न्हाव्यासारखी हजामत घरच्या घरी कशी करावी?

Submitted by मानव पृथ्वीकर on 27 May, 2017 - 03:13

भारतात केशकर्तन न करुन घेणारा, केशभूषा न आवडणारा माणूस विरळाच! किंवा केसांनी तरी विरळा.
बाहेर केशकर्तनालयात केली जाणारी हजामत झटपट, सुबक असते खरी पण तितकीच आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यात वापरलेले वस्तरे, कात्र्या, कंगवे अस्वच्छ असतात. डोक्याला, मानेला इन्फेक्शन होऊ शकते.

हे सगळे टाळण्यासाठी आम्ही घरी फिस्कर्सची कात्री आणि सिंगरची दोरी वापरुन घरी हजामत करतो, तर तिला नीट आकार येत नाही.

न्हावी कुठली खास (आपल्याला न दिसणा‍‍‍र्‍या दोरीची बनवलेली) टेम्प्लेट वापरतात काय? अनेक न्हाव्यांना याविषयी विचारले तर कोणीही काही सांगितले नाही. अर्थातच त्यांचे ट्रेड सिक्रेट का उघड करतील म्हणा.

तर मायबोलीकरांनो,
घरी केलेली हजामत सुबक होण्यासाठी काय करावे?
यासाठीच्या कर्तनकृती, टिप्स असतील तर सांगा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

यामागे काय लॉजिक आहे? >>> कुठल्या कंपनीचा बॉस इतकी दाढी वाढवणार्‍याला कामावर ठेवत नाही. अगदी स्वतःचा मेहूणा असेल तरी.

कुठल्या कंपनीचा बॉस इतकी दाढी वाढवणार्‍याला कामावर ठेवत नाही.
>>>>
मग आपल्या आसपास जी दाढी वाढवलेली माणसे दिसतात ती काय स्वतःचे दुकान थाटलेलीच असतात का?
कुठलीही कंपनी बॉसवर नाही तर एच आर पॉलिसीवर चालते. आमची तर एमेनसी आहे. विविध जाती धर्म प्राम्त देशाचे लोकं तिथे काम करतात. तिथे दाढी किंवा केशरचनेच्या जुनाट कल्पनांना जराही थारा नाही. ड्रेसकोड मात्र आहेत. मात्र फ्रायडेला त्यातूनही सूट असतेच.

आमच्या ऑफिसात तर मोव्हेंबर जोरात साजरा होतो. मिशांना मॅचिंग दाढीही ठेवली जाते पण बक्षीस मात्रं सुंदर मिशांनाच मिळतं. त्या दाढीमिशांची सवय झालेले लोक मग ते कायमच ठेवतात नुसतेच हलके ट्रीम करून. हँडसम दिसतात. कधी चकाचक करून आले की डोळ्यांना त्यांच्या त्या रूपाची सवय व्हायला वेळ लागतो. पण १-२ महीने हजामत न करणे नॉर्मल आहे.
काही मुलं पोनीटेल बांधून नाही तर हेअरबँड लावून पण येतात डोक्यावर. एकदा एक मॅनेजर त्याच्या ऑफिसच्या पहिल्या दिवशी तारेचा तो वेटोळे वेटोळेवाला केसांना हजार भांगांमधे विभागणारा हेअरबँड घालून सुटाबुटात आलेला. सगळे त्याच्याकडे वळून वळून बघत होते. मग त्याने कोट काढून खुर्चीला लावून ठेवला तेव्हा जरा माणसात आल्यासारखा वाटला. दुसऱ्या दिवसापासून गपगुमान जीन्स नी टीशर्ट घालून आला.
काही लोक रोज चकाचक करून येणारे तर काही थोडी दाढीमिशी ठेवणारे तर काही लांबलचक दाढीमिशा ठेवणारे. सगळ्या प्रकारचे लोक आहेत ऑफिसात.

सोनू येस्स..
बहुधा प्रत्येक जण ज्या दोनचार कंपन्यांचे अनुभव घेतो त्यानुसार आपली मते बनवतो. त्यामुळे काही लोकांनी हे पाहिलेच नसेल तर सांगून पटणे अवघड जाऊ शकते.
आमच्याकडे मुसलमान कर्मचार्‍यांची संख्या जास्त असल्याने त्यात काही पर्मनंट दाढीवाले आहेत. अर्थात त्यांचा तोच कायम लूक दिसत असल्याने काही वेगळे वाटत नाही. पण मी दोन महिने वाढत जाणारी दाढी आणि सोबत वाढत जाणारे केस. आणि मग एके दिवशी दाढी सटासट आणि बारकुसे केस असा टोटली चेंज लूकमुळे नेहमी चर्चेत असतो. दोन महिने होत येतात तसे दर दोन दिवसांनी मला विचारणा केली जाते. काय मग आता कधी मुहुर्त Happy

माझे तर वॉर्डरोबमध्येही दोन भाग आहेत.
एक ते कपडे जे सटासट लूक मध्ये शोभतात तर एक ते जे वाढलेल्या दाढीवर चांगले दिसतात. उदाहरणार्थ पिंक, रेड, येल्लो वगैरे मी वाढलेल्या दाढीवर घालत नाही. ब्लॅक ग्रे व्हाईट हे डॅशिंग दिसतात.. एक दोन स्काय ब्ल्यू शेड शर्ट आहेत ते मात्र वाढलेल्या दाढीवरही चांगली दिसतात. तसेच ते शर्ट सटासट केले असताना घालून जातो तेव्हाही लोकं मला स्वदेसचा शाहरूख बोलतात Happy

कुठल्या कंपनीचा बॉस इतकी दाढी वाढवणार्‍याला कामावर ठेवत नाही.
>>>>
मग आपल्या आसपास जी दाढी वाढवलेली माणसे दिसतात ती काय स्वतःचे दुकान थाटलेलीच असतात का?
कुठलीही कंपनी बॉसवर नाही तर एच आर पॉलिसीवर चालते. आमची तर एमेनसी आहे. विविध जाती धर्म प्राम्त देशाचे लोकं तिथे काम करतात. तिथे दाढी किंवा केशरचनेच्या जुनाट कल्पनांना जराही थारा नाही. ड्रेसकोड मात्र आहेत. मात्र फ्रायडेला त्यातूनही सूट असतेच. >>>
ऋन्मेष जरा जुन्या लेखांमधे काय लिहिलय ते ही आठवत जा कि जरा Happy त्यात धाग्याच्या लिंका देउन ठेवल्यात Happy

ऋन्मेष जरा जुन्या लेखांमधे काय लिहिलय ते ही आठवत जा कि जरा
>>>>>>>
काही मिसमॅच आहे का?
तरीही चालतंय, तसेही माझे लेख कोणी वाचत नाही, त्याखालचे प्रतिसादच वाचतात Wink

बाय द वे,
हे बघा मेघा, जुन्या एका लेखातही मी हेच लिहिलेय.
------------------------
पण चांगले दिसणे म्हणजे केवळ चांगले कपडे घालणे असे नाही. तर सोबत मेक अप आणि ब्यूटी पार्लरही हवे. माझ्यासाठी ते तीनचार महिन्यांचे वाढलेले केस कापणे आणि साठ-पासष्ट दिवसांची दाढी करणे ईतकेच असते.
------------------------

Ha Narsisus cha deshi avatar re baba >>>> हे माझ्यासाठी आहे की धागाकर्त्याला? माझ्या पोस्ट खाली आल्याने पटकन वाटले मलाच आहे की काय Happy
बाकी Narsisus म्हणजे काय असते? स्वतंत्र धाग्याचे पोटेंशिअल असेल तर नक्की सांगा याचा अर्थ
जर Narsisus आणि दाढीचा काही संबंध नसेल, हे अवांतर असेल तर मला विपू केली तरी चालेन.

काही मिसमॅच आहे का? >>> अगदी, टोटली ऑपोजिट आहे Happy , म्हणजे मी काही दिवसांपुर्वी वाचलेय मला आठवतयं...
तरीही चालतंय, तसेही माझे लेख कोणी वाचत नाही, त्याखालचे प्रतिसादच वाचतात >>>> Lol

ते काहीतरी वेगळ्या संदर्भाने असेल मेघा.. मी उलट माझ्या दाढीमिश्यांसाठी फेमस आहे.. अगदी बाहुबली 2 नंतरही ऑफिसमध्ये मला लोकं म्हणतात, रुनम्या जरा बॉडी बनव, डिट्टो बाहुबली प्रभास वाटशील.. ते ऐकूनच तर मी त्याचा फॅन झालो आणि त्यावर धागा काढला. ती एक मानसिकता असते ना, आपल्याला कोणी एखाद्या सेलिब्रेटीसारखे दिसतो म्हटल्यावर अचानक ती आपल्याला आवडायला लागते..
त्या धाग्याची शीर्षकही बघा.. अस्सल भारतीय मर्दानी सौण्दर्य! माझ्यामते ज्या पुरुषाला दाढी मिश्या शोभतात तोच खरा सुंदर आणि रुबाबदार.. बाकीचे नुसतेच देखणे दिवे Happy

मला शोधून आनाव लागेल आता Happy

मी उलट माझ्या दाढीमिश्यांसाठी फेमस आहे.. अगदी बाहुबली 2 नंतरही ऑफिसमध्ये मला लोकं म्हणतात, रुनम्या जरा बॉडी बनव, डिट्टो बाहुबली प्रभास वाटशील.. ते ऐकूनच तर मी त्याचा फॅन झालो आणि त्यावर धागा काढला. ती एक मानसिकता असते ना, आपल्याला कोणी एखाद्या सेलिब्रेटीसारखे दिसतो म्हटल्यावर अचानक ती आपल्याला आवडायला लागते..
त्या धाग्याची शीर्षकही बघा.. अस्सल भारतीय मर्दानी सौण्दर्य! माझ्यामते ज्या पुरुषाला दाढी मिश्या शोभतात तोच खरा सुंदर आणि रुबाबदार.. बाकीचे नुसतेच देखणे दिवे >>> Happy थोड्यावेळाने शाहरुखला पण आणा हं Happy

हे सगळं हलकं का काय ते घ्या Light 1 विनोदी धागा आहे Happy

चला मेधा.नी नवीन धाग्याची सुरुवात करूँ दिली आहे.
आता गरीबांचा शा.खा माध्यमवरगीयांचा प्रभास कसा बनला यावर बालके ऋ चा धागा वाचूया.

आता गरीबांचा शा.खा माध्यमवरगीयांचा प्रभास कसा बनला यावर बालके ऋ चा धागा वाचूया.>>> Lol
पण प्रतिसाद खरचं फाडू असतात त्यांचे...फक्त एका लेखामधे काय लिहिलय हे हि लक्षात ठेवता आलं पाहिजे Happy

एक साळसूद प्रश्न: विडंबनाच्या धाग्यात "ओ वेमा अवांतर पोस्टी उडवा!" अशी मागणी करता येते का? Wink

मला वाटते अशी मागणी करायचा हक्क मूळ लेखकाला म्हणजे ज्याच्या लेखाचे विडंबन झाले आहे त्याला असतो.
काही चुकत असेल तर जाणकारांनी प्रशाक टाका

अरे यार कोणीतरी काकांना सिरियसली उत्तरं द्या की... Happy
त्यांनी काय प्रश्न विचारला आहे ....आणि काय उत्तर येतायतं Sad

बघ ना!
आज रविवार आहे, छान हेअरकट करता आली असती घरच्या घरी.

एकदा मी माझ्या साडेतीन महिने वाढलेल्या दाढीला घरीच करायचे ठरवले. वस्तरा हरवायच्या भितीने आधी कात्रीने कट करूया म्हटले. पण कात्रीने कापताना कट कट असा आवाज येऊ लागला. ते पाहून माझी आई म्हणाली, काय कटकट आहे. बस्स त्या दिवसापासून घरी दाढी करायचा विषयच कट करून टाकला.

आज रविवार आहे, छान हेअरकट करता आली असती 
>>>>
किती ईंग्रजाळलेलो आहोत आपण
एखादा शंकराचा सोमवार वा गणपतीचा मंगळवार.. किंवा गेला बाजार मारुतीचा शनिवार बघून केस कापायचे सोडून मटणमच्छीच्या रविवारी केस दाढी करतो..
अरे ते ब्रिटीश लोकं संडेला चर्चला जायच्या आधी शुचिर्भूत होतात. आपले काय असते रविवारी?? फॅड करून ठेवलेय नुसते.. आणखी केक कापा आणि वाढदिवस साजरे करा....

रविवारी सुट्टी असते म्हणुन. मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही शनिवारीही काम करतो.

रच्याकाने: इंग्रजाळलेलो असु तर त्यात वाइट काय?

दाढी मी घरीच करतो! नको ते न्हाव्या कडचे वस्तरे!

पुर्वी दाढी साठी खोरे गोदरेज साबणाची ती प्लास्टीक डब्यात ठेवलेली गोल वडी मस्त ब्रश पाण्यात बुडवून त्या साबणावर बराच वेळ घासून भरपूर फेस करुन गालावर लावायचा आणि मग खोर्‍याने दाढी करायची टोपाझ किंवा भारत ब्लेड...

हे आजकालच्या पेस्ट आणि फोम ट्वीन ब्लेड ह्यात तश्या दाढी करायाची मजा नाही! Wink

फिलिप्सचा एक ट्रीमर मिळतो (ज्याची जाहिरात एकेकाळी अर्जुन कपूर करायचा). तो मी माझ्या नवऱ्याला घेऊन दिला. पण हजामत करायला नाही. घरच्या घरी प्रचंड एफर्ट घेऊन त्याची एफर्टलेस दाढी मेंटेन करायला. साधारण १ महिन्याची दाढी तो ट्रिम करायला जातो आणि संपूर्ण हजमातच होते. आजपर्यंत नक्की काय प्रॉब्लेम आहे कळले नाहीये. यात कदाचित त्याला बिन दाढीचा चंपू लुक आवडतो हेही छुपे कारण असेल.
तर तुम्हाला घरच्या घरी करायचे असेल तर असे काहीतरी यंत्र आणा जे दाढी आणि केस वाढवण्यासाठी वापरले जाते (किंवा मेंटेन करण्यासाठी). ते तुम्हाला वापरता येणार नाही आणि त्याचा उलट परिणाम होऊन तुमची हजामत होईल.

ते तुम्हाला वापरता येणार नाही आणि त्याचा उलट परिणाम होऊन तुमची हजामत होईल.>>>> Proud
सई त्या ट्रिमर सोबत एक कॅप असते.
अशी:
trimmer-cap.png

ती पूर्ण काढून तो ट्रिमर वापरत असेल, त्यामुळे तसे होत असावे.
ती कॅप त्यावर ठेवून तीची पोझीशन अ‍ॅडजस्ट करावी १ ते १० नंबर बर. १ वर केल्यास साधारण दोन मिमि लांबीचे केस रहातात.

पुर्वी दाढी साठी खोरे गोदरेज साबणाची ती प्लास्टीक डब्यात ठेवलेली गोल वडी <<< कृष्णा, अरे द्वापारयुगातल्या सगळ्याच गोष्टी काही आज नामशेष झालेल्या नाहीत. ती वडी आजही मिळते. Proud

विडंबनाचा धागा आहे पण ते ध्यानात आलेले दिसत नाहिये. मला साध्या रेझरने पुरुषांची नीट दाढी व केस ट्रिम करणे, बारीक कात्रीने. आणि बायका मुलींचे . लहान मुलांचे केस नीट कापता येतात. व आव डते पण इट्स अ‍ॅण आर्ट यू नो. मी मेजरली कस्टमर फेसिन्ग प्रोफाइल्स मध्ये काम केले असल्याने बरोबरचे कलीग नीट दाढी केलेले आफ्टर शेव्ह लावलेले रुबाबदार असेच बघायची सवय आहे. नीट मेंटेन केलेली दाढी मिशी शोभते काहीना पण नीट नसेल तर अजागळ व अस्वच्छ दिसते. पण आपल्याला काय त्याचे. वाढवेनात का.

वापारयुगातल्या सगळ्याच गोष्टी काही आज नामशेष झालेल्या नाहीत. ती वडी आजही मिळते. Proud>>>

आणायला हवी शोधून! आता घेतोच ह्या रविवारची ही मोहीम हातात खोरे आणि 7óclock ब्लेड

Pages