लॉन-वरचं लगीन!

Submitted by अत्रुप्त आत्मा on 20 April, 2017 - 03:08

https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17991585_1325052557581027_2522918732284372163_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=87b7fe7cee10ef8de3ed78cb4dfac684&oe=59985CF0
नाटकापेक्षा आमच्या धंद्यात,
नेमका उलटा खेळ आहे.
तिथे भेळेला खाणारा आहे.
इथे खाणाय्राला-भेळ "आहे! "

स्टेज लागून तयार आहे.
नेपथ्यंही सज्ज आहे.
वधूपार्टी येऊन गरम,
आणी .. वरंपार्टी थंड आहे.

या रे! जा रे! .. आणा रे! बोलवा रे!
हलकल्लोळ आता उडणार आहे.
जो तो येऊन गप पडल्या,
भटावर आता चिडणार आहे.

दोन तास लेट झाला
आकराची वेळ छापून !
आइस्रकिम जरी "तयार होतं"
वितळण्या आधी कापून! (स्लाइस करून)

केटरिंग आणी भटजिंचीही
अवस्था अशी-एक आहे.
काम ठरताना चालंलेली नोट
आज मात्र "फेक" आहे.

लायटिंगच्या माळा स्टेजची फूल सजावट!
लॉन वरच्या लग्नांची सगळी ही दिखावट!
भकास , रूक्ष व्यवहारांच्या वरातीत
कर्ते सोडून क्रीयापदांची वजावट!

तेव्हढ्यात एक लहान मूल,
आइस् करीम घेऊन येते.
"काका.. आयश्लिम खानार? " म्हणून
थंडावा देऊन जाते.

मग मनात विचार येतो..
इथे लहान होऊनच रहायला हवं.
त्याच्या निरागस नजरेनी,
सगळं चालंलेलं पहायला हवं!

मग सगळे त्रास सु सह्य होऊन,
अॅक्सेप्टन्स वाढेल.
आणी फार तर तिथला 'राग',
तो कवितेतून काढेल!

सोप्पं होऊन जाइल सगळं
त्रास हवेत विरून जाइल!
शब्द उरले नाहित.. तरी,
काव्य तळाशी राहिल!
==============
अत्रुप्त...

Group content visibility: 
Use group defaults