क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय हे...
अफ्रिकेच्या मॅचबद्दल काहीच कॉमेंट्स नाहीत Uhoh

रच्याकने,
धवनचा फॉर्म परत आणाय्चा असेल तर त्याला आयसीसीच्या स्पर्धेत खेळवायचा.

kharach re ankya.. lai charcha padat khelat hota to achanak ekdam jorat ala. Happy

काल क्रिकइन्फो वर १५ ची सेमी बांगला देश वि. भारत असे लिहीले होते लिस्ट वर. आज ते पुन्हा बदलून TBA केलेले आहे. श्रीलंका-पा़क मॅच च्या निर्णयामुळे दोन्ही सेमीज ची दुसरी टीम ठरणार असे दिसते - कारण लंकेने भारताला हरवले पण पाक ने नाही. त्यामुळे सेमीज चे रँकिंग त्यांच्यापैकी कोण जिंकतो आज त्यावरून ठरेल असे दिसते (इंग्लंड सोडून).

म्हणजे लंका जिंकल्यास आपला नेट रनरेट जास्तं असूनही त्यांनी आपल्याला हरवले होते म्हणून ते ग्रूपमध्ये टॉप करतील का?
पाकिस्तान जिंकले तरी भारताचा नेट रनरेट गाठू शकण्यासाठी त्यांना ओवरला ४० रन बनवावे लागतील तर ते शक्य वाटत नाही.

वॉर्न, मांजरेकर, हुसेन, पाँटिंग, गांगुली, होल्डिंग, ग्रॅमी स्मिथ, मॅक्युलम, रमीझ राजा, संगाकारा वगैरे मंडळी फायनल कोणत्या टीम्स्मध्ये होईल ह्याचे भाकित वर्तवत असतांना सगळे लोक ईंडिया-ईंग्लंड आणि ईंडिया-ऑस्ट्रेलिया अशी नावं घेत असतांना मध्येच रमीझ राजा येवून पाकिस्तान - ईंग्लंड फायनल आणि पाकिस्तान जिंकणार म्हणाला तेव्हा एकदम फिस्सकन हसायला आलं.
पण काही सांगता येत नाही क्रिकेट मध्ये.

पाक इंग्लंड सेमी फायनल होऊ शकते जर जिंकले तर मग फायनल तेच कसे खेळणार? रमीझ राजाला सांगितले नाही का एवढा रनरेट सोप्पे नाही..

पाक इंग्लंड सेमी फायनल होऊ शकते जर जिंकले तर मग फायनल तेच कसे खेळणार? रमीझ राजाला सांगितले नाही का एवढा रनरेट सोप्पे नाही.. >> हे स्पर्धा नुकतीच चालू झाली होती तेव्हाचे प्रेडिक्शन्स आहेत सगळ्या कॉमेंटेटर लोकांचे.

http://www.espncricinfo.com/icc-champions-trophy-2017/engine/series/1022... इथे point सारखे असतील तर NRR प्रमाणे संघ दाखवलेत त्यामूळे आपण वि. बांग्लादेश असेल का ?

एव्हढी रटाळ स्पर्धा आधी पाहिली नव्हती. विचित्र scheduling .

एव्हढी रटाळ स्पर्धा आधी पाहिली नव्हती. विचित्र scheduling >>> वीकेंड + ईंडियाचे गेम्स एनकॅश करण्याचा आटापिटा आहे सगळा बाकी काही नाही असं मला वाटतं.

दुसर्‍या देशांच्या मॅचेस आणि भारताच्या मॅचेस ला असलेली ऊपस्थिती खूप काही सांगून जाते.
भारत जिंकतांना भारतीय पब्लिकला बघणे हे आता एक अतिशय चीड आणि लाज वाटायला लावणारी गोष्टं झाली आहे. कॅमेरा स्टेडियम मध्ये गेला की मैदानातल्या मेन स्क्रीनवर बहुधा स्टेडियमचा तो भाग दिसत असावा. त्या स्क्रीन मधली पब्लिक अक्षरशः चेकाळून ऊठते. विचित्रं हावभाव, स्क्रीन मध्ये येण्यासाठी धडपड, आजिबात प्लेझंट वाटत नाही बघायला. बांग्लादेशी पब्लिक तर फारंच वाह्यात वाटतात बघायला. कसले अ‍ॅग्रेशन असते एवढे कळंत नाही. एका टाळीचाही आवाज येत नाही. फार लाजिरवाणे वाटते हे बघणे.
ह्याऊलट ईंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड मॅचेस.... टेनिसची मॅच बघतोय की काय असे वाटण्यासारखा लयबद्ध टाळ्यांचा कडकडाट असतो. फार फार मस्तं वाटते ऐकायला आणि बघायला. सॉकरच्या स्टॅडियम मध्ये असते तसे साईन वेव्ज, घोळक्याने सुरात गाणे वगैरेही मस्तं वाटते.
खूप वाईट वाटते लिहायला पण मास आणि क्लास ची खूप मोठी दरी भारतीय आणि ईतर फॉरेन प्रेक्षकांमध्ये.

आपापसातली मॅच कोण जिण्कली हे आता तरी बघितले जात नाही, मागे कधीतरी पाहिले होते हे. आता नेट रनरेटच बघितला जातो आणि तेच योग्य आहे.

धवन आयपीएलपासूच चढत्या क्रमाने फॉर्मला आलेला. आयपीएलच्या सुरुवातीपासूनच त्याने रन्स बनवलेत पण तरी पहिल्या काही खेळी आश्वासक नव्हत्या. सहजता नव्ह्ती. मात्र त्याच् धावांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे उत्तरार्धात ती आली. अगदी स्टेप बाय स्टेप फॉर्मला आलेला. यंदाच्या ईंग्लिश कंडीशन टिपिकल नसल्याने त्याला तो फ्लो टिकवणे सोपे गेले.

ICC event ला कुठल्याही देशामधे टिपीकल विकेट्स नसतात रे, शक्यतोवर बॅट्समनना मदत होईल अशाच असतात. शेवटी पैशाचा सवाल आहे.

हे हल्ली रनठोक पिच बनवायचे आणि पब्लिक खेचायचे फ्याड आल्यामुळे. एकदा फलण्दाज धार्जिण्या विकेट बनवल्या गेल्या की त्या त्या देशाच्या टिपिकल कंडीशन कमी होत जातात. स्पोर्टींग विकेटलाच त्या उठून दिसतात. अन्यथा आयसीसीने खेळपट्ट्या आपल्या हातात घेतल्या तरी निसर्गावर त्यांचे नियण्त्रण नसते.

सरफराजचा आज सोमवार दिसतोय. लंका हरली तर आपल्या कर्मानेच. पाकिस्तान देखील आपल्या परीने हरायचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही संघात आत्मविश्वासाचा अभाव आहे. आणि अशी एखादी टीम सेमीला पोहोचणार. 95 टक्के शक्यता भारत ईँग्लण्ड अंतिम सामना..

तरी निसर्गावर त्यांचे नियण्त्रण नसते. >> हो पण venue selection नि scheduling वर असते. Northern England मधे ह्या वेळी पाऊस पडणे common आहे पण केव्हढ्या मॅचेस तिथे झाल्या नि वाहून गेल्या. मागे लंकेमधे monsoon season मधे चँपियन्स ट्रॉफी होती. असे विचित्र प्रकार चँपियन्स ट्रॉफी ला होतातच.

95 टक्के शक्यता भारत ईँग्लण्ड अंतिम सामना >> इंग्लंड ला पाकिस्तान हरवू शकते बे. किंबहुना ती अशी एकच टीम आहे जी कोणाला पण कधीही हरवू शकतील Wink

भारत पाक बांगला सेमीला ...
फाळणीनंतर पहिल्याण्दाच आज हे तीन देश एकत्र आले.. आणि सोबत आपल्यावर राज्य करणारे ईंग्लण्ड Happy

किंबहुना ती अशी एकच टीम आहे जी कोणाला पण कधीही हरवू शकतील 
>>>>
हे गेल्या एकदोन दशकातील पाकिस्तानला जास्त शोभायचे. आताच्या टीमबद्दल फक्त रमीज राजालाच असे वाटते.

रफ सरफेस असलेले स्लो पिच आहे तेंव्हा पाकिस्तानची टेलर मेड बॉलिंग चालणे साहजिक होते. आता कळेल कि इंग्लंड काय करू शकते ते ...

इंग्लंडची बॉलिंग लंकेपेक्षा जरा बरी आहे पण.. आणि ते होपफुली सिटर्स टाकणार नाहीत, तेव्हा काही सांगता येत नाही अजून.. कदाचित २११ डिफेंड करु शकतील.. पावसाची फार काही शक्यता तरी दिसत नाहीये सध्या... पण ह्या मॅच सारखे झाले तर.. http://www.espncricinfo.com/ci/engine/current/match/65233.html

212 हवेत पाकड्यांना..

गम्मत बघा ज्या देशाने 3 देश केले तो देश जिंकला तर बरंय असे वाटत होतं सगळ्यांना Happy

95 टक्के शक्यता भारत ईँग्लण्ड अंतिम सामना >> इंग्लंड ला पाकिस्तान हरवू शकते बे. किंबहुना ती अशी एकच टीम आहे जी कोणाला पण कधीही हरवू शकतील >>> असामी फिक्सिंग करुन आला होतास का ? Lol

Pages