जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 June, 2017 - 15:40

आज ऑफिसमध्ये.. ऑफिसहून सुटल्यावर ट्रेनमध्ये.. घरी पोहोचल्यावर शेजारीपाजारी मित्रांमध्ये.. मोबाईलवर व्हॉटसप उघडून पाहिले तर प्रत्येक ग्रूपमध्ये .. हेच चालू होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा!

जसजसे ईंग्लण्डच्या विकेट कोसळू लागल्या तसे हे वाढतच गेले. जिथे तिथे पाकिस्तानी गोलंदाजांचे कौतुक कानावर येऊ लागले. हे मन केवळ भारतीयांचेच. ईतक्या दुवा आणि प्रार्थना एकत्र झाल्यावर पाकिस्तानने सामना सहज जिंकायचाच होता....
आणि तो जिंकताक्षणीच अमर-अकबर-एंथनी वेगळे झाले तरी शेवटी एकाच आईची लेकरं ती, तसेच भारत-पाक-बांग्लादेश ही आपापसात फाळणी करून बसलेली भावंडे त्या फाळणीला जबाबदार असलेल्या गोरया साहेबांच्या ईंग्लण्डला स्पर्धेबाहेर काढत कशी एक झाली या आशयाचे सुजलाम सुफलाम मेसेज फिरू लागले.

या सर्व जल्लोषामागे प्रामुख्याने दोन कारणे -

1) फायनलला ईंग्लण्डला ईंग्लण्डमध्ये हरवण्यापेक्षा पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये हरवणे जास्त सोपे आणि आपले जिंकण्याचे जास्त चान्सेस.

पण हे कारण क्षुल्लक वाटावे असे दुसरे भक्कम कारण म्हणजे,

2) अजून एक ब्लॉकबस्टर भारत-पाक सामना. एखाद्या वर्ल्डसिरीजच्या फायनलला. म्हणजे जणू ड्रीमफायनलच. रविवारची एक सुट्टी एका अविस्मरणीय सामन्याचा आनंद घेत धमाल जाणार.

या वरच्या दोन कारणांमुळे स्वत:ला अगदी कट्टर देशभक्त म्हणवणारे आणि देशप्रेमापोटी पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याच्या निर्णयाला समर्थन देणारे मूळचे क्रिकेटप्रेमी देखील आज हेच करत होते.. जितेगा भाई जितेगा.. पाकिस्तान जितेगा !

जर ईतकी मजा येते तर ही बहिष्काराची ढोंगं कशाला?
मल वाटते देशद्रोहाचा शिक्का बसण्याची भिती झुगारून आता सरकारला सांगायची वेळ आली आहे की एक क्रिकेटप्रेमी म्हणून आम्हाला भारतपाक मालिका त्रयस्थ ठिकाणी का होईना पुन्हा सुरू व्हायला हव्या आहेत. ती सचिनची चेन्नई इनिंग, त्या कुंबळेने काढलेल्या दहा विकेट, ती टोरेंटोची दादागिरी, तो वर्ल्डकपवाला सचिनने अख्तरला मारलेला छकडा, ते धोनीने गाजवलेले पाकिस्तान, जोगिंदर शर्माच्या हातात चेण्डू सोपवत भारताला मिळवून दिलेला विश्वचषक, अगदी परवाची कोहली-युवराजने पाकिस्तानी गोलण्दाजीची काढलेली पिसे, अगदी हेच नाही तर पाकिस्तानी वर्ल्डक्लास वेगवान गोलण्दाजांचा मारा, अख्तरचा बाऊन्सर, वकारचा स्विंगिण्ग यॉर्कर, ती साकलेनची जादुई फिरकी, त्या अन्वर, आफ्रिदी आणि ईझाज अहमदने केलेल्या भारताच्या धुलाया आणि मग वेंकटेशने काढलेला सोहेलचा दांडका हे सारे पुन्हा पुन्हा अनुभवायचे आहे. मन मारून देशप्रेम जपायचे आणि मग ते ढोंग असे उघडे पाडायचे याला काय अर्थ आहे?

बघा पटलं तर लाईक करा.. आणि चटकन करा.. कारण उद्या बॉर्डरवर काही चकमक घडली आणि ती बातमी वाचून ईथे आला तर मुळीच नाही पटणार.. भारत-पाक क्रिकेटचे संबंध हे असेच आहेत. तुझे माझे जमेना, आणि तुझ्यावाचून..... जाऊ दे मरेना. जमल्यास या धाग्यावर रविवारी भारत-पाक सामन्याचा आनंद लुटायला नक्की या !
सोबत एक्स्ट्रा इनिंगमध्ये कोणाला आपल्या अविस्मरणीय भारत पाक सामन्यांच्या आठवणी शेअर करायच्या असतील तर नक्की करा ..
आणि हो, फॉर ए चेंज, आजच्या घडीला मला पाकिस्तान मोस्ट डिजर्व्हिंग टीम वाटत असल्याने मी रविवारच्या फायनलला पाकिस्तानला सपोर्ट करणार आहे .. याची नोंद घ्या Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसले पैसे खाण्याचे आरोप करताय रेशमी..
तुमच्या सारख्या फॅन्स चा हाच प्रॉब्लेम आहे.. जिंकतो match तेंव्हा कौतुकच कौतुक... एक match मध्ये परफॉर्मन्स चुकला तर बिनबुडाचे आरोप करणार..जाऊन दगडे मारणार क्रिकेटर्स च्या घरावर...

ओ च्रप्स, मी कुठे आरोप केलेत पैसे खाल्ल्याचे? माझ्या म्हणण्याच्या अर्थ नीट समजून घ्या. मॉडेलींग मध्ये यांना पैसे मिळतात ते वरचे. पण जेव्हा क्रिकेट खेळुन पैसे मिळतात ते हक्काचे , पण या हक्काच्या पैशांचे यांना महत्व राहीलेले नाहीये. मी या पैशाबद्दल बोलतेय, आपल्या क्रिकेट पटुंनी फिक्सींग चे पैसे घेतलेत असा घाणेरडा आरोप मी केलेला नाहीये हे आधी लक्षात घ्या, कृपयाच. उगा आपले काहीही आरोप करत रहायचे. आम्ही क्रिकेटर्स ना डोक्यावर पण बसवत नाही आणी दगडं पण मारत नाही.

बाकी पाकड्यांच्या ( हो, मी पाकडेच म्हणणार) जिद्दीला मानले पाहीजे. यांचे शेपुट सुद्धा शेवटपर्यंत काम करु शकते हे आधी पण सिद्ध झाले आहे. पण वाईट वाटतेय आपली अवस्था बघुन. बाकी धोनी वगैरे करतील ते खरे.

ऋन्मेष, जिभेवर काळा डाग वगैरे आहे का रे बाबा तुझ्या?>>>>>> अगदी अगदी.पण ते मस्त खेळले.रुबाबात.
रस्त्यावर शुकशुकाट आहे.सन्नाटा वगैरे आहे.

काळी जुबान वगैरे काही नाही....... याला क्रिकेटींग ब्रेन म्हणतात ईतकेच.

माझेही मन भारत भारतच करत होते पण दिमाग पाकिस्तानच सांगत होते. आणि का ते वर कारणे दिली आहेतच.
त्यात म्हटल्याप्रमाणे पहिल्या सामन्यानंतर त्यांच्या गोलंदाजीने जी कात टाकली ती ईथेही तोच परफॉर्मन्स कंटिन्यू ठेवला यात नवल नाही. तसेच त्यांच्या नवोदीत फलदांज फकहर झमानचा विशेष उल्लेख केलेला त्याने माझा विश्वास सार्थ ठरवला. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे हे कबूल. मात्र मी क्रिकेटचे अंदाज भूतकाळातले आकड्यांवर नाही बांधत तसेच भावनेच्या आहारी जाऊन नाही लिहीत. तर माझे क्रिकेटींग ब्रेन वापरून काय घडतेय, कोणाच्या विजयाचा वा पराजयाचा पॅटर्न आहे, कोणाची काय क्षमता, काय फॉर्म आहे, कोणत्या संघासोबत मोमेण्टम आहे, स्ट्रेंथ वीकनेस वगैरे वगैरे गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून मगच बोलतो. त्यामुळे अचूकतेचे प्रमाण वाढते. अन्यथा भारतासोबत पाकिस्तान जिंकायचे चान्सेस जास्त आहेत असे लोकभावनेविरुद्ध जऊन एवढे धाडसी विधान पब्लिक फोरमवर टाकायची हिंमत दाखवलीच नसती.

जर मला आजच्या सामन्यावर पैसे लावायचे असते तर मी पाकिस्तानवरच लावले असते. पण अर्थात भारताच्या सामन्यावर मी कधीच पैसे लावत नाही. क्यों की जहा दिल लगा होता है वहा पैसे नही लगते. आज वही दिल टूट गया. जेव्हा पाकिस्तानने बिनबाद शंभरची सलामी दिली आणि फकहर झमान नेहमीपेक्षा संयम दाखवत आपली इनिंग रचतोय हे समजले तेव्हाच मी हा सामना गेलाय हे ओळखले. माझाच अंदाज खोटा ठरावा म्हणून मीच प्रार्थना करत होतो. पर आखिर ईस दिल और दिमाग के जंग मे दिमाग जित गया. मोहब्बत की जंग होती तो शायद दिल जित जाता, पर ये क्रिकेट कि जंग थी. यहा दिमाग ही जितनेवाला था.... Sad

येनीवेज,
पाकिस्तानला आपण मात दिल्यावर फिरवण्यासाठी व्हॉटसपचे कित्येक मेसेज तयार असतील. जे आता सारे व्यर्थ गेले असतील. मला तर आता व्हॉटसप उघडायलाही भिती वाटतेय. सामना सुरु झाल्यापासूनच मला हे असे घडणार याचा अंदाज आल्याने उघडलेच नव्हते. उघडले तर आज झोप नाही येणार. लोकं आपल्याईकडची वेडी आहेत. फक्त एकच विनंती, आपल्याच खेळाडूंना शिव्या घालू नका. देशातले सर्वोत्तम 11 क्रिकेटर निवडून अश्या स्पर्धांत पाठवलेले असतात. जर ते नाही करू शकत तर कोणीही नाही करू शकत.

नो बॉल और वाइड किस प्रेशर में होती है ?
वो भी एक नहीं 10 - 10 ?

पुरे पाक इनिंग में हर ने भारतीय bowlers को कुत्ते की तरह धोया,
सिवाय दो के और वो कौन है,
Hardik Pandya, और भुवनेश्वर
जहाँ सभी रन लुटा रहे थे, वही Pandya और भुवनेश्वर ने consistent bowling कर 5 की दर से रन दिए, जो सबसे कम है
और भारत के लिए पहला विकेट(किसी बॉलर द्वारा) भी लिया।

दूसरी ओर, बैटिंग को भी देख लीजिए
जहाँ पाक के नए batsmen जिन्हें international खेलने का ज्यादा अनुभव भी नही है, वो दुनिया की best team के खिलाफ century और हाफ सेंचुरी लगाते हैं
और जिस पिच पर batting करना इतना आसान हो,
वही दूसरी तरफ दुनिया के best batsmen जीरो पर आउट हो गए। करीब 60 के स्कोर पर worlds best top batting order सुपर फ्लॉप हो जाती है।
उसके बाद उसी पिच पर उसी बौलेर्स के बॉल पर Hardik Pandya 150 से 200 के स्ट्राइक रेट से 43 बॉल पर 76run बनाता है जिसमे मजे की बात ये है कि इसमें पंड्या के 6 sixers भी शामिल हैं।

जब ये देखकर फटने लगती है, तो पवेलियन से एक लौंडा पानी की बोतल लेकर आता है, वो भी किसके लिए हमारे नवाब Jadeja के लिए, जिनके क्रीच पर महज कुछ ही मिनट हुए थे।

और आगे सारी दुनिया ने अपनी आँखों से देखा,
अगले ही over में, Pandya run out
वो भी कैसे, ये भी देखने की चीज है
जब कोई सामने वाला batsman विरोधी टीम के छक्के छुड़ा रहा हो, तो नॉन striker end पर जो प्लेयर खड़ा हो उसे अपनी wicket give up कर देता है।
लेकिन फिर यहाँ देखिये, नवाब को जितनी देर में स्ट्राइकर एन्ड का बल्लेबाज मने Pandya , दूसरी छोर पर पहुच जाता है,
वहां इ नवाब हिलते भी नही है
अगर ये सिर्फ क्रीच की line से बाहर निकल जाता तो Pandya run out होने से बच जाता।

आगे, ये देश भावनाओ से चलता है, मुझे मालूम है बहुत से लोग पढ़ते ही मुझे गाली देंगे।
बोलेंगे, हारने के सौ बहाने, वगैरह वगैरह।।

मला सामन्याच्या आदल्या दिवशीच हा खाली दिलेला मेसेज आलेला. यात किती तथ्य असावे आणि दिलेले डिटेल्स खरे आहेत का? प्लीज कोणीतरी कन्फर्म करा. व्हॉटसप ग्रूपवर एका सचिन द्वेष्ट्याने टाकलेय. त्याला ऊत्तर द्यायचेय.
>>>>>>>>>>>>

भारत-पाकिस्तान मॅच मध्ये 2000 करोड़ रुपयांची उलाढाल करणारे बेटींग रॅकेटचे सुत्रधार संजय नारंग आणि शोभन मेहता.

संजय Ambassador Hotel च्या मालकाचा मुलगा. इशा कोप्पीकरचा ...... आणि अंजली मेहताचा खास मित्र. सुष्मीता सेनला अबुसालेमच्या भेटी करता विदेशी नेणारा संजय नारंग.

सचीन ने "Tendulkars" हाॅटेल ह्याच नारंगच्या प्राॅपर्टीत सुरु केल होत.

शोभन मेहता हा अंजलीचा cousin. भारतातील कुप्रसिद्ध बुकी. सचीनच्यालग्नात ह्याने अंजलीला एक नेकलेस भेट दिला होता.

उद्याची मॅच जर पाकिस्तान जिंकले तर संपुर्ण श्रेय ह्या महात्म्यांच असेल.

रुन्मेष, ज्याचे सत्य असत्य सिद्ध करता येत नाही त्या वादात आपण भांडून काय फायदा?

नारंग, सचिन, मेहता, मोदी, श्रीनिवासन, पवार सगळे कोट्यवधी कमवणार, आणि तुम्ही आम्ही सामान्य ते लोक प्रामाणिक कि अप्रामाणिक यावर एकमेकांची आयमाय काढत भांडत बसणार, कशासाठी?

सोडून दे भावा, तू काय सचिन चा वकील नाही, तो एक सही चे 76 हजार घेतो, तू त्याची बाजू फुकटात घेऊन भांडतो, तू व तुझ्या सारखे करोडो असे फुकटात भांडतात यावरच तो पैसे कमावतो.... बघ या बाजूने विचार करून कधीतरी

आता काथ्याकूट करून काय फायदा? सत्य कधीही समोर येणार नाही. निकाल मात्र समोर येतो, तो स्वीकारून पाकिस्तानचे अभिनंदन करा. बऱ्याच वर्षांनी त्या जनतेच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडलेय, त्यांना त्याचा आनंद घेऊ द्या.

कसल सत्य ? On that Day they just played better than us and deserved to win . हे मान्य का करवत नाही ?
ज्यान अगदी कॉलेज लेव्हल क्रिकेट खेळलय त्याला प्रेशर म्हणजे काय माहित असत . मग भारत पाक सोडाच.
उगाच प्रत्येक गोष्टीत फिक्सिंग आणायची गरज आहे का ?

उगाच प्रत्येक गोष्टीत फिक्सिंग आणायची गरज आहे का ?

>> केदार, नक्की काय प्रॉब्लेम आहे?

कालची म्याच त्या डब्ल्युडब्ल्युडब्ल्युएफ कुस्त्यांसारखी वाटली.
भुवनेश्वरच्या बॉलिंगमुळे अन पंड्याच्या बॅटिंगमुळे इतर बरीचशी "घाऊक पितळं" उघडी पडली.

मोकळ्या मनाने अभिनंदन करूया पाकिस्तानचे. त्यांनी आनंद लुटावा असे बर्‍याच दिवसांनी काही घडलेय.... साधना, या मुद्द्याशी सहमत.

उगाच प्रत्येक गोष्टीत फिक्सिंग आणायची गरज आहे का ?
>> केदार, नक्की काय प्रॉब्लेम आहे?
>> नानाकळा , हेच की एक मॅच हरली की ते मुद्दाम हरले , फिक्सिंगच केली अस म्हणण . हे म्हणत असताना आपण डायरेक्ट त्यांच्या Character आणि Integrity वर शंका घेतोय हेही न पाहण .

केदार, समहाऊ, मी तुमच्याशी यावेळेस तरी सहमत होऊ शकत नाही.
उठसुठ अशी शंका घेतली जात नाही, निदान माझ्याकडुन तरी, पण कालची मॅच अथपासुन इतिपर्यंत बघता माझ्याही मनात हीच शंका बळावली.
अन त्यास इतरही अनेक कारणे आहेत, जशी की मिडियामधुन बातम्यांद्वारे "सट्ट्याच्या आकड्यांची केलेली" जाहिरात... मुलाखती, अन इतर अनेक बाबी.
माझ्यामते आयसीसी काय की बीसीसी काय, दोन्ही संघटना हल्ली केवळ "धंदा" करायला बसलेल्या आहेत.
आयपीएल तर सरससकट करमणूकीचा धंदा आहे. अन म्हणूनच मला डब्ल्युडब्ल्युएफ कुस्त्यांची आठवण झाली.

जशी की मिडियामधुन बातम्यांद्वारे "सट्ट्याच्या आकड्यांची केलेली" जाहिरात... मुलाखती, >> आणि हे सग्गळं आपल्या 'सरकार'ने पाहुन देखिल काणाडोळा केला??

"हार्दिक कदाचित मॅच खेचुन आणु शकेल असे वाटल्या मुळे ड्रेसिंग रुम मधुन निरोप घेउन १-२ निळे कपडे घातलेले लोक काहितरी निमित्त करुन मैदानात येउन जडेजाला हार्दिक चा बंदोबस्त करायचा आदेश देऊन गेले. " असा मेसेज काल फिरत होता.

Pages