचे मेले, चाळीस तिकडचे मेले. तुम्ही ती बातमी वाचून आपल्या स्वभावानुसार कमीजास्त हळहळ व्यक्त करता किंवा काय हा मुर्खपणा असे पुटपुटता आणि टोस्टचा तुकडा चावून पुढच्या बातमीकडे वळता.
पुढची बातमी असते की झेकोस्लोवाकियामध्ये "अ" आणि "क्ष" धर्मामध्ये तुंबळ हाणामारी. चार अ मेले आणि चाळीस क्ष मेले. आता मात्र ही बातमी तुमच्यासाठी जगातल्या एका कोपरयातील राहिली नसते. तुम्ही तिच्याशी रिलेट झाला असता. कारण तुमच्या क्ष धर्माचे लोकं त्यात मेले असतात. ज्या लोकांना तुम्ही कधी पाहिले नाही आणि जे चांगले की वाईट हे देखील तुम्हाला माहीत नाही त्या क्ष लोकांबद्दल तुम्ही हळह्ळता आणि त्या अ लोकांना मनोमन शिव्याही देता.

आता पुढची बातमी,
मराठवाड्यात तणाव - ब आणि ड जातीच्या लोकांमध्ये तुंबळ हाणामारी.
आता या बातमीतल्या ब आणि ड या दोन्ही जाती तुमच्या धर्मातीलच असतात. पण तुमच्या जातीतील नसतात. त्यामुळे तुम्हाला आपल्या देशातील आणि धर्मातील लोकं आपसात भांडत आहेत हे बघून हळहळ वाटली तरी तुम्ही याकडे तटस्थ नजरेने बघू शकता. पण तेच जर त्यात तुमच्या क जातीचे भांडण असते तर तुमच्या भावना आणि मनात आलेले विचार वेगळे असते.

मॉरल ऑफ द पोस्ट - जेव्हा तुम्ही एखादा धर्म वा जात मानता तेव्हा स्वत:ला एका गटाशी जोडता. आणि त्या गटाच्या हित अहिताचा विचार करता. तसेच हा विचार कधीच तटस्थ नसतो, तर पारडे स्वकीयांच्या बाजूने झुकलेले असते.

हा मानवी स्वभाव आहे. तुम्ही यात काही गैर करत नाही. फक्त जे कोणतीही जात, धर्म मानतात त्यांनी मी समता, समानता, बंधुभाव पाळतो असा दावा करू नये ईतकेच.

झेकोस्लोवाकियामध्ये "अ" आणि "क्ष" धर्मामध्ये तुंबळ हाणामारी. चार अ मेले आणि चाळीस क्ष मेले. आता मात्र ही बातमी तुमच्यासाठी जगातल्या एका कोपरयातील राहिली नसते.
>>>

बरोबर आहे. असा देश आज जगात अस्तित्वात नसल्याने ती बातमी जगाच्या कुठल्याच कोपऱ्यात राहिलेली नसते

हिंदू तत्वज्ञानात एकच देव आहे व तो फक्त श्रद्धा पूर्वक स्मरण करणार्याकडेच लक्ष देतो, बाकी कुणाहिकडे नाही. कुणाची श्रद्धा नसेल, ते मानत नसतील तर त्या देवाचे काहीहि बिघडत नाही. तो तुम्हाला शिक्षा वगैरे काही करणार नाही. >>>>+१११
आस्तिक नास्तिकतेच्या वादातून समाजाचे नुकसानच होते.. कुणी कितीही नास्तिकतेचा पुरस्कार केला आणि आस्तिक असलेल्यांच्या नावानं बोटं मोडले, हातपाय आपटले तरीही परमेश्वर नावाची जी शक्ती आहे, ना तीला काही फरक पडणार ना त्या शक्तीचा अनुभव घेणार्यांना...

ही परमेश्वर नावाची शक्ती सर्व फसादची जड आहे.
एका काल्पनिक संकल्पनेला मानले की मग काहीच सिद्ध करायची गरज उरत नाही. जो तो आपले निकष लाऊन आपले विचार मांडतो आणि भांडत सुटतो.
उदाहरणार्थ मीठ खारट असते की गोड? किंवा दोन अधिक दोन चार होतात की पाच यावर कधीच वाद होणार नाहीत. पण परमेश्वर आहे की नाही ईथपासून तो कसा आहे ईथपर्यंत वाद होतच राहणार. एकमत कधी होणारच नाही. कारण जगातली कुठलीही व्यक्ती समोरच्याला आपण जाणलेला आणि मानत असलेला परमेश्वर हा दोन अधिक दोन चार होतात या पद्धतीने पटवून देऊच शकत नाही. आणि कितीही म्हटले की आम्हाला कोणाला पटवून द्यायची गरज नाही तरी ते तसे नसते. हा मानवी स्वभाव आहे.

हिंदू मरु देत वा मुस्लिम, वेळ मिळाल्याने आपला केमिस्ट्रीचा पेपर यामुळे नक्की सुटणार हा स्वार्थी विचार मनात आला.आपण निधर्मी होत आहोत याची पहील्यांदा झालेली जाणीव. >>> ह्यात निधर्मी पणा कुठे येतो ह्याला पोलिटिकल माईंड म्हणतात
मानवजिंना अनुमोदन

निधर्मी होण्यासाठी नास्तिक होणे अत्यण्त गरजेचे. आपण कितीही म्हटले की धर्म म्हणजे ठराविक प्रथा, परंपरा, आणि जीवनपद्धती.. तरी त्याचे मूळ देव या संकल्पनेला तुम्ही कोणत्या रुपात मानता आणि त्याची उपासना कशी करता हे आहे. त्यावरच आधारीत धर्मांची विभागणी झाली आहे. जर तुम्ही स्वत:ला नास्तिक समजता आणि तरीही एका धर्माला चिकटून आहात तर याचा अर्थ तुमचे नास्तिकतेबद्दलचे कन्सेप्ट गंडले आहे. तुम्ही नास्तिक नाही आहात.

<हिंदू तत्वज्ञानात एकच देव आहे व तो फक्त श्रद्धा पूर्वक स्मरण करणार्याकडेच लक्ष देतो, बाकी कुणाहिकडे नाही. कुणाची श्रद्धा नसेल, ते मानत नसतील तर त्या देवाचे काहीहि बिघडत नाही. तो तुम्हाला शिक्षा वगैरे काही करणार नाही.>

हे कळलं नाही. देव एखादा शाळाचालक आहे का , की जो फक्त त्याच्या शाळेत प्रवेश घेणार्‍यांचाच विचार करतो? त्याच्या शाळेत नसलेल्यांशी किंवा जे त्याची शाळा सोडून गेलेत त्यांच्याशी, त्याला काहीच देणं घेणं नसतं?

न केलेली शिक्षा नक्की कशासाठी? या शाळेत प्रवेश न घेतल्याबद्दल? पण मग या शाळेत प्रवेश घेऊन केलेल्या चुकांबद्दल तो शिक्षा करतो का? चुका = आपल्याच शाळेतल्या दुसर्‍या मुलांना किंवा दुसर्‍या शाळेतल्या मुलांना त्रास देणे. शाळेत कसे वागावे याचे नियम देवानेच ठरवून दिलेत असे बहुश: मानले जाते. ते त्याने स्वतः तुम्हाला सांगितले नसले, तरी त्याने कधीतरी कोणाच्या तरी कानात सांगितले होते आणि त्यांनी ते लिहून ठेवलेत. त्या नियमांत बदल होऊ शकतो का?

(उद्धरण हिंदू धर्माबद्दल असले तरी प्रश्न सगळ्याच धर्मांच्या देवांबद्दल लागू पडतात. बाकीच्या काही धर्मांचे देव आपल्या शाळेत न येणार्‍यांना शिक्षा करतात असे काहींना वाटते).

<जीवनात येणारे वेगवेगळे अनुभव, चढ उतार इ. निभावण्यास मनात एक श्रद्धा असली, (ती कुठल्याशा शक्तीवर / कुणीतरी विधाता असेल असे मानून त्यावर, अथवा लोकांनीच निर्माण करुन ठेवलेल्या एखाद्या देवावर) की तो / ती / ती शक्ती पाठीशी आहे, आपण खंबीर राहुन आपले योग्य ते कार्य करत रहावे, तोल ढळु नये, इ. तर ते अशी श्रद्धा ठेवणाऱ्या व्यक्तीच्या मानसीक स्वास्थ्यासाठी फायद्याचेच आहे. पण अशा श्रद्धेचे / आस्तिकतेचे जाहीर प्रदर्शन करत रहाणे, इतरांकडुन त्याची अपेक्षा ठेवणे यात समाजाचे नुकसान आहे.

तसेच अशा श्रद्धेने त्यांना होणारा फायदा / पाळणाऱ्या व्यक्तींसाठी त्याचे महत्व लक्षात न घेता आपल्या नास्तिकतेचे जाहीर प्रदर्शन करत रहाणे यात सुद्धा समाजाचे नुकसान आहे.>

इथे 'आपले योग्य ते कार्य' हा कळीचा मुद्दा आहे. माझ्या धर्मात सांगितलेल्या गोष्टी (इतरांकडून) पाळल्या जात आहेत की नाही, हे पाहणे हे माझे 'योग्य कार्य' असू शकते की नाही?

मानसिक स्वास्थ्यासाठी की मानसिक दुर्बलता टिकून राहण्यासाठी?

<आस्तिक नास्तिकतेच्या वादातून समाजाचे नुकसानच होते>

आस्तिक नास्तिकांच्या वादांत झालेच तर नुकसान नास्तिकांचे अधिक होते (असे मला वाटते)

इतर वेळी नास्तिकांच्या विरोधात एकत्र येणारे सगळ्या प्रकारचे आस्तिक आपापल्या आस्तिकतेच्या कल्पनांसाठीच एकमेकांशी वाद घालत आल्याचे दिसले नाही आणि त्याने झालेले नुकसान या आस्तिक नास्तिक वादाने झालेल्या नुकसानाच्या तुलनेत प्रचंड आहे. नाहे का?

निधर्मी होण्यासाठी नास्तिक होणे गरजचे आणि नास्तिक असणे म्हणजे निधर्मी असणे या दोन्ही गोष्टी पटल्या नाहीत.

समजा माझा कोण्या सर्वश्रेष्ठ शक्तीवर विश्वास आहे. पण ही शक्ती वेगवेगळ्या धर्मांनी सांगितलेले कोणतेही रूप घेत नाही. धर्म हे माझ्या मते या जगात जगण्याचे नियम सांगतात. ते नियम मी माझ्या कल्पनांनुसार ठरवतो, की धार्मिक नियमांपेक्षा वेगळा नियमसंच पाळतो. उदा: भारतीय घटना. तर मी आस्तिक असूनही निधर्मी असू शकतो.

दुसरीकडे मी सगळ्या धर्मातले देव मानत असेन, त्यांची उपासना त्या त्या धर्मात सांगितल्याप्रमाणे करत असेन, तर माझा धर्म नक्की कोणता? (आता काही धर्मांत हाच एक देव माना, दुसरा नाही, असे सांगितलेले असते, असेही काहींचे म्हणणे असते, पण हे शेवटी माझ्या समजण्यावरच आहे. नाही का?)

या उलट धर्मात राहूनही नास्तिक होता येत असावे . हे मी फार वरवर वाचलंय, त्यामुळे खात्रीने आणि नीट लिहिता येणार नाही. पण चार्वाकाचे तत्त्वज्ञान नास्तिकतेचा अंतर्भाव करते आणि तो वैदिक धर्माचा भाग आहे. बौद्ध धर्मातही ईश्वर मानत नाहीत (?)

योग्य ते कार्य हे मानवतेच्या दृष्टीने योग्य ते कार्य.

आता मानवता म्हणजे काय? नैतिकता म्हणजे काय? आणि हे ठरवणारे कोण? हा मुद्दाही येउ शकतो. तर तुमची स्वत:ची सध्या असलेली मानवतेची व्याख्या गृहीत घ्या.

इथे "माझ्या धर्मात" चा प्रश्नच उद्भवत नाही, ते करणे म्हणजे आपल्या श्रद्धेचे / आस्तिकतेचे जाहीर प्रदर्शन आणि इतरांकडुनही त्याची अपेक्षा झाले. त्यामुळे तुम्ही दिलेल्या उदाहरणातून समाजाचे नुकसान दिसून येते.

<आता मानवता म्हणजे काय? नैतिकता म्हणजे काय? आणि हे ठरवणारे कोण? हा मुद्दाही येउ शकतो. तर तुमची स्वत:ची सध्या असलेली मानवतेची व्याख्या गृहीत घ्या.>

मग हे सांगायला धर्म कशाला हवा? म्हणजे मानवतेच्या , नैतिकतेच्या दृष्टिकोनातून योग्य अयोग्य काय, हे मीच ठरवणार, तेवढी समज मला आहे; तर त्याल मी मानवता /नैतिकताच का म्हणून नये? धर्मच का म्हणावे? (धर्म = रिलिजन)

मी धर्म हवा किंवा त्याला धर्म म्हणावे / मानावा असे म्हटले नाही, भरत.
मानवता / नैतिकता नक्कीच म्हणु शकता.
मी धर्म हवा किंवा त्याला धर्म म्हणावे / मानावा असे म्हटले नाही, भरत.
मानवता / नैतिकता नक्कीच म्हणु शकता.
श्रद्धा ही एक वैयक्तीक बाब आहे. ती ठेवावी की नाही ही ज्याची त्याची मर्जी, तसेच त्याचा कुणाला फायदा होईल की नाही हे व्यक्ती-व्यक्तीवर अवलंबून आहे, कुठल्या वातावरणात वाढले / रहातात यावर सुद्धा.

Pages