मी अनुभवलेलं बीएमएम २०१७- ३

Submitted by माध्यम_प्रायोजक on 8 July, 2017 - 23:25

प्रमुख पाहुणे श्री मनोहर पर्रिकर विशेष भाषण (किनोट स्पीच) करताना.
IMG_2796_mb.jpg

फोटो समीर सरवटे
20170708_100309_1499522614142_001_mb.jpg

Group content visibility: 
Use group defaults

मोरूची मावशी
IMG_2803_mb.jpg
फोटो समीर सरवटे
IMG_2805_mb.jpg

डलास महाराष्ट्र मंडळाने केलेला फ्लॅश मॉब डान्स. २०१९ मधले बीएमएम अधिवेशन डलास ला होणार आहे.

IMG_2821_mb.jpg

फोटो समीर सरवटे
IMG_2818_mb.jpgIMG_2820_mb.jpg

मराठी अंतरी हा शॉर्ट व्हीडीओ कोणी पाहिला का? Happy आमच्या ढोल ताशा पथकाचा त्यात सहभाग होता Happy
पाहिले असेल तर फीड्बॅक द्या नक्की.

>>> अधिवेशन खूप छान झालं..
हे काय, सविस्तर लिहा की. कार्यक्रम कसे होते, (मुख्य म्हणजे) जेवण कसं होतं... Proud Happy

'मराठी अंतरी' त्या सगळ्या चित्रफीतीवर (जवळपास ६० तास) वर कात्री चालवून त्यातून ९ मिनिटांची चित्रफीत तयार करण्याचे काम माझ्या घरी संकलक 'राशी देसाई' ने केले. प्रत्यक्ष बृमम मधे मात्र चित्रफीत बघितली नाही..
सविस्तर लिहा की. <<<<< लिहीणार होतो पण तिथे भेटण्याचा उत्साह कुणालाच दिसला नाही, तेव्हा कोण वाचणार?

Proud मी माध्यम-प्रायोजकाना Text पाठवून 'भेटण्याचे आवताण दिले' .. ते म्हणाले, 'अरे कोण तू? चुकून मला Text पाठवलेले दिसते' Proud

Proud

मग तेच लिहायचं वृत्तांतात.
बीएमेममध्ये कोणी कोणाला पाणी पाजलं आणि कोणाला पाणी मिळालं नाही - आम्ही सगळंच तेवढ्याच आवडीने वाचतो. Proud

परदेसाई Happy

सविस्तर वृत्तांत लवकरच लिहितो. थोड्क्यात खूपच छान आयोजन. चविष्ट जेवण ते पण रांगा न लागता.

मी पाहिलेले प्रयोगः
१. अग्निदिव्य - (बागराज्य) उत्कृष्ट प्रयोग होता.
२. ब्लॅक गेम - (डीसी)
३. संगीत संशयकल्लोळ... (भारत) थोडासा बघितला ठिक ठिक वाटला. (अर्ध्यावर उठून गेलो).
४. घाशीराम कोतवाल - ( NC) छान प्रयोग.. मला आवडला.
५. बेला शेंडे/स्वप्निल बांदोडकर - नवीन गाणी फारशी माहित नसल्याने ठिक वाटला. सिरीयलची Title Songs गाणे अनावश्यक वाटले.
६. मनोहर पर्रीकर - खूप छान भाषण, लोकांना आवडले.
७. महेश काळे : उत्तम गाणे, पण अनावश्यक स्वतःची जाहिरात करणे. मधे मधे मित्र/नातेवाईक यांचे Video लावून छळले.
८. Short films मराठी अंतरीमधे मी/एबाबा वगैरे असल्याने पहायची होती, पण वेळ जमली नाही. आता घरी बसून पाहीन.

बाकी बराच वेळ आमचे नाटक आणि तालिम झाल्याने बाकीचे कार्यक्रम पाहता आले नाहीत.

films मराठी अंतरीमधे मी/एबाबा वगैरे असल्याने पहायची होती, पण वेळ जमली नाही. आता घरी बसून पाहीन.>> आम्हाला पन लिन्क द्या

परदेसाई धन्यवाद. शॉर्ट फिल्म ची क्लिप पब्लिक केलीत तर कळवा. ६० तास ते ९ मिनीटे हे अफाट संकलन आहे!

समीर - डीटेल्स वाचायची उत्सुकता आहे. जेवणाच्या तयारीबद्दलचा लेख आधी वाचलेला होता म्हणून जास्त कुतूहल.

महेश काळे : उत्तम गाणे, पण अनावश्यक स्वतःची जाहिरात करणे. मधे मधे मित्र/नातेवाईक यांचे Video लावून छळले.>>>>> इथे (आम्ही भरभक्कम तिकीट काढून आणि वेळ खर्च करून गेलो होतो तरी) आम्हालाच गायला लावून त्यांनी बरेच छळले होते.. तिथे तर काय त्यांना होम पिचच होता....

सुंदर फोटो, चांगला प्रोग्राम मिसला. एवढे वर्ष मिशिगन च्या जवळ राहत होतो पण मागच्यच महिन्यात अमेरिका सोडली त्यामुळे जमणार न्हवते.

सविस्तर वृत्तांत किंवा कार्यक्रमाचा लिंकच्या प्रतिक्षेत.

महेश काळे : उत्तम गाणे, पण अनावश्यक स्वतःची जाहिरात करणे. मधे मधे मित्र/नातेवाईक यांचे Video लावून छळले.>>>>> इथे (आम्ही भरभक्कम तिकीट काढून आणि वेळ खर्च करून गेलो होतो तरी) आम्हालाच गायला लावून त्यांनी बरेच छळले होते.. तिथे तर काय त्यांना होम पिचच होता....
>>>>>>>>>>> +१०० सहमत. सिड्नी मधे पण हेच झाल

एकूणात फारच ठंडा प्रतिसाद दिसतोय इथे ब म म अधिवेशनाला. समीर चे फोटो का समीर ने काढलेले फोटो यात जरा गोंधळ ऊडाला.. (हलके घ्या!) Happy
पर्रीकर भाषण स्क्रिप्ट वाचायला आवडेल.

>>+१०० सहमत. सिड्नी मधे पण हेच झाल

'चला हवा येऊ द्या' झालं की हे असच होतं.... शेवटी ही आपणच डोक्यावर घेतलेली भूते असतात. Wink

बाकी ६० तास ते ९ मिनिटे हा गिनिज रेकॉर्ड असावा ?

मुळात अश्या बहु खर्चिक व 'प्रदर्शनीय' संमेलनांमूळे नेमके कुणाचे कसले व काय भले होते या प्रश्णाचे ऊत्तर मला सापडलेले नाही. आणि त्यातून अनेक दशके मराठी मंडळे (ऊसगाव, दुबै, आता युके) यांच्या कार्य कारभाराचा अगदी जवळून अनुभव घेतल्याने हा प्रश्ण जरा अधिकच भेडसावतो. Happy
ता.कः अलिकडे लंडन मधिल पहिले जागतिक मराठी संलेनाचा थिम पोवाडा संगीतबध्ध करून व शिवाय स्टेज वर कलाकरांसह स्वतः साजरा केल्यावर मुंबई सकाळ ने ' नंदेश ऊमप ' यांनी पोवाडा सादर करून रसिकांच्या टाळ्या मिळवल्या अशी बातमी छापली होती.. (बाकी इतर बरेच रंजक किस्से आहेतच). त्या ईवल्याश्या कातरणात काही बरीच ऊत्तरे मिळाली होती. Happy (मागाहून नंतर सर्वत्र योग्य बातमी छापून आली होती...)
असो.

सविस्तर लिहा ना वृत्तांत. डीसीचं नाटक भुताटकीवर होतं असं ट्रेलरवरून वाटतय. संशयकल्लोळ रंगलं नाही का एवढं ?

"मराठी अंतरी" म्हणजे काय? : काही वर्षांपूर्वी 'मी मराठी मी मराठी' असे कितीतरी प्रसिध्द कलाकाराना घेऊन एक गाणे तयार केले होते (बहुतेक कौशल इनामदार यानी).. त्या धरतीवर इथे अमेरिकेतल्या मराठी माणसाचे आयुष्य दाखवणारे एक गाणे 'वृंदा खातू' (बाराकर) यांनी लिहिले, ते भारतात स्वरबध्द करण्यात आले, आणि त्यावर विकास फणसळकर (बाराकर) यांने चित्रफित तयार केली. त्यात बरेचसे बाराकर कलाकार आहेत, काही मायबोलीकरही आहेत. या चित्रफितीचे नाव 'मराठी अंतरी' आहे.
आम्हाला पन लिन्क द्या >>>>>> अद्याप ही चित्रफित विश्वष्टकावर टाकलेली नाही, त्यामुळे Link देता येत नाही. माझ्या घरी संकलन झाल्याने (लेकीने केल्याने) मला घरी बसुन बघता येईल.
आम्हालाच गायला लावून मला हा प्रकार आवडतो.. कारण नुसतं शांत बसून ऐकण्यापेक्षा मधे कधीतरी मोठ्याने गायिल्याने झोप/आळस झटकला जातो.
सविस्तर लिहीणार असे Admin नी सांगितल्यामुळे मी काही तुकडे तुकडे लिहीले.. प्रतिक्षा करूया..

Black Game हे डीसीचे नाटक Suspense/Thriller आहे. मुळात नाटकाची दिग्दर्शिका आणि कलाकार माझे जवळचे मित्र आहेत . तेव्हा ते बघायचे मी ठरवलेच होते. 'भुताटकीवर' होतं आणि नव्हतं ही, पण खूप छान प्रयोग झाला. कदाचित भल्या मोठ्या Arena मधे ते रंगलं नसतं, पण एका छोट्या सभागृहात ते चांगलं रंगलं. कलाकारानी खूप ताकदीने काम केलं होतं. एका मृत्यूची तपासणी एवढंच सांगेन.

संशय कल्लोळः एकतर प्रशांत दामले/राहूल देशपांडे असल्याने या नाटकाला भरपूर गर्दी होती. त्यात Arena मधे न करता एका मोठ्या Theater मधे हे नाटक दोनदा केले गेले. मला मिळालेली सीट ४थ्या मजल्यावर असल्याने ते खूप लांब काहितरी चालले आहे असे वाटत होते, त्यामुळे कंटाळा आला आणि मी उठून गेलो. दुसर्‍या दिवशी पुन्हा नाटक होते, तेव्हा माझेही नाटक (तमाशातील तमाशा) Arena मधे चालू होते, त्यामुळे नक्की 'संशय कल्लोळ' चांगले होते की नाही ते कळले नाही.

बृमम जेवणः व्यवस्था उत्तम होती. भरपूर Stalls असल्याने आणि जेष्ठ नागरिकांसाठी वेगळी व्यवस्था असल्याने जेवणासाठी रांगा नव्हत्या.
प्रत्येक वेळच्या जेवणात वरणभात असला तरी इतर कितीतरी पदार्थ होते. मालवणी (कोलंबी भात, चिकन, सोलकढी), नागपूरी, पावभाजी, भाजीपूरी, श्रिखंडपुरी, पाटवड्या, कोथिंबीर वड्या, रगडा पॅटीस असे कितीतरी प्रकार होते. जेवण वेळेवर दिले गेले.
एकच तक्रार.. आपण जेवायला १५/२० मिनिटे उशीरा पोहोचलो (म्हणजे ७:०० ते ८:३० अशी वेळ ठरली असताना ७:२० ला) तर फक्त २ किंवा ३ Stall चालू आणि काही पदार्थ संपलेले. मला रगडा मिळाला पण पॅटीस नाही, तर बायकोला पाव मिळाला पण पावभाजी नाही.
इतर बरेच पदार्थ असल्याने गैरसोय झाली नाही.
बाकी जेवण आवडणे न आवडणे प्रत्येकावर अवलंबून. कांदेपोहे/उपमा/शिरा वगैरे राजभोगची Ready Made Heat it/Eat It पाकिटाचे केले होते असे कोणीतरी सांगितले.
निघतानाचा Packed Lunch काय असावा याचे जेष्ठ नागरिकांचे मत वेगळेच होते.
Wraps ऐवजी पुलाव का दिला नाही? असे एक आजी रागावून म्हणताना ऐकले.
(४ माणसे एकत्र आली तर ४ प्रकारचे विचार मांडतात, इथे ४००० माणसे होती.. तेव्हा चालायचेच).

परदेसाई, छान वॄत्तांत. अग्निदिव्य नाटकात पण एबाबा होते ना? त्या नाटकाबद्द्ल लिहणार का?
जेवणातले पदार्थ संपणे हा घोळ नेहमीचाच आहे. ४००० माणसांच्या व्यवस्थापनेत हे सहाजिकच आहे म्हणा!
ओपनिंग सेरेमनी चांगला आटोपशीर झाला असं ऐकलं, त्या बद्दल तुमचं मत काय? तसंच क्लोजिंगला काय होतं?

छान वृत्तांत. जेवणाची व्यवस्था चांगली होती असं दिसतंय. संशयक्ल्लोळचे अमेरिकेत अजून कुठे प्रयोग झाले असते तर छान झालं असतं. नाना पाटेकर बरोबरच्या गप्पा कशा झाल्या?

होना, यावेळी गेल्यावेळेप्रमाणे धडाधड प्रत्येक प्रोग्रॅमचा फिडबॅक नाही आला, मागच्या वेळि फार हलचल होती वृत्तन्त लिहिताना , मी, र्म्द , रार, धनश्री आणि बर्याच पब्लिकला काय लिहु काय नको झाले होते. Proud
कि यावेळी सगळे इतके परफेक्शन म्हणून कोणी काही लिहिले नाही ?
नाना पाटेकर- सोनाली कुलकर्णी, ऋजुता दिवेकर , बेला शेंडे इ. प्रोग्रॅम कसे झाले ? सारेगम स्पर्धा होती का, कशी झाली ?
डिटेल मधे लिहा कि कोणाची वाट न पहाता..

पूर्ण BMM चा माझा पहिलाच अनुभव. ह्या आधी डे पास घेऊन १ दिवस बघितले होते. ह्या वेळी बरोबर नवरा, ३ सिनियर आणि २ छोटी होती. हा कबिला घेऊन कास काय convention अनुभवणार अशी भीती होती. परंतु अनुभव खूप सुंदर होता. डेट्रोईटच्या लोकांनी घरदार नोकरी धंदे मुलं बाळ म्हटले कोतारे सगळं साम्भाळुन एक खूप मोठा सोहळा अत्यंत मेहनतीने , काटेकोरपणे आणि प्रेमाने फुलवला. त्याचाच इतकं अप्रूप वाटलं. कौतुकाला शब्द कमी पडतील. त्यांच्या मेहनतीला सलाम.

आवडलेले प्रोग्रॅम्स
ओपनिंग सेरेमोनी - अप्रतिम concept ,संचालन, नृत्य गायन आणि मुख्य म्हणजे वेळेची बांधिलकी
मृदुला दाढे जोशी - भारवून टाकणारा प्रोग्रॅम. कसलाही आव ना आणता सामान्यांना संगीत शिकवणारा
माउली सांगीतिका - शिकागो मंडळ . घराचा प्रोग्रॅम म्हणून नाही पण खरचं अप्रतिम होता. लेखन, दिग्दर्शन, lights, रेकॉर्डिंग, गाणी, नृत्य , कपडेपट, अभिनय सगळंच सुंदर
महेश काळे - कमावलेला आवाज आणि मार्केटिंग माईंड. मजा आली
आशोक नायगावकर - खूप आवडला हा प्रोग्रॅम. रामदास फुटाणेंशी relate नाही करू शकले

जेवण - जेवण पेक्षा फूड मानजमेंट वरच मी अडकून पडले. इफिसिएंट !

BMM हा नम्र करणारा अनुभव होता. माणस सगळं सांभाळून हौशी पोटी किती मेहनत घेतात हे दिसलं .

Pages