या कामशिल्पांचं करायचं काय?

Submitted by वरदा on 19 June, 2017 - 10:25

खरं तर धागा काढण्याएवढं मटेरियल या विषयात नाही, फक्त वादंग तयार करायचं सामर्थ्य आहे. पण राहावलं नाही म्हणून काढते आहे. मी कुठल्याही एका राजकीय विचारसरणीचं अथवा पक्षाचं समर्थन करत नाही. पण टोकाचे विचार करणारे सगळ्याच पक्षांमध्ये असतात, त्यातून मोठे आणि छोटे कुणीच राजकारणी, नेते सुटत नाहीत एवढंच मला म्हणायचं आहे.

खजुराहो च्या प्रसिद्ध मंदिरांपाशी कामसूत्र विकलं जातं यावरून सध्या सगळीकडे तावातावाने चर्चा चालू आहे. आपली संस्कृती, इतिहास याची अर्धवट, भगव्या चष्मातून माहिती व छ्द्मज्ञान (pseudo-knowledge) असलेल्या काही माथेफिरूंनी या सर्वावर बंदी घालावी असं आग्रहाने सुचवलं आहे (त्यांना शक्य असेल तर शक्तीचा वापर करूनही अंमलात आणायचा प्रयत्न करतील, कुणी सांगावे?).... गेल्या तीनचार वर्षांमध्ये आपल्या संस्कृती आणि इतिहासाविषयी लोकपातळीवर छद्मज्ञान पद्धतशीरपणे पसरवलं जात आहे ते फार चिंताजनक आहे.

पण खजुराहो बिचारं कायमच वादाच्या भोवर्‍यात असतं. त्याविषयी नाराजी दर्शवणार्‍यांमधे सध्याचे उजव्या विचारसरणीचेच कशाला, खुद्द गांधीजींचाही समावेश होता. गांधीजी या मंदिरांच्या पूर्णतया विरोधी होते. त्यांच्या मते ही मंदिरं परत मातीच्या ढिगार्‍यात झाकून टाकणेच जास्त योग्य होते. अखेर रवींद्रनाथ टागोरांना यात मध्ये पडून ही मंदिरे आपली आपला राष्ट्रीय वारसा आहेत हे गांधीजींना ठामपणे सांगावं लागलं होतं...
तेव्हा टू सेट द रेकॉर्ड स्ट्रेट - आपल्याला सामाजिक मानसिकतेमध्ये कामशिल्पं ही आपल्या समृद्ध वारशाचा एक भाग आहेत हे कधीच मोकळेपणे मान्य करता आलेले नाही. जसा बहुसंख्येने समाज तसेच त्यांचे नेते.
मात्र खजुराहो हे एकमेव कामशिल्पे असलेले मंदिर नाही. आठव्या नवव्या शतकानंतर उभारल्या गेलेल्या बहुसंख्य मंदिरांमधे कमी-जास्त प्रमाणात कामशिल्पं कोरली जायची. अगदी वेरूळच्या कैलासातही कामशिल्पे आहेत.

तेव्हा आपला सामाजिक दांभिकपणा आणि त्याहूनही ढोंगी नीतीमत्तेची आवरणे बाजूला करून जेव्हा आपण हे मान्य करू तेव्हा सुदिन!!

त.टी. - यावर नेहेमीच्या यशस्वी उखाळ्यापाखाळ्या काढणे, वचावचा भांडणं करणे असं न होता चर्चा झाली तर खूप बरं होईल. तसं चर्चा करण्यासारखंही यात फारसं काही नाही. पण इतरत्र कुठे पोस्ट केली असती तर कदाचित कुणाच्या लक्षात आली नसती. म्हणून इथे वेगळं लिहिलं. तेव्हा वाचा, पोस्ट लिहिलीच पाहिजे असं काही नाही. पण विसरून जाऊ नका Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

<<बाकी जिवंत लोकं जगताहेत की मरताहेत याची पर्वा न करणारी माणसं दगडी शिल्प जतन करायला का आटापीटा करतात हे समजत नाही. दगडंच ती तुटली फुटली हरवली भूकंप येऊन जमिनीत गडप झाली तर पुढच्या पिढीचे काय असे नुकसान होणार आहे. मी तर बोलतो जर भारत सरकार माझ्या टॅक्सच्या पैश्यातून त्यांन जतन करायचा खर्च करणार असेल तर तोडून टाका, आम्हाला काही गरज नाही.>>
------- :अरेरे
खुप धक्कादायक विचार आहेत. अगदी असेच विचार तालिबान नेते ओमार अब्दुल्ला यान्चे आहेत/ होते...
"....आम्हाला बामियान बुद्धा पाडायचा नव्हताच.. पुण तुम्ही (माणसा पेक्षा) दगडाला पुजता म्हणुन आम्ही तो नष्ट केला... " मानव जातीचे एव्हढे प्रेम असेल तर याने एकाही मानवाला मारले नसते, मारण्याचे आदेश दिले नसते.

शिल्प नष्ट करणे म्हणजे पुढच्या पिढीचे कधिही भरुन न येणारे नुकसान होणार आहे... त्यान्ना काय नको हे आजची पिढी कसे ठरवणार ? दगडा मधुन शिल्प कोरणे या कलेचा मला अतिव आदर आहे. साध्या कागदावर मला एक धड चित्रे काढता येत नाही, खोड रबरच्या वापरा शिवाय चार वाक्य लिहीता येत नाही... आणि हे शिल्पे दगडात कोरलेली आहेत, काही ठिकाणी एका दगडात.... काय साधने असतील त्यान्च्या जवळ ? शिल्पे कोरताना काही चुका झाल्यास?

गांधीजींचा उल्लेख मूळ धाग्यात आला असला तरी त्या अनुशंगाने केलेल्या प्रतिक्रिया धाग्याला भलतीकडेच नेत आहेत. त्यामुळे त्या अप्रकाशीत केल्या आहेत.

>>>>दगडा मधुन शिल्प कोरणे या कलेचा मला अतिव आदर आहे.
>><<<<

तुम्ही शिल्पकलेचे घेऊन बसला आहात. मला तर सुंदर अक्षराचेही फार कौतुक आहे. खास करून ते फळ्यावर खडूने सुण्दर अक्षरात सुविचार लिहिणारयांचे जरा जास्तच. पण जर कोणी त्या फळ्यावर सुंदर अक्षरात सुविचाराच्या जागी एखादी पॉर्नकथा लिहीत असेल तर शिक्षकांनी त्या अक्षराचे कौतुक करत ते तसेच राहू द्यावे की त्यातील मजकूर नाही पटला म्हणून त्याला पुसून टाकावे?

तुमच्या संपुर्ण पोस्टमध्ये हीच गल्लत झाली आहे. विषय कामशिल्पांचा आहे आणि तुम्ही केवळ शिल्प आणि शिल्पकलेच्या अनुषंगाने लिहिले आहे. कामचे कामच तमाम करून टाकलेय.
त्यानंतर आमच्या विचारांची तुलना तालिबानी विचारांशी केलीत. ते देवांच्या मुर्त्या फोडायचे. देवाच्या मुर्त्या आणि ही कामशिल्पे यांना समान दर्जा देऊन कसे चालेल?
एकूणातच आपली पोस्ट कामशिल्पांच्या अनुषंगाने लिहीलीत तर चर्चा करायला आवडेल. काम आणि पॉर्न हा असा विषय आहे की चर्चा करायला आणि वाचायला सर्वांनाच आवडते Happy

कृपया विषयांतर टाळा. तुम्हाला विषयाला धरून बोलता येत नसेल तर प्रतिक्रिया दिलीच पाहीजे असे नाही.
वर लिंबूटिंबू यांची प्रतिक्रिया अप्रकाशित केल्यावर हे लिहिले आहे.

कामशिल्पांमधून फक्त कामक्रीडाच दिसते का?
वरकरणी पाहाता, हो, कितीतरी लोकांना फक्त कामक्रीडाच दिसत असेल व शिल्पकाराचा तोच उद्देशही असेल.
परंतु कामशिल्पे ही केवळ कामक्रीडा सांगत नसून बरेच काही सांगतात. वरदा खरंतर हे खूप सुंदर सांगू शकेल. मी माझ्या चिमुकल्या अभ्यासातून जे काही कळलं ते मांडायचा प्रयत्न करते.

१. कामशिल्पांचे स्थान त्या वास्तूत कोठे आहे, ती किती उठावदार आहेत, त्यांना एकूण वास्तूत किती जागा दिली गेली आहे, ती नजरेच्या टप्प्यात आहेत की वर / खाली / छतावर / निम्न ठिकाणी आहेत यावरून त्यांचे शिल्पकाराला व वास्तुकर्मीला अभिप्रेत असलेले स्थान कळून येते. कदाचित ते त्या त्या काळाच्या, समाजाच्या संस्कृतीचे द्योतकही असेल.
२. कामक्रीडेत कोरलेली शिल्पे ही कोणते तंत्र वापरून कोरलेली आहेत, ती बाकीचे वास्तूशी सुसंगत वाटतात का, तेच तंत्र उर्वरित शिल्पांचेही आहे का, त्या तंत्रावरून तेव्हाच्या शिल्पकलेविषयी काय कळते, तेव्हाच्या सामाजिक व आर्थिक संपन्नतेविषयी काय कळते, साधारण किती काळ ही शिल्पे कोरण्यात गेला हे तंत्रावरून कळून येते का,
हा अभ्यास / माहिती मिळू शकते.
३. शिल्पांत दाखवलेली माणसे ही त्यांच्या वेशभूषेवरून किंवा वस्त्रालंकारांवरून काही विशेष दर्शवतात का? त्यांचे भौगोलिक, सामाजिक, आर्थिक स्थान कळू शकते का?
४. सोबत दाखवलेले विविध साहित्य, अलंकार, प्राणी, पक्षी, लता वेली पुष्पे, नक्षीकाम यांतून काही अर्थबोध होतो का?
५. काही ठिकाणी कोणती कथा सांगायचा प्रयत्न केला गेला आहे का?
६. ते मंदिर कामशिल्पांसाठी प्रसिध्द नसते तर लोक तिथे आले असते का?
७. ते मंदिर जर कामशिल्पांसाठी प्रसिध्द नसेल तर ते पाहायला येणाऱ्या कितीशा लोकांना मंदिरातील कामशिल्पांनी फरक पडतो?
८. हिंदू धर्मात धर्म, अर्थ, काम, मोक्षादी संकल्पना सांगितल्या आहेत त्यातील काम संकल्पनेचे हे स्थूलचित्रण नव्हे काय? कामातून मोक्ष संकल्पनेचेही हे स्थूलचित्रण असावेसे वाटते.
९. आज जगातील प्रसिध्द किंवा कमी प्रसिध्द पुरातन शिल्पे, मंदिरे, अवशेष हे जागतिक सांस्कृतिक ठेवा /वारसा म्हणून जपण्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न होत असताना भारताचा हा समृध्द सांस्कृतिक वारसा संकटग्रस्त व्हावा याचे वैषम्य वाटल्यावाचून राहावत नाही.

नाशिकला कळवण तालुक्यातील देवळाणा गावात आटोपशीर प्राचीन शिवमंदिर आहे. तिथे तर प्रवेश द्वाराच्या दोन्ही बाजूला नजरेसमोर काम शिल्पपट्टीका आहे. आत प्रवेश करण्यापूर्वी सर्व तऱ्हेच्या वासना बाहेर ठेऊन आत जाण्यास सुचवित असाव्यात. अंदाज.

सर्व तऱ्हेच्या वासना बाहेर ठेऊन आत जाण्यास सुचवित असाव्यात.

>>> याच्या उलटही असेल. सर्व तर्‍हेच्या वासनांचा सुयोग्य उपभोग घेतल्याशिवाय शिवाची प्राप्ती होत नाही असेही सुचवायचे असेल. ही शिल्पे जेव्हा कोरली गेली तेव्हा सामाजिक व्यवस्थेत कोणकोणते स्थित्यंतरं दिसली हे समाजशास्त्राचे अभ्यासक सांगू शकतात. सर्वसंगपरित्याग, इंद्रियदमन यातून अपेक्षित परिणाम साध्य होत नसुन समस्या वाढतच आहेत हे निदर्शनास आल्यामुळे संभोग आवश्यक आहे असेही नमूद करायचे असावे. उत्तम संभोगासाठी अनेकविध उपाय, आसने दर्शवली गेली आहेत. एकमात्र नक्की की आज सारखा टॅबू तेव्हा नसेल असे आपण आदिवासींच्या चालीरिती बघून मानू शकतो.

याचप्रकारे "ढोंगी नितीमत्तेची आवरणे' याचे एकही उदाहरण लेखातुन मिळत नाही. Lol Lol Lol
कामशिल्पे अंकित केलेल्या मंदिराच्या आवारात शिल्पांच्या प्रतिकृती विकायला बंदी
हि शिल्पे बनवण्यासाठी ज्या ग्रंथाचा आधार घेतला , तो ग्रंथ विकायला बंदी कारण मंदिराचे पावित्र्य भंग होते
याच ढोंगीपणा बद्दल अक्खा लेख आहे,
अजून काय उदाहरणे पाहिजेत लोकांना देव जाने.

आपल्या सामाजिक दांभिकपणाचे अजून एक उदाहरण म्हणजे 'आमच्याकडे सगळेच होते आणि ते शास्त्रियच होते' चा ढोल वाजवताना; मग त्यात विमानशास्त्रापासून योगशास्त्रापर्यंत सगळेच आले; कामशास्त्र आणि ते लिहिणार्‍या वात्स्यायनालामात्र सोयिस्करपणे बाजूला सारले जाते.
असो, ढोंग नक्की काय अस्ते ते वरच्या काही प्रतिक्रियावरुन नीटच लक्षात आले त्याबद्दल संबंधीतांचे धन्यवाद.

ऋन्मेऽऽष दादा, कुठलीही पुरातन मानवनिर्मित गोष्ट, ती शेकडो वर्ष जुनी आहे या निव्वळ एका कारणासाठी जतन केली गेली पाहीजे. मग ती कितीही निरुपयोगी असुदे.

वेमा, गांधीजींबद्दलच्या पोस्टबद्दल हेच लिहायला आलो होतो. Happy मूळ धाग्यावर सविस्तर थोड्या वेळाने लिहितो.

प्राचीन काळी छापील पुस्तकं/साहित्यं फार मोठ्या प्रमाणात ऊपलब्धं नसण्याच्या किंवा काही मोजक्या लोकांनाच ती ऊपलब्दं असण्याच्या काळात असे पर्मंनंट स्ट्रक्चर्स तयार करून 'कला आणि ज्ञान' सामान्यांना खुले करण्याचा हा त्या विषयातील तज्ञांचा किंवा समाजवादी राज्यकर्त्यांचा प्रयत्न असू शकतो का?
नाही तरी त्याकाळी शेती, शासन, सैन्य, धर्मशास्त्रं, नृत्य वगैरे कामं वेगवेगळ्या लोकसमुहाकडे विभागली गेली असल्याने, देव/ मंदिराच्या संकल्पनाही वेगवेगळ्या असल्याने हे एकच कॉमन 'काम' सोडले तर सगळ्यां लोकसमुहांना जोडणारा कला आणि ज्ञानाच्या प्रदर्शनाचा दुसरा कॉमन विषय आणि स्त्रोत नसावा. मला फार ज्ञान नाही ह्या विषयातले पण, 'का ऊभी केली असावीत ही शिल्पं' विचार केला असता असे वाटले.

काहीही असले तरी काम हा विषय आजच्या एवढा टॅबू नसावा त्याकाळी असे वाटते. सर्वभौम राष्ट्रं असतांना परकीय लोकांच्या आक्रमणांच्या आधी स्त्रियांची सुरक्षितता हाही ईश्यू गहन नसल्यास एकंदर सामाजिक वातावरण मोकळे असावे असेही वाटते. हे खरे असेल तर आजचे आपण फारंच कमनशिबी असलो पाहिजेत की असे सामाजिक वातावरण आपल्याला मिळत नाही.

ह्या शिल्पांकडे डायरेक्ट स्त्री-पुरुष संबंधांचे जाहीर प्रदर्शन किंवा स्त्रीचा ऊपमर्द वगैरे अश्या आऊट ऑफ टाईम आणि आता स्फोटक झालेल्या गोष्टींशी न जोडता केवळ एका ऊज्वल कालखंडाचा साक्षीदार म्हणून बघितले तर हे प्रकरण सुरळीत होईल असे वाटते. पण जनमाणसाची विचारधारा बदलवणे आजिबात सोपी गोष्टं नाही. 'कामसूत्रं' जर ह्या शिल्पांमागचा विचार असेल तर पुस्तकांद्वारे तो अधिक माहिती मिळवण्याची ईच्छा असलेल्यांपर्यंत पोहोचवण्यातही काही गैर नाही असे वाटते.

वेमा, चर्चा काबूत ठेवायचे प्रयत्न केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

मला शाब्दिक खेळात, उगा बाल की खाल निकालना मध्ये रस नाहीये. खजुराहोच्या कामशिल्पांचा अर्थ, प्रयोजन वगैरे तपशीलांत जाण्यातही माझ्या दृष्टीने हशील नाहीये. ती असणं 'जस्टिफाईड'आहे की नाही हा मुद्दा नाही.
ढोबळ मुद्दा असा आहे की कामशिल्पं, कामसूत्र, मशीदी, चर्चेस, मंदिरं, लेण्या, गडकिल्ले व इतर सर्व काही भौतिक पुरावशेष हे आपला वारसा आहेत. बरावाईट आपल्या दृष्टीने कसेही असले तरी. इतिहासाचे , संस्कृतीचे, आपण आज आलो तो नक्की काय आणि कसा प्रवास करून आलो हे जाणून घेण्यामधले हे महत्वाचे दुवे आहेत. तेव्हा आपल्या सर्व प्रकारच्या वारश्यांचा आपण मनःपूर्वक स्वीकार करून आपल्या बहुपेडी संस्कृतीचे ते एक अंग आहेत आणि त्याचे योग्य ते जतन, अभ्यास करणे/ आदर राखणे ही बाब पूर्वग्रह सोडून मोकळेपणी लोकपातळीवर समाजमानसात रुजली गेली पाहिजे. अगदी जर्मनीतही होलोकॉस्ट संबंधित स्थळांची जपणूक केली आहे, कितीही अप्रिय इतिहास असला तरी तो लपवला, विद्रूप केला गेलेला नाही हे इथे आवर्जून नमूद करावंसं वाटतं आहे.

गेले अनेक दशके सार्वजनिक वैचारिक जगतात सभ्यपणे वाद घालायला जागा होती. स्पेस फॉर कंटेस्टेशन म्हणतात ती होती. कुणी आक्रस्ताळेपणे न करता हे विवाद वाद होत असत. थोर लोकांनी केलेल्या मतप्रदर्शनाविरोधात बोलता येत असे, त्यावर कुणी तुटून पडत नसत. गेल्या काही वर्षांमध्ये ही सभ्यपणे वाद घालण्याची जागा वेगाने संकोचत चालली आहे. आता कुठलेही वाद आक्रस्ताळेपणे देशभक्ती, उच्च संस्कृती याच मुद्याभोवती गोल गोल फिरवत विरोधी बाजूला देशद्रोही ठरवायची चढाओढ सुरू होते. अ‍ॅकेडेमियात काय होतं आहे त्याचे तपशील मी इथे लिहिणार नाही, पण जे होतंय ते काही फारसं बरं नाही. अस्वस्थ करणारं आहे.जोपर्यंत या वारसास्थळांबद्दल, इतिहासाच्या सर्व पैलूंबद्दल (वेद, त्यातली विमाने, वैदिक विज्ञान, शिवाजी, गडकोट, उसासे, फुगणार्‍या छात्या वगैरे मालमसाला सोडून) जोपर्यंत सामान्य तुम्हाआम्हा लोकांमधली उदासीनता संपत नाही, त्यांच्याबद्दल आदर निर्माण होत नाही, मनोमन त्यांच्या तिथे असण्याचं महत्वं कळत नाही/ कळवून घ्यायची इच्छा नाही, तोपर्यंत या अशाच फुटकळ संघटना दांडगाईची भूमिका घेणार. त्यांना विरोध करणारे अल्पसंख्य राहणार. बहुतेक सगळे उदासीनच! अजून पर्यंत तरी सरकार बधलेलं नाहीये, पण बधणारच नाही याची खात्री मनोमन वाटत नाहीये.

मी माझ्यापरीने काय करू शकते? फारसं काही नाही. माझी भूमिका इथे मांडून आणखी चार जणांना जरी हे चाललं आहे ते चुकीचं आहे त्याला विरोध दर्शवत आहेत त्यांना पाठिंबा व्यक्त केला पाहिजे हे पटलं तरी खूप झालं. ज्या दिवशी भारतातली बहुसंख्य जनता अशा उठपटांग मागण्यांना विरोध करते, जनमताचा रेटा आपल्या विरोधी आहे हे या अशा फॅनॅटिक घटकांना कळेल तेव्हा आपसूक ही थेरं बंद होतील. दुर्दैवाने भारतात हे आणखी कितीतरी पिढ्या होऊ शकणार नाही याची खात्री पटत चालली आहे.

सिम्बा, मी काही दिवस इथे येऊ शकले नाही तेव्हा तुम्ही बर्‍यापैकी किल्ला लढवल्याबद्दल धन्यवाद. तुमची आत्ताची शेवटची पोस्ट अगदी अचूक आहे Happy

वरदा, सुप्परलाइक.... अशा वाह्यात कल्पनांना जन्मतःच टोकलं गेलं पाहिजे. नाहितर हे लोक गृहित धरुन चालतात की त्यांचंच बरोबर आहे. मग बहुसंख्य अनभिज्ञ 'बाकीचे कोणी बोलत नाही ना मग काय चुकीचं नसेल" अशा मनोवस्थेत येतात. ह्या सगळ्याचा फायदा अशा फनेटिक लोकांना मिळतो. तेव्हा होइल तितके आवाज उठवत राहणे, संवाद घडवून आणणे, चर्चा होणे महत्त्वाचे.

जबरदस्त पोस्ट वरदा. कसलाही अजेंडा नसलेल्या जाणकार लोकांची मते व त्यातल्या टीकेचे वेगळेपण लगेच कळते.

वरदा सुंदर पोस्ट,
आणि मुद्दामहून माझा उल्लेख केल्या बद्दल धन्यवाद,

वरदा,
गांधीजींबद्दलचे तुमचे विचार संपादीत केले आहे. कारण काही कारण नसताना पुन्हा या धाग्याला त्यामुळे फाटे फुटतील. आणि इतरांना गांधीजींबद्दल या धाग्यावर लिहू नका असं म्हटल्यावर तुम्ही लिहणं योग्य होणार नाही.
तुम्हाला ते विचार मांडायचे असतील तर तेच विचार लिहून वेगळा धागा सुरु करा.

ओके. मला तुमचा निर्णय पटला नाही. पण ठीक आहे. त्यांचा उल्लेख वगळून मी स्पेस फॉर कन्टेस्टेशन बद्दलची वाक्ये परत लिहिते आहे. सुदैवाने फोनवर जुनी पोस्ट असलेले पान अजून बंद झालेले नाहीये.

>> कसलाही अजेंडा नसलेल्या जाणकार लोकांची मते व त्यातल्या टीकेचे वेगळेपण लगेच कळते
Happy

सहमत, वरदा पोस्ट आवडली. आणि इथे धागा उघडून ही चर्चा घडवून आणल्याबद्दलही अभिनंदन आणि आभार.

वरदा,

मुळात ही फुटकळ संघटना आहे, नावही ऐकलं नव्हतं. तिच्या या आंदोलनाला कोणाचा पाठींबा मिळालाय असं काही दिसलेलं नाही. सरकारने दखलही घेतली नाही. मग तुम्हाला हा इतका मोठा इश्यू का वाटतोय? सरकारने दखल घेतली तर, लोकांनी पाठींबा दिला तर..हे स्पेक्युलेशन आहे. असं घडलेलं तर नाहीये. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे?

आणि गेली दहा पंधरा वर्षं महाराष्ट्रात जे चालू होतं - भांडारकर संस्थेवर हल्ला, पुतळे फोडणे, इतिहासाचे पुनर्लेखन व राजकिय वापर- हे पीसफुली चर्चा करून झालेले प्रकार होते का? संबंधित militant groups चा तत्कालीन सत्ताधाऱयांची असलेला संबंध हे ओपन सिक्रेट आहे अगदी कालपरवाच अधोरेखित झाले आहे. ते डेंजर वाटत नसेल आणि ही फुटकळ संघटना- जिला सरकार बधलेलं अजिबात नाही- हे डेंजर वाटत असेल तर अवघड आहे.

A) संबंधित militant groups चा तत्कालीन सत्ताधाऱयांची असलेला संबंध he ओपन सिक्रेट आहे अगदी कालपरवाच अधोरेखित झाले आहे.

B) ते डेंजर वाटत नसेल आणि ही फुटकळ संघटना- जिला सरकार बधलेलं अजिबात नाही- हे डेंजर वाटत असेल तर अवघड आहे.
<<
हे फुटकळ गोरक्षस वगैरे militant groups .... सद्यकालीन सत्ताधाऱयांशी असलेला संबंध

Closed secret Lol

शिल्पांकडे डायरेक्ट स्त्री-पुरुष संबंधांचे जाहीर प्रदर्शन किंवा स्त्रीचा ऊपमर्द
>>
कामवासना - कामशिल्पे ह्यातून सरसकट स्त्रिचा उपमर्द होत नाही.
जर त्यात स्त्रीला object म्हणून रेखाटले असेल किंवा object म्हणून वापरले असेल तरच तो उपमर्द होईल.
एक स्त्री म्हणून मी हे नोंदवू इच्छिते.

Pages