आणि तो रडु लागला - परिस्थितीजन्य कोडे

Submitted by मानव पृथ्वीकर on 25 May, 2017 - 15:28

पकोडेच आहे हे. पण फरक असा की यात प्रश्न विचारायचे नाहीत. खाली एक छोटीशी घटना दिली आहे.
त्यावरुन तुम्ही नक्की काय घडले असावे हे ओळखायचे / सांगायचे आहे. उत्तरे अर्थात अनेक असतील. तर आपल्या कल्पनाशक्तीला ताण द्या आणि येऊ द्या तुमची उत्तरे.

खुर्चीत तो वाचनमग्न होता. त्याच वेळी सिगरेट मग्न सुद्धा. वाचता वाचता अधुन मधुन झुरके घेत होता, झुरके घेत अधुन मधुन तो वाचत होता.
मध्येच एका बातमीने त्याचे एकदम लक्ष वेधले. ती वाचून पूर्ण झाल्यावर त्याने झुरका घेण्यास हात पुढे आणला आणि बोटांमधील सिगरेटकडे पाहिले. काही क्षण पहातच राहिला. आणि मग तो रडु लागला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर बातमीमध्ये काही क्ल्यू असेल तर कदाचित सिगा रेट महाग झाल्याची बातमी असेल? त्यात जर तो चेन स्मोकर असेल तर बिचार्‍याचे महिन्याचे बजेट कोलमडले असेल?
चेन स्मोकर वरून आठवले, शाहरूखही बहुधा चेन स्मोकर आहे. त्याच्या संबंधित काही बातमी होती का?

१. कदाचित त्याचे शेअर्स/बिझिनेस बुडाल्याची बातमी असेल? आणि आता त्याच्या हातात उंची सिगारेटेवजी विडी असेल.
१. कदाचित मनोरुग्णालयातुन रुग्ण पळाल्याची बातमी असेल? आणि त्याच्या हातातली सिगारेट पेटवलेलीच नसेल. किंवा लहान मुले पितात ती कँडी सिगरेट असेल.

१. त्याचा/त्याची पार्टेनर ह्यांनी एकत्र स्मोकिंग सुरू केले होते. पेपरात लंग कॅसरने त्याचा/तिचा मृत्यू झाल्याची बातमी वाचली.
२. पेटत्या सिगरेटच्या थोटकाने घराला आग लागून कुटुंब मृत्युमुखी पडल्याची बातमी वाचून त्याच्या आयुष्यात त्याच कारणामूळे घडलेली तीच घटना नि त्याचे स्वतःचे कुटूंब आठवले.

दिलेल्या माहीतीपलीकडे काही क्लु वापरू शकतो का... म्हणजे तेव्हाच शेजारच्या काकूंनी कांदा कापायला घेतलेला.. रेडीओवर एखादे जग सूना सूना लागे सारखे सॅड साँग लागलेले..

कदाचित त्याने सिगारेट आपल्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीत प्यायला सुरुवात केली असावी आणि पेपरात तिच्या लग्नाची किंवा मृत्युची (तसेही दोन्ही एकच) बातमी आली असावी?

त्या बातमी चा मथळा होता:
**************
"दशक्रिया विधी"
.........................
*************
आता फक्त सिगरेट जळत होती...१० दिवसान्पूर्वी सरणावर त्याची चिता जळत होती.
त्या सिगरेट नेच त्याचा जीव घेतला होता.
त्याच्या रडण्याचा आवाज आता कोणीही ऐकू शकत नव्हत.

माझे सायन्स वायन्स तसे कच्चेच आहे. पण अश्रू धूर रडवतात असे ऐकले आहे. सिगारेटमध्ये चुकून तंबाखू ऐवजी भलते सलते भरले गेले असावे आणि त्यातून नेहमीच्या धूराऐवजी अश्रूधूर बाहेर पडले असावेत?

स्वप्नाली, ईथे रात्रीचे पावणेदोन वाजले आहेत. माझ्यासारखी बाळं जागी आहेत. आणि तुम्ही भूताचे विषय कसले काढत आहात Happy

कधीकधी प्रकाशमान गोष्टींकडे एकटक बघत राहिले की डोळ्यातून पाणी येते. जसे की सूर्य.
तसेच सिगारेटच्या निखार्‍याकडे एकटक बघत राहीले तर डोळ्यातून पाणी येऊ शकते का? मी पित नसल्याने अनुभव नाही. जाणकारांनी प्रकाश टाकावा...

एक शंका - तो रडण्याचे नाटक तर नव्हता ना करत??? आपल्यावर पकोडे बनवले जावेत यासाठी माणसं कुठल्याही थराला जाऊ शकतात..

खुर्चीत तो वाचनमग्न होता. त्याच वेळी सिगरेट मग्न सुद्धा. वाचता वाचता अधुन मधुन झुरके घेत होता, झुरके घेत अधुन मधुन तो वाचत होता.
मध्येच एका बातमीने त्याचे एकदम लक्ष वेधले. ती वाचून पूर्ण झाल्यावर त्याने झुरका घेण्यास हात पुढे आणला आणि बोटांमधील सिगरेटकडे पाहिले. काही क्षण पहातच राहिला. आणि मग तो रडु लागला. >>>
स्थळ १६०० पेन्सिल्वेनिया अवेन्यू नॉर्थवेस्ट, वॉशिंग्टन डीसी २०५००
दिनांक ९ नोवेंबर २०१६

पुढची स्टोरी सांगायची गरज आहे का?

तो पित असलेल्या सिगरेट ब्रँड कंपनीने कसे आजवर प्रॉफिट मार्जिन वाढवण्यासाठी लोअर क्वालिटी निकोटीन वापरले, त्यातील एक अतिशय हार्मफुल केमिकल घटक कसा त्याच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला कँसरग्रस्तं करतो आहे आणि त्यापासून सुटका नाही ह्याची ती बातमी होती.

. ती वाचून पूर्ण झाल्यावर त्याने झुरका घेण्यास हात पुढे आणला आणि बोटांमधील सिगरेटकडे पाहिले. काही क्षण पहातच राहिला. आणि मग तो रडु लागला. >>
आज किती दिवसांनी त्याला गुडांगरम परवडली होती, आणि ती फडतूस बातमी वाचता वाचता झुरके न घेताच संपली होती. परत संभाजी बिडीच्या आठवणीने रडूच कोसळणार ना!

तमाम ब्रँडेड सिगारेट्स ट्राय करून झाल्या होत्या. हल्ली त्याला हाताने वळलेल्या सिगारेट्स ची दीक्षा कुणीतरी दिली. ताजा सुट्टा तंबाखू हँड रोल करायचा आणि कागदात वळून मस्त झुरका घ्यायचा!! ही त्याची नवी किक होती.
आत्ता तो वाचण्यत इतका गुंग झाला की नेहमीच्या कागदाऐवजी समोर पडलेले कालच घेतलेले लोट्टो चे तिकिट कधी घेतले आणि गुंडाळले त्याला कळलेदेखिल नाही .
खुर्चीत तो वाचनमग्न होता. त्याच वेळी सिगरेट मग्न सुद्धा. वाचता वाचता अधुन मधुन झुरके घेत होता, झुरके घेत अधुन मधुन तो वाचत होता.
मध्येच एका बातमीने त्याचे एकदम लक्ष वेधले. लोट्टो चा रिझल्ट होता तो ! ३ ..२..५..४..७..७.६.४.. पॉवरबॉल नंबर ९ !! सगळे नंबर जुळल्यास ३३३ मिलियन डोलर्सचं बक्षिस !! ते विनिंग तिकिट गार्डन स्टेट हायवे एक्झिट १० च्या रेस्ट स्टॉप वरच्या दुकानात काल विकले गेले होते अशी ती बातमी होती!! ओ माय गॉश !! मी कालच तर नाही का तिथून... !!
त्याच वेळी त्याने बोटांमधील सिगरेटकडे पाहिले. एव्हाना जवळपास पूर्ण जळालेल्या त्या तिकिटावरच्या वाकुल्या दाखवणार्‍या पावरबॉल नंबर ९ कडे तो काही क्षण पहातच राहिला. आणि मग तो रडु लागला.

Happy

वडिलांची सगळी मालमत्ता सिक्युअर्ड होती, त्यांच्या पश्च्यात ती सगळी पब्लीकली याच्या नावावर झालेली, पण जोपर्यंत त्याची प्रायव्हेट की मिळत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार न्हवते.
त्याच्या वडिलांच्या मृत्यूपत्रात ती सिगारेट त्याला सापडली होती. जोपर्यंत मालमत्ता अनलॉक होत नाही तोपर्यंत ही सिगारेट शिलगावू नको असं स्पष्ट लिहिलेलं असूनही इतके दिवस 'प्रायव्हेट की' चा पत्ता न लागल्याने आज वैतागून त्याने ती सिगारेट प्यायला घेतली होती. पेपरातली बातमी वाचून संपली आणि त्याचं लक्ष सिगारेट कडे गेलं. वेष्टनाच्या आत एक कागद होता आणि शेवटचे काही अंक आणि चेकसम जळायला लवकरच सुरुवात होणार होती.

ज्याला पडयावर बघूनच त्याने पहिली सिगरेट हातात घेतली त्या त्याच्या आवडत्या हीरो देवानंदच्या निधनाची बातमी होती ती आणि बातमीचा मथळा होता 'मै जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुये में....'

Pages