मलेशिया - प्रवास

Submitted by रायबागान on 7 June, 2017 - 01:42

मलेशियाला जाण्याचा विचार आहे, दिवाळिच्या सुट्टित जाणार आहे.
ह्या विषयी एक धागा होता, असे वाटते

प्रवासाचे २ दिवस सोडुन ८/९ दिवस आहेत. टिकिट KUL आहे जाउन- येऊन

मलेशिया मध्ये KUL / Penang/ Longkawi/ Genting / Gorge town --
बघण्याचा विचार आहे.

- एकन्दरित १० दिवसात हे सर्व होइल का बघुन?
- कुठे किती दिवस रहावे?
- साधारण किती खर्च होइल?
- नक्की न चुकवण्यासार्ख्या जागा ? (must watch)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

.

के एल, जेंन्तिंग २ दिवसात होतं
के एल करणारच आहात अन १० दिवस ट्रिप असेल तर सिंगापूरचाही विचार करु शकता

जेंटिंगमध्ये बघण्यासारखे काहीही नाही, अर्थात तुम्हाला कॅसिनो मध्ये रस नसेल तर. तिथल्या राईड्स सध्या बंद आहेत, पुढच्या वर्षी सुरू होतील. तिथेच खाली strawbery गार्डन वगैरे आहे, फुलांचे गार्डन आहे ते पाहा. बाटु गुहा आहेत, तिथे पायऱ्या चढ उतार फक्त भारी आहे, एवढे चढल्यावर वर काहीही नाहीये बघण्यासारखे. तिथे बाजूला रामायण गुहा आहे ती मात्र बघा. पेनांग एका दिवसात बघून होते. तिथेही देवळेच आहेत. ती पहिली की संपले सगळे. पेनांग ला मत्स्यालय आहे , चांगले मोटठे मॉल्स आहेत. जी काय खरेदी करायची ती तिथेच करा. आम्हाला लंकावीला स्वस्त मिळेल , ड्युटी फ्री मिळेल वगैरे सांगितले गेलेले, म्हणून आम्ही पेनांगला काही घेतले नाही. आणि लांकविला दारू ड्युटी फ्री होती, बाकी सगळे ड्युटी फ्री लिहिलेले पण पेनांग पेक्षा महाग होते. आम्हाला दारूचा काहीच उपयोग नसल्याने आम्ही पेनांगलाच का नाही शॉपिंग केले म्हणत एकमेकांना शिव्या घातल्या. Happy

लंकावी मात्र अतिशय सुंदर आहे. मी 2 च दिवस होते पण ते कमी पडले. तिथे अजून 10 दिवस मी आरामात राहिले असते. तिथे दिवसाच्या टूर्स खूप आहेत. त्या घ्या. चॉकलेट फॅक्त्तरी थोडी महाग आहे. तिथल्या वस्तू मॉल मध्येही मिळतात आणि तिथल्या पेक्षा स्वस्त. तिथल्या समुद्र किनाऱ्यावर मला भटकता आले नाही वेळ अपुरा पडल्यामुळे.

तुम्ही फक्त शाकाहारी असाल आणि भारतोय जेवणच हवे हा आग्रह असेल तर हाल होतील. इथून शक्य तितके घेऊन जा खाणे. माझयासोबत एक प्रवासी फक्त इडली डोसा आणि बटाट्याची भाजी खाणार हा हट्ट धरून बसणारी होती. तिच्या नवऱ्याचे खूप हाल झाले प्रत्येक ठिकाणी सर्वांणा भवन शोधताना. तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर मात्र मज्जा... मस्त ताव मारा जे मिळेल त्याच्यावर.

मला परत मलेशियाला जायला मिळाले तर मी थेट लंकावीला जाईन आणि तिथेच समुद्रकिनारी लोळत पडेन.

मला परत मलेशियाला जायला मिळाले तर मी थेट लंकावीला जाईन आणि तिथेच समुद्रकिनारी लोळत पडेन. >>> + १०००००० .

आम्ही पेनांग पाहिलं नाही .
जेंटींग ला जायच तर गरम कपड्याची बॅग घेउन जावी लागेल वेगळी आणि सिनिअर सिटीझन्स ला फारसं आवडणार नाही म्हणून त्याऐवजी लंकावी निवडलं . लंकावीला ४ दिवस होतो , पण परत जायला नक्की आवडेल Happy ..

जेंटिंग थोडे थंड आहे पण मुद्दाम गरम कपडे हवेत असे वाटले नाही. एक पातळ स्वेटर किंवा पुलोवर बस होतो. तिथे दिवाळीत पाऊस असतो, दिवस सुखाने घालवला तरी 4 च्या सुमारास येतोच. आम्ही पक्षी अभयारण्य पाहायला गेलो तेव्हा तासभर दुकानाच्या शेडमध्ये उभे राहून पाऊस कधी संपतो याची वाट पाहिली. हवा बऱ्यापैकी थंड करून जातो. गरमही होते तेवढेच.

धन्यवाद, आदित्य आणि साधना Happy
KUL ल २ दिवस, penang 1 दिवस,
George town ला किती दिवस लागतिल?
जाणे worth आहे का? KUL हुन कसे जायचे?
KUL base आणि मग हि
सगळी ठिकाणे असे कारायचे का?
शाकाहारिच आहोत, त्यामुळे service apartment चा रहण्यासाठि विचार करतोय.
water ways ने longkawi ला जाण्याचा विचार आहे, कोणी हा प्रवस केलाय का?

तसेच इथे काहि trekking spots का ?

खरेदी साठी काहि खास tip?

http://www.maayboli.com/node/59536

हा धागा.

वॉटरवे तेव्हा सुरू असेल का कल्पना नाही, तेव्हा पावसाळा संपत आलेला असतो आणि वॉटरवे रफ आहे असे ऐकलंय. विमानाने अर्ध्या तासात पेनांगवरून पोचता येते, वाटेर्वे 4 तास घेतात.

तिथल्या जंगलात छोटे ट्रेक्स आहेत, नेटवर माहिती आहे.

जॉर्ज टाऊन पेनांगचे मुख्य केंद्र आहे. खूप छान जागा आहे. 1 दिवस बस होतो. तुम्ही 8 - 9 दिवस आहात तर जाऊन या. मनसोक्त पाहून या. माझ्याकडे दिवस कमी होते. पेनांगवरून लांकवीला जा.

मी हॉटेल चे बुकिंग नेटवरून केलेले. व्यवस्थित रेट्स होते. मलेशिया तसे स्वस्त आहे. 17 रुपये म्हणजे 1 रिंगे हे तिथे गेल्यावर डोक्यातून काढून टाकले की कसलाही त्रास होत नाही. 9 रिंगे मध्ये आम्ही 4 जणांनी रस्त्यावरच्या गाडीत मस्त ब्रेफा केला, स्वच्छता आपल्यापेक्षा खूप भारी.

KUl बेस करून नाही जमणार. खूप लांब अंतरे आहेत, विमानतळे शहराबाहेर आहेत. तिथून शहरात यायलाच तासभर जातो.

तिथे फिरण्यासाठी पूर्ण दिवस टॅक्सी न करता जशी हवी तशी हात दाखवून टॅक्सी करा. पूर्ण दिवस 200 300 रिंगे मागतात, तेच हवी तेव्हाच केली तर पूर्ण दिवस 50 60 रिंगेत होतो. बस आणि मेट्रो (kul) ही आहे. आम्ही बस नेही फिरलो. बस खूपच स्वस्त आहे.

मला खरेदित रस नाही, त्यामुळे नो मदत.

बाकी नेटवर पहा, प्रत्येक ठिकाणी भरपूर पाहण्यासारखे आहे.

तिथल्यासाठी फोन साठी कार्ड वगैरे अजिबात घेऊ नका. वास्तव्याचे हॉटेल आणि इतरत्र सर्वत्र फ्री वाई फाई असते, स्पीड आपल्या 4g सारखा. व्हाट्सअप वरून कॉल करायचे भारतात. मी तर मुलीला तिथून व्हाट्सअप विडिओकॉल पण केलेले आमचे हॉटेल व बाहेरील नजारा दाखवायला, ती सोबत नव्हती म्हणून. स्पीडचा अंदाज येईल तुम्हाला यावरून.

साधना धन्यावाद, खुप माहिती मिळालि

स्वस्ति तुम्हाला ही धन्यवाद

अजुन काहि , प्रश्न आहेतच

logkawi ला जाण्यासाठि वेगळा visa लागेल?
tentatively
़KUL - 3 days including Genting
Penang - 1 day
George town - 1 day
Longkawi - 3 dayर्‍

अस ठरतय

BOM - HYD - KUL & Back
KUL - Penang by bus / flight
Penang - Longkawi by ferry
Longkawi - KUL - by flight

दक्षिणा, msg नाही मिळाला Sad

मलेशियाच्या टुरिस्ट विसामध्ये तिथल्या काही भागात जायची परवानगी नाहीये असे मला अंधुकसे आठवतेय पण त्यात लंकावी नाहीये. सो, तुम्ही आरामात जा लंकाविला. तिथल्या एका हॉटेल वाल्याचा नंबरही आहे माझ्याकडे. तो लंकावी बद्दल चांगले मार्गदर्शन करेल, जरी तुम्ही त्याचे हॉटेल निवडले नाही तरीही. हवा असल्यास देईन.

बॉम्बे hud कुल असं का घेताहात?मलिंदा एअर लाईनचे मुंबई कुल थेट विमान आहे आणि तेही रात्रीच्या वेळेस. त्यामुळे उगीच दिवस प्रवासात जाणार नाही. रात्री 11 ला इथून निघून सकाळी 6 ला तिथे पोचते, 8 पर्यंत तुम्ही हॉटेलवर पोचता, 10 पर्यंत तयार होऊन शहर दर्शन करता बाहेर पडता येते.

मी मलिंडाचे mum-kul, kul-penang & langkawi-kul, kul-mumbai असे बुक केलेले, साधारण 32000 ला मिळालेले. पेनांग ते लंकावी वेगळे बुक केलेले, एअर asia चे. ही कंपनी शुध्द लूटमार करते. विमान तिकीट वेगळे आणि लगेज वेगळे घ्यावे लागते.

धन्यवाद साधना Happy
Via HYD तिकिट स्वस्त आहे, BOM - HYD प्रवास पकडुन २०००० सुध्दा होत नाहित

त्यात penang / longkawi नाहित, तुम्हि सान्गितले ले option हि बघते Happy

१० दिवस फक्त मलेशियासाठी फारच जास्त झाले. तसा टिनीविनी देश आहे. बाकी सगळे उल्लेख झाले आहेत, म्हणुन रिपिट करत नाही पण 'सनवे लगुन थीम पार्क' बद्द्ल वर लिहिलेल दिसलं नाही. ग्रुपमधे बच्चे कंपनी आणित टीन एजर्स असतील तर त्यांना इथे आवडेल. खुप स्वच्छ आणि सेफ वॉटर गेम्स आहेत. ( आपल्यासारखी घाण आणि खिळे निघालेल्या किंवा पत्रा फाटलेल्या वॉटर राइड्स नाहीत :रागः: आपाल्याकडे एका फेमस वॉटर पार्कमधे मी पाण्यात जाणार्‍या घसरगुंडीवर एका छोट्या मुलाला फाटलेल्या घसरगुंडीवर पाठीला जखम झालेली पाहिली आहे. काही चंपट बायकांच्या काचेच्या बांगड्या घसरताना फुटल्या आणि त्या पाण्यात पडल्या होत्या ते वेगळंच. असो. ) या पार्कला भेट द्यायला आवडेल तुम्हाला. फक्त इथुन जाताना स्विमिंग कॉस्ट्युम्स घेवुन जा. तिथे रेंटवर घेणं महाग आणि शिवाय ते कित्येक लोकांनी वापरलेले असतात.

दुसरी मस्ट शॉपिंग म्हणजे - 'ज्युक बॉक्स" नावाची फुटवेअरची चेन. कुल. मधे बर्‍याच ठिकाणी ही दुकानं दिसतात. इथे 2 MYR ते 5-7 MYR पर्यंतच्या खुप मस्त चप्पल, फ्लोटर्स, सॅन्डल्स मिळतात. ( मी पहिल्या ऑफिस ट्रीपमधे घेतल्या होत्या, त्याला खुप वर्ष झाली, नंतर शॉर्ट ट्रीपमधे वेळ झाला नाही, त्यामुळे आता माहिते नाही) तेव्हा मात्र शॉपिंग बॅग दिलेली असते ती भरायचीच असा नियम असल्यासारखी मी ३०-४० तरी जुत्ते आणले होते. (MYR बहुतेक १५-५८ रुपये आहे त्यामुळे मलेशियाला शॉपिंग करताना मानसिक त्रास होत नाही आणि कन्वर्जनचा रोगही होत नाही.)

क्लायमेट मात्र बेक्कार. अती उष्ण आणि मग धबाधबा पाउस. Carry your cottons, sun screen, sun glasses and drink lots of water to enjoy the trip.

गेंटिंग राइड्स बं द असल्यातरी केबल कार्सचा अनुभव आणि मस्त धुकं आणि गार हवा हवी असेल तर एक दिवसाची ट्रिप करा. आणि मजा म्हणुन थोडंसं गॅम्बलिंग अनुभवाय्ला काय हरकत आहे ? माझे तिथे खरेदी केलेल्या एका ड्रेसचे पैसे वसुल झाले होते. Proud