या कामशिल्पांचं करायचं काय?

Submitted by वरदा on 19 June, 2017 - 10:25

खरं तर धागा काढण्याएवढं मटेरियल या विषयात नाही, फक्त वादंग तयार करायचं सामर्थ्य आहे. पण राहावलं नाही म्हणून काढते आहे. मी कुठल्याही एका राजकीय विचारसरणीचं अथवा पक्षाचं समर्थन करत नाही. पण टोकाचे विचार करणारे सगळ्याच पक्षांमध्ये असतात, त्यातून मोठे आणि छोटे कुणीच राजकारणी, नेते सुटत नाहीत एवढंच मला म्हणायचं आहे.

खजुराहो च्या प्रसिद्ध मंदिरांपाशी कामसूत्र विकलं जातं यावरून सध्या सगळीकडे तावातावाने चर्चा चालू आहे. आपली संस्कृती, इतिहास याची अर्धवट, भगव्या चष्मातून माहिती व छ्द्मज्ञान (pseudo-knowledge) असलेल्या काही माथेफिरूंनी या सर्वावर बंदी घालावी असं आग्रहाने सुचवलं आहे (त्यांना शक्य असेल तर शक्तीचा वापर करूनही अंमलात आणायचा प्रयत्न करतील, कुणी सांगावे?).... गेल्या तीनचार वर्षांमध्ये आपल्या संस्कृती आणि इतिहासाविषयी लोकपातळीवर छद्मज्ञान पद्धतशीरपणे पसरवलं जात आहे ते फार चिंताजनक आहे.

पण खजुराहो बिचारं कायमच वादाच्या भोवर्‍यात असतं. त्याविषयी नाराजी दर्शवणार्‍यांमधे सध्याचे उजव्या विचारसरणीचेच कशाला, खुद्द गांधीजींचाही समावेश होता. गांधीजी या मंदिरांच्या पूर्णतया विरोधी होते. त्यांच्या मते ही मंदिरं परत मातीच्या ढिगार्‍यात झाकून टाकणेच जास्त योग्य होते. अखेर रवींद्रनाथ टागोरांना यात मध्ये पडून ही मंदिरे आपली आपला राष्ट्रीय वारसा आहेत हे गांधीजींना ठामपणे सांगावं लागलं होतं...
तेव्हा टू सेट द रेकॉर्ड स्ट्रेट - आपल्याला सामाजिक मानसिकतेमध्ये कामशिल्पं ही आपल्या समृद्ध वारशाचा एक भाग आहेत हे कधीच मोकळेपणे मान्य करता आलेले नाही. जसा बहुसंख्येने समाज तसेच त्यांचे नेते.
मात्र खजुराहो हे एकमेव कामशिल्पे असलेले मंदिर नाही. आठव्या नवव्या शतकानंतर उभारल्या गेलेल्या बहुसंख्य मंदिरांमधे कमी-जास्त प्रमाणात कामशिल्पं कोरली जायची. अगदी वेरूळच्या कैलासातही कामशिल्पे आहेत.

तेव्हा आपला सामाजिक दांभिकपणा आणि त्याहूनही ढोंगी नीतीमत्तेची आवरणे बाजूला करून जेव्हा आपण हे मान्य करू तेव्हा सुदिन!!

त.टी. - यावर नेहेमीच्या यशस्वी उखाळ्यापाखाळ्या काढणे, वचावचा भांडणं करणे असं न होता चर्चा झाली तर खूप बरं होईल. तसं चर्चा करण्यासारखंही यात फारसं काही नाही. पण इतरत्र कुठे पोस्ट केली असती तर कदाचित कुणाच्या लक्षात आली नसती. म्हणून इथे वेगळं लिहिलं. तेव्हा वाचा, पोस्ट लिहिलीच पाहिजे असं काही नाही. पण विसरून जाऊ नका Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

कसलाही अजेंडा नसलेल्या जाणकार लोकांची मते व त्यातल्या टीकेचे वेगळेपण लगेच कळते.>>> +१
वरदा पोस्ट छान Happy
होप यापुढे तरी लोक शाब्दिक खेळ खेळन थांबवतील.

समाजसंकेत बदलले की एका कालावधीत शिष्ट आणि सभ्य वाटणारे आचारविचार अशिष्ट आणि असभ्य ठरतात. हे केवळ शिल्पात आणि चित्रांत नव्हे तर साहित्यातही घडते. एकोणिसाव्या शतकात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात साहित्यात सर्व व्यक्तींवचे एकेरी उल्लेख असत. जसे तुकाराम, ज्ञानेश्वर, शिवाजी, संभाजी, पहिला बाजीराव, दुसरा बाजीराव, राम, कृष्ण वगैरे. सांप्रत यातला फक्त कृष्ण एकेरी राहिला आहे. तोही काव्यातून. शिवाय जुन्या साहित्यात नग्नतेचे अनेक उल्लेख असतात. अगदी धार्मिक साहित्यातही असतात. व्यंकटेश स्तोत्र, दत्तप्रबोध वगैरेमध्ये याची उदाहरणे सापडतात.
गधेगाळ या नावाने प्रसिद्ध असलेले आज्ञाशिल्पांचे अनेक पत्थर आपल्याकडे सापडतात. एके काळी ते भर चौकात किंवा लोकांच्या नजरेसमोर राहातील असे पुरलेले/उभारलेले असत. गेल्या एकदोन शतकांत लोकांना ते अश्लील वाटू लागले आणि कित्येक शिला भग्न केल्या गेल्या अथवा जमिनीत उलट्या म्हणजे कोरीव भाग जमिनीत जाईल अश्या ठेवल्या गेल्या. यापैकी कित्येकांना शेंदूर फासून त्यांचे चक्क दैवतीकरणही केले गेले आहे. संस्कृती बदलत असते. आजच्या स्थलकालसंकल्पनांच्या चौकटीत या सगळ्याचे मूल्यमापन केले जाऊ नये. इतिहास या शब्दाचा अर्थच मुळी 'असे असे होते' असा आहे. जे होते किंवा घडले ते त्या त्या चौकटीत घडले. त्या त्या अवकाशाच्या मर्यादांत घडले. त्याचा बरेवाईटपणा आजच्या फुटपट्टीत मोजता येणार नाही. पण हे अवशेष गतकालाच्या पाऊल्खुणा असतात. आपले पूर्वज कोणत्या वाटेने चालत होते याचे ते दर्शन असते. ते फोडून तोडून का टाकावे?

वरती एका प्रतिसादात विचारलय की अशी शिल्पं असल्याने पर्यटक वाढतात का?
आता भारतीय पर्यटक खात्याने जाहीर केलेले : राज्य, भारतीय (परदेशी)पाहा लाखांत-
तमिळनाड:३४३८(४७)
मप्र:१५०४(४६)
उप्र२११७(३१)

तमिळनाडमध्ये नक्की काय आकर्षण असावे?

मी वरती "अजेंडा" बद्दल लिहीले आहे त्याने "इथे बाकी इतर सर्वांनी राजकीय अजेंड्याने प्रेरित होउन लिहीले आहे" असा समज होऊ नये म्हणून हे -

वरदाच्या पोस्ट च्या आधी अरूंधती, सिम्बा यांची वरदाच्या पोस्ट च्या आधीची पोस्ट, बुवा, अतुल ठाकूर, व इतर अनेकांच्या पोस्ट चांगल्या आहेत, हीरा यांची या पानावरची वरची पोस्टही. मी वरदा च्या पोस्ट ला स्पेसिफिकली प्रतिक्रिया दिली कारण तिने जी समरी लिहीली आहे ती अगदी माझ्या मनात आल्याप्रमाणेच वाटली. पण त्याचा अर्थ असा नव्हता की बाकीच्यांच्या सर्वांच्या राजकीय हेतूवाल्या आहेत. त्यातून इतरांना अकारण हिणवले जात असेल असे वाटले असेल तर होपफुली याने ते क्लिअर होईल.

माझाही मूळ मुद्दा हाच होता की त्या शिल्पांबद्दल किती लोकांना काय पडलेय?

ज्या संघटना या वादातून सवंग प्रसिद्धी मिळवायला बघतात त्यांना मूळात प्रसिद्धी मिळवायला अशी संवेदनशील गोष्ट लागते जिच्याशी लोकं भावनिकदृष्ट्या जोडली गेली आहेत. जर या शिल्पांबाबत कोणाला पडले नसेल तर त्यांच्या विरोधातील जीव तिथेच कोलमडून पडेल. थोड्यावेळासाठी हा धागा अप्रकाशित करून बघा. सारे काही शांत होईल Happy

मंदिराच्या किंवा कुठल्याही ऐतिहासिक स्थळाच्या अगदी जवळ किंवा थेट आवारात विक्रीचा बाजार मांडणे योग्य नाही असे वाटते. संग्राह्य आणि विक्रीयोग्य वस्तू किंवा प्रतिकृतींची एक वेगळी वास्तू आवाराबाहेर पण आवाक्यात असावी . तीत वास्तू किंवा वास्तुविषयासंदर्भात अधिक माहिती देणाऱ्या किंवा रिलेटेड गोष्टी असाव्यात.
.पुरातन वास्तुविशेषांवर फेरीवाल्यांचे आक्रमण होऊ देऊ नये .

हिरा, ही विक्री ASI च्या कॅन्टीन मध्ये होत होती,
बजरंग सेनेचा आरोप होता की कामसूत्र पुस्तकांच्या नावाखाली पॉर्न पुस्तके विकले जात आहेत.
पोलिसांनी तपास करून असे काही होत नसल्याची ग्वाही दिली आहे,
त्यानंतर बजरंग सेने ने ASI चे क्युरेटर (नाव विसरलो मी) याना कर्तव्यात कसूर केल्या बद्दल काढून टाकावेअशी मागणी केली आहे

हीरा, संग्राह्य आणि विक्रीयोग्य वस्तूंची तुमची व्याख्या काय आहे? कामसूत्र त्यात बसते का? कामसूत्र हे खजुराहोशी रिलेटेड आहे की नाही याबद्दल आपले मत काय आहे?

होय . कामसूत्र ही संस्कृत पुस्तिका किंवा त्याचे मुळाबरहुकूम भाषांतर विक्रीयोग्य आहे. त्यात टिटिलेटिंग असे काहीच नाहीं. त्यातील कितीतरी अवतरणे अथवा अंश आणि पूर्णरूपातसुद्धा ते जालावर वाचनासाठी उपलब्ध आहें . या पुस्तिकेत वासना उद्दीपित होतील किवा चाळवतील असे काहीही नाही . उलट कधी कधी अति तांत्रिकतेमुळे कंटाळा येतो. सवंग नसलेली कुठलीही संबंधित वस्तू चालेल .कामसूत्र हे porn नाही .

हिरा यांच्याशी सहमत

कामसूत्र पीडीएफ स्वरूपात online फुकट उपलब्ध आहे. ज्यांनी अजूनही taboo मुळे वाचलं नसेल कृपया वाचून घ्या...

कामसूत्र पीडीएफ स्वरूपात online फुकट उपलब्ध आहे.
<<
नुसते गूगल केलेत तर फडतूस लैंगिकता मिळेल. ऑथेंटिक कॉपीज अंमळ कठीण असतात.

अवांतरः

आमच्या लहानपणी (त्या काळी बर्का: हाल्फ सेंचुरी अगो.) ही कामसूत्राची (छापील कागदी) हिन्दी पुस्तके पिवळ्या जिलेटीन पेप्रात पक्की गुंडाळून गांधीपुतळ्याखाली बसणारा पेपरवाला विकत असे. ("पिवळी पुस्तके" हा शब्दप्रयोत यावरून आहे)
सामुहिक वर्गणी काढून तो पिवळा जिलेटीन फाडण्याइतपत पैसे खर्च करून, ते विकत घेतले, तेव्हा त्यात 'तसले' काहीच नाही, हे पाहून पौगंडावस्थेत जाम गंडलो गेल्याचं फीलींग आलं होतं. लयच टेक्निकल मॅन्युअल स्टाईल आहे ते.

! प्राईसलेस Wink

अरे, इथे परत लागलं का धुमसायला?

राजसी, नक्की काय मुद्दा आहे? मला तुमचा विरोधाचा मुद्दा नीटसा कळला नाहीये. माबुदोस.
द्विरुक्ती, ऑक्सिमोरॉन आणि संभावितपणा/साळसूदपणा हे समानार्थी शब्द आहेत हे नव्याने कळले. धन्यवाद.

मी मूळ लेखात सरकारविषयी काहीच म्हणले नाहीये. राजकारणी नेत्यांविषयी म्हणले आहे. गांधीजींचं नाव घेतलं आहे हे सोयीस्करपणे विसरता आहात का? की फक्त उजव्या लोकांवर टीका केलेली खुपली आहे? जसे लोक तसे नेते हेही लिहिले आहे. आपल्याला समाज म्हणून मानसिकता बदलायला हवी आहे यात साळसूदपणा वगैरे कुठे आला कळलं नाही.
माझ्या शेवटच्या प्रतिसादामध्ये मी सरकार याला बधणारच नाही याची खात्री वाटत नाही असं लिहिलं आहे. यात सरकारवर टीका वाटत असेल तर असूदेत. एक नागरिक म्हणून सरकारविषयी मला काय वाटतं हे सभ्य भाषेत व्यक्त करायला अजून तरी कायदेशीर परवानगी आहे.

तुम्हाला विरोधी मुद्दे मांडायचे आहेत तर जरूर मांडा, पण नुसतीच बिनबुडाची, माझ्या लिखाणात नसलेले शब्द्/मुद्दे घेऊन टीका कशाला?
शांतपणे मुद्यावर चर्चा करायला कुणाचीच हरकत नाही. पण तुम्हाला मला एका ठराविक राजकीय हेतूच्या साच्यात बसवून वाद घालायचा असेल/ टीका करायची असेल तर खुशाल करा... मला फुकाचे वाद/ उगा शब्दाला शब्द लिहिण्यात रस नाही. तुम्ही काय करावं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे.

गणू एक शिल्प तोडण्याची मागणी करत होता.
तिथे असणारे व्यवस्थापकांनी दुर्लक्ष केले
गणू ने ते शिल्प तोडायला सुरुवात केली
शिल्प तोडताना तिथल्या लोकांनी / व्यवस्थापकानी गणू ला सपोर्ट केला नाही.
गणू शिल्प तोडताना तिथल्या लोकांनी दुर्लक्ष केले
गणू ने ते शिल्प पुर्ण तोडून टाकले.
तिथले लोक बधले नाही. गणू ला कोणी सपोर्टच केला नाही.
गण्याचे काम फत्ते झाले. तिथल्या लोकांनी सपोर्ट केला नाही म्हणून त्या लोकांवर कोणी आरोप लावू नये.

थोडक्यात असे काहीसे म्हणणे इथल्या काही लोकांचे आहे

सगळे विद्वान आणि विचक्षण (हा शब्द मला फार आवडलाय) माबोकर चर्चा करताहेत पण मला तर ह्या धाग्यचं शीर्षक आणि मटेरिअल काहीच कळलं नाही.
शीर्षकात लिहिलंय काम्शिल्पांचं करायचं काय? आणि विषय मांडलाय तिथे विकल्या जाणार्‍या लिटरेचचा.
मला शीर्षक वाचुन वाटलेलं की ही खजुराहोची मंदिरं शिल्प तोड्ताहेत की काय?
नक्की काय प्रॉब्लेम झालाय?

गणू एक शिल्प तोडण्याची मागणी करत होता.
तिथे असणारे व्यवस्थापकांनी दुर्लक्ष केले >>>>>>>>>>>>>>> अगदी योग्य केले..

गणू ने ते शिल्प तोडायला सुरुवात केली >>>>>>>>>>>>> हीच ती योग्य वेळ गणूला हाणायची Happy

पुढची पोस्ट बाद !

तेव्हा टू सेट द रेकॉर्ड स्ट्रेट - आपल्याला सामाजिक मानसिकतेमध्ये कामशिल्पं ही आपल्या समृद्ध वारशाचा एक भाग आहेत हे कधीच मोकळेपणे मान्य करता आलेले नाही. >> ह्याच्याशी पुर्ण सहमत.

दुसर्या पॅराची गरज काय होती हे समजले नाही. छद्मद्यान म्हणजे काय तेही समजले नाही. पुरावे नसताना / अपुरे असताना मांडलेल्या थेअरिज आणि तेच वास्तव समजून झालेल्या सामाजीक वा राजकीय उलाढाली भारतात्/जगात नवीन नाहीत. ओरिएंटलिजम, युरो-सेंट्रिझम, मार्क्सिझम ह्या व अशा इतर चश्यामतन झालेले काम व त्याचा भारतीय नव-विचारावरील छाप अजून मिटला आहे का? मग नेटिविस्ट चश्म्याला मग तो नॅशनिल्स्ट किंवा भगवा किंवा हिरवा असला तर खरच काय फरक पडतो?

ह्या सगळ्या चश्म्यांच्या पलिकडे जाऊन बघता येणे गरजेचे आहे हे निर्विवाद पण प्रॅक्टिकली समाज-शास्त्रात ते कितपत शक्य आहे?

@सिम्बा
तुम्ही पुन्हा मूळ विषयाला सोडून प्रतिसाद दिला आहे. शासकीय पातळीवर सगळ्याच वेगबेगळ्या विषयावर काय होतं याबद्दल याच धाग्यावर लिहिणं योग्य नाही कारण नसते फाटे फुटत जातायत. लेखिका लिहितील त्याना काय म्हणायचं छद्मद्यान म्हणजे. आणि त्यांनी मूळ लेखात कुठेही शासनाचा उल्लेख केलेला नाही.
>मी मूळ लेखात सरकारविषयी काहीच म्हणले नाहीये. राजकारणी नेत्यांविषयी म्हणले आहे.
हे लेखिकेने स्प्ष्ट केले आहे.
तुम्हाला शासनाबद्दल वेगळं त्यात डीटेल लिहायचं असेल तर वेगळा धागा सुरु करा. सगळ्या धाग्यांचं सार पुन्हा त्याच त्याच मुद्यावर आणू नका .

Ok wema,
पेशव्यांनी छदमज्ञान म्हणजे काय विचारले, त्याचे मी उत्तर दिले असे मला वाटले,
तुम्हाला ते विषयाशी असंबद्ध वाटत असेल तर ठीक आहे,
माझा प्रतिसाद अप्रकाशित करतो
या पुढे लेखिकाच इकडे लिहितील,
सिम्बा,

वर कोणीतरो, एक टुचच्या संघटनेने केलेल्या मागणीला इतके का रिऍक्ट होता वगैरे विचारले होते.
या अशा छोट्या छोट्या मागण्या करतच घोडे पुढे रेटले जाते, आणि मग राष्ट्रीय स्मारकाची तोडफोड करण्याचे धाडस यांच्या अंगी येते.
http://indianexpress.com/article/india/agra-vhp-members-vandalise-wester...

काय ताजमहाल वगैरे पाहून घ्यायचा असेल तो 1 2 वर्षात पाहून घ्या 2019 ला bjp आले तर काही खरे नाही त्याचे.

मला शहाजहान ने बांधलेला ताजमहालाच म्हणायचे आहे,
तेजमहाल वगैरे गोष्टी माझ्या भारतात अस्तित्वात नाहीत.

या कामशिल्पांचे काय करायचे??

तेच जे कामसूत्राचे केले
https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/cities/ahmedabad/stor...

अहमदाबाद मध्ये कामसूत्र जाळण्यात आले. त्या प्रतिमध्ये कृष्णाला विविध आसने करायला लावून त्याचा अपमान केला असा दावा बजरंग दलाचे कार्यकर्ते करतात.

Pages