क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुवनेश्वर चे मला कौतुक वाटते कायम निर्विकार चेहरा किती भारी विकेट काढू दे वा जोरदार बीट करू दे.. अजिबात ओव्हर एक्सप्रेशन्स देत नाही!!

"इशांत नाहीये का?' - ह्या तुझ्या प्रश्नानंतर मी एक सुस्कारा सोडला, 'थँक गॉड' म्हणून. Wink

बॉलर्स सगळेच फॉर्मात दिसताहेत.. कोणाला घ्यावे कोणाला नाही डोकेदुखी आहे.. त्यात पांड्याही जो बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये कमकुवत होता तो आज ब्याटींगमध्ये चमकला..

कोणाला घ्यावे कोणाला नाही डोकेदुखी आहे.. त्यात पांड्याही जो बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये कमकुवत होता तो आज ब्याटींगमध्ये चमकला.. >> एकदम भारतीय सिलेक्टरसारखे बोललास Lol

मला वाटतं, तीन सीमर्स (शामी, भुवनेश / बुमराह, यादव), जडेजा आणी पंड्या खेळतील. बाकी धोनी, धवन, शर्मा, कोहली, जाधव, युवराज / कार्थिक / रहाणे असा स्टार्टींग लाईन-अप असेल.

फेफे / टाकून अश्विन सोडून बाकीचे सगळे प्लेयर्स लिहून काढलेस Happy

मला वाटते असे असेल धवन, शर्मा, कोहली, धोनी, युवराज, जाधव, पंड्या, भुवनेश , बुमराह, यादव, जडेजा.

<<बांगला देश वन डे रँकिंग्ज मधे श्री लंकेच्या वर न. ६ ला आले Happy>>
बांगलादेश ला प्लुटो सारखे परत नॉन-टेस्ट प्लेइंग लिस्ट मधे टाकले पाहिजे. आमच्या गल्लीतले ही हरवतील.
कंडम टीम आहे.

कालची बांग्लादेश विरुद्धची मॅच अगदीच एकतर्फी झाली. आता सहाव्या क्रमांकावर पोचलेली बांग्ला टीम फाइट करेल असं वाटलं होतं.
आपल्या फास्ट बॉलर्सची बॉलिंग मस्त झाली. बॉल कधी कधी प्रमाणाबाहेर उसळत होते, बाहेर जात होते.. एकंदर लाइन, लेन्थ ची अ‍ॅक्युरसी अश्या पीच वर महत्वाची ठरणार. न्यूजीलँड विरुद्ध तसंच कालच्या मॅचमधेही चाचपडत सुरुवात करणार्‍या कार्तिक ची बॅटींग पहायला काल मजा आली. पंड्या पण मस्त खेळला. माझ्या मोस्ट फेवरेट.. रहाणेला आत्मपरिक्षणाची गरज आहे असं वाटतं. सारखं सारखं स्वस्तात आउट होणं परवडण्यासारखं नाही. .. अर्थात हे सर्व आपल्या टीमने निश्चितच नोंदलं असणार आणि त्याप्रमाणे सिरीज मधे वाटचाल करतील असा विश्वासही वाटतो.

दोन दिवसा पूर्वी ह्याच बांग्ला टीमनी पाकिस्तानच्या विरुद्ध ३४१ मारले होते... त्यांना इतक्यात रुल आऊट करु नका. एखादा अपसेट नक्की देऊ शकतील ते..

सेहवाग प्रशिक्षक म्हणून काय मत आहे.
मला तो बॅट्समन म्हणून आवडतो पण प्रशिक्षक म्हणून शास्त्री बेटर वाटतो. कुंबळे-कोहली नक्की काय झालं माहित नाही.
अ‍ॅग्रेसिव कोहली बरोबर द्रविड कितपत जुळवून घेउ शकेन माहित नाही.

इंग्लंड ने अगदीच कचरा केला बांग्लादेश चा. इंग्लंड वन-डे मधे गेल्या २ वर्षात प्रचंड सुधारलेत. That is the team to beat. बॉलिंग मधे वेगवेगळे ऑप्शन्स आणी बॅटींग मधे डेप्थ असल्यामुळे त्यांना हरवणं सोपं नाहीये. त्यातून त्यांना ह्या वेळी होम कंडीशन्स चा फायदा मिळेल.

कोहली / बीसीसीआय ला आत्ताच कुंबळे वाद उकरून काढायची आवश्यकता नव्हती असं वाटलं एकंदरीत बातम्या वाचून.

सेहवाग प्रशिक्षक म्हणून काय मत आहे. >> अजिबात नको वाटतो. पंजाब एलेव्हन तो मेंटॉर होता नि त्यातून फारसे काहि पदरी पडल्याचे दिसत नाही. द्रविड कोच म्हणून योग्य नाही असे माझे मत आहे. त्याच्या योग्यतेबद्दल वाद नाही पण खेळाडूंशी connect होणे हा भाग त्याला कितपत जमेल (विशेषतः स्टार खेळाडूंशी) ह्याबाबत मला शंका आहे. मला व्यक्तिशः टॉम मूडी आवडेल.

कोहली / बीसीसीआय ला आत्ताच कुंबळे वाद उकरून काढायची आवश्यकता नव्हती >> BCCI ने unofficial news leak केली नि कोहलीची गोच केली. हे करण्याची खरच गरज नव्हती, कमीत कमी उघडयावर धुणी धुवायची गरज नव्हती. नको तिथे transparency बरी सुचते ह्यांना.

इंग्लंड all the way जाईल नि हरेल असे मला वाटते, law of averages Happy

मला तर कोहलीसुद्धा सगळ्यांना जिमिंग वगैरे करायला लावणारा, बेस्ट देण्यास प्रवृत्त करणारा स्ट्रिक्ट माणूस वाटायचा.

"मला व्यक्तिशः टॉम मूडी आवडेल." - दर वेळी क्लासिफाईड्स मधे इंडिया कोच च्या जागेची जाहिरात आली, की एक अ‍ॅप्लिकेशन टॉम मूडी चं असतच. Wink

द्रविड स्वतःच फारसा उत्सुक नाहीये सिनियर टीम च्या प्रशिक्षकपदासाठी. मूडी किंवा लालचंद रजपूत चा नंबर लागेल असं वाटतं.

फेरफटका, तिकडे रसपच्या धाग्यावर वेगळाच विषय नको म्हणून इथे - लंकेचा १९९६ चा बदला नंतर १९९९ मधे टॉण्टन ला सणसणीत घेतला होता. ३७१ मारून. दादा व द्रविड.

फारएण्डा, हो रे, निसटलच हे माझ्याकडून. मी ९६ कडून पुढे येण्याऐवजी, २०११ कडून मागे गेलो Happy You are right! धू धू धूतला होता द्रविड-गांगुली ने तेचा लंकेला.

विल्यमसन मस्त खेळतोय. न्यूझिलंड ऑस्ट्रेलिया ला धक्का देणार का? पिच मधे काही दम वाटत नाहीये. त्यामुळे वॉर्नर, फिंच, स्मिथ, मॅक्सवेल मंडळी सुद्धा खोर्याने रन्स काढू शकतील.

इच्छुकांमधलं एक नाव डोड्डा नरसैय्या गणेश सुद्धा आहे >> आज वाचले त्यावरून तो बरिच वर्षे कोचिंग मधे active आहे असे दिसतेय, अर्थात बाकीच्या heavy weights मधे त्याचा टिकाव लागणे कठीण आहे. जर कोणी तरी नवा उचलून आणला नाही तर मूडी नि प्रिबस ह्यांमधला एक येईल असे वाटतेय. गांगुली, सचिन नि लक्ष्म्ण ते ज्यांच्याबरोबर interact झालेले आहेत त्यांना preference देतात असे मला वाटते त्यामूळे सेहवाग आला तरी धक्का बसू नये. फक्त प्रामाणिकपणे त्याच्या सडेतोड स्वभावामूळे तो नसावा असे वाटते. तो प्लेयर्स शी नीट कनेक्ट होईल पण when goings gets tough, he may end up spitting opinions which can hurt the players.

गुहांनी दिलेल्या राजिनाम्या मधल्या काहि गोष्टी ज्या खटकल्या त्यातली सर्वात मुख्य गोष्ट
whether the coach must rely on the sanction of the captain and senior players ?
>> मला वाटते कोच नि प्लेयर्स एकमेकांना बांधले असल्यामूळे ह्याचे उत्तर हो असावे. ते जर एकमेकांबरोबर comfortable नसतील तर त्याचा परीणाम खेळावर होईल.

त्याबरोबर कप्तान नि कोच ह्यांनी selection committee meeting attend करण्याबाबत असलेला आक्षेप कळला नाही. उलट ह्या दोन पार्टींना अधिक वाव असला पाहिजे team selection साठी.

conflict of interest बद्दल काही मुद्दे पटतात पण काही फक्त तत्वतः आणलेले वाटले.

Pages