Submitted by बाळ पाटील on 19 May, 2017 - 00:12
वाकून नम्रतेने सांगून वाट गेली
आहे वळण पुढे हे दावून वाट गेली
संकेत पाळणे हा संकेत एक आहे
येथे भल्याभल्यांची लागून वाट गेली
वाटेस भेटणार्या वाटा अनेक होत्या
" भुलशील हाय वेड्या "बोलून वाट गेली
येथे कितीे फुलांचे निर्माल्य साठलेले
येथे किती युगे ती पाहून वाट गेली
काटेकुटे जरी हे लोटून दूर द्यावे
उखडू नयेत वाटा , सुचवून वाट गेली
थकलीत पावले अन् हातात ही शलाका
मी संपलो तरी ना संपून वाट गेली
_बाळ पाटील
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप आवडली.
खूप आवडली.
थकलीत पावले अन् हातात ही
थकलीत पावले अन् हातात ही शलाका
मी संपलो तरी ना संपून वाट गेली >>>> मस्तच
कविता मस्तच पण शेवटी मी
कविता मस्तच पण शेवटी मी संपलो तरी ना संपून वाट गेली हे खटकते मी संपलो तरीही अजूनही वाट उरली हे योग्य होईल असे वाटते
प्रमोद जोशी
>>>येथे कितीे फुलांचे
>>>येथे कितीे फुलांचे निर्माल्य साठलेले
येथे किती युगे ती पाहून वाट गेली>>>खासंच!
प्रमोदजी,कसेही लिहीले तरी
प्रमोदजी,कसेही लिहीले तरी अर्थ एकच! ही गझल आहे,शब्द वृत्तात बांधताना किस पडतो.
प्रमोदजी,कसेही लिहीले तरी
प्रमोदजी,कसेही लिहीले तरी अर्थ एकच! ही गझल आहे,शब्द वृत्तात बांधताना किस पडतो.धन्यवाद!
मि.पंडीतजी,रश्मीजी,सत्यजीतजी
मि.पंडीतजी,रश्मीजी,सत्यजीतजी धन्यवाद!