माझा एकमेव ड्यु आयडी ( - मदर वॉरिअर)

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

मायबोलीवर येऊन १३-१५ वर्शं झाली तरी माझा एकच आयडी कायम होता तो म्हणजे बस्के. लोकं ड्युआय का काढतात ह्याचे नवल मात्र कायम वाटायचे. एक म्हणजे गरज काय, अन दुसरे म्हणजे हे सर्व मॅनेज करणे किती अवघड जात असेल?

दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला मिळाली यथावकाश. मला ड्यु आय घेऊन का होईना पण व्यक्त होण्याची गरज पडली. आणि ते सर्व, दोन दोन आयडेंटिट्या मॅनेज करणे किती अवघड जाते हे ही समजले.

तीन वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात एक वादळ आले. पहिले एक दिड वर्षं आपलं आपलं मॅनेज करून नेलं निभावून. पण हळूहळू व्यक्त होण्याची गरज ( तीही नॉर्मल, अ‍ॅडल्ट लोकांबरोबर) प्रॉपर संभाषणाची गरज खूप भासू लागली. माझे सोशल लाईफ आधीच तसे कमीच होते व ह्या नवीन परिस्थितीमुळे चांगलेच हँपर झाले होते.

हिच ती गरज व मीच ती मदर वॉरीअर.

सुरवातीला केवळ ऑटीझमबद्दल माहिती पोचवणे व जमेल तितके व्यक्त होणे इतकाच उद्देश होता. व तो पार पाडणे जमतही होते. मात्र हळूहळू मला ह्या दोन दोन आयडेंटिट्यांचा खूप त्रास होऊ लागला. मी बस्के म्हणून मायबोलीवर येणे बरेच कमी केले. कारण चुकून इकडचा संदर्भ तिकडे देणे वगैरे होणे मला तेव्हा परवडण्यासारखे नव्हते.

बरेच ड्युआय सुखाने नांदत असतात. मग मलाच का आयडेंटिटी रिव्हिल करायची आहे? कारण मी अशी मूळात नाहीये. मला जे जसे आहे ते तसे बोलायला, व्यक्त व्हायला आवडते. पण गेल्या काही वर्षात सिचुएशनमुळे व मी तयार केलेल्या ह्या कप्प्यांमुळे मला नॉर्मल संभाषण अवघड बनत गेले. मुलांच्या गप्पा होत असताना मी एकदम शांत बसणार. काही म्हणजे काहीच बोलता येत नाही. कारण ना कोणाला माहित आहे ऑटीझमबद्दल, न मला नॉर्मली बोलता येतंय मुलांचे चिमखडे बोल वगैरे बाबत. शिवाय मला स्वतःला स्प्लिट पर्सनालिटी आहे की काय असे वाटावे इतका गोंधळ सुरू झाला. ज्या मैत्रिणी मुलाचा ऑटीझम जाणून आहेत त्यांनी बस्केला विचारले मवॉ तू आहेस का? बस्के म्हणणार नाही. बस्केच्या ओळखीच्या आयडींशी मदर वॉरिअर , कोण तुम्ही, कुठे असता करत बोलणार! सगळा खरंच सावळा गोंधळ!
माझ्या आधीच कॉम्प्लीकेटेड असलेल्या आयुष्यात हा गोंधळ मला वाढवायचा नव्हता. तो असा वाढेल असे वाटलेही नव्हते. पण झाले खरे तसे.

शिवाय ह्यासर्वात ऑटीझम अवेअरनेसचे काय? मी माझ्या नाव/गावासकट जेव्हा ऑटीझमबद्दल बोलीन, तेव्हा तो जास्त लोकांपर्यंत पोचेल रादर दॅन मवॉमार्फत.
कोण मवॉ? कोण जाणे. तिच्यावर कोणी का विश्वास ठेवावा?

असं सगळं होऊ लागले. अन मला हे अनबेअरेबल झाले. सो... मी, बस्के, भाग्यश्री - मीच मदर वॉरीअर, स्वमग्नता एकलकोंडेकर आहे. इथून पुढे ऑटीझम विभागात बस्केच लिहीत जाईल. Mother warrior, goodbye! You gave me tremendous support when it was truly needed!
थँक्स मायबोलीकर्स, मवॉला इतके सांभाळून घेतल्याबद्दल!

विषय: 
प्रकार: 

मनापासुन _____/\______.

बस्के दोन्ही आयडी दोन वेगवेगळे व्यक्तिमत्व वाटताहेत...
तु खरच वॉरीयर आहेस किप इट अप! hats off to u..>>>>>>>+१००००००.

तुम्ही कोणीही असा ताई तुमच्या लढ़ाऊ बाण्याला अन सत्य प्रिय असल्यामुळे तुम्ही केलेले मोकळे विवेचन ह्याच्यामुळे आदर प्रचंड वाढला तुमच्याबद्दल Happy

वरती अनेकांनी व्यक्त केलेल्य भावनांशी सहमत.

परिस्थितीच्या रेट्याने बदलत जाणारे आपण कसे बदलल्लो आहोत कसे बदलत आहोत ह्याची भावनिक-तार्कीक छाननी करणे कधी कधी अपरिहार्य होऊन बसते. बदलणार्या 'मी'त व असलेल्या 'मी'त "आपला संवाद आपणासी" करण्याची सोय म्हणजे वेगळा आयडी, डु-आयडी, असे मला वाटते. मदर वॉरिअर ही तुमच्यात घडत वाढत गेलेली ओळख कुथेतरी त्र्ययस्थ पणे मांडताना आज ती तुमची ओळख तुमच्याशी पुन्हा एकरूप झाली असे काहीसे वाटले.

बर वाटल वाचून. मोकळ झाल्यासारख.
आपल्या विषयी आदर व प्रेम वाढल.

आभाळाएवढी आहेस गं! शब्द तोकडे आहेत काहीही बोलण्यासाठी.

मला आणखी काय आवडलं तर, मनावरचा तो बोजा तू तिरमिरीनं फेकून दिला नाहीस, छानपैकी उमदेपणानं उतरवून खाली ठेवलास आणि मोकळी झालीस. हे फार फार अवघड आहे. सलाम!

एखाद्याबद्दलचा आदर आभाळाएव्हढा असतोच... त्यात अजून एका आभाळाएव्हढा आदर कसा काय मावतॉ... पण मावतोच.
मन अगदी उतू जाण्याइतकं हे तुझ्याबद्दल वाटणारं मोठ्ठेपण आहे, बस्के.

मी गेले वर्षभर अगदीच 'मिसिंग इन अ‍ॅक्शन' होते. एकही लेख लिहीला नाही ह्यानंतर. एनीवे.. एक अपडेट द्यायचे होते.
मी जर्नी विथ ऑटीझमसाठी फेसबुकवर पेज तयार केले आहे. वेबसाईट आहेच पण आजकाल फेसबुक वरून कनेक्ट होणे, प्रसार करणे जास्त सोपे असल्याने तिथेही पेज बनवत आहे. मी मैत्रीण/मायबोलीवर ह्या वेबसाईटच्या बाबतीत 'कमिंग आउट' केले असले तरी वर्ल्ड वाईड वेबच्या समोर जाण्याची माझी इच्छा नाही त्यामुळे पेजवर कुठेही माझे नाव नसेल. मात्र तुम्ही त्या पेजवरच्या पोस्ट्स तुमच्या वॉलवर शेअर करू शकता.. हे ते पेज. https://facebook.com/mr.journeywithautism/
तुमच्या फ्रेंड्सनाही कळवा. आत्तापर्यंतचे लेख तसेच नवा कंटेंट मी तिथे लिहित जाईन. मच थँक्स फॉर ऑल द लव्ह! .

शब्द तोकडे आहेत काहीही बोलण्यासाठी.

मला आणखी काय आवडलं तर, मनावरचा तो बोजा तू तिरमिरीनं फेकून दिला नाहीस, छानपैकी उमदेपणानं उतरवून खाली ठेवलास आणि मोकळी झालीस. हे फार फार अवघड आहे. सलाम!>>>>>>+१

बस्के,
मला या ड्यू आयडीबद्दल आज कळले. पण मी तुझे हे सगळे लेख अगदी मनापासून मैत्रीणवर वाचले आहेत. काही काही तर पुन्हा पुन्हा.
आपल्या सगळ्यांनाच "नॉर्मल" या शब्दात अडकून पडायची सवय लागलेली असते. आणि या एका समजुतीमुळे कित्येक लहान मुलांना अकारण मनःस्ताप होताना दिसतो. तुझा लढा हा या "नॉर्मल" शब्दाशीच आहे/होता. त्यामुळे काही दिवस तुला या आयडीचा आधार घ्यावा लागला.

पण यातून तू जो मार्ग काढला आहेस -- तुझ्या आजूबाजूच्या "नॉर्मल" लोकांना ही सगळी माहिती द्यायचा. आणि मैत्रीण सारखे अतिशय सकारात्मक असणारे संकेतस्थळ काढायचा, हा तुझ्या मुलानी तुझ्यात घडवून आणलेला बदल आहे, ज्याचा फायदा माझ्यासारख्या कित्येक मैत्रिणींना होतो आहे. तुझ्या मुलाला तुझ्यासारखी आई मिळाली हे त्याचे केवढे मोठे भाग्य आहे.

आणि मला खात्री आहे की तो नाव काढणार.

सई, थँक्स फॉर युअर काईंड वर्डस! Happy अगदी खरं बोललीस. लढा नॉर्मल शब्दाभोवती व मुलाने मला बदलवलं! कुडन्ट अ‍ॅग्री मोअर!
मैत्रीणवर सर्व लेख नाही आहेत. मी अर्धेच आणले आहेत. वर मदर वॉरियरच्या प्रोफाईलची लिंक आहे त्यात किंवा जर्नी विथ ओटीझम वेबसाईट्वर सगळे लेख मिळतील. वेबसाईटवर अजुन जास्त वेगळा कंटेंट आहे. फेसबुक पेजवर हे सर्व लेख येतील आठवडाभरात..

Pages