चूक भूल द्यावी घ्यावी - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 25 December, 2016 - 11:16

चूक भूल द्यावी घ्यावी ही नवी मालिका झी मराठीवर १८ जानेवारी पासून चालू होतेय. तर, चर्चेकरता हा धागा... Happy
कलाकार -
सुकन्या मोने - कुळकर्णी : मालती
दिलिप प्रभावळकर : राजाभाऊ
प्रियदर्शन जाधव : तरूणपणीचे राजाभाऊ
सायली फाटक : तरूणपणीची मालती
नयना आपटे : राजाभाऊंची आई

ही मालिका चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी विनोदी नाटकावर आधारीत आहे.
लेखक - मधुगंधा कुळकर्णी, दिग्दर्शक - स्वप्निल जयकर, निर्माती - मन्वा नाईक

विकी पेज इथे पाहाता येईल

ओझी वर सगळे भाग पाहाता येतील...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती ही काही भांडायला कमी नाही दाखवलीय! कडाकडा भांडण दाखवल नानीच आणि कुंदीच्या सासूचं परवाच्या (बुधवार) भागात...!

तरुण पणीची मालू चेहेर्‍यावर तेच ते भाव घेऊन वावरते...सतत नाक उडवून , डोळे बारीक करुन....बोलायचं......! सेम एक्सप्रेशन्स!
सिनिअर राजाभाऊ -मालूंना तर काही कामच नाही विशेष. फक्त आठवणीत रमायचं!
डायलॉग्ज मात्र मस्त चुरचिरीत.

हो ना, संपतेय ही मालिका. अर्थात तिचा जीव छोटाच होता म्हणा पण छान रंगली, आवडली. यंग बोक्या मालू आणि नयना आपटे आत्ताच्या काळातली जास्त आवडले.

नकटी लग्न नाही का संपणार, ती आवडली नाही आणि बघितलीही नाही कधी.

छान होती मालिका. काही एपिसोड्स तर अगदी हहपूवा होते अलीकडे. नानी माझ्या फेवरिट- त्या या मालिकेच्या सचिन तेंडुलकर - काय तुफान फटकेबाजी.
खुकखू, कादिप, नकटीच्या, मानबा अशा एकसोएक भयाण वाईट मालिका चालू आणि चुकभूल बंद??
सध्या टीआरपीमध्ये मानबा, तुझ्यात जीव, कादिप, हवा येऊ द्या आणि चुकभूल आघाडीवर आहेत. चान्गले टीआरपी असून का बंद होतेय???

अय, अजून नव्या शिरेलीची अ‍ॅड आलेली नाही. >>> आला प्रोमो नवीन. मी सोताच्या डोळ्याने बघितला. वरती लिंक दिलीय बघा कच्चा लिंबू यांनी.

मालिका सुरू होतानाच मालिकाकर्त्यांनी तु मर्यादित भागांची आसेल हे.सांगितलेलं. मग राग खशाला?

भरत मर्यादित भागांची असेल हे मान्य. पण शेवटी अगदी गाशा गुंडाळल्यासारखं करतात ते खटकतं... बाकी काही नाही.
तशी मस्त चालू होतीच की

नकटीपण मर्यादीत भागांचीच आहे असं सांगितलेलं. नकटीचं लग्न शेवटी त्या आतेभावाशीच होणार पण अनेक अ‍ॅक्टर्स आणून पिदवणार तोपर्यंत. असो, बघत नाही मग काहीही करोत.

खरय! नानिचा कर्कशपणा सोडला तर मालिका आवडत होती, सुरवातिला खटकलेले काही पॉइन्ट (मोने बाइच चालण,ओठ हलवण, नानीच वय ई) नतर सवयिचे झाल्यावर ब्लर वाटत होते... अजुन आवडली असती बघायला.

प्रियदर्शनने केलेली स्त्री भूमिका नाही आवडली. दिलीपची बायको त्याच्या मुलीच्या वयाची दिसत होती. शेवटचा भाग चांगला होता. बाकी ह्या मालिकेबरोबर फारच दुजाभाव केला, कधी प्रोमो नाहीत, रविवार दुपारचे रिपीटसुद्धा बंद केले होते.

काही धक्का नाही. सुमो व्हिसासाठी जायला तयार नव्हती, दिप्रच्या मनात नाही म्हणून पण दिप्र तयार झाले मग व्हिसासाठी गेले. तोपर्यंत मुलगा सून घरी आले आणि एक इमोशनल सीन झाला बाप लेकात आणि दोघांनी आपल्या चुका, एकमेकांचं महत्व मान्य केलं. नानी आणि कुसुम पण जाणार इंग्लंडला हे ठरलं. मग मुलगा फॅमिलीसकट येणार भारतात हे ठरलं . त्याने मुलांवर मराठी संस्कार केलेत, मुलं मराठी बोलतात आणि तो सर्व सणवार, भारतीय संस्कृती टीकवून आहे, हे ऐकून दिप्रला आनंद झाला. कहाणी सुफळ संपुर्ण Wink .

त्या चुकभुलच्या पेजवर लिहीलंय की आम्ही परत येऊ .

त्या यंग बोक्या मालूला लगेच कलर्स मराठीची जीएसटी ही सिरीयल पण मिळाली, जी आजपासून आहे.

आधी प्रियदर्शन आवडायचा नाही पण शेवटी आवडायला लागला होता तर मालिकाच बंद झाली. त्याने स्रीपात्र काय ग्रेसफुली केलं hats off to him for that!

सुमोंचा अभिनय शेवटच्या भागात झकास. सतत बायकोचा हिरमोड करणा-या दिप्रंचा शेवटी शेवटी राग यायला लागला होता. सतत आपलं मी नाही येणारचं तुणतूणं. त्याऊलट नानींचा ऊत्साह. सर्वात व्रुद्ध स्री म्हणून गिनीज बुकात जाणार तेही नविन साडी नेसून. सर्वांना मिस करणार. लवकर या म्हणावं परत.

Pages