विक्या-माझी आठवण

Submitted by र।हुल on 9 July, 2017 - 07:36

[Disclaimer- सदर घटना सत्य प्रसंगांवर आधारित असून पात्रांची आणि ठिकाणांची नावे बदललेली आहेत.]

       पुजा, विनिता, विकास आणि सुजय..चार भावंडं..आमचे घरचे चांगले संबंध होते. ताई (पुजा)  भाऊच्या वर्गात होती. विनी (विनिता) माझ्या ताईच्या वर्गात. विक्या (विकास) माझ्या वर्गात. सहा वर्षं आम्ही शाळेत एकत्र होतो. त्यात विनी आणि ताईची व माझी आणि विक्याची जिवलग मैत्री..त्यामुळं एकमेकांच्या कुटुंबाबद्दल परकेपणा कधी वाटायचाच नाही..विक्या म्हणजे मुर्ती लहान किर्ती महान! खोड्या करण्यात कायम पुढं..आख्या शाळेत माझी लहानपणी कोणी चेष्टा करत असेल तर तो फक्त विक्याच! बाकी कुणाचीच तशी हिम्मत नसायची..सातवीपर्यंत कसं मस्त चालू होतं ना..पण पुढं सगळंच बदललं..सातवीत असताना विक्याचं कुटुंब नगर सोडून गावाकडं गेलं..ते कायमचंच! नंतर वर्षभरानं फक्त एकदाच विक्या भेटला होता..घरी आलता..क्रिकेट खेळलो होतो आम्ही..नंतर परत काहीच संपर्क राहीला नाही आमचा..
September२०१२ ला मी Facebook वर आलो आणि पहीलाच search विक्याच्या नावानं दिला..एकच result आला..मी क्षणात ओळखलं.. आपलाच विक्या..friend request पाठवली, timeline check केली २३ऑगस्ट १२ ला last update म्हणजे online असतो तर! विनीला शोधून तिला request पाठवली...तिचा मेसेज आला, 'Rahul, you have lost your friend'. मी  गोंधळून गेलो...तीला म्हटलो तुझा फोन नं दे..फोन केला तिला..खुप रडली ती..विस ते पंचविस दिवसांपूर्वीच accident चं निमीत्त होऊन विक्यानं जग सोडलं होतं..खुप वाईट वाटलं मला...हाच संपर्क आधी का नाही झाला असं राहूनराहून सारखं वाटायचं...पुढं दोन वर्षांनंतर विनीने तिच्या लग्नाचं invitation पाठवलं fb वरच..आळंदीत लग्न होतं..मी गेलो..दरवाज्यातच सुजय भेटला...तो म्हटला, 'ताईला भेट.' म्हणालो, 'नंतर भेटतो होऊदे सगळं.' 
      लग्नं लागल्यानंतर जरा नवरदेवनवरी जवळची गर्दी कमी झाल्यावर विनीसमोर जाऊन उभा राहीलो..हसत उभी होती ती..म्हटलो, 'ओळख बरं मला..' तीनं दोन मिनिटं विचार केला आणि हसतच म्हटली..'नाही माहीत.. कोण...?'... मी, 'राहूल' म्हणताच विनी मोठ्यानं रडायला लागली..मला कसं react व्हावं तेच कळेना...मी स्वत:च्या नकळत तिच्या खांद्यावर हात ठेऊन, 'शांत हो' म्हटलो..हा आमचा गोंधळ पाहून दोनतीन स्त्रिया आमच्याजवळ येऊन उभ्या राहील्या..हे सगळं तो नवरदेव तटस्थपणे पहात होता..त्यालाही कळेना नक्की काय झालं ते..शेवटी तो विनीपाशी सरकला व हळूच तीला म्हटला, 'कोण आहे?'  मग तिनं सांगितलं, 'विकासचा लहानपणचा मित्र'..इतक्यात तिथं पुजाताई आली..विनीने तिला माझी ओळख सांगितली..आणि पुन्हा दोघी रडायला लागल्या..थोड्यावेळाने त्यांनी मला जेऊ घातलं..नंतर मी जिना उतरून खाली येत असताना मला विकीची मम्मी भेटली..मी फक्त त्यांच्याकडे बघत होतो खरं तर आठदहा वर्षांनंतर मला तिथं कुणी ओळखणं शक्यच नव्हतं पण त्यानी मला 'तु नगरवरून आलास ना?' म्हणून विचारलं मग मी हो म्हणून नाव सांगितलं..त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. म्हटल्या, 'बघ ना किती चांगले दिवस आलते...खुप हौस होती विकीला ताईचं लग्न करण्याची..' मीही भावूक झालो...जड मनानं त्यांचा निरोप घेतला...निघताना त्यांनी, 'ये कधी अमरावतीला' म्हणून आवर्जून सांगितलं..मी हो म्हणून जड अंत:करणानं तिथून बाहेर पडलो...
आज साडेतीन वर्षं झाली ह्या प्रसंगाला...हे लिहून काढावं असं कधीच वाटलं नाही...
....पण कधी चुकार वेळी वाटतं की विक्याचं महत्व वेगळंच होतं माझ्या आयुष्यात...तो जर शाळेत होता तेव्हाच माझ्या आयुष्यातून गेला नसता तर..तर कदाचित आज माझंही आयुष्य वेगळंच असतं...miss u vikkya..
Dedicated to my loving friend SSP.

-₹!हुल 

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाईट वाटलं वाचून..
शाळेतली, त्या वयातली मैत्री फार वेगळीच आणि निस्वार्थी असते.. तशी सहजी मिळत नाही पुन्हा.. ती जाते तेव्हा त्रास होतोच. अनुभव आहे

छान लिहलय अश्या गोष्टी शब्दात मांडण नेहमीच कठीण असतं प्रत्येक शब्द लिहताना रिलेटेड गोष्टी फ्लॅशबॅक सारख्या समोरून फिरत असतात हृदयस्पर्शी>>+१

छान लिहलय अश्या गोष्टी शब्दात मांडण नेहमीच कठीण असतं प्रत्येक शब्द लिहताना रिलेटेड गोष्टी फ्लॅशबॅक सारख्या समोरून फिरत असतात हृदयस्पर्शी>>+११११

राहुल, खरच सुन्दर लिहलय. Concise choice of events, words and well articulated writing which never lost the touch with readers or the कथेतील नायक, राहुल and विक्की!

वाईट वाटलं वाचून..
शाळेतली, त्या वयातली मैत्री फार वेगळीच आणि निस्वार्थी असते.. तशी सहजी मिळत नाही पुन्हा..>>>>> +१

हे वाचल्यावर काय बोलाव हे कळेना. शाळा कॉलेज मधले बरेच असे मित्र मैत्रिणी जे संपर्कात न्हवते ते फेसबूक मुळे मिळाले आणि त्यातूनच काही आता नाहीत हे ही कळाले. बर्‍याच वर्षात गाठभेट नसून सुद्धा आपल्या जवळची व्यक्ती अशी सापडून आणि अचानक काही दिवसातच तिच जग सोडून जाण हे कळाल की फार अवघड होते मनाची स्थिती.