आरंभमचा पुढचा भाग लिहिण्याआधी थोडं फिक्शन...
१. फॅमिली.
"ही जागा खूप छोटी पडतेय आता."
"अगं सगळं तर आहे इथे."
"काही नाहीये इथे."
"जास्तीचा हव्यास धरू नकोस. बघ हा आपला मोठा वाडा. तुझे आणि माझे आईबाबा. आपले कल्याण चिंतणारे नातेवाईक. नारळाची आणि पोफळीची झाडे. पंधरा गाड्या. पन्नास नोकर. तुला हवी असणारी सगळी चीजवस्तू इथे आहे."
"मला नकोय काही असलं..."
"मग निघून जा इथून...तो रागावला."
...आणि ती त्या मोठ्या फॅमिली फोटोमधून बाहेर पडली!"
२. ड्रायव्हर
"डायरेक्ट झाडीत घुसव लेका..."
किर्याने गाडी झाडीत घुसवली.
"शाबास लेका डायवर पाहिजे असा. आता बुंगाट पळव. राम्याला ठाव लागला नाय पाहिजे."
किर्याही जीव धोक्यात येईल अशी गाडी चालवत होता. मात्र पाटलाला त्याचं सोयरसुतक नव्हतं
मागून राम्याचा डायवर पाठलाग करत होता
"फोकणीचा डागल्या किर्याला दम देतोय व्हय? बग आमचा किर्या कशी टर्न घेतो आता!"
..आणि घाट ओलांडताना किर्याने घेतलेला टर्न बघून डागल्याचाही श्वास अडकला...
किर्या सुसाट निघाला...
...संध्याकाळी किर्या मालकाला म्हणाला.
"मालक तुम्हाला ना, आमच्यासारख्याची कायबी कदर नाय. आज बैलगाडी मोडली तरी शर्यत नाय हारलो आपण. बघा ना चंद्रभान पाटलाकड गंगीसाठी खडा टाकून."
पाटील उठला आणि म्हणाला.
"...दुभती हाय ती अजून. पान्हा आटू दे. कमी किमतीत मिळलं लेका! तुबी बैलबुद्धीच हाय.."
३. वापर.
ही काय भानगड आहे कळेना देवा...
बोल नंदी.
कुणालासुद्धा ठाव लागत नाहीये. कुणी आत गेला नाही. कुणी बाहेर आला नाही आणि त्रिशूल गायब...
हाताचे ठसे?
नाही देवा.
पायाचे ठसे?
तेही नाही देवा.
कुणी दोरी आत नेऊन तर त्रिशूल बाहेर ओढला नाही ना.
मग देवा तो जमीनीवर पडून जमिनीवरच्या सेन्सरने तो कॅपचर केला असता आणि अलार्म वाजला असता.
कुणी पक्षी उडत जाऊन तर त्रिशूळ चोरला नाही ना.
नाही देवा. काहीही झालं तरी त्याचे पंख जाळीला टच झाले असते. मग जाळीचाही सेन्सर वाजला असता.
अरे सीसीटीव्ही मद्धे काही कॅपचर नाही झालं?
मेंटेनन्ससाठी बंद होता.
अरे मग तिथे कुणाची ये जा झालीे, काही खबर?
हो देवा..
सांग.
लॉगबुक मध्ये इंद्र, कार्तिकेय, वरूण देव, गणपती, ब्रह्मदेव आणि पार्वती मातेची नोंद आहे.
आणि हे कुणाला आधी कळलं?
माता पार्वतीला. करण मोहनअस्त्र वापरून तयार केलेला त्रिशूल तिनेच ओळखला.
भगवान शिव हसले आणि म्हणाले.
...तू सोंडेचा वापर विसरलास नंदी!
आवडल्या कथुकल्या..
आवडल्या कथुकल्या..
तिसरी तर मस्तच.. बाप्पाच चोर!!
प्रयत्न चांगला आहे. दुसरी कथा
प्रयत्न चांगला आहे. दुसरी कथा नीटशी कळली नाही .
थँक्स राहुल आणि जाई.
थँक्स राहुल आणि जाई.
जाई ड्रायव्हरच बैल आहे अशी कल्पना करून बघा.
ओह ! अशी होय कल्पना . भारीच
ओह ! अशी होय कल्पना . भारीच
जाई ड्रायव्हरच बैल आहे अशी
जाई ड्रायव्हरच बैल आहे अशी कल्पना करून बघा. +१००
आर्रे व्वा!
मी मात्र वेगळाच विचार केलता..
छान आहे ह्याही कथुकल्या.
छान आहे ह्याही कथुकल्या. आवडल्या तिन्ही.
राहुल वेगळा विचार इथे सांगू
राहुल वेगळा विचार इथे सांगू शकतोस की विपु करतो?
थँक्स अक्षय..
मस्त आहेत कथा.
मस्त आहेत कथा.
अस्ट्रोनोत ना fight आहेत या
अस्ट्रोनोत ना fight आहेत या kathukalya... तिन्ही आवडल्या
थँक्स मामी आणि च्रप्स
थँक्स मामी आणि च्रप्स
तिन्ही आवडल्या...बैलगाडी वरून
तिन्ही आवडल्या...बैलगाडी वरून लक्षात आले ड्रायव्हर बैल आहे. पुढील कथेच्या प्रतीक्षेत.
छान आहेत कथुकल्या!
छान आहेत कथुकल्या!
थँक्स प्लॅटिनम. नक्कीच!
थँक्स प्लॅटिनम. नक्कीच!
थँक्स मानव
मस्तच..
मस्तच..
तिसरी आवडली..
तुमच्या कथुकल्या मला झेपतात अगदी... लिहित रहा....
तिन्ही...हलक्याफुलक्या...मस्त
तिन्ही...हलक्याफुलक्या...मस्त
मस्त कथा
मस्त कथा
मला त्रिशुलाची कथुकली कळली
मला त्रिशुलाची कथुकली कळली नाही कृपया फोड करून सांगा.
पहिली एकदम खासच आहे.
मस्त, आवडल्यात.
मस्त, आवडल्यात.
मला त्रिशुलाची कथुकली कळली
मला त्रिशुलाची कथुकली कळली नाही कृपया फोड करून सांगा.
गणपतीबाप्पा त्रिशूल सोंडेत लपवून घेऊन जातो..
थँक्स मेघा मयुरी समाधानी
थँक्स मेघा मयुरी समाधानी दक्षिणा अदिती.
राहुल बरोबर!
दक्षिणा वाटतायेत ना कथा अमानवीय
मयुरी नवीन कथेच्या प्रतीक्षेत आहे. राहुल तुही लिही.
आणि मेघा विपु केली आहे.
छान आहेत. दुसरी मलादेखील कळली
छान आहेत. दुसरी मलादेखील कळली नव्हती.
थँक्स अॅमी
थँक्स अॅमी
छान. पहिली आवडली
छान. पहिली आवडली
थँक्स कुमार
थँक्स कुमार
मस्त कथा. आवडल्या.
मस्त कथा. आवडल्या.
थँक्स चैत्राली
थँक्स चैत्राली
तिन्हीही मस्त.
तिन्हीही मस्त.
थँक्स अस्ट्रोनोत!
थँक्स अस्ट्रोनोत!
पण तुम्ही एवढ्यात थांबू नका प्लिज!