लहानपणीचे संस्कार! .... (भाग -१)

Submitted by मेघा. on 12 July, 2017 - 08:31

काल एका गप्पांच्या धाग्यावर राहुल ने चोरी करण्यासंबंधी एक प्रतिसाद दिला होता..आपल्या घरातल्या,आजूबाजूच्या वातावरण नुसार आपण कसे घडलो जातो .. आपल्या स्वभावात ,वागण्यात त्याचा कितपत परिणाम होतो..याच ते उदाहरण होतं.. तेव्हा मलाही माझ्या लहानपणीचा एक प्रसंग आठवला ....तो इथे शेयर करतेय.. असे बरेच आहेत आज एक ...

लहान मुलांवर आपण जसे संस्कार करू,किंवा त्यांच्यासमोर आपण जसे वागतो ..त्याच ते अनुकरण करत असतात..काय योग्य काय चूक याची जाणीव त्या वयात नसते .मातीला (चिखलाला) आपण जसा आकार देऊ तसा तो तयार होतो..तसच या छोट्यांचं पण असतं...आपल्याला घडवण्यात बऱ्याच लोकांचा त्यात हाथ असतो. आई-वडील ,नातेवाईक ,शिक्षक ,मित्र-मैत्रिणी,किंवा मग् अगदी एखादी व्यक्ती ५ मिनिटांसाठी जरी भेटली तरी ती काहीतरी शिकवून जाते..
माझ्या आत्याचाही यात मोलाचा वाटा आहे,जिचे उपकार/तिने केलेले संस्कार मी कधीही विसरू शकत नाही...
चला आता खूप झाल्या गप्पा.. डायरेकट मुद्द्याला हात घालते...
मी लहान असताना (अजूनही लहानच आहे म्हणा Proud ) ,६ वर्षांची असेल बहुतेक.कारण मला अजूनही सगळं काही आठवतंय....

मी दहावर्षांची होईपर्यँत माझ्या आत्याकडे होते..पाचवीपर्यंत तिच्याकडेच शाळा झाली माझी.
तर एकदा असा एक प्रसांग झाला .. ज्यातून मी एक धडा शिकले म्हणा किंवा लहान वयात चांगले संस्कार झाले म्हणा..
माझ्या आत्याचं किराणा मालाचं दुकान होतं त्यावेळी,तीच ते चालवायची .माझी चुलत बहीण (नाव नाही सांगत) आली होती एकदा ..ती मोठीये माझ्यापेक्षा ..तर मी शाळेतून आल्यावर तिने मला बोलावलं आणि बोलली कि तू ना आत जा आणि गल्ल्यातून ५ रुपये घेऊन ये,आपण दुसर्या दुकानातून काहीतरी खायला आणू गुपचूप ,मी आधी तयार नाही झाले पण तिने काय जादू केली काय माहीत पण नंतर मी तयार झाले..अक्कल नव्हती ना...ती माझ्याबरोबर आली सुद्धा नाही ..मला पुढे केलं.. Angry
मग मी थोडासा अंदाज घेतला आणि गेले ना दुकानात पैसे चोरायला..गल्ल्यातून ५ रुपये चोरले सुद्धा , पण त्याचवेळी आत्या तिथे आली आणि तिने मला पकडलं..मग काय जे रडायला सुरुवात केली विचारता सोय नाही,पण बिचारी मला ओरडली सुद्धा नाही .पण तिने घडलेला /मी केलेला प्रताप मात्र दादांच्या कानावर घातला .दादा आमचे खूप रागीट आहे(पण मनाने खूप हळवे आहेत..फणसासारखे) ,मला तर जाम भीती वाटते बाबा . दादा आले,आत्याने आधीच सांगितलं काय मारू -बिरू नको पोरीला ,फक्त समजावून सांग ..मग सभा भरली ,ज्यामध्ये माझ्या ३ आत्या,दादा,आत्याची मैत्रीण + तिच्या बरोबरचे दोघे जण यांनी अगदी मनापासून भाग घेतला...आता फक्त मला हजेरी लावायची होती ,मला बोलावण्यात आलं.मी आधीच थरथर कापत होते.. मी आत गेले .
आरोपीला जशी विचारपूस होते..अगदी तशी माझी पण विचारपूस झाली ..असं का केलं ,कोणी सांगितलं वगैरे वगैरे..पण माझ्या मुखातून एकही शब्द येत नव्हता..शेवटी दादांनी अशी एक कानाखाली ठेऊन दिली कि ,दुसऱ्या क्षणाला सगळं बकुन टाकलं ! Lol
थोड्यावेळ शांतता पसरली ..एक आत्या आली माझ्याजवळ (आई बोलते तिला मी),मला जवळ घेतलं..आणि समजावून सांगू लागली ,असं करू नये,चुकीचं आहे हे..तिने (बहिणीने) तुला काहीही सांगितलं तर तू लगेच ऐकणार का..काय बरोबर काय चूक कळायला नको.. हेच शिकवलय का तुला ?? शाळेत जातेस तु ??परत असं करायचं नाही ..
पण दादांचं समाधान एवढ्यावर नव्हतं होणार ,बोलले नाही माफ़ी माग आत्याची(मोठ्या आत्याची) सर्वासमोर..सांग तिला चुकलं माझं पुन्हा असं काही नाही करणार,माफ कर म्हणून..मी परत सायलेंन्ट मोड मध्ये,लहान असले म्हणून काय झालं..अपनी भी इज्जत है भै ..सभेसमोर माफी मागायची म्हणजे जरा अतीच नाय कै?? मी खाली मान घालून गप्प .१मिनिटांनी परत आवाज मोठ्ठा झाला..आता मात्र माफीमागण्याशिवाय पर्याय नव्हता ...गेले आत्याजवळ तिचे पाय धरले (खरंच )आणि माफी मागितली ...

आत्याने तर केव्हाच माफ केलं होतं..पण मला माझ्या चुकीची जाणीव व्हावी म्हणून हे केलं...
आज जेव्हा ते सगळे आठवत ..तेव्हा असं वाटत कि जर त्यावेळी आत्या तिथे आली नसती तर??
माझी हिम्मत अजून वाढली असती ...आणि काय माहीत मी काय बनले असते...
त्या एका प्रसंगाने सगळं बदलून टाकलं..मी कधीही अशी घोडचूक केली नाही,विचार हि आला नाही मनात कधी..
आज कोणी घरी येऊन जरी सांगितलं ना कि,तुमच्या मुलीने असं काही केलयं..तर दादाच काय पण एकही नातेवाईक विश्वास ठेवणार नाही..एवढा विश्वास आहे माझ्यावर! Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सचिन जी,अंबज्ञ जी ,राहुल आता खुश ना !
मी जाते बाबा...प्लिज समजून घ्या .... Happy

व्वा! छान लिहीलं..
.मी परत सायलेंन्ट मोड मध्ये,लहान असले म्हणून काय झालं..अपनी भी इज्जत है भै .. >>>
त्या लहान वयात ही असलेला हा attitude आवडला...
Happy

सचिनजी, अंबज्ञजी आपण एकाच धाग्याची अपेक्षा केलींत तर एक दिर्घ मालिका आणलीय आपल्यासाठी!!!
विषय मस्त निवडला...

कावेरि,
खूपच छान!
अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण खूप काही शिकत असतो! आणि घरातले संस्कार हे खरेच खूप मोलाचे असतात त्यामुळे आपल्यात अमुलाग्र बदल होतो! पण खरे सांगू नुसते घरातले संस्कार उपयोगाचे नसतात.. दाखविला जाणारा धाक असेल वा प्रेम असेल, माया ममता असेल ते तुम्ही कोणत्या स्वरूपात (सकारात्मक वा नकारात्मक) स्विकारता ह्यावर तुमची पुढचे वर्तन ठरत जाते. त्यामुळे स्वतःचा स्वभाव हा तुम्हीच घडवित असता!

मुर्तिकार खूप चांगला असतो पण दगड देखिल तितकाच चांगला हवा त्यात 'सप' नको! त्यामुळे आपण किती सकारात्मक कुठलीही गोष्ट स्विकारतो ते आपल्यावर अवलंबून असते!

झकास!!!! आवडलं!!!

प्रथम धाग्याकरिता मेघाचे अभिनंदन!! Happy

आणि सहा वाजता सांगितलेली वेळही अगदी तंतोतंत पाळलीय. हासुद्धा एक संस्काराचाच भाग झाला.

एखादी व्यक्ती ५ मिनिटांसाठी जरी भेटली तरी ती काहीतरी शिकवून जाते.. >>> एक नंबर की बात बोले, भै!!!

कृष्णा जी छान प्रतिसाद..
मुर्तिकार खूप चांगला असतो पण दगड देखिल तितकाच चांगला हवा त्यात 'सप' नको! त्यामुळे आपण किती सकारात्मक कुठलीही गोष्ट स्विकारतो ते आपल्यावर अवलंबून असते! >>> +१११ हे महत्वाचं सांगितलंत. धन्यवाद!

छान ...
तुमची लेखनशैली छान आहे

मेघा/कावेरि,
सुन्दर लेखन आणि व्याकरणबदध!!
वयाच्या १२-१५ पर्यन्त कित्येकजण Abstract thinking (अमुर्त विचार?) करत नाहीत, मग चान्गल नी वाईट फरक करतना मुलान्चा गोन्धळ साहजिक आहे.
छडी लागे छमछम, विद्या येई घमघम!!
धन्यवाद!

छान आवडले,
लहान वयात काय वाईट काय नाही हे कळत नाही. फक्त भिती हा फॅक्टर काय करायचे काय नाही हे बरेचदा ठरवतो.
आमच्याकडे माझे वडिल एक अफाट व्यक्तीमत्व होते, म्हणजे आहेत. त्यांनी कधी जगाला काय वाटेल किंवा जग काय विचार करेल याची पर्वा नाही केली, तर काय चूक आणि काय बरोबर या आधारावरच संस्कार केले.. नाहीतर मी एकूणच जसा बंडखोर स्वभावाचा होतो आणि ज्या वातावरणात, मित्रपरीवारात लहानाचा मोठा झालो ते पाहता, सहज वाहावत गेलो असतो .. आज एक वाह्यात मवाली मुलगा ईतकीच ओळख बनून राहिली असती.. किस्से पुन्हा कधीतरी.. पण घरचे संस्कार खरेच फार महत्वाचे असतात!

मानवी मनाला मोह हा होतच असतो मग ते वय लहान असो कि मोठे.... तरीही हा मोह योग्य कि अयोग्य ह्याची जाणीव होणे महत्वाचे असते आणि ती जाणिव तुम्हाला त्या बालवयात होती हेच महत्वाचे Happy
आपले अनवधानाने घडलेले वागणे चूकच होते हे स्वच्छपणे स्वीकारले तोच क्षण आयुष्यात महत्वाचा - अर्थात चांगल्या मार्गावरील प्रगतीचा !
संस्कार घडणे आणि स्वीकारणे , दोन्ही परस्पर पूरक घटना - अतिशय सहज ओघवत्या भाषेत मांडल्याबद्दल आणि माबो वरील पहिल्या वहिल्या धाग्याबद्दल कावेरी तुमचे अभिनंदन.
पुभाप्र

@अंबज्ञजी, +१११
>>> आपले अनवधानाने घडलेले वागणे चूकच होते हे स्वच्छपणे स्वीकारले<<<<

बर्याच जणांना हे स्विकारणेच जड जाते...

अरे व्वा! छानंच!
गोष्ट तशी साधीच,पण अतिशय चित्रदर्शी,समोर बसून आठवणींच्या गप्पा मारल्याइतकी ओघवती लिहिली आहे,ते खासंच! लिहीत रहा...
अभिनंदन...आणि पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा!

यार कितना इमोशनल किया मेरेको आप लोगोंने.. थँक्यु सो मच.... Happy

राहुल्,अंबज्ञजी , सचिनजी क्रुश्नाजी ,मानव काका, अक्षय्,सत्यजितजी,ऋन्मेष, पाथफाईंडर ,स्मिता ताई, समाधानी,राज्,संशोधक्,कऊ,सायुरी आणि मायबोलीच छोटुस बाळ म्हणजे चिप्स तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार!
सर्वांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिलेत .. Happy
मेरेको इतना टेंशन आया था ना .... कल रात देर तक नींद ही नही आई... Lol आजही घाबरत घाबरत उघडलाय धागा...

वा कावेरि भारि लिहिलंय अगदी खुसखुशीत
सकाळ पेपरमध्ये स्मार सोबती मध्ये सई या नावाने लेख येतात तशी लेखनशैली वाटली

गोष्ट तशी साधीच,पण अतिशय चित्रदर्शी,समोर बसून आठवणींच्या गप्पा मारल्याइतकी ओघवती लिहिली आहे,ते खासंच! लिहीत रहा...
अभिनंदन...आणि पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा!>>>+1111

इश्श... तुमचा प्रतिसाद असा वाचला... Happy
मस्तच कावेरी..खूप छान लिहिलय. अशीच लिहित रहा.
पुलेशु .... इश्श...

मेघा छान लिहिलस ग!

भावनाताई Lol

धन्यवाद इशूताई,पंदितजी ,भावनाताई.. Happy

सकाळ पेपरमध्ये स्मार सोबती मध्ये सई या नावाने लेख येतात तशी लेखनशैली वाटली >>> ती मीच आहे .. Proud
बायदवे,रोज येतात का लेख त्यांचे पंदितजी ???

Pages