Voice typing साठी चांगले online आणि offline सॉफ्ट वेअर कोणते?

Submitted by अजय अभय अहमदनगरकर on 9 June, 2017 - 14:34

Voice Typing साठी मी नॉर्मली गूगल डॉक्स वापरतो. तसे ते चांगले चालते.८० % अ‍ॅक्युरसी आहे. स्पीच नोट् सही उत्तम आहे. दोन्ही मध्ये हिंदी टायपिंग इतके उत्कृष्ट चालते की मला हिंदीत डिक्टेशन देण्याचा प्रचंड मोह होतो. ईंग्लिश भारतीय अ‍ॅक्सेंट्स चांगले रिस्पाँड करते. मात्र हिंदी सिलेक्ट करून मराठी डिक्टेशन दिले तर हिंदी मराठी कॉमन शब्द फक्त स्वीकारले जातात. मराठी भाषा गुगल डॉक्स मध्ये समाविष्ट करण्यासाठी त्याना काही जणानी कळवले आहे. पण पुरेशा रिक्वेस्ट आल्याशिवाय खरोखर यूझर्स मिळतील अशी खात्री पटल्याशिवाय ते मराठी त्यात घेणार नाहीत असे वाटते . त्यामुळे मराठी वॉईस टायपिंग सध्यातरी उपलब्ध नाही असे दिसते. ( असल्यास सांगावे ). ईंग्रजीवॉइस टायपिंग च्या डिक्टेशनसाठी आणखी चांन्गली ऑनलाइन आणि ऑफलाईन सॉफ्तवेअर कुणी वापरली आहेत काय त्याबाबत अनुभव द्यावेत. ड्रॅगनची प्रो दिसतात पण किमतीजास्त आहेत आणि ती कितपत अ‍ॅक्युरेट चालतात त्याची ग्यारन्टी नाही .
तरी याबाबत माहिती अथवा अनुभव पोस्ट करावेत ही विनंती.( मला दोन्ही भाषात काम करावे लागते.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ड्रॅगन फारच कॉस्टली आहे पर्सनल युज साठी. १०० % अ‍ॅक्युरसी तेही देऊ शकेल की नाही याची खात्री नसल्याने घ्यायचा विचार सध्या नाही. गुगल वाले मराठी कधी आणनार Uhoh

मलाही एक मराठी Voice typing साठी एकादे सॉफ्टवेअर असेल, तर हवे आहे. घरी बरिच जुनी पुस्तके, पडुन खराब होत आहेत. त्यांची पीडीएफ कॉपी बनवायची आहे.

बेसीक गोष्टींकरता (टेक्स्ट, ईमेल) आय्फोनची सिरी उत्तम आहे; अँड्रॉय्डवर हि तत्सम नेटिव काहितरी असावे.

बाकि मला शंका वाटते बड्या कंपन्या (गुगल, अ‍ॅपल) टायपिंग साठी अ‍ॅप बनवतील. कारण वॉइसमेमो रेकॉर्ड्/सेव करण्याकरता बरीच अ‍ॅप्स आहेत आणि आता सगळी कम्युनिकेशनची साधनं डिजिटल होत असल्याने एखादा मेमो डिक्टेट-टाइप-प्रिंट या सोपस्कारातुन जाणं हे जवळ्जवळ नाहिसं होणार आहे. वॉइसमेमो अ‍ॅपने केलेली ऑडीयो क्लिप अ‍ॅटेचमेंट्/हायपर्लिंक द्वारे शेअर्/पब्लिश करणं सोपं असल्याने तुम्हाला हवं असलेलं अ‍ॅप (भविष्यात) कमर्शियली वायेबल नाहि...

ओडिओ मेमो नाही.मला १०-१५ पानांची डॉक्युमेन्ट्स बनवावी लागतात की जे लिगल रेकॉर्ड म्हणून ठेवायचे असत्तत. त्यात ऑडिओ क्लिप चे काय करणार? मराठी वॉइस टायपिन्ग उपलब्ध नाही हिन्दी आहे.