शेतकर्‍यांचा संप

Submitted by मार्मिक गोडसे on 1 June, 2017 - 08:55

आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी

काय आहेत संपावर जाणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्या ?

१) शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा.

२) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी.

३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा.

४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा.

५) शेतकर्‍यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी.

६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा.

७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा.

८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे.

का केल्या शेतकर्‍यांनी ह्या मागण्या?

शेतकरी सरकारकडे ह्या मागण्या अनेक वर्षांपासून करीत आहे. राज्यातील पूर्वीच्या सरकारने एखादवेळी कृषीकर्ज , कृषीवीजबील माफ करून वेळ मारून नेली होती. परंतू शेतकर्‍यांच्या शेतीमाल संबंधीत समस्या न सोडवल्यामुळे शेतकर्‍याची आर्थिक बाजू कायम कमकुवत राहीली.

मग आताच का उचल खाल्ली ह्या मागण्यांनी?

राज्याच्या सत्तारुढ महायुतीतील सर्व घटक पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. विद्यमान पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या भाषणात शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५०% अधिक भाव देण्याचे आश्वासान दिले होते. शेतकर्‍यांनी त्यावर विश्वास ठेवून सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या. सत्तेत येउन बराच काळ लोटला परंतू ना केन्द्र सरकारने ना राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावनी केली. शेवटी हताश झालेल्या शेतकर्‍यांना सरकारला आठवण करुन देण्यासाठी संपाचे हत्यार उगारावे लागले.

सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघत आहे का?

दररोज शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असताना राज्यसरकार ढिम्म आहे. राज्यातील शेतकरी संपावर जाणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्रांनी शेतकर्‍यांशी बोलणी केली नाही. 'ह्या संपाचा काहीही परिणाम होणार नाही, आम्ही माल बाहेरुन मागवू', अशी बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षातील काही जण करू लागले आहेत. त्यातच खरिबाचा हंगाम सुरू झाला तरी शेतकर्‍यांना पिककर्ज मिळालेले नाही. सगळीकडून शेतकर्‍यांन्ची कोंडी केली आहे.

शेतकर्‍यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे का?

अल्पदरात पिककर्ज, शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी अखंडीत वीजपुरवठा आणि ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान , ह्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे.

संप यशस्वी होईल की नाही ह्यापेक्षा शेतकर्‍याने एकजूट दाखवून आपली ताकद दाखवली आहे हे महत्वाचे. हा संप यशस्वी होण्यासाठी आपल्यासारख्या शहरवासीयांनीही ह्या संपाला पाठींबा द्यायला हवा. सरकारने शेतमाल बाहेरुन आणल्यास त्यावर बहिष्कार टाका. जमल्यास सोशल मिडियातून अधिकाधीक लोकांपर्यंत शेतकर्‍याची समस्या पोहचवा व ह्या संपाला पाठींबा देण्याचे आवाहन करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृपया फोरवर्ड्स इकडे टाकू नका, !!

अ रे व्वा ईतक्यात उपरती ?

आतापर्यंत "फॉरवर्ड -फॉरवर्ड " च खेळत होते तुम्ही हे विसरलेले दिसत आहेत !!

वर टाकलेल्या फॉरवर्ड पैकी कोणते मुद्दे तुम्हाला पटले आहेत ते लिहा त्या अनुषंगाने पुढे बोलता येईल

अचं कचं सिम्बा, मग शब्दांचा गुंता घालून या बोटावरची थुंकी त्या बोटावर करायला कसं जमणार?
ती स्माईलीची पिवळी टिकली लावली की "मज्जा करत होतो हो" असं म्हणत लोकं काखा वर करतात त्यातलाच हा प्रकार

बेफिकीर,
दुसऱ्यांचे विचार, ते पण दुसऱयांच्याच शब्दात घेऊन व्यक्त होण्याची केविलवाणी वेळ तुमच्यावर आलेली बघावी लागू नये (what ever said , तुमचे लिखाण आवडते मला) म्हणून "कृपया" म्हणून विनंती केली होती.
आणि फॉरवर्ड मधल्या मुद्द्यांची चिरफाड झाल्यावर " अहो ते फॉरवर्ड आहे, मी सगळ्या मुद्द्यानशी सहमत नाही" अशी पळवाट काढता येऊ नये , हा त्या विनंतीचा दुसरा उद्देश होता,
दुर्दैवाने तुम्हाला यात गटबाजी दिसली.

परत एकदा सगळ्यांनाच विनंती,
फोरवॉर्ड मधले आपल्याला पटलेले मुद्देच इकडे नोंदवा (अगदी कॉपी पेस्ट करा) मूळ फॉरवर्ड मध्ये बरीच फ्लॅमबॉयण्ट विधाने असतात, आणि त्यामुळे चर्चा भरकटू शकते.

>>यामध्ये काही प्रमाणात घुसलेला ब्राह्मण द्वेषाचा प्रादुर्भाव

ब्राह्मण शेतकरी नसतातच का? याला जातीय रंग का दिला जातोय? की उगाच माला माल्ल म्हणून कांगावा करायचा?

ज्यांना ग्राऊंड रिअ‍ॅलिटी पूर्ण माहीत आहे त्यांनी ती नसणार्‍यांशी वाद - प्रतिवाद करण्यापेक्षा मोर्च्यात सहभागी होता आले तर बघावे. निदान मोर्च्याला रिअलिस्टिक स्वरूप तरी मिळेल.
Submitted by बेफ़िकीर on 3 June, 2017 - 12:18

>>>> हे फार्वेर्ड आहे का बेफि?

त्त्या पत्र लेखकाला ब्राह्मणद्वेष कुठे दिसला संपात?? की सगळ्या ब्राह्मणांना अद्दल घडावी म्हणुन शेतकर्‍यांनी संप केला असे त्यांचे म्हणणे आहे??

जयाजी सूर्यवंशी यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. दुपारनंतर त्यांनी माफीचा संदेश सर्व शेतकऱ्यांसाठी पाठविला आहे. मात्र त्यांच्याशी फोनवर अजूनही संपर्क होऊ शकलेला नाही.

शेतकरी संपाबाबत जयाजी सूर्यवंशी यांनी दिलेली जाहीर कबुली
————
“” काल रात्री मुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर बैठक होणार नाही, असे ठरले. तसा निरोप मग आम्ही बैठकीच्या बातमीसाठी उभ्या असलेल्या पत्रकारांना, चॅनेलवाल्यांना दिला होता. पण रात्री मुख्यमंत्र्यांचा फोन आला. आता बैठक,चर्चा झाली नाही तर चर्चेला दोन दिवस वेळ मिळणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे मी दबावात आलो आणि सदाभाऊ खोत यांच्या घरातून त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांकडे चर्चेला गेलो. या दबावाला पडलो ही माझी चूक झाली. त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांची माफी मागतो. बांधावरील शेतकरी जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. “- जयाजी सूर्यवंशी.
http://www.deshdoot.com/nashik-news-farmers-strike-and-jayaji-suryavansh...

--------------
आता गाल चोळत बसा . कळलं का. Wink

समाजातील प्रत्येक घटक हा काही ना काही भूमिका बजावतच असतो. आम्ही आमचे काम करुन समाजावर मोठे उपकार करत आहोत असा माज काही लोकांना का असतो ते कळत नाही.
समजा सगळे डॉक्टर संपावर गेले तर समाजाची वाट लागेल, सगळे बँकवाले संपावर गेले तरी वाट लागेल, सगळे सफाई कर्मचारी संपावर गेले तरी, एवढेच काही सगळे न्हावी सलून बंद करुन गेले तरी वाट लागेल. फार्मसिस्ट, शिक्षक, फोन सेवा देणारे, बस, रिक्षा, रेल्वे, पोलिस, सैन्य ही सर्व क्षेत्रे कुठल्या तरी पातळीवर समाजाकरता अत्यावश्यक आहेत आणि ह्या सेवा बंद झाल्या तर समाजजीवन ठप्प होईल. पण म्हणून ह्या सगळ्यांनी आमचे काम करुन समाजावर मोठे उपकार करत आहोत आणि उरलेला समाज आमची कदर करत नाही असे काही म्हणत नाही. शेतकरीच का असा समज बाळगून आहेत?

वरिल उल्लेख केलेल्या प्रत्येक घटकाने संप केलेला आहे. तेव्हा असे प्रश्न विचारले नाही?
६७ वर्षात पहिल्यांदाच शेतकर्‍याने स्वतःवर होणार्‍या अत्त्याचाराला वाचा फुटण्यासाठी संप केला तर इतकी का जळजळ व्हावी ?
असे ही शेंडे अमेरिकेतल्या शेतकर्‍यांनी संप केला नाही. उगाच जीवाला त्रास करून घेऊ नका

गेले ३-४ दिवस विविध संघटनांची नावे येत होती. एकूण चार प्रमुख संघटना यात आहेत हे दिसत आहे. हे केवळ वेगळे पक्ष असतात तसे आहे, की वेगवेगळ्या ठिकाणी मूळ धरलेल्या संघटना आहेत कल्पना नाही.

किसान क्रांती मोर्चा - शिष्टमंडळात होते. (७०%) मागण्या मान्य झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
अन्नदाता शेतकरी संघटना - शिष्टमंडळात होते. मात्र आजच्या बातम्यांत विरोध करत आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटना- आश्वासने मान्य नाहीत.
किसान सभा - आश्वासने मान्य नाहीत. संप सुरूच.

पूर्वी खूप जोरात असलेली शेतकरी संघटना यात दिसत नाही. तसेच शिवसेनेची शेतकरी सेनाही.

वरती मूळच्या मागण्या वाचल्या तर वाटाघाटींच्या सुरूवातीला टोकाच्या मागण्या करून मधे कोठेतरी सेटल करतात तशाच वाटत होत्या. त्यातील ७०% चे लॉजिक कळाले नाही. याने शेतकर्‍यांच्या हातात काय पडेल याचा विचार केला तर कर्जमाफीची मागणी सर्वात जास्त निकडीची असावी. ती ३-४ महिन्यांत क्लिअर होउ शकते.

बाकी दूध वगैरे ओतल्याच्या बातम्या पाहूनही यातील गरीब शेतकर्‍यांबद्दल वाईट वाटल्याशिवाय राहात नाही. माझ्या मित्रांच्या "गावाकडच्या" कथा ऐकलेल्या/पाहिलेल्या आहेत (बहुतांश पुण्याच्या आसपासच्याच - उरूळी जवळची कुंजीरवाडी, खेड जवळचे निमगाव, मंचर जवळचे कळंब, चर्‍होली ई). संप होणार ऐकल्यावर वाईट वाटले होते ते अशा छोट्या मोठ्या जमिनीवर थोडी पिके, थोडा भाजीपाला, पाच दहा कोंबड्या, दोन चार गाई अशावर घर चालवणार्‍या लोकांबद्दल. कामगारांचा संप मिटतो त्या महिन्याच्या अखेरीस त्याला (बहुतांश) नेहमीप्रमाणे पगार मिळतो. चार दिवस संप केला, फार फार तर चार दिवसांचा पगार जाईल. बर्‍याचदा तेही होत नाहीच. पण शेतीत बरेचसे सगळे लाँग टर्म. आज न विकलेली भाजी तिथपर्यंत यायला अनेक दिवसांची मेहनत असते. चार दिवसांचा वाटणारा संप हा प्रत्यक्षात दोन महिन्यांची मेहनत फुकट घालवतो. त्या दृष्टीने संप मिटला हे चांगले झाले.

अजुन संप मिटला नाही.
भाजपावाल्यांन्नी आपलाच कार्यकर्ता असलेला सुर्यवंशी यांना ४ जणांसोबत बोलवून संप मिटला म्हणून जाहीर केले.

शेंडेनक्षत्र, माधव भंडारी जे बोलले त्यावर यापेक्षा वेगळी प्रतिक्रिया येऊ शकत नाही.

कर्जमाफी झालेली नाही. फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येईल का, कशी ? याचा विचार करायला समिती नेमणार आहेत. तिला ३१ अऑक्टोबरपर्यंतचा वेळ दिला जाईल. चार महिने म्हणताहेत. खरं तर पाच महिने आहेत.

संप मागे घेतला गेला या घोषणेच्या वेळी जे मुमंसोबत माना डोलवत होते, तेच या समेटाततून मागे वळलेत.

महाराष्ट्रभरच्या ७०-८० संघटना यात असताना मोजक्या १२ -१३ लोकांशी मध्यरात्री चर्चा करण्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटत नाही?

शेन्डे, समाजजीवन ठप्प होणे आणि जेवण ठप्प होणे यात फरक असतो.

फारेन्डः
१. वेगवेगळ्या ठिकाणी मूळ धरलेल्या संघटना आहेत
२. पूर्वी खूप जोरात असलेली शेतकरी संघटना >> यातल्या "पूर्वी खूप जोरात असलेली" या शब्दात सगळं आलं.
३. कर्जमाफीचे आश्वासन सत्तेवर येण्यासाठी दिले होते, तेव्हा त्याचा अभ्यास त्या आधीपासून सुरु असेल असे समजतो. आता तीन वर्ष होत आलीत, अजून कर्जमाफी कशी होइल याचाच विचार ३ ४ महिने होणार असेल तर, आणि आश्वासनं फिरवली जाणार असतील, तेही मग्रुरी दाखवुन तर....
४. वाईट वाटले होते ते अशा>>> नका वाटून घेऊ, अशाच छोट्या शेतकर्‍यांच्या पट्ट्यांवर उणे रक्कम येते तेव्हा जास्त वाईट वाटते. दोन दोन महिने पिकवलेला माल खुडणे, भरणे, गाडीभाडं जाऊन वरुन अडत्या शेतकर्‍यावरच पैसे काढतो तेव्हा वाईट वाटते. शेतकरी फक्त सलाइन वर जीवंत आहे. त्याच्याबद्दल वाईट वाटले पाहिजे.
५. संप मिटला हे चांगले झाले.> संप मिटला हे तर सत्य नाहीच. आणि त्याच्यादृष्टीने तर नाहीच. त्याला काहीही फरक पडणार नाही

............ फारेन्ड तुमच्या प्रतिसादावरुन असं वाटतंय की हा संप जणू श्रीमंत शेतकर्‍यांची कर्जे माफ करण्यासाठी आहे...............

पण शेतीत बरेचसे सगळे लाँग टर्म. आज न विकलेली भाजी तिथपर्यंत यायला अनेक दिवसांची मेहनत असते. चार दिवसांचा वाटणारा संप हा प्रत्यक्षात दोन महिन्यांची मेहनत फुकट घालवतो.

नाशिवंत शेतीमालाला जेव्हा बाजारात कवडीमोल भाव मिळतो तेव्हा शेतकरी हा माल व्यापार्‍याला देण्याऐवजी रस्त्यावर फेकून देतो. असे वाईट दिवस त्याच्या जीवनात अनेक वेळा येत असतात. तेव्हाही त्याची अनेक महिन्यांची मेहनत फुकट जात असते. तेव्हा आपण हा माल स्वतात मिळाल्याने खुष असतो, कांदाभजी , टोमॅटो सॉस वर ताव मारत असताना ह्या शेतकर्‍याच्या नुकसानीची आठवणही येत नाही. उगाच संपात फेकल्या गेलेल्या भाजीपाला, दुधाच्या नावाने खोटी सहानुभूती दाखवण्यापेक्षा ह्या संपात शेतकर्‍याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, त्यातच शेतकर्‍याचे व आपले हित आहे.

शेंडेनक्षत्र तुम्ही उल्लेख केलेल्या शेती व्यतिरिक्त इतर बऱ्याच व्यवसायीकांनी, नोकरदारांनी सेवा पुरवणाऱ्यांनी एकदाच नव्हे तर अनेक वेळा संप केले आहेत.

संप करणे म्हणजे स्वत:ला समाजावर उपकार करणारे समजणे, असे असते का?
असेल तरी मग फक्त शेतकऱ्यांचाच असा समज आहे असे आपण कसे म्हणु शकता?

या बाफवर व शेतकर्‍यांबद्दल असलेल्या एकूणच सर्व बाफवर असलेला "वत्सा, तुला जगातील प्रॉब्लेम्सची माहिती नाही. माझी गुरूवचने ऐक" टोन इथेही दिसत आहे. "माझ्याशी १००% सहमत व्हा, नाहीतर तुम्ही खोटी सहानुभूती दाखवणारे शहरी लोक आहात"

- माझ्या मित्रांच्या मला थेट माहिती असलेल्या प्रश्नांपैकी मला नक्की कशाबद्दल वाईट वाटते किंवा नाही याबद्दल अंदाज लावून मलाच धडे!
- याच मित्रांच्या आजूबाजूच्या शेतांत, गावात संपामुळे काय होत असेल याचा अंदाज लावला, तर ती सहानुभूती खोटी आहे!

माझ्या बद्दल माझ्यापेक्षा मला कधीही न भेटलेल्या इतरांनाच अचूक माहिती आहे असे दिसते. एकूण मला कठोर आत्मपरिक्षणाची गरज असावी. नेक्स्ट टाइम टोमॅटो सॉस खाताना लक्षात ठेवेन.

इथल्या कमेन्ट्स मधून जितकं आणि जे दिसतं त्यावर लोक मतं बनवतात, फारेन्ड. त्यात इगो का आणायचा?

आताच फेबु वर एक दुधाचे दात न पडलेल्या आणि सर्व आयुष्य बापाच्या पैशावर मजा मारलेल्या मुलीने मलाच "जरा आजूबाजूला बघा मग समजेल" असा सल्ला दिला. असो चालायचेच. दुर्ल़क्ष तर करु शकतो आपण. नसेल तर आपण आपल्याकडची माहिती द्यावी.

तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहात जालावर, तुम्हाला काय सांगायचे?

इथल्या कमेन्ट्स मधून जितकं आणि जे दिसतं त्यावर लोक मतं बनवतात >>> तीच अपेक्षा आहे आणि तसे होत नाहीये असेच वरच्या पोस्टवरून दिसत आहे. पोस्टवरून इतर बरेच काही गृहीत धरून लिहीले जाते, त्यालाच आक्षेप आहे.

तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहात जालावर, तुम्हाला काय सांगायचे? >>> इतके दुसरे टोकही गाठू नका एकदम. आप तो शरमिंदा कर रहे है :). तुम्हाला ५-१० गोष्टींबद्दल माझ्यापेक्षा बरीच जास्त माहिती असेल, मला २-३ गोष्टींबद्दल तुमच्यापेक्षा जास्त माहिती असू शकेल. ती शेअर करताना आधीच काही गृहीत धरले गेले तर ते खटकते, इतकेच.

संप करणार्‍याची सध्याची एकूणच अवस्था वाइट आहे हे मला समजते. पण संपाने ती आणखी चिघळते. झोपडीत पुराचे पाणी घुसल्याचे ऐकल्यावर पहिल्यांदा त्या घटनेने होणार्‍या नुकसानाचे, त्या कुटुंबांना दुसरा फॉलबॅक नसल्याचे वाईट वाटते, तसेच.

आताच फेबु वर एक दुधाचे दात न पडलेल्या आणि सर्व आयुष्य बापाच्या पैशावर मजा मारलेल्या मुलीने मलाच "जरा आजूबाजूला बघा मग समजेल" असा सल्ला दिला. असो >>>

माफ करा नानाकळा .
इथे वेगळाच इगो प्रॉब्लेम आहे अथवा पूर्वग्रह आहेत असे मला जाणवले।

आता मुद्द्यांबद्दल.

फारेन्ड तुमच्या प्रतिसादावरुन असं वाटतंय की हा संप जणू श्रीमंत शेतकर्‍यांची कर्जे माफ करण्यासाठी आहे >>> नाही तसे काही दर्शवायचे नव्हते. लिहीताना काही गडबड झाली असेल तर कल्पना नाही. मूळच्या प्रॉब्लेम्स बद्दल काहीच वाद नाही.

हे जयाजी सूर्यवंशी १९९९ ला जनता दलात होते Happy .... तेव्हा नेहमी संबंध यायचा . मध्ये गायब झाले. या वर्षात पुन्हा अ‍ॅक्टिव झाले . भाजपत व्गेलेत वाटतं Wink

मानव,
आहे, इगो आहेच. का नसावा?

स्वतः खपून, कष्टाने मिळवलेल्या ज्ञानामुळे मला इगो आहे. कारण सांगोवांगीच्या गोष्टी आणि लिमिटेड पर्सनल एक्स्पिरीयन्सवर माझी मतं बेतलेली नाहीत. ज्याला असे ज्ञान असते, ते दिसतेच. त्याला आडंबराची गरज नाही.

ज्यांना काही माहित नसते त्यांचा इगो मात्र भयंकर दुखावतो आणि सामंजस्याने घेण्यापेक्षा आपलं अर्धवट ज्ञान पणाला लावुन आपलीच बाजू कशी योग्य हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात असे जालावर बघितले आहे.

बाकी, जिथे मला कळत नाही तिथे मी स्पष्ट सांगतोच की मला यातलं काही माहित नाही. किंवा साशंक आहे.

Pages