Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऑस्ट्रेलिया नशीबवान आहे !
ऑस्ट्रेलिया नशीबवान आहे !
खरंच ! हरत असलेल्या मॅच मधून
खरंच ! हरत असलेल्या मॅच मधून १ पाॅईंट कमवला!!
डकवर्थ लुइस रुल काही झेपतच नाही. पावसामुळे न्यूझीलॅंड ला ४६ ओवर्स, तर आॅस्ट्रेलियाला ३३ ओवर्स मधे रिवाइज्ड टारगेट. खरंतर संपूर्ण मॅच मधे न्यूझीलॅंडची मॅच वर पकड होती. आॅस्ट्रेलिया च्या ३ महत्वाच्या विकेट्स पण उडवल्या होत्या. तरी..
अशा संधी मिळाल्या तर सहसा
अशा संधी मिळाल्या तर सहसा ऑस्ट्रेलिया त्या वाया घालवत नाही.
उद्या भारत- पाकिस्तान! चांगली व्हायला हवी आणी अर्थातच भारताने जिंकायला हवी.
ऑस्ट्रेलिया पावसाने वाचले,
ऑस्ट्रेलिया पावसाने वाचले, मॅच गेल्यात जमा होती डकवर्थ लुईस नियमानुसार, हेन्रीक्सला पाठवून स्कोर वाढवण्याचा प्रयत्न केला होता पण तोच नेमका आउट झाला. स्टिव्ह स्मिथ लिटरली पळत पळत आत गेला.
काल लंका आणि आफ्रिका अगदीच बोअर झाली मॅच. लंकेनी बॉलिंग बरी केल्यामुळे आफ्रिका ३०० पर्यंतच मजल मारू शकली पण नंतर लंकेची पण गोचीच झाली.
आता आज कल्ला आहे.
आर्र्रं काये हे!! आईच्चं
आर्र्रं काये हे!! आईच्चं इंग्लिश वेदर!!
बाकी तो इमाद एकदम आतिपस्लम सारखा दिसतो, नाही?
आणि आपला शिकं डावन म्हणजे क्रिकेट मधला रापानडालच जनू. कशाला त्या इतक्या टाईटीज घालाव्या म्हणतो मी? कसं मोकळं चाकळं यावं मान्सायनी ब्याटींगला?
हे असं गच्चम आवाळलेले कपडे घातले की खेळायचं सुधरन का? ऑ?
(पावूस आहे म्हणून ब्रेक मदीं थोडी टिकाटिप्पनी, बाकी काही नाही)
बुवा
बुवा

असल्या उत्साहाने लवकर उठले होते! पावसाने राडा केला
हौ ना!
हौ ना!
दुस्री मॅच गहाळ झाली तर आता काय आम्ही निसते हायलाईट बघायचे का?
२-३ तास पाऊस पडेल म्हणे नंतर
२-३ तास पाऊस पडेल म्हणे नंतर सगळे क्लिअर आहे!
फार्फार तर ५-१० ओव्हर्स कमी होतील
झालया बॉ सुरु मिल्क रस्क अन
झालया बॉ सुरु मिल्क रस्क अन खिरीच्या जाहिराती सुरु.
वहाब रियाझ आला! लै भारी अॅक्शन आहे त्याची. लेफ्ट आर्म पेसर लोकांच्या अॅक्शन मध्ये जरा वेगळी पण फॅसिनेटिंग अशी स्टाईल असते.
२-३ ओवर्स भारी झाल्या. गुड
२-३ ओवर्स भारी झाल्या. गुड स्टार्ट. ऐसाइच हाणनेका अब
लगे रहो.
आले आले!
आले आले!
शर्मा एक तर आउट हो नाही तर
शर्मा एक तर आउट हो नाही तर खेळ
आधी युवी पेटला, आणि ती एक
आधी युवी पेटला, आणि ती एक सिक्स कनेक्ट झाल्यावर कोहलीही. शेवटच्या ओव्हर्स बघायला जाम मजा आली.
Ok , I thought no one is
Ok , I thought no one is watching .. Good score , boys !
Finish them
जावईबापू आले खेळायला..
जावईबापू आले खेळायला.. त्यांना आउट केलं की पकड मजबूत होईल !
काय मजा नाही राहिली!
काय मजा नाही राव! सुरुवातीपासूनच आपल्याला काही चान्स नाही अशा अॅटिट्युड ने खेळत आहेत पाक.
खुन्नस , किंवा जिंकायची एक्सायटमेन्ट पण वाटेना.
भारत -पाक मॅच पेक्षा जास्त शेतकरी संपावर जास्त एक्सायटमेन्ट आणि ट्यार्पी आहे म्हणजे बघा
फक्त 9 विकेट.पडले, 1 रिटायर
फक्त 9 विकेट.पडले, 1 रिटायर हर्ट होता त्याचा रीप्लेसमेंट का नाही खेळवला अर्थात त्याने काही फरक पडला.नसता म्हणा कारण भारतीय संघ कसाही जिंकलाच असता
पाकिस्तानी टीम आधीच हार
पाकिस्तानी टीम आधीच हार मानायचं ठरवलेलं दिसत होतं. अगदीच वन साइडेड मॅच होती. सगळेच पाट्या टाकत होते.पूर्वीसारखी नेल बायटिंग मॅच झालीच नाही.नवखे प्लेयर्स आहेत का ? बाकी युवी, धवन ,कोहली भारी खेळले .
सध्या एकूण वाघ-शेळी रोल एकदम
सध्या एकूण वाघ-शेळी रोल एकदम उलटे झालेले दिसत आहेत
अगदीच किरकोळ , उगीच झोप
अगदीच किरकोळ , उगीच झोप डिस्टर्ब केली !
Scathing Article on Cricinfo
Scathing Article on Cricinfo by Jarrod Kimber . Nice read . It ends with "Playing Pakistan in this form is having a bye. Bye, Pakistan, bye." Harsh but true . They played so bad that the Win doesn't taste that good
http://www.espncricinfo.com/icc-champions-trophy-2017/content/story/1101...
कालची मॅच अर्धी प्रवासात
कालची मॅच अर्धी प्रवासात रेडिओ कॉमेंट्री तर पाक बॅटिंग टीव्हीवर.. पाक फलंदाज फारसे धावा काढण्याचा प्रयत्न करीत नव्हते!
एक तर पावसाने ३-४ व्यत्यय त्यामुळे ऑसी-न्युझिलंड प्रमाणे १-१ गुण घ्यावा लागतो की काय अशी भिती!
नंतर गोलंदाज अफलातून बॉलिंग करत आहे असे उगाच वाटावे तशी बॅटिंग पाकिस्तानची!
फक्त 9 विकेट.पडले, 1 रिटायर
फक्त 9 विकेट.पडले, 1 रिटायर हर्ट होता त्याचा रीप्लेसमेंट का नाही खेळवला >>> मला हे सांगा ना कुणीतरी
1 रिटायर हर्ट होता त्याचा
1 रिटायर हर्ट होता त्याचा रीप्लेसमेंट का नाही खेळवला >>>
रिटायर्ड खेळाडूच्या ऐवजी फक्त फिल्डींग साठी राखिव खेळाडू येत असतो! बॅटिंग बॉलिंग करता येत नसते!
रिप्लेसमेंट च् पोट खराब होते
रिप्लेसमेंट च् पोट खराब होते म्हणून तो ही फलंदाजीला उतरला नाही
बॅटिंग ला न आलेला वहाब रियाझ.
बॅटिंग ला न आलेला वहाब रियाझ. तो बोलिंग करताना क्रॅम्प्स का काहीतरी आले म्हणून बाहेर गेला. तोच बॅटिंग ला आला नाही. त्याच्या ऐवजी दुसरा बॅटिंग करू शकत नाही.
केदार - जबरी वैतागून ते आर्टिकल लिहीलेले दिसते
मीडियाने जेवढी हाइप केली होती मॅच ची तेवढी रंगतदार होणार नाही अशीच शंका होती. आता तर मिसबाह आणि युनुस खानही नाहीत.
पूर्वी ते इम्रान किंवा अक्रम सारखे दिग्गज लोक कप्तान असताना त्यांचा कोणीही सोम्यागोम्या येउन मॅचविनिंग खेळी खेळून जात असे. पण आता तसे व्यक्तिमत्त्वच नाही त्यांच्याकडे. आता जिगर, कौशल्य, प्रेशर हॅण्डलिंग आणि आक्रमकता सर्वच बाबतीत भारताची टीम सरस आहे.
Thanks Krishnaस्मित:
Thanks Krishna न फा.
फारएन्ड +१
फारएन्ड +१
मला वाटलेले की मॅच थोडीफार
मला वाटलेले की मॅच थोडीफार रंगतदार होईल कारण जावईबापू वगळता नविन खेळाडू होते ज्यांच्यावर पुर्वीचे दडपण असायचे कारण नव्हते! कारण भारता विरुद्ध कमी खेळलेले.. आणि मध्यंतरीच्या काळात अफ्रिका वैगेरे संघाबरोबर चांगले खेळलेले होते!
पाकड्यांना एक्स्पोजरच कुठे
पाकड्यांना एक्स्पोजरच कुठे मिळते आहे? असेच खड्ड्यात जा म्हणावे.
Pages