बागकाम - अमेरीका २०१७

Submitted by स्वाती२ on 28 January, 2017 - 13:20

बघता बघता जानेवारी संपत आला. २०१७ च्या बागकामाच्या नियोजनासाठी , सल्ल्याच्या देवघेवीसाठी आणि कौतुकाने बागेचे फोटो शेअर करण्यासाठी हा धागा.

परागिभवनात मदत करणार्‍या विविध किटकांसाठी आणि पक्षांसाठी म्हणून यावर्षी काही झाडे लावणार असाल तर त्यासाठी मार्गदर्शक पुस्तीका उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या भागात रहाता त्या भागासाठी खास तयार केलेल्या या मोफत पुस्तीका आहेत.
Ecoregional Planting Guides

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली, मस्त बाग.
मला जमिनीत काही लावायचा धीर समहाऊ होतच नाही. डेकवर कुंड्याच बर्‍या पडतात. एकतर यार्ड फेन्स्ड नसल्याने हरणांना मोकळीक आहे. म्हणजे वाट लावतील.
माझ्याकडे घरातही भरपूर सक्युलण्ट्स, फर्न, बरीच डेकोरेटीव झाडं आहेत.

दीप,
यूट्यूबवर मोगर्‍याबद्दल, कटींग्ज कसे लावायचे याबद्दल भरपूर व्हिडीओज आहेत.
https://www.youtube.com/watch?v=eu2PwsY2pOE&list=PLkE1fJdrJkQQUo1uUUDBS_...

मी https://www.youtube.com/watch?v=QdiRVDYaLhU ही पद्धत वापरली. नुसते कटींग्ज घेऊन ते पाण्यात ठेवून साधारण २-३ महिन्यांत मुळं फुटतात, मग ती कुंडीत लावायची ही पद्धत पण बरेच लोक वापरतात. मी यावर्षी तसे कटींग्ज घेऊन बघणार आहे.

अंजु, सुंदरच झाली आहे बाग!! तु विंटर मध्ये ते जमीनीतले पॉट्स आत आणणार आहेस म्हणुन तस केल आहेस का डायरेक्ट रोप जमीनीत लावण्या एवजी?

सीमा, फक्त पुदिना आणि ओरेगानो कुंडीत लावले आहेत. बाकी सगळे हर्ब्ज जमिनीत लावले आहेत. पुदिना आणि ओरेगानो दोन्हीची भरमसाठ वाढ नियंत्रित करण्यासाठी कुंडीत लावले. त्या भल्या मोठ्या कुंड्या जमिनीच्या वर नको होत्या. बाकी हर्ब्ज बरोबर लेवल पाहिजे होती पण कुंडीच्या भिंतीचं संरक्षणपण पाहिजे होतं. त्या कुंड्या बाहेरच ठेवणार आहे. गवती चहा बाकी मोगर्‍यांच्या झाडांबरोबर कदाचित हिवाळ्यात आत आणेन.
सगळे हर्ब्ज लावण्या आधी जमिनीत का कुंडीत याबद्दल वाचलं तेव्हा जमिनीत केव्हाही चांगले असंच वाचलं. मला साधारण असा लूक हवा होता
0e5abebdffd3685f6026cfaaece73db8.jpg

अंजली, कुंड्यामध्ये हर्ब्ज वगैरे लावून त्या कुंड्या जमिनीत गाडायची आयडिया मस्त आहे. थंडीत ह्या बाहेर काढून घरात हलवायचा प्लॅन आहे का?

राज, 'गबरू जवान' अनंत!! Happy वाचून खूप हसले.
फॉलमध्ये प्रुन करा>> टीप लक्षात ठेवते. धन्यवाद!
अंजली यांची बाग पण मस्त. कुंडी जमिनीत पुरण्याची कल्पना फारच आवडली. वेळ मिळाला की सोनटक्का आणि गवती चहावर प्रयोग करीन.
मेधा, आज-उद्या करता करता मला अजून फोटो प्रकरणात लक्ष घालायला जमलेले नाही Sad वेळेअभावी माझी धाव 'अनियमितपणे' मायबोलीच्या जेमतेम पहिल्या पानापर्यंत असते. त्यामुळे तो 'खास' उद्या कधी येणार कुणास ठाऊक! पण इतक्या लोकांना जमते म्हणजे आपल्यालाही जमेल. बस, वक्त की कमी है! Happy

सायो, जमिनीत पुरलेल्या कुंड्या आत आणणार नाही. तसंही त्यात ओरेगानो आणि पुदिनाच आहे. यावर्षी सगळे हर्ब्ज वाळवून त्याचे स्पाईस मिक्स करायचा प्रयोग करून बघणार आहे. यशस्वी झाला तर ख्रिसमसला सगळ्यांना स्पाईस मिक्स मिळेल Wink

अंजली, वरच्या बागेचा फोटो तुझ्या बागेचा नाही हे काल नेट सर्च करताना लक्षात आलं.
पण मला ही आयडिया आवडली आहे. कधीतरी करुन बघता येईल.

अंजली, हे फोटो पाहुन काल मी जोरदार बागकाम केले. वांगी, फरसबी, काकडी, टरबुज, मिरच्या (बर्पीजच्या बिया) पेरल्या. टोमॅटो, मिरची, स्ट्रॉबेरीची रोपे लावली. एट्सीवरुन मागवलेली चाफा, जाई आणि रातराणी लावली. जुना अनंत कोमेजल्याने नवीन लावला. तुळस तर आपोआपच पुष्कळ फोफावली आहे. भरपुर काम केले बागेत काल. चांगले रिझल्ट्स आले तर फोटो टाकेन Happy

सायो,
वरच्या बागेचा फोटो तुझ्या बागेचा नाही हे काल नेट सर्च करताना लक्षात आलं. >>> Proud . अगं, 'असा' लूक हवा होता असं लिहीलंय ना. त्यामुळेच तर आधी सगळे हर्ब्ज कुंडीत लावून त्या कुंड्या जमिनीत गाडणार होते. पण रीसर्च केल्यावर असं लक्षात आलं की जमिनीत लावलेले हर्ब्ज जास्त fragrant, flavorful असतात म्हणून बाकी जमिनीत लावले.

राया, भरपूर काम झालंय की. फोटो नक्की टाका.

तुळस तर आपोआपच पुष्कळ फोफावली आहे. >> मी दरवर्षी उन्हाळ्यात लावते. बियांपासून नाहीतर इं ग्रो मधुन आणून. पण सप्टेंबर एंडला रोपं घरात आली की १०-१५ दिवसात पानं गळायला लागतात आणि महिन्याभरात सुकतं झाड पूर्ण . तुम्ही कुठल्या झोन मधे आहात ? तुळस बारा महिने बाहेर असते का ?

टेंडर पेरेनियल म्हणून लावलेली दोन लॅव्हेंडर आणि एक फ्रेंच टॅरगॉन मागच्या वर्षापासून या वर्षापर्यंत तरी टिकले आहेत . त्यामुळे यंदा अजून एक दोन 'टेंडर पेरेनियल' लावावे असा विचार आहे.

एका मास्टर गार्डनर कडून भरपूर क्रेन्स बिल जेरनियम ची रोपं मिळाली या आठवड्यात. डियर प्रूफ आहेत म्हणे. सध्या गेले तीन दिवस तरी हरणं त्यांच्या वाटेला गेली नाहीयेत. फीलिंग होपफुल.

मेधा - झोन ५ब. तुळस फक्त चार महिने बाहेर असते (कुंडीतच लावलेय). बाकी आठ महिने भरपुर उन येणार्या खिडकीजवळ ठेवते मी. बिया सुकवुन इतर कुंड्यांत पेरल्या की पुष्कळ रोपे घरातच येतात. तुळशीला चांगले६/७ तास उन मिळायला हवं. आणि रोज पाणी. मंजिर्‍या लगेच येतात.

मंडळी,
१. मदत करा. मोगर्‍याला खूप कळया आहेत पण त्या आधी गुलाबी होतात आणि मग काळ्या पडून गळून जातात. ३०-४० कळ्यांपैकी फक्त ५-६च फुलं फुलली. आ.का.चु. ?

२. गेल्या फॉलमध्ये लसणीच्या पाकळ्या लावल्या होत्या. त्याला थंडीतही पात होती भरपूर. पण आत्ता मे-जूनमध्ये पात वाळून गेली. मग ह्या आठवड्यात आम्ही उकरून पाहिलं. लावलेल्या पाकळ्याचं थेप कांद्यासारखा झाला होता. पण तो काही लसणासारखा दिसत नव्हता. लसणाचा वास होता. आधीच काढले गेले का ते?

आज आम्ही स्प्रिंग / समर प्लँटींग संपल्याचं स्वत:लाच सांगितलं. Happy बागेचा अंगापेक्षा बोंगा मोठा व्हायचा नाहीतर!
यंदा पहिल्यांदाच जमिनीत ट्युलिप्स लावले होते. छान फुलं आली. फक्त आम्ही अगदी सुचनांप्रमाणे मोजून अंतर सोडलं. त्यामुळे बाहेर दिसतो तसा दाट फ्लॉवर बेड दिसत नव्हता. पुढच्या वर्षी त्या बल्बच्या मधेमध्ये नवे बल्ब लाऊ. गेल्यावर्षीचे डॅफो आणि हायासिंथ छान फुलले.
नेहमीचे यशस्वी कलाकार म्हणजे जास्वंद, जर्बेरा, झेंडू भरपूर फुलं देत आहेत. नॉक आऊट थंडी नंतर वाढलं पण त्यावर किड पडली. त्याचे फोटो होमडिपोत दाखवल्यावर त्यांनी किटकनाशक दिलं. मग मात्र गुलाब मस्त फुलला. एकावेळी कुंडीतल्या झाडाला १५ फुलं होती!
जिरेनियम आधी फार वाढत नव्हतं पण आता मस्त फुलं येत आहेत. हिरव्या मिरच्या बर्‍याच येत आहेत. तीन चार टमॅटो आणि २-३ काकड्या आल्या आहेत.
डेलिया आणि ग्लॅडीओला लावायला उशीर झाला. होपफुली फुलतील. इथे वाचून गणेशवेल आणि गोकर्णाच्या बिया मागवल्या. त्या रुजल्याही आहेत. आता फुलं यायची वाट पहातो आहे. Happy
बाकी होमडिपो आणि नर्सरीत मिळाली काही अ‍ॅन्युअल फुलझाडंही आहेत.

https://toptropicals.com/html/toptropicals/articles/shrubs/jasminum_samb...
https://toptropicals.com/html/toptropicals/articles/shrubs/jasminum_samb...

I noticed the buds of Belle of India plants to open early instead of maturing to bigger size buds before blooming. I was wondering why are they blooming into a flower pre-maturely? . When the plant arrived from your nursery it was full with big buds and they bloomed into fuller flowers with lot of fragrance. I am wondering where am I going wrong?

There could be a few reasons:

1) Do not over-fertilize. We apply slow-release fertilizer (granulated) - 3 months release. So we apply a table spoon every 3 months.
2) Do not over water. Sambacs prefer to be on dry side. Underwatering is better.
3) For bigger flowers, they need plenty of sun.

Do not over water. Sambacs prefer to be on dry side. Underwatering is better. >>>>
पाणी दिवसातून एकदा घालतो. पण वर शोनू उलट म्हणते आहे.

For bigger flowers, they need plenty of sun. >>>>> ऊन भरपूर आहे. जवळ जवळ ८ तास (सध्या) उन असतं.

खत अजून घातलेलच नाहीये ! आधी कधी कळ्या अश्या गुलाबी आणि मग काळ्या पडलेल्या पाहिल्या नव्हत्या.

पराग, मेधा,
माझ्या अनुभवाप्रमाणे कुंडीतल्या मोगर्‍याला थोडं कमी पाणी लागतं. हाताला ओल लागली तर मी पाणी घालत नाही. पाणी जास्त होणं हे कळ्या लवकर गळून पडण्याचं कारण असू शकतं. माती, कुंडी योग्य नसणे, मुळं हेल्दी नसणे, उन न मिळणे अशी बाकी कारणंही आहेत. तू जे सांगतो आहेस ते पहाता पाणी जास्त होत असावं असं मला वाटतंय. माझ्याकडच्या आठही मोगर्‍यांच्या झाडांना फार उन असेल म्हणजे ९०+ तर २ दिवसातून एकदा पाणी देते. बाकी वेळेस मातीला हात लावून ओलसरपणा किती आहे याचा अंदाज घेऊन मग पाणी देते. आत्तापर्यंततरी हे वर्काआऊट झालं आहे.

पराग,
गूगल केलं तेव्हा ही खालची माहिती मिळाली.

Browning flowers
I live in Miami two month back I plant Jasmine Plant in a pot.The Plant is growing my fine but why are the bud are turning brown as well as the Jasmine flowers fall as soon as they bloom.
Thanks

HI
Browning flowers are an indicator that the plant is under some kind of stress. Are you misting the plant? Moisture on the flowers can lead to a fungal disease(blossom blight) that will cause them to turn brown. Direct sun, low humidity, too much or not enough water can also be a problem.

यूट्यूबवर पण याबाबत व्हिडीओज असण्याची शक्यता आहे. मी शोधून पाहिले नाहीत.

पाणीच जास्त होत असल्याची शक्यता वाटते आहे. >> ह्म्म, कुंडीत आहेत की जमिनित ? कुंडीत असेल तर पाण्याचा निचरा होत नाहीये का ?

माझ्याकडे कुंडीत आहे मोगरा आणि ८९-९० डि किंवा जास्त टेम्प असेल तर सकाळ संध्याकाळ पाणी घालते मी.
पाणी घालायच्या आधी माती ओलसर लागते आहे का ?

मी फिनीक्सला राहते. माझ्याकडे तीन मोगर्‍याची झाडं आहेत. यार्डात लावली आहेत. भरपूर उन्हात आहेत. सध्या ९० च्यावरच असतं. तरी मी एक दिवसाआड पाणी देते. रोज भरपूर फुलं येताहेत. (समरला दोने महिने तरी ११० च्या वर टेंपरेचर असतं. तेव्हा जुलैपासून रोज पाणी देते. )

मला वाटतं पराग, तुमच्याकडे ह्युमीड पण असतं ना? तेव्हा पाणी खूप कमी लागेल.

फक्त आम्ही अगदी सुचनांप्रमाणे मोजून अंतर सोडलं. त्यामुळे बाहेर दिसतो तसा दाट फ्लॉवर बेड दिसत नव्हता. पुढच्या वर्षी त्या बल्बच्या मधेमध्ये नवे बल्ब लाऊ>> मधे लावताना जरा वर लाव म्हणजे झिगझॅग स्टाइल
/\/\/\/\

शोनू, कुंडीत आहे. आम्ही कुंडी पण बदलली आणि पाणी कमी घातलं गेले ३-४ दिवस (एका आड एक दिवस) आणि काल आणि आज मिळून ६ फुलं फुलली !! बाकीच्या कळ्या पण अजुनतरी गुलाबी दिसत नाहीयेत. सगळ्यांना धन्यवाद सल्ल्यांबद्दल Happy
अंजली लिंका उपयुक्त आहेत.

शुगोल, अगदी मुंबईइतकं ह्युमिड नसतं पण तुमच्या इतकं ड्रायपण नसतं. पाणी घालायच्या आधी माती ओली लागते आहे का नाही ते पाहीन नक्की आता.

प्राजक्ता, पॅटर्न ट्राय करेन.

Pages