Submitted by अक्षय. on 5 July, 2017 - 06:35
पाऊस
थेंबाने मातीचा सुगंध चहूकडे दरवळवणारा
निसर्गाला हिरवळीने बहरवणारा
बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा
धो धो कोसळणारा खुदकन हसवणारा
अंगावर शहारे आणणारा चिंब भिजवणारा
चहाचा घोट नवा वाटणारा कांदाभजीला चव देणारा
कागदाच्या होडीबरोबर वाहणारा
शाळेभोवती तळे साचून सुट्टी देणारा
खिडकीतून हळूच खुणावणारा
खोटे पैसे घेऊन खरा येणारा
सर्वाना हवाहवासा वाटणारा
प्रेमाला हाक देणारा
ओल्या नजरांना प्रेमात पडणारा
एकाच छत्रीत जवळ आणणारा
पाऊस ..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा!!! काय मस्त आणि सुरेख
व्वा!!! काय मस्त आणि सुरेख वर्णन केलंस अक्षय... मन तृप्त झालं.
मस्त .........
मस्त .........
कवितेनेच मन तृप्त केलं अगदी......
मन तृप्त झालं......खुप मस्त
मन तृप्त झालं......खुप मस्त वाट्ल.
सुंदर आणि बहारदार
सुंदर आणि बहारदार
अक्षयच्या कविता खुप साध्या
अक्षयच्या कविता खुप साध्या सरळ अन् सहज असतात त्यामुळे खुप छान वाटतात.
छान !
छान !
खिडकीतून हळूच खुनावणारा की खुणावणारा ?
सुंदर ..
सुंदर ..
कवितेनेच मन तृप्त केलं अगदी>>+ १११
राहुल, कावेरी, डब्बू, पंडितजी
राहुल, कावेरी, डब्बू, पंडितजी, चैत्राली उदेग, शेखर आपल्या प्रतिक्रियांबद्दल खूप धन्यवाद.
चैत्राली उदेग बदल केला आहे धन्यवाद मागेही असाच घोळ झालेला न ला ण ण ला न नेहमीच झालंय आता
अक्षयच्या कविता खुप साध्या सरळ अन् सहज असतात त्यामुळे खुप छान वाटतात. >> याच साठी केला होता अट्टहास अवांतर असाच एक प्रतिसाद मागे च्रप्स यांनीही केला होता पुनश्च धन्यवाद वाचत रहा..
ओघवती साधी भाषा खूप आवडली.
ओघवती साधी भाषा खूप आवडली.
अक्षय, मस्तय पाऊस!
अक्षय, मस्तय पाऊस!
वृंदा , कृष्णाजी धन्यवाद..
वृंदा , कृष्णाजी धन्यवाद..
छान .......
छान .......
धन्यवाद
धन्यवाद..
आता पावसात भिजयची इच्चा झाली.
आता पावसात भिजयची इच्चा झाली... मस्त कविता
धन्यवाद च्रप्स
धन्यवाद च्रप्स
सहज सुंदर कविता!!
सहज सुंदर कविता!!
धन्यवाद सायूरी
धन्यवाद सायूरी
छान, सरल व सहज
छान, सरल व सहज
धन्यवाद..
धन्यवाद..