शीतपेय आणि आपले आरोग्य

Submitted by नलिनी on 26 April, 2017 - 07:37

आपल्याला नेहमीच वाचनात / ऐकण्यात येते की शीतपेयं आरोग्यासाठी हाणीकारक आहेत, पण कसे?
साधारण एक कॅन शीतपेय प्यायले तर काय होते ते पाहू -
साधारण १० टिस्पून साखर शरीरात जाते. एवढी साखर एकदाच खाल्ली तर ओकारीच व्हायला हवी पण त्यातले phosphoric acid तसे होऊ देत नाही.
पुढील १० - २० मिनिटात एवढ्या प्रमाणात आलेल्या साखरेसाठी त्याच प्रमाणात इन्सुलीन शरीरात सोडले जाते. लिव्हरचे काम वेगाने वाढते आणि ही रक्तात सोडलेली साखर चरबीत साठवायचे काम करावे लागते. रक्तातले साखरेचे प्रमाण वाढते, बीपी वाढतो, pH बदलतो म्हणजे बघा शरीरावर केवढा ताण पडतो ते. वाढलेला pH सामान्य पातळीत आणण्यासाठी हाडांमधून आणि दातांमधून कॅलिशिअम घेतले जाते.
आपल्या शरीराकडून आणखी साखरेची मागणी होते ते तर वेगळेच.
ह्याबद्दल असलेली तुमची माहिती , तुमचे मत नक्की वाचायला आवडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृष्णा मला तर वाटते जास्तच जात असेल.
मी तर एअरेटेड ड्रिन्क्स च्या वाट्याला कधीच जात नाही उभ्या आयुष्यात मी पेप्सी, थम्ब्स अप वगैरे हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्याच वेळेला प्यायलेले आहे. त्यातल्या त्यात माझा प्यायले असेन.

मी देखिल कधी पित नाही पण आश्चर्य वाटले खरेच एवढी साखर त्या २००-३०० मध्ये असेल का म्हणून!
आजवर क्वचित सटी सामाशी एखादा ग्लास प्यायला असेल!

शीतपेयात मोठ्या प्रमाणात साखर असते हि ज्ञात गोष्ट आहे,
मात्र ज्या गोष्टी आरोग्य दायक म्हणून खाल्ल्या जातात त्यात देखील मोठ्या प्रमाणावर साखर असते,
उदा, च्यवनप्राश, इकडे मी पतंजली हे उदाहरण घेतोय, पण कोणत्याही ब्रँड मध्ये थोड्या बहुत प्रमाणात हीच परिस्थिती आहे
अमृत रसायन, प्रत्येक 100 ग्राम मध्ये 70 ग्राम साखर, 22 ग्राम आवळा पिष्टी, आणि उरलेले काही ग्राम ब्राम्ही, इ प्रक्षेप द्रव्ये+ स्टेबिलिझिंग अजेंट्स असतात,
जे अगदी केशर युक्त म्हणून सांगितले जाते ते केशर 100 ग्राम मागे 0.06 ग्राम असते,
असे हे रसायन, डायबेटिक माणसाने सकाळ संध्याकाळ 1 मोठा चमचा खाल्ले तर त्याच्या पोटात किती साखर जाईल?

आता यातही शुगर फ्री च्यवनप्राश आलाय, त्यात काय आहे ते पहिले नाही अजून.

डायबेटिक माणसाने सकाळ संध्याकाळ 1 मोठा चमचा खाल्ले तर त्याच्या पोटात किती साखर जाईल?>> डायबेटीक असणार्‍याने काय पण नसणार्‍याने जरी खाल्ले तरी ते नुकसानदायकच आहे.
आता यातही शुगर फ्री च्यवनप्राश आलाय>> शुगरफ्रीपेक्षा साखर असलेले बरे असे म्हणावे लागेल. शुगरफ्रीपासून दूरच राहिलेले बरे.

नुसते एअरेटेड नव्हे तर मॅप्रो सारखी काही कॉन्सेंट्रेटेड सरबतातही भरपूर साखर असते.
साखरेच्या पाकात नावाला रंग आणि चव टाकलेले असते.
बहुदा पदार्थ टिकवण्यासाठी एवढी भरमसाठ साखर वापरत असावेत.

बाजारात किंवा हॉटेल मधे मिळाणार्‍या लस्सी, फालुदा पेयातही ती भरमसाठ असतेच.
दहिवडा सोबत दही येते तेही गोडमिट्ट, खजूराची म्हणुन जी चटणी देतात, तीपण साखरेचा पाक !
अगदी ताजा मोसंबीचा रस घेतला तरी त्यात पळीभर पिठीसाखर टाकतात
( कारण मूळात त्या मोसंबीला काही चवच नसते )

बाजारात किंवा हॉटेल मधे मिळाणार्‍या लस्सी, फालुदा पेयातही ती भरमसाठ असतेच.

सगळ्याच नाही, परंतू स्वस्तात मिळणार्‍या ठिकाणी एक इंडस्ट्रिअल पावडर साखरे ऐवजी वापरली जाते , जी साखरेपेक्षा स्वस्त व कमी प्रमाणात लागते. मुळात ही पावडर खाण्यासाठी बनवलेली नाही. आरोग्यास अपायकारक अशी व साखरेपेक्षा कैकपटीने गोड असलेली ही पावडर पीठिसाखरे सारखीच दिसते . रस्त्यावरील लस्सीवाले हमखास हीच पावडर वापरतात.

नाव माहीत नाही. इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये वापरतात.

रस्त्यावरील लस्सीवाले हमखास हीच पावडर वापरतात. <<<< सगळ्याना सरसकट यात धरू नका.
मी रस्त्यावर लिंबू सरबत विकायचो तेव्हाही काही शिकलेली गिर्‍हाईके आमच्यावर हेच आरोप करायची.
खरे तर १/४ किलो साखर + पाणी , ७५० मिलीच्या बाटल्यात घालून साखरेचे पाणी नेहमी करायचो, पण ते ऐकायचेच नाहीत.
अश्या गिर्‍हाईकाना सुकी साखर घालून सरबत विकायचो.. त्यातही कोणतीही पावडर नाही हे दाखवून..

नानाकळा +१
माझ्यासारख्या सटीसामाशी एखादा ग्लास /टिन पिण्याऱ्या लोकांना पण भीती वाटली लेख वाचून Sad

हा किती मीली लिटरचा कॅन आहे?
३३० मिलीच्या कोक क्लासिक मध्ये ३५ ग्रॅम साखर असते. ५ ग्रॅम म्हणजे एक टी स्पून होतात, म्हणजे ३३० मध्ये साधारण 7 टी स्पून साखर असते. मग २२० मिली मध्ये साधारण ४ चमचे असेल. आणखी बारका १०० चा पण मिळतो मला वाटतं. त्यात २ चमचे असेल.
लिंबू / कोकम सरबत, अ‍ॅपल ज्यूस, उसाचा रस, ऑरेंज ज्यूस, टमेटो ज्यूस यातही साधारण इतकीच साखर असते.
एरेटेड पेयांचे सेवन करणे टाळाच पण त्याच बरोबर ज्यूस, गोड चहा / कॉफी, पुरणपोळी, मोदक, गुलाबजाम ही तितकेच वाईट आहेत हे लक्षात असू द्या.

रस्त्यावरील लस्सीवाले हमखास हीच पावडर वापरतात. <<<< सगळ्याना सरसकट यात धरू नका.
@ गोष्टीगावाचे
माझ्या प्रतिसादात सुरवातीलाच मी लिहिले आहे की, सगळ्याच नाही, परंतू स्वस्तात मिळणार्‍या ठिकाणी एक इंडस्ट्रिअल पावडर साखरे ऐवजी वापरली जाते
आणि तसंही तुम्ही लस्सी विकत नव्हते त्यामुळे तुम्हाला ते लागूही होत नाही.

अश्या गिर्‍हाईकाना सुकी साखर घालून सरबत विकायचो.. त्यातही कोणतीही पावडर नाही हे दाखवून..
असं करून तुम्ही बाटलीतील साखरेच्या पाण्यात स्वीटनर नसल्याचे सिद्ध केलंच नाही. रस्त्यावरील लस्सीवाले गिर्‍हाईकाला दिसेल अशा जागी पारदर्शक बरणीत उत्तम दर्जाचे काजू ठेवतात. परंतू लस्सीत टाकण्यासाठी होलसेल बाजाराती किडके व तुकडे झालेले काजू वापरतात. एवढंच नव्हे तर किडीमुळे डब्याच्या तळाला जमलेली काजुची पावडरही लस्सीत टाकतात, ज्यामुळे लस्सीला स्वाद व घट्टपणाही येतो. असला माल फार स्वस्तात मिळतो.

माझ्यासारख्या सटीसामाशी एखादा ग्लास /टिन पिण्याऱ्या लोकांना पण भीती वाटली लेख वाचून >> माझा कोणालाच घाबरवण्याचा उद्देश नाही.
शीतपेय कींवा इतर पेय ज्यात अतिप्रमाणात साखर किंवा साखरसदॄश दुसरे काही असते ते आपण किती सहजरित्या सेवन करतो. त्यातले अन्नघटक जे अपायकारक आहेत ते कोणते, ते कशाप्रकारे हानी करू शकतात ही माहिती आपण क्वचितच मिळवतो.

अतिप्रमाणात गोड पदार्थांचे सेवन करणे हे अपायकारकच आहे. त्याचे समर्थन होऊच शकत नाही. पुर्वीच्या तुलनेत आता गोडाचे खाणे वारंवार व अतिप्रमाणात होऊ लागले आहे. त्याचे परीणाम अनेक आजारांच्या रूपात दिसू लागले आहे.

शीतपेयांमध्ये साखरेचे जे प्रमाण असते तेवढी साखर जर पोटात गेली तर आपल्याला ओकारी व्हायला हवी. तशी जर ती झाली तर आपण परत ह्याच्या वाटेला जाणार नाही आणि तसे होवू नये त्यात साखरेच्या जोडीने फॉस्परीक अ‍ॅसिड पण सेवन करायला भाग पाडले जाते.

अमितव, तुम्ही दिलेली आकडेवारी ही सर्व शीतपेयांना लागू होत नाही. वेगवगळ्या कंपनींच्या पेयात ती कमी अधिक प्रमाणात आढळते. माझ्या बघण्यात असे बरेच जण आहेत की ते दिवसाला कमीतकमी ५०० मिली पेय नाश्ता, जेवण , मधल्यावेळेत पाण्याऐवजी पितात. हल्ली एखाद्या पार्टीला, गेटटूगेदरला गेले की तिथे ही पेय म्हणून विकतचे ज्यूस किंवा शीतपेय हेच प्रामुख्याने दिले जातात.

बर्‍याचदा बाहेर घेतल्याजाणार्‍या जेवणासोबत ( कमी दरात ) कॉम्प्लीमेंटरी म्हणून शीतपेयाचे कॅन दिले जातात.
एवढ्याप्रमाणात साखर असलेले कोणतेही पेय सेवन केले की ते लगेचच परत भूक लागल्याची जाणीव करून देते त्यामुळे त्यानंतर परत जास्तीचे खाणे होते. शिवाय एक ग्लास पिऊन समाधान होत नाही तेही परत परत प्यायले जाते.
उन्हाळ्याच्या दिवसात थंड काहीतरी प्यायला हवे म्हणून ज्यूस, फ्रूटी(फृटी), शीतपेय यांचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते.

आरोग्यासाठी योग्य असणारे डीटॉक्स वॉटर, कमी साखरेचे किंवा बिना साखरेचे घरी बनवलेले सरबतं पिणे शक्य असताना बाजारात मिळणार्‍या ह्या असल्या अपायकारक द्रव्यांपासून शक्य तितके दूरच रहावे असे मला वाटते.

>>>>बर्‍याचदा बाहेर घेतल्याजाणार्‍या जेवणासोबत ( कमी दरात ) कॉम्प्लीमेंटरी म्हणून शीतपेयाचे कॅन दिले जातात.
>>>>
बऱ्याचदा, पाण्याची बाटली 30 रु आणि कोल्ड ड्रिंक 45 रुपये असे पाहिल्यावर , जाऊ दे पाण्या पेक्षा कोल्ड ड्रिंक पिऊ असा म्हणायचा मूर्खपणा मी करत होतो ,
पण आता पाणी 100 रुपयाला असेल तरी पाणीच पीईन इथपर्यंत विचार बदलले आहेत,

सगळाच गोंधळ आहे राव. कोणावर भरवसा ठेवावा? सायन्स जर्नल्स मध्ये आलेले संशोधन पीअररीव्युड असतेच असे नाही. शिवाय एखाद्या शास्त्रज्ञाने केलेले संशोधन तपासायलाही वेगळे संशोधन करावे लागते, त्याला फंडींग कोण करणार.. खाण्यापिण्याच्या बाबतीत सगळाच बनाव दिसत आहे. काही वर्षांपूर्वी, चॉकलेट, चहा घातक होते, आता हेल्दी आहेत, अनेक बाबतीत कोलांट्याउड्या चालू असतात वैद्यकिय क्षेत्राच्या....

काही वर्षांपूर्वी, चॉकलेट, चहा घातक होते >> नानाकळा, हे आजही घातकच आहेत की.
मूळ कोको फळातले गुणधर्म आहे तसेच आहेत. फक्त चमचाभर कोकोपावडर खा ती आरोग्यवर्धक, पौष्टीक आहे असे सांगितले तर कितीजण खातील?
त्यात वेगवेगळे प्रकार, ब्रांड करण्याच्या प्रकारात भरमसाठ साखर, फॅट, दुग्धजन्य पादार्थ, शेल्फ लाईफ वाढविण्यासाठी प्रिजर्वेटीव घातले जाते.
मार्केटींग तर येवढ्या मोठ्या प्रमाणवर केली जाते की ते खाण्याचा मोह कित्येकांना टाळता येत नाही.

बेकरी पदार्थांनापण हे लागू होते. अगदी ४-६ महिन्याच्या मुलांना सोप्यात सोपा देता येण्यासारखा पदार्थ म्हणजे दुध-बिस्कीट. बिस्कीटात वापरले जाणारे ट्रान्स फॅट , साखर, मैदा ह्याचा कितीजण विचार करतात? ५-१० रूपयाला ( उत्पादन शुल्क, मार्केटींग, बाजारात उपलब्ध करणे हा सगळा खर्च व त्यांचा फायदा) एवढ्या स्वस्त दरात ग्राहकाला ते द्यायचे असेल तर त्याचा दर्जा वाढवून ह्या कंपन्या / बेकरी कशा चालतील?

बाटलीतील साखरेच्या पाण्यात स्वीटनर नसल्याचे सिद्ध केलंच नाही असे काम कधीतरी करून बघा.
तिथे सिध्द करायला वेळ नसतो, वाद घालायला वेळ नसतो, आणि प्रयोगशाळाही नसते.
तसंही तुम्ही लस्सी विकत नव्हते प्रश्न साखरेचा आहे, आणि तुमचं विधान सरसकट आहे.. आता फक्त 'लस्सीवालेच' लबाडी करतात असे तुम्हाला म्हणायचे असेल... तर चालू द्या... Happy

असे काम कधीतरी करून बघा.
नको रे बाबा! उद्या एखादे शिकलेले गिर्‍हाईक लिंबाऐवजी सायट्रिक अ‍ॅसिड वापरता अशी शंका काढेल तेव्हा त्याच्यासमोर लिंबू पिळून सरबत करावं लागेल. अशुद्ध पाणी वापरता म्हटलं की फोडा त्याच्यासमोर मिनेरल बाटलीचे सील. इतके सिध्द करायला वेळ आणी पैसा कोण वाया घालवेल?
आता फक्त 'लस्सीवालेच' लबाडी करतात असे तुम्हाला म्हणायचे असेल... तर चालू द्या...
हो, माझा अनुभव फक्त रस्त्यावरील स्वस्तात लस्सी व दुग्धपदार्थ विकणार्‍यांपुरताच मर्यादीत आहे, कारण स्वस्तात विकणे शक्य नसल्याने असले गैरमार्ग वापरले जातात. लिंबूसरबतवालेही लबाडी करतत असं तुम्हाला खात्रिलायकपणे वाटंत असेल तर कळू द्या आम्हालाही, तेव्हडीच आमच्या ज्ञानात भर पडेल.

मार्मिक, काय नाव आहे त्याचे ? मोसंबी ज्यूस वाले नक्कीच तीच पावडर वापरत असणार !!

सॅकरिन बद्दलच बोलत असावेत. Saccharin.
(अवांतरः आधी एक गोडेबाबा म्हणून होता. तो हाताला ही पावडर लावुन यायचा. मग पाण्यात बोट बुडवुन गोड करुन दाखवायचा. चमत्कार!!!)
या विषयावर काही माहितीपट पाहण्यात आले होते. त्यातल्या दोन विशेष आवडल्या होत्या.
१) Fed up
२) Jamie Oliver's Sugar Rush

रस्त्यावरील लस्सीवाले गिर्‍हाईकाला दिसेल अशा जागी पारदर्शक बरणीत उत्तम दर्जाचे काजू ठेवतात. परंतू लस्सीत टाकण्यासाठी होलसेल बाजाराती किडके व तुकडे झालेले काजू वापरतात.
>>>>>>>
हेच ते १० रुपयांत मॅंगो ज्यूस विकणारे करतात. गोड रसाळ आंब्याच्या राशी दिखाव्यासाठी रचून कसला पिवळा रस विकतात देवास ठाऊक. पण दहा रुपयात मोठा ग्लासभर मॅंगो ज्यूसवऊनच त्यात आंबे नसणारच हे समजते.

बऱ्याचदा, पाण्याची बाटली 30 रु आणि कोल्ड ड्रिंक 45 रुपये असे पाहिल्यावर , जाऊ दे पाण्या पेक्षा कोल्ड ड्रिंक पिऊ असा म्हणायचा मूर्खपणा मी करत होतो ,
>>>>>>>>>>>
हा हा सिम्बा.. प्रामाणिक आहात. पण हाच मुर्खपणा बरेच जणांना करताना मी पाहिले आहे. आणि ओळखीचे असतील तर त्यांना यापासून परावृत्तही केले आहे.
मुळात सॉफ्ट ड्रिंक्सनी तहान भागत नाही, तर बहुधा शरीराची पाण्याची गरज वाढतेच. तहान भागवायला पाणीचे बेस्ट. मला पर्याय शोधायचा झाल्यास मी अमूल वगैरेचे पंधरा रुपयांचे ताक घेतो.

माझा मॅंगोला स्लाईस हे फसफसणारे पेय नसतात म्हणून कमी घातक असाही बरेच जणांचा समज असतो. अर्थात तुलनेत कमी घातक असतीलही. पण त्यातलाही गोडवा नक्कीच आंब्याचा नसून आचरट गोष्टींनीच आला असतो हे कश्याने ते नक्की माहीत नसूनही अंदाज बांधता येतोच. त्यामुळे ते देखील टाळतोच.

शीतपेयातील साखरेच प्रमाण मात्र खरेच अचाट आहे.
डाएट कोक-पेप्सी मध्ये हे प्रमाण काय असते? आणि ते या तुलनेत किती कमी घातक असते? कोणाला काही कल्पना?

Pages