शॉर्ट फिल्स

Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54

परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:

-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind

अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कडली नावाची ८ मिनिटाची शॉर्टफिल्म पाहिली ओके होती, नीना कुलकर्णी आणि श्रुती व्यास.

सर्वात आवडली ती अनुपम खेर ची खीर ही शॉर्ट फिल्म.
जमल्यास नक्की पहा.

इलायची काय कळली नाही. कुणीतरी विस्कटून सांगा.

सध्या मी 'गर्ल इन द सिटी' वेबसिरीज ची अतिप्रचंड फॅन झाली आहे. मिथिला पालकर आहे यात. खूप मस्त आहे सिझन`१ पूर्ण आणि २ चे काही भाग झालेत. इतकी ती इन्वॉल्व वाटते अ‍ॅज अ फॅशन डिझायनर. सगळ्यांची कामे सुपर्ब आहेत. तिचे आई बाबा, रुममेट्स, बॉसेस टु गुड.

इलायची काय कळली नाही. कुणीतरी विस्कटून सांगा. >>> नवर्‍याच्या आठवणींपासून सुटका मिळवण्यात ती यशस्वी होते का हे `अद्रक की इलायची?' यावरून ठरणारे. शेवट प्रेक्षकांवर सोडला आहे.

सध्या मी 'गर्ल इन द सिटी' वेबसिरीज ची अतिप्रचंड फॅन झाली आहे. मिथिला पालकर आहे यात. खूप मस्त आहे सिझन`१ पूर्ण आणि २ चे काही भाग झालेत. इतकी ती इन्वॉल्व वाटते अ‍ॅज अ फॅशन डिझायनर. सगळ्यांची कामे सुपर्ब आहेत. तिचे आई बाबा, रुममेट्स, बॉसेस टु गुड. >>>>>>>>>
हो मस्त आहे ती वेब सिरीज ....मिथिला छान अभिनय करते ....तिची च dice मीडिया ची 'little things ' पण बघा ...छान आहे ती सुद्धा .

गर्ल इन द सिटी' वेबसिरीज ... पहिला सीजन काही रात्र सलग बघून संपवलेला.. मस्तय.. आता दुसरा सीजन आला हे ईथे सांगितल्याबद्दल धन्यवाद.. शोधतो पुढच्या विकाण्ताला Happy

नवर्‍याच्या आठवणींपासून सुटका मिळवण्यात ती यशस्वी होते का हे `अद्रक की इलायची?' यावरून ठरणारे. शेवट प्रेक्षकांवर सोडला आहे.>>>>> ओह असं आहे का? धन्यवाद.

वॉव... गर्ल... चे फॅन्स आहेत का इकडे? चला जरा गॉसिप करता येईल म्हणजे Wink
ती अरीम किती इरिटेटींग आहे.... तिचा भाऊ हँडसम आहे पण स्प्लिट पर्सनालिटी वाटतो.. Lol
आजचा भाग पाहिला. कार्तिक म्हण्तो मेरी दाल Rofl
लिटिल थिंग्स पाहिली आहे, ती पण मस्त आहे.

मी अनेक शॉर्टफिल्म्स पाहते सध्या प्रवासात.
त्यात ड्राय डे, अरे बाबा, द लास्ट डे, पाहिले
पण त्यातल्या त्यात ' व्हिसा' आणि ममता टॉनिक बर्‍या वाटल्या.
व्हिसा जास्तच आवडली.

मला आवडलेल्या काही शॉर्ट फिल्मस
क्रीती - मनोज वाजपेयी आणि राधिका आपटे
चटनी - टिस्का चोप्रा
स्पेशल डिश - मनवा नाईक
प्युर व्हेज
स्टार बेस्ट्सेलरची एक शाम की मुलाकात - इरफान, टीस्का चोप्रा, हिमानी शिवपुरी

अम्ब्रेला - एकत्र राहणारे दोन मित्र, एक घरून फोनवर फूड ऑर्डर करत असतो, आणि पलिकडच्याला दम देतो की अर्ध्या तासात फूड डिलिव्हर कर. दुसरा तोवर घरी येऊन पोहोचतो, थोडा डिस्टर्ब्ड. आणि मग तो त्याला रस्त्यात भेटलेल्या माणसाबद्दल सांगतो..... नक्की पहा.

द पेपर बॉय - वेस्ट बेंगॉल मध्ये एक छोटा मुलगा पेपर टाकत असतो घराघरात.... त्याच्या एका दिवसाची ही कथा. त्यात एक पण संवाद नाही. मुलाने अतिशय सुरेख काम केले आहे. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव आपल्याला त्याच्या प्रेमात पाडतात.

या दोन शॉर्ट फिल्म्स नक्की पहा.

लली..... $$$$ ऐकतेस ना? प्लिज बघ.

गर्ल इन द... चा फ्रायडे एपि ....yes..really shocking. पण मे बी अरीम ला परत आणण्यासाठि हे खोटेच केले आसेल... होप सो.

`गर्ल इन द सिटी'चा पहिला सीझन संपवला. खरंच मस्तय. अश्या १२-१५ मिनिटांच्या एकेका भागाची कल्पना आवडली. कमी वेळाचे एपिसोड्स असले तरी पटकथा किती क्रिस्प लिहिली आहे. त्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता टिकून राहते.
कामं सगळेच मस्त करतात. कार्तिकचं काम केलेला मुलगा म्हणजे `उडान'मधला मुलगा आहे ना?
फक्त एकच जाणवलं - मीरा एक सूटकेस घेऊन मुंबईत आलेली असते; तरीही तीन महिन्यांत तिचा एकही ड्रेस रिपीट झालेला दाखवलेला नाही. Proud
आता वेळ मिळाला की दुसरा सीझन बघायला सुरू करणार.

दक्षे, `अम्ब्रेला' मी आधी पाहिली होती. मला जरा क्लिशे वाटली.
`द पेपर बॉय' बघते.

`परोक्ष' पण परवा यू-ट्यूबनेच सजेस्ट केली होती. ती पण पाहायची आहे.

Ouch- मनोज बाजपेयी , पुजा चोप्रा
Kriti - मनोज बाजपेयी , राधिका आपटे , नेहा शर्मा
White shirt- कुणाल कपुर , क्रितिका काम्रा
Naked - काल्की , रिताभ्रि - खुप छान मेसेज दिलाय ह्या शॉर्ट फिल्ममधुन
Taandav - मनोज बाजपेयी

काल `द पेपर बॉय' बघितली. एकंदर कॅमेरा वर्क, वातावरण निर्मिती वगैरे खूप आवडलं. त्या मुलाचं अनाथ्/बेघर असणं भिडलं. कलाकार मुलाचे डोळे किती बोलके आहेत!
पण शेवटी त्या बुटांचा क्लोज-अप का ते कळलं नाही. त्या आधीचे सिक्वेन्सेस म्हणजे त्याचं स्वप्न होतं असं आधी वाटलं. पण त्याचीही सुसंगती लागेना.
त्या एका वरच्या बाल्कनीत त्याने पेपर टाकणे आणि वरून उलट त्याच्यावर एक-एक कागदी गुंडाळी पडणे, ती त्याने उघडून पाहणे - हे छान घेतलंय. पण त्याचा आणि फिल्मच्या शेवटाचा मला काही संबंध जोडता आला नाही. Sad

Pages