पाऊस

Submitted by अक्षय. on 5 July, 2017 - 06:35

पाऊस
थेंबाने मातीचा सुगंध चहूकडे दरवळवणारा
निसर्गाला हिरवळीने बहरवणारा
बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा
धो धो कोसळणारा खुदकन हसवणारा
अंगावर शहारे आणणारा चिंब भिजवणारा
चहाचा घोट नवा वाटणारा कांदाभजीला चव देणारा
कागदाच्या होडीबरोबर वाहणारा
शाळेभोवती तळे साचून सुट्टी देणारा
खिडकीतून हळूच खुणावणारा
खोटे पैसे घेऊन खरा येणारा
सर्वाना हवाहवासा वाटणारा
प्रेमाला हाक देणारा
ओल्या नजरांना प्रेमात पडणारा
एकाच छत्रीत जवळ आणणारा
पाऊस ..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त .........
कवितेनेच मन तृप्त केलं अगदी...... Happy

छान !
खिडकीतून हळूच खुनावणारा की खुणावणारा ?

सुंदर ..
कवितेनेच मन तृप्त केलं अगदी>>+ १११

राहुल, कावेरी, डब्बू, पंडितजी, चैत्राली उदेग, शेखर आपल्या प्रतिक्रियांबद्दल खूप धन्यवाद.
चैत्राली उदेग बदल केला आहे धन्यवाद मागेही असाच घोळ झालेला न ला ण ण ला न नेहमीच झालंय आता
अक्षयच्या कविता खुप साध्या सरळ अन् सहज असतात त्यामुळे खुप छान वाटतात. >> याच साठी केला होता अट्टहास अवांतर असाच एक प्रतिसाद मागे च्रप्स यांनीही केला होता पुनश्च धन्यवाद वाचत रहा..

छान .......