मायबोलीचं नूतनीकरण पूर्ण

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मायबोलीच्या गाभ्याचं नूतनीकरण पूर्ण झालं आहे. हे फक्त अंतर्गत प्रणालीचं नूतनीकरण असल्याने सभासदांच्या नेहेमीच्या वापरावर (User experience) काही फरक होऊ नये.
नूतनीकरणाचा एक अगोदर लक्षात न आलेला परिणाम (side effect) म्हणजे तुमची विचारपूस आता सदस्यखात्यात गेली आहे. ती पूर्वीसारखी कशी दाखवता येईल यावर प्रयत्न चालू आहेत.

जर तुम्हाला काही बदल/अडचणी जाणवल्या तर त्या आम्हाला कळवा.

विषय: 
प्रकार: 

<<>>

अ‍ॅडमीन महाशय ,
आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत , आता दिवस कसा त्या अ‍ॅड मधे दिसणार्‍या रसरशीत आवळ्या सारखा रसरशीत जातो.:)

अगदी अगदी.

ती अ‍ॅड(दातांची) खूपच किळसवाणी. (हि सुचना म्हणजे अती वाटेल पण शक्य झाले तर बरे होइल.) जेवून वगैरे माबो वर बसले की ती अ‍ॅड दिसते.)

नूतनीकरणानंतर 'माझ्यासाठी नवीन' आणी 'ग्रुपमध्ये नवीन' या विभागांमध्ये काही फरक दिसत नाही. पुर्वी बीबी वाचला की परत नवीन मेसेज येइपर्यंत 'माझ्यासाठी नवीन' या विभागातून तो बीबी जात असे. तसे परत करण्याचा विचार आहे का?

प्रत्येक पानावर दिसणार्‍या प्रतिसादाच्या खिडकीत (आणि नवीन लेखन करताना दिसणार्‍या खिडकीत) सुधारणा केल्या आहेत.
१. "?" बटनावर टिचकी मारल्यावर पूर्वीप्रमाणे देवनागरीकरण करण्याचा तक्ता उपलब्ध आहे.
२. देवनागरी(मराठी)/रोमन (इंग्रजी) अदलाबदल करण्यासाठी पूर्वीसारखे बटन उपलब्ध आहे.
३. मॅक, क्रोम आणि लिनक्स वापरणार्‍या मायबोलीकराना थेट देवनागरीत लिहायला अडचण येत होती. त्यांच्यासाठी नवीन बटन दिले आहे. त्यावर टिचकी मारल्यावर जुन्या मायबोलीत असल्याप्रमाणे खिडकी उघडून एका भागात रोमनमधे लिहून दुसरीकडे देवनागरीत दिसेल

विचारपूस आता पहिल्या पानावर दिसण्याची व्यवस्था केली आहे. जर तुमच्या विचारपूशीत नवीन संदेश असेल तर पहिल्या पानावर खाली (जिथे खरेदी विभागाची जाहिरात असते) तिथे तुम्हाला किती संदेश आले आहेत हे दिसू लागेल.

अ‍ॅड्मिन,
पुर्वी एखाद्या लेखा/कविता/चित्र या वर जेव्हा प्रतिसाद येत ,त्या सगळ्यांचे आयडी निळ्या रंगाच्या पट्टीत आणि ज्याचे लेखन किंवा कलाकृती आहे त्याचे प्रतिसाद वेगळ्या रंगात ( लाल?) यायचे, त्यामुळे लेखकाला किंवा ज्याची ती कलाकृती आहे, त्याला काय म्हणायचेय ते लगेच कळायचे, आता जरा शोधायला लागतं. ति पध्दत चांगलि होति.
धनु.

अ‍ॅडमिन टीम
अजुनही विचारपूस माझे सदस्यत्व मध्ये जावुनच बघावी लागतेय, तुम्ही म्हणता तसे पहिल्या पानावर खाली कुठेच संदेश येत नाहीए नवीन विपू आली असा.

जर विचारपूसमध्ये एखादी नवीन नोंद आली असेल तरच मायबोलीच्या फक्त पहिल्या पानावर (मुख्यपृष्ठावर) उजव्या बाजुला खाली त्याचा दुवा दिसतो.

हो, दिसते. पण यामुळे प्रश्न सुटला नाहीच. 'सदस्यत्व' मध्ये जाण्याऐवजी पहिल्या पानावर जावे लागेल. Happy
पूर्वीसारखी लिन्क देता आली तर बरं होईल.

मायबोलीच्या फक्त पहिल्या पानावर (मुख्यपृष्ठावर)<< इथं घोळ आहे हो. सगळ्या पानांवर विपु वाचेपर्यंत हे दिसत राहील असं काही करा ना प्लीज!

सदस्य विचारपुस एकदम लॉग इन केले कि, लगेच दिसु लागली आहे. पुर्वे सदस्य खात्यात गेलो कि मग दिसायची.

छान आहे.

पण ते सदस्य खाते, माझे सदस्यत्व .......अन विचारपुस ह्यात जास्त अंतर पडले आहे.

हल्ली मला 'अजून वाचायचय' मध्ये काही बा.फ. लागोपाठ दोनदा दिसत आहेत. पण सगळ्या बा.फ. च्या बाबतीत हे घडत नाहिये. असे मागच्या आठवड्यापासून व्हायला लागले आहे.

अरेच्च्या? नुतनीकरण पूर्ण झाल??? कधी???? कस?????? (आश्चर्याने आ वासलेला चेहरा Wink )
मग...
अहो रन्गित अक्षरे कुठे मिळतील?
पूर्वीसारखे टेबल कसं टाकता येईल?
डायरेक्ट पेनने लिहीणे वा चित्र काढणे कधी शक्य होईल?
फ्रेण्ड्स लिस्टचे काय होतय?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे इग्नोरच्या सुविधेचे काय???

अरे 'त्या त्रस्त समंधाच्या' पांढर्‍या शाईचे आणि रंगीत अक्षरांचे काही केले की नाही ? नाहीतर रोजचीच कटकट व्हायची ...

Pages