Submitted by सत्यजित... on 13 January, 2017 - 09:53
पेटुनी आरक्त संध्या,मातला अंगार आहे...
केवडा वा रातराणी..मोगराही फार आहे!
मोकळे बाजार-रस्ते,शांत आहे शहर सारे...
वाटते आहे उद्याचा,वादळाचा वार आहे!
काजव्यांच्या चार ओळी,सारख्या फिरतात येथे...
सांग त्यांना..पेटलो तर,सूर्य माझे सार आहे!
एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी...
त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे!
सांगू नका कोणी मला हा कोणता आहे ऋतू...
आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे!
सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी...
मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे!
—सत्यजित
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह! क्या बात है! अतिशय छान
वाह! क्या बात है!
अतिशय छान आशय आणि समर्पक भाषा. गझल आवडली.
मनाापासून धन्यवाद शार्दुलजी!
मनाापासून धन्यवाद शार्दुलजी!
अतिसुंदर ! प्रत्येक शेर दमदार
अतिसुंदर ! प्रत्येक शेर दमदार !
सांगू नका .... मात्रा चुकतात
सांगू नका .... मात्रा चुकतात
सुरेश भट यांनी लिहीलेले,
सुरेश भट यांनी लिहीलेले, यशवंत देव यांचे संगीत असलेले नि देवकी पंडित यांनी गायलेले रंगुनी रंगात माझ्या, रंग माझा वेगळा हे गाणे आत्ताच ऐकले. हुबेहूब त्याच चालीवर वरील कविता म्हणता यावी.
धन्यवाद!
धन्यवाद!
खूपच सुंदर रचना.......
खूपच सुंदर रचना.......
धन्यवाद मीनलजी!
धन्यवाद मीनलजी!
वाह! अतिशय सुंदर झालिये..:)
वाह! अतिशय सुंदर झालिये..:)
वरती आणायलाच हवी!
एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी...
त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे!>> वाह!
Wahh,,
Wahh,,
खूप धन्यवाद माउ!
मनःपूर्वक धन्यवाद माउ!
Thanks kally!
क्या बात है..
क्या बात है..
<<<< सोबती कोणी न माझा,ना
<<<< सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी...
मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे! >>>>>
हे खूप आवडले...
मस्तच
मस्तच
रमा,निरु,शशांकजी मनःपूर्वक
रमा,निरु,शशांकजी मनःपूर्वक धन्यवाद!
अरेच्चा हि गझल वाचली नव्हती
अरेच्चा हि गझल वाचली नव्हती मी...
छान..
खूप छान !!!
खूप छान !!!
शेवटचे दोन शेर ... अफलातुन.
शेवटचे दोन शेर ... अफलातुन.
सांगू नका कोणी मला हा कोणता
सांगू नका कोणी मला हा कोणता आहे ऋतू...
आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे!
--उत्तम...
छान! फार सुंदर ! गझल आवडली !
छान! फार सुंदर ! गझल आवडली !