मराठी मालिका आणि दिग्दर्शनाची बोम्बाबोम्ब

Submitted by रमेश भिडे on 22 April, 2017 - 02:08

गेले काही दिवस झी मराठी वरच्या मालिका पाहताना प्रचण्ड मानसिक त्रास होतो ... कारण नसताना घेतलेले क्लोज-अप्स , पात्रांच्या संवादातले अनावश्यक पॉझेस , कथासूत्रातला कर्मदरिद्रीपणा आणि पात्रांचे स्वभाव अतिशय बटबटीत पणे रंगवणे यासारख्य असंख्य बिनडोक चुकानी भरलेल्या या सीरियल पाहण्यात समस्त महिला वर्गाच्या सन्ध्याकाळी बर्बाद होत आहेत याचे खरोखर वैशम्य वाटते

अगदी चान्गल्या गाजलेल्या कादम्बर्‍यान्वर आधारित मालिका केल्या तरी दिग्दर्शक आणि एडिटर्स त्या कथेची / संकल्पनेची माती करतात असा अनुभव आहे... बापजन्मात कधी हे लोक हॉलीवुड च्या लेव्हल्स च्या सीरियल बनवू शकतील का? असा प्रश्न पडतो.

अमेरिकन टीव्ही वरच्या डेली सोप सीरियल्स चे प्रमाण कमी करून तिथे वीकली सीरिज दाखवण्याचा ट्रेन्ड वाढल्यामुळे तिकडे गुणवत्तेत सकारात्मक बदल झाला आहे ... आपल्याकडे देखील तो ट्रेन्ड सुरु व्हायला हवा आहे . पूर्वी दूरदर्शन च्या जमान्यात वीकली सीरिज असल्यामुळे दर्जा उत्तम होता.....

साभार--- आमचे परममित्र झपाटलेला फिलॉसोफर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण ऋन्मेषचा आधीचा मुद्दा पटला.
आधी फक्त हिंदीच मालिका बघितल्या जायच्या. आता इतके मराठी चॅनेल आहेत, मराठी घरांत मराठीच मालिका बघितल्या जातात, इव्हेंट्सना मराठी सेलेब्रिटीच बोलावले जातात हे नक्कीच छान आहे. या मराठी टीव्ही इंडस्ट्रीचा उपयोग मराठी फिल्म व नाट्य सृष्टीलाही होतोय. चॅनेलवर गाजलेले कलाकार मालिका संपल्यावर आवर्जून नाटक करताना दिसतायत आणि त्यांना पाहण्यासाठी तरुण वर्ग नाटकाकडे वळतोय. आता फक्त मालिकांचा दर्जा सुधारायला हवाय.
पण त्यातही तुझ्यात जीव रंगला सारखी एखादी मालिका आशेचा किरण आहे. चुकभूल द्यावी घ्यावी सारखा वेगळा प्रयोग होतोय. खवय्ये हा पाककृतीचा कार्यक्रम अनेक वर्षानुवर्षं चालू आहे. हे सर्व नक्कीच कौतुकास्पद आहे.

ऋन्मेष,

प्रत्यक्ष जीवनात मी स्वतः एक कलाकारच आहे, टू बी स्पेसिफिक 'कमर्शियल आर्टीस्ट'. ग्राहकाच्या गरजेनुसार कलेचा वापर करुन 'त्याला हवी तशी' कलाकृती निर्माण करणारे. (मात्र कारागीर आणि कलाकार यांच्या बेसिक फरक आहे तो नंतर कधीतरी)

माझ्याच उदाहरणावरुन सांगतो.

तू मांडलेला सीन आमच्या जीवनाचा नेहमीचा भाग आहे. काम कुठे व किती पैशाला करावं हे बरेचदा कलाकारावर अवलंबून असतं. पण काय काम करावं हे ग्राहकावर अवलंबून असतं. कसं करावं हे कलाकारावर अवलंबून असतं. कमर्शियल आर्ट हे ग्राहक्+कलाकार यांचे अपत्य असते. ते कसे निपजेल ह्यासाठी दोघेही जबाबदार असतात. मी जगात भारी लोगो बनवून दिला एकदम अ‍ॅपल, नायके सारखा तरी साईप्रसाद इलेक्ट्रॉनिक्स, श्रीगणेश शू मार्ट अशा ग्राहकांना ते चालत नाही. त्यांना त्यांच्या लेवलनुसार काम लागत. प्रत्येकाचे एक सर्कल असते. तुम्ही कलाकार म्हणून कसे आहात ह्यापेक्षा कोणत्या वर्तुळात काम करता यावरही बरंच अवलंबून असतं.

कलाकारच्या कमाईबद्दल/पैशाबद्दल. : मला एक लोगो बनवायचे ३० हजार देणारे ग्राहक मिळतात, १५ देणारे ग्राहक मिळतात, ५ हजार आणि २ हजारही देणारे मिळतात. महिन्याला मला १ लाख रुपये हवे असतील तर मी कसे काम करेन? ३० हजार देणारे ४ ग्राहक शोधेन की २ हजार देणारे ५० ग्राहक ? २ हजार देणार्‍या २ ग्राहकांची कामे मी एका दिवसात केली तर असे ५० होऊन माझा आकडा अचिव होतो. तेवढेच पैसे मी ४ ग्राहक शोधले तरी होतो.

मला काही परिचित ३० वाले शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा २-२ वाले घेऊन फटाफट काम उडवून द्या असे सांगतात. २-२ वाले चिक्कार असतात, ३० वाले कमी. पण मला ३० वाल्यांमध्ये इन्टरेस्ट आहे, कारण मला ३० वाल्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच २ वाल्यासाठी लागतो. दुसरे असे की २ वाल्यांना कलेची किंमत नसते. भले मला दोन महिन्यातून एक ३० वाला मिळू देत. पण मी २ वाला एकही करत नाही. मी उरलेला वेळ ३० वाले ग्राहक शोधण्यात घालवतो. प्रत्येक कलाकाराच्या अशा प्रायोरिटीज असतात. त्या त्या पद्धतीने तो करतो.

डिझाईनचे पैसेच न मिळणार्‍या रोडसाईड डिटीपीवाल्याकडे मी पहिली नोकरी केली. तिथे एक ३०० पानांचे पुस्तक डिझाइन केले तर प्रिंटींगच्या नफ्यातून आमचे पगार काढले जायचे. दोनच वर्षांनी मी खुद्द बीसीसीआयमध्ये आयपीएल चे ३०० पानांचे टुर्नामेंट हॅण्डबुक डिझाइन केले तर त्याचे केवळ डिझाइनचे (चार दिवसाच्या कामाचे) खणखणीत अडीच लाख मिळाले. कलाकार तोच, तंत्र, ज्ञान, कल्पकता, दर्जाही तोच. किंमत वेगळी.

एवढे सगळे रामायण सांगण्याचे कारण. कमी पैसे मिळतात म्हणून पाट्या टाकल्या जातात हे तुझे म्हणणे खरे नाही. आपण जे काम करतो ते कोणाचे करावे, ते करायला किती पैसे आकारले पाहिजेत हे कलाकाराला समजायला हवं. पाट्या टाकणे हा कलाव्यवसायाचा भाग नाही, ग्राहकाला काय हवे ते देणे हा आहे. माझ्यामते खरा कमर्शियल आर्टीस्ट तोच जो त्याच्या ग्राहकाला गरजेनुसार त्याला हवे ते बनवून देऊ शकतो. माझ्यामते तरी कोणताही ग्राहक असो (५० वाला किंवा २ वाला) कलाकार आवश्यक तेवढा वेळ घेतोच. कमी वेळ असेल तरी दर्जावर कमी पडतो असे होत नसते.

फायनली काय तर पैसे असो, वेळ असो, सर्कल असो, कोणत्याही घटकाचा दर्जावर परिणाम होत नाही. जगदीश खेबुडकर, शिघ्रकवी, मिनिटात अजरामर गाणी लिहून दिली आहेत, फडक्यांनी बसल्याबसल्या अजरामर चाली लावल्या आहेत. दर्जा हा उपजत असतो, आतून येतो. दर्जा निर्माण करता येत नाही.

कलाकाराचा दर्जा ग्राहकाच्या आवडीनिवडीच्या दर्जाशी मॅच होणे महत्त्वाचे. कारण दर्जा हा सापेक्षही असतो. ग्राहकाला काय हवे ह्यावरच सर्व ठरते. इथे ग्राहक कोण? तर प्रेक्षक. ८० च्या दशकातला अभिजात आवडीनिवडी असणारा "टीव्ही प्रेक्षक" विशिष्ट वर्गापुरता
मर्यादित होता. तेव्हा जसे प्रेक्षक होते तशाच मालिका असायच्या. आताही तेच आहे, जसे प्रेक्षक आहेत तशाच मालिका आहेत. तेव्हाच्या चित्रपटांना टीव्हीपेक्षा जास्त प्रेक्षक असायचे. आजच्या मालिका ७०-८० च्या दशकातल्या कौटूंबिक चित्रपटांच्याच पाणी घातलेल्या नद्या आहेत. उतरत्या काळातले जितेंद्र, जयाप्रदा, राजेश खन्ना, श्रीदेवी, विनोद मेहरा, वगैरेंचे कौटुंबिक चित्रपट धमाल चालायचे. दर्जा हाच, आजच्या मालिकांचा. अमरिशपुरी, कादरखान, ओमपुरी, मिथुन, प्रेमचोप्रा, सदाशिव अमरापुरकर, राज बब्बर, नसिरुद्दिन शहा, अनुपम खेर हे लोक अव्वल दर्जाचे कलाकार पण कमर्शियल सिनेमांत टिनपाट कामे करण्यात आयुष्य घालवले. तिथेच केके मेनन सारखा दूरदर्शन कलाकार आज दर्जेदार टॉप सिनेमातच काम करतो.

हॉलिवूडमध्ये भरपूर पैसा लावतात म्हणूनच दर्जेदार चित्रपट, मालिका निघतात असे नव्हे. मुळातच तिकडचा ग्राहक, त्याची टेस्ट काय आहे यावर, नाविन्यतेचा प्रयोग करण्याची त्यांची सवय, मार्केटसाईझ, रिस्क घेण्याची तयारी, वेगळे काही देण्याची जिद्द ह्यावर पैसा किती लावावा या गोष्टी अवलंबून असतात. धाग्यात चर्चा होते आहे ती कन्टेन्टच्या दर्जाची. मी अनेक असे बिगबजेट चित्रपट बघितले आहेत की जिथे "यार इत्ता पैसा खर्चा किया तो थोडा ढंग का पिच्चर बनाते ना.." असे वाटून जाते. नुसता तांत्रिक झगमगाट आणि संपल्यावर रिकामपण...

--------------------------------------------------------------------------

अबाउट अ कमर्शियल आर्टीस्ट, देअर इज नथिंग स्पेश्यल इन इट फॉर पब्लिक. अनेक जबरदस्त जाहिराती आपण बघतो, वर्षानुवर्षे आपल्या मनाचा भाग बनून राहिलेल्या असतात, कित्येकांची गाणी, डॉयलॉग, दिग्दर्शन मनात घर करुन बसते. ९९.९९ टक्के वेळा आपल्याला त्याच्यामागचे कलाकार माहित नसतात, हे कोणी लिहिलं, गायलं कोणी, संगीत कोणी दिलं, दिग्दर्शन कोणाचे काहीही माहित नसते. आपले रवी जाधव नटरंग करण्याआधी जाहिरातींचे दिग्दर्शक होते, अनेक यशस्वी दिग्दर्शक हे जाहिरातींचे दिग्दर्शक होते, आहेत. त्यांच्या कामाबद्दल त्या वर्तुळात माहित होत जाते.

----------------------------------------------

बराच लांबला प्रतिसाद. माफ करा पण थोडक्यात माझे होत नाही.. Wink

@ हुमायुन नेचर तर ते ह्युमन नेचरच. माझ्याकडून का कसे माहीत नाही ते हुमायुनच लिहिले जाते. मायबोली सर्च मारलात तर आणखी चार ठिकाणी हे मीच लिहिलेले सापडेन. पण या निमित्ताने हुमायुन नावाची कोणीतरी व्यक्ती ईतिहासाच्या पुस्तकात होऊन गेली आहे हे समजले. आणि तरीच या आधीही मी जेव्हा जेव्हा हा शब्द वापरायचो तेव्हा तेव्हा लोकांचा गोंधळ गैरसमज होऊन त्यांना माझा मुद्दा समजायचा नाही. कारण मी ह्युमनचा नेचर सांगायचो आणि ते त्याला कुठल्यातरी हुमायुनशी ताडत बसायचे..

या मालिका स्त्रिया बघतात असा एक आपला गैरसमज आहे. पण मोठ्या प्रमाणात पुरुष या मालिका बघत असतात.
>>>>>>
जर मी चुकत नसेन आणि ऑल मेन आर माझ्यासारखे असतील तर मालिकातील तरुण महिला कलाकारांचे प्रमाण आणि मालिका बघणार्‍या पुरुषांचे प्रमाण हे नक्कीच हातात हात घालून चालत असावेत.

बराच लांबला प्रतिसाद. माफ करा पण थोडक्यात माझे होत नाही.. Wink
>>>>>
मग त्या डेलीसोप वाल्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये फरक काय उरला नानाकळा? तुमची पोस्ट वाचल्यावर हाती काहीच नवीन मुद्दा लागला नाही असे झाले तर मी कुठे डोके आपटायचे? माझ्याच की बोर्डवर ?? Happy
जोक्स द अपार्ट, खरेच मुंबईत रात्रीचे पाहुणे दोन वाजत आल्याने आणि आज मला अंमळ लौकर झोप आल्याने खरेच आपली लांबलचक पोस्ट वाचली नाही, कारण ती वाचून उगाच काही लिहायला स्फुरले तर आणखी पंधरा मिनिटे जायची आणि पुर्ण दोन वाजायचे. त्यापेक्षा सकाळी सावकाश आरामखुर्चीत तयारी करता करता वाचेन... शुभरात्री Happy

मला तुम्ही पुरुषांमध्ये धरू नका.
Submitted by ऋन्मेऽऽष on 25 April, 2017 - 12:52

या मालिका स्त्रिया बघतात असा एक आपला गैरसमज आहे. पण मोठ्या प्रमाणात पुरुष या मालिका बघत असतात.
http://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/...
Submitted by सनव on 25 April, 2017 - 23:55

Proud

नानाकळा यांची वरील पोस्ट पटते (एखाद दोन बाबी सोडून).
>>>>> एवढे सगळे रामायण सांगण्याचे कारण. कमी पैसे मिळतात म्हणून पाट्या टाकल्या जातात हे तुझे म्हणणे खरे नाही. आपण जे काम करतो ते कोणाचे करावे, ते करायला किती पैसे आकारले पाहिजेत हे कलाकाराला समजायला हवं. पाट्या टाकणे हा कलाव्यवसायाचा भाग नाही <<<<
तरीही, कमी पैसे मिळतात, तर कसेही काम "उरका" ही प्रवृत्ती सर्वदूर आहेच्चे. किंबहुना, नानाकळा, तुम्ही जे मांडताय, ते "आदर्शवाद" या स्वरुपात आहे, व ते दुर्मिळच असते.
आमच्या पुजापाठामध्ये देखिल सत्यनारायण पुजेस रुपये १०० पासुन रुपये २५०० पर्यंत देणारे असतात. जर पुजा सांगणारा (मजसारखा) ब्राह्मण (कलाकार?) सच्चा असेल, तर तो इर्रिस्पेक्टीव्ह ऑफ दक्षिणा अमाऊंट १०० की २५०० हे न बघता, पुजा दोन्हीकडे सारखीच करतो, पण सर्वच ठिकाणी असे असते असे नाही, "यावत दानम, तावत आख्यानम" असे वागणारेच बहुसंख्य असतात. ज्याठिकाणी पापपुण्याची बाब गणली जाते, तिथे देखिल असे असेल, तर बाकी टीव्हीसेरियल वगैरे क्षेत्रात तर विचारायलाच नको.
हल्ली कामचलाऊ काम करण्याचीच पद्धत आहे. मिडीया देखिल त्यास अपवाद नाही.
झोकुन देऊन काम करणे, जीव लावुन जीवतोड मेहनत करणे , उत्कृष्टतेचा ध्यास धरणे, स्वतःच्या कामात सातत्याने सुधारणा करीत रहाणे, स्वतःच्या चुका शोधुन त्या दुरुस्त करणे वगैरे बाबी बहुतेक क्षेत्रातुन इतिहासजमा झाल्यात, त्यास मिडीया तरी कशी अपवाद असेल?
पण काही क्षेत्रे, त्यांच्या स्वरुपानुसार सक्तिने अपवाद बनतात.. म्हणजे बघा की एखादा गवय्या/वादक आहे, अन कमी पैसे मिळतात म्हणून तो वेगळा/कमीप्रतिचा सूर वा जास्त पैसे मिळतात म्हणुन अजुन वेगळा सूर लावु शकत नाही, तो जे गाइल/वाजवेल, ते त्याला येत असल्याप्रमाणे उत्कृष्टच असेल, व तिथे कमीजास्त करता येत नाही. एक आहे, की पैसे किती मिळतात यावर कितीवेळ गायचे हे त्याचे हातात आहे, पण जे गाईल/वाजवेल, ते कमीप्रतिचे असेल असे होणार नाही. या दृष्टीने तुम्ही म्हणता तसे "पाट्या टाकणे हा कलाव्यवसायाचा भाग नाही " हे बरोबर. इतकेच नव्हे तर टीव्हीवर जे काय चालते, तो "कलाव्यवसायाचा" भाग मानायला मन तयार होत नाही, तो "धंदा" आहे, कलाव्यवसायच नव्हे, तर समाजसुधारणा/समाजप्रबोधन वगैरेही कोसों दूर आहे. एकदा हे मान्य केले की टीव्ही वर काय चालते, त्याचे दु:ख न होता, टीव्हीचे बटन बंद करता येते.

नानाकळा, बराचसा प्रतिसाद पटला. पण,
खेबुडकर, गदिमा, सुधीर फडके अशासारख्या जिनियस कलाकारांनी कधीकधी एका दिवसात/ तासात/ काही मिनिटांत अजरामर गाणी तयार केली, हे जरी खरे असले तरी त्यांना दर तासाला किमान एक तरी गाणे द्याच, अशी सक्ती केली असती तर चालले असते का?
एकेका कलाकाराचा चॉईस असतो, हे १००% पटलं.
वंदना गुप्ते, रीमा, प्रशांत दामले ( आम्ही सारे खवय्ये सोडून) असे काही कलाकार आहेतच, जे डेली सोपमधे फारसे दिसत नाहीत.

>>> तरी त्यांना दर तासाला किमान एक तरी गाणे द्याच, अशी सक्ती केली असती तर चालले असते का? <<<<
हा एक अजुन स्वतंत्र मुद्दा आहे..... नक्कीच लक्षणीय.
कलाकारांच्या सृजनशीलतेच्या "मुड्स" चा विचार होत नाही/होत नसणार हे नक्की ! मग जे काय उपजणार, ते मारुन मुटकुन आणलेलेच असणार.......
सेरियल्सचे भाग पाडणे म्हणजे बुंद्या पाडणे वा भजी तळण्याइतके सोप्पे नक्कीच नाही, पण ते भजी तळण्याच्या स्पीडनेच मागत असल्यास.... ! मग घ्या लेको.....
अहो भजाच्या हातगाडीवरही , गिर्‍हाईक वाढुन घाईगडबड झाली, तर बरेचदा आतपर्यंन न तळलेली/शिजलेली अर्धीकच्ची भजी वाट्याला येतात..... या सेरियल्सतरी अपवाद कशा असतील/?

एखादा गवय्या/वादक आहे, अन कमी पैसे मिळतात म्हणून तो वेगळा/कमीप्रतिचा सूर वा जास्त पैसे मिळतात म्हणुन अजुन वेगळा सूर लावु शकत नाही, तो जे गाइल/वाजवेल, ते त्याला येत असल्याप्रमाणे उत्कृष्टच असेल, व तिथे कमीजास्त करता येत नाही. एक आहे, की पैसे किती मिळतात यावर कितीवेळ गायचे हे त्याचे हातात आहे, पण जे गाईल/वाजवेल, ते कमीप्रतिचे असेल असे होणार नाही.

>> This is it!

>>>>एखादा गवय्या/वादक आहे, अन कमी पैसे मिळतात म्हणून तो वेगळा/कमीप्रतिचा सूर वा जास्त पैसे मिळतात म्हणुन अजुन वेगळा सूर लावु शकत नाही, तो जे गाइल/वाजवेल, ते त्याला येत असल्याप्रमाणे उत्कृष्टच असेल, व तिथे कमीजास्त करता येत नाही. एक आहे, की पैसे किती मिळतात यावर कितीवेळ गायचे हे त्याचे हातात आहे, पण जे गाईल/वाजवेल, ते कमीप्रतिचे असेल असे होणार नाही.
>> This is it!>>>
खरंय... बजेट ,वेळ/टाइम लिमिट कमी आहे किंवा अजून काही काही कमी आहे / कलाकार/साहित्य उपलब्ध नाहीये किंवा ते माझं काम नाही आहे किंवा अजून काही बाही च्या नावाखाली प्रेक्षकांच्या माथी निकृष्ट दर्जा मारणं चूकच... आधीच्या काळात सगळं अगदी मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतानाही आहे त्यातच ऍडजस्ट करून दर्जेदार कलाकृती द्यायचा प्रामाणिक प्रयन्त तरी असायचा...

वावे,
प्रशांत दामलेंनी त्यांच्या फेसबुक पेजवर गेल्याच आठवड्यातील एका पोस्टमध्ये आम्ही सारे खवय्ये सोडल्याचे सांगितले आहे.

गवैय्या कमीप्रतीचा सूर का लाऊ शकत नाही हे कळले नाही?
मी स्वता गाताना ऐकणारे कोण आहे त्यानुसार स्वताला झोकून द्यायचेय की नाही हे ठरवतो. उदाहरणार्थ पिकनिकला गेलोय, पोरंपोरंच आहोत, तर गातो कसाही भसाडा.. तेच ग्रूपमध्ये पोरीही आहेत तर अलगदसे माझ्या अंगात सोनू निगम घुसतो. आता त्या पोरींना ईम्प्रेस करणे हीच माझी मिळकत. त्यातही त्या फारश्या आवडल्या नाही तर मिळकत कमी म्हणत पटकन एखादा हिमेश गाऊन मोकळा होतो.. पण तेच जर गर्लफ्रेण्ड सोबत असेल तर अरिजित.. पर्याय नाही, तिला हल्ली तोच आवडतो.. तर हे गवैय्यांबाबतही असे असते.. गळा म्हणजे देवाने वरतून मोड सेट करून पाठवलेले मशीन नाही.

बाकी थेट गवैय्याचे उदाहरण घ्यायला गेलात म्हणजे अभिनय, दिग्दर्शन, लेखन वगैरे किंमतीनुसार कमी जास्त दर्जाचे होते हे तरी कबूल असेल ..

आणि हे उदाहरण कुठल्याही क्षेत्रात येऊ शकते हा.. आपले लाडके क्रिकेट घ्या. आयपील चालूय. देशविदेशीचे क्रिकेटर देशासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळावेत तसे किंवा त्याहून जीव तोडून खेळत आहेत. का? उत्तर द्या ...

@webmaster,प्राजक्ता या ऋन्मेषवर अत्यंत वैयक्तीक टीका करत आहेत.साती यांना जो नियम लावला गेला तो ह्यांना लावणार का?/कृपया प्राजक्ता यांचा आयडी गोठवावा.

मलाही तेच लिहावे वाटले होते सिंजी. विषय काय चाललंय, या बाब्याचे काय सुरू आहे, नानाकळा इतके जीव तोडून सांगतायत तर याच भलतंच.
शास्त्रीय गायक आणि स्वतः आणि हिमेश
वीट आलाय त्याच्या अनेक निर्बुद्ध पोस्ट चा

अरे साती यांचा आयडी गोठवला गेला का? कधी? का?
बाकी माझी स्वताची कोणाविरुद्ध काही तक्रार नाही..
गवैय्या मुद्दाम कमी दर्जाचा सूर का लाऊ शकत नाही हे मात्र खरेच कळले नाही. आणि मला त्यातले कळत नाही म्हणूनच कळले नाहीये. पुढच्याच पोस्टमध्ये मी क्लीअर केले आहे की मी स्वता एक पिकनिक सिंगर लेव्हलचा मनुष्य आहे Happy

सिन्जि ! मी क्वचित इतकी वैयक्तिक होते किबुहना इग्नोरन्स हे माझ माबोवर वावरायचा स्वतःपुरता घालुन घेतलेला नियम आहे पण ज्यात त्यात " गिरे तो भी टान्ग उपर !" या अ‍ॅटीटुड्चा खरच कन्टाळा आलाय..

उचित स्पष्टीकरण देऊनही तेच ते प्रश्न परत येत असतील भाऊंनी माझी पोस्ट गिगाबायटी असल्याने वाचलेली नाही असे दिसते, तेव्हा असोच!

ऑर्कुटवर असताना बॅन केलेले सभासद आणि उडवलेले धागे असा एक सेपरेट धागा होता.
कोणताही धागा उडवला किंवा सभासदाला बॅन केले की मॉडरेटर तिथे लिहायचे, असा एक धागा माबो प्रशासनाने काढायला हवा..

ईथे अवांतर आहे हे, पण कुठेतरी ही विनंतीवजा सूचना करायला हवी ..

गवैय्या मुद्दाम कमी दर्जाचा सूर का लाऊ शकत नाही हे मात्र खरेच कळले नाही. आणि मला त्यातले कळत नाही म्हणूनच कळले नाहीये.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष >>>>>>>>>

मला वाटत विषय थोडस भरकटलेला आहे...

गवैय्या हे उदाहरण या ठीकाणी वैयक्तीक कला सादरीकरण या मध्ये मोडत.
या ध्याग्या मध्ये आपण कोण्या एका T.V. कलाकाराच काम कमी दर्जाच आहे या नाही तर मालिका आणि दिग्दर्शन याची गुणवत्ता या बाबतीत बोलतोय.

कोण एक कलाकार ढिसाळ काम करतोय म्हणुन नाही तर दिग्दर्शन ढिसाळ होतय हा मुद्दा आहे.

सिनेमा वा सिरीयल चा फायनल आउटपुट हे दिग्दर्शकावर अवलंबुन आहे..
दिग्दर्शका हा जर गवैया वा चित्रकार असेल तर सिनेमा/सिरीयल गाण वा पेन्टींग आहे.

सिनेमा/सिरीयल मधील सेट, नायक, नायीका, संगीत, लाईट, कॅमेरा हि सगळी साधन आहेत.. जी वापरुन तो सिनेमा/सिरीयल बनवतो.

जस एकादा चित्रकार हा, पाणी, रंग, कागद, ब्रश हि सगळी साधन वापरुन पेन्टींग बनवतो...

मग जर पेन्टींग बकवास असेल तर जसा चित्रकार जबाबदार तसाच सिनेमा/सिरीयल बंडल असेल तर दिग्दर्शक ... असा हा मुद्दा आहे..

गवैय्या मुद्दाम कमी दर्जाचा सूर का लाऊ शकत नाही हे मात्र खरेच कळले नाही. आणि मला त्यातले कळत नाही म्हणूनच कळले नाहीये.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष >>>>>>>>>

मला वाटत विषय थोडस भरकटलेला आहे...

गवैय्या हे उदाहरण या ठीकाणी वैयक्तीक कला सादरीकरण या मध्ये मोडत.
या ध्याग्या मध्ये आपण कोण्या एका T.V. कलाकाराच काम कमी दर्जाच आहे या नाही तर मालिका आणि दिग्दर्शन याची गुणवत्ता या बाबतीत बोलतोय.

कोण एक कलाकार ढिसाळ काम करतोय म्हणुन नाही तर दिग्दर्शन ढिसाळ होतय हा मुद्दा आहे.
सिनेमा वा सिरीयल चा फायनल आउटपुट हे दिग्दर्शकावर अवलंबुन आहे..
दिग्दर्शका हा जर गवैया वा चित्रकार असेल तर सिनेमा/सिरीयल गाण वा पेन्टींग आहे.

सिनेमा/सिरीयल मधील सेट, नायक, नायीका, संगीत, लाईट, कॅमेरा हि सगळी साधन आहेत.. जी वापरुन तो सिनेमा/सिरीयल बनवतो.

जस एकादा चित्रकार हा, पाणी, रंग, कागद, ब्रश हि सगळी साधन वापरुन पेन्टींग बनवतो...
मग जर पेन्टींग बकवास असेल तर जसा चित्रकार जबाबदार तसाच सिनेमा/सिरीयल बंडल असेल तर दिग्दर्शक ...

असा हा मुद्दा आहे..

ढिसाळ दिग्दर्शनाचा एक नमुना याचि देहि याचि डोळा पाहिलेला, बी आर फिल्म्सच्या स्टुडिओत तेव्हा कोण्यातरी अशाच सिरियलचे शुटींग होते, हेमा मालिनी आणि पंकज धीर होते त्यात, त्या सिरियलच्या सेटनिमित्त तिथे गेलो होतो, तिथे दुसरीकडे दुरदर्शनवरच्या कोणत्या तरी सस्पेन्स-थ्रीलर मालिकेचे शुटींग चालू होते, रात्रीची वेळ होती, स्टुडिओच्या आवारात गॅरेज बनवलेले होते. खरेतर चारपाच भंगार गाड्य असतात, कॅमेरामुळे अगदी भव्य शंभरेक गाड्यांचे गॅरेज वाटते. . सगळं लो-बजेट, कलाकारही असेच स्ट्रगलर वगैरे. दोन की एकच टेक झाला, अगदी चमाट अ‍ॅक्टींग केलेला तो शॉट दिगदर्शकाने ओके केला, सहाय्यक दिग्दर्शक त्याला म्हणत होता की सर अजून एक घ्यायचा का, तर तो म्हणे, नही, ठिक है, चेहर्‍यावर तद्दन सरकारी बाबू लोकांसारखे जगाला कंटाळलेले भाव, काही उत्साह नाही, काही नाही. त्याकाळच्या दुरदर्शन मालिका हास्यास्पद का होत चालल्यात याचे कारण मला तिथे दिसले. काही चांगले बनवावे, दर्जेदार असावे अशी दिग्दर्शकाचीच इच्छा दिसत नव्हती. जे आपण पाट्या टाकणे म्हणत आहोत ते हे असू शकते. त्याच्याकडे नेमक्या कोणत्या गोष्टीची कमतरता होती म्हणून त्याने तो शॉट आहे तसा आटोपला याबद्दल मला आज प्रश्न पडला आहे.

कदाचित त्या कलाकारांचे काम दिगदर्शकाने आधी पहिले असेल, आणि आता जो परफॉर्मन्स दिला त्यापेक्षा जास्त चांगला मिळणार नाहि याची खात्री असेल Happy

काय टीपी चाललाय! असंबंध प्रतिसाद काढून टाकता येतील का?

पुन्हा मुद्द्यावर येऊ. सध्याच्या टॉप ५ मालिका अशा आहेत- टीआरपी प्रमाणे-
५. चला हवा येऊ द्या- विनोदी कार्यक्रम आहे. हिंदीतील समस्त खानावळ व सगळया तारका इथे हजेरी लावतात. मराठीतीलही अनेक सेलेब येतात. नॉट दॅट बॅड.
४. चुकभुल द्यावी घ्यावी- नवीन कन्सेप्ट आहे. हलकीफुलकी करमणूक. ज्येष्ठ नागरिकांना विशेष आवडेल. यातही टीका करावी असं काही नाही.
३. काहे दिया परदेस - टिपीकल मालिका आहे. हिंदी- मराठी प्रेमकथा आहे. निदान सुनेने, मुलीने करियर करावं यात काही चूक नाही असा एक महत्वाचा विचार सध्या प्रमोट करत आहेत, हेही नसे थोडके. इथे सर्व कलाकारांची कामं छान असतात.
२. तुझ्यात जीव रंगला- अस्सल मराठी मातीतली, शेतकरी हिरो असलेली , जुन्या मराठी चित्रपटांची आठवण करून देणारी छान कथा आहे. सध्या तरुण पिढीला आवडत आहे.
१. माझ्या नवर्याची बायको- ही मात्र फारच विचित्र मालिका असूनही एक नंबरवर कशी हा प्रश्नच आहे. बहुधा शनायाच्या पुरुष चाहत्यांमुळे असेल.

थोडक्यात - १ नंबरचा अपवाद वगळता बाकी मालिका छान/ ठीक वगैरे वाटतात. अगदीच वाईट अशा खुलता कळी किंवा नकटीच्या लग्नाला टाईप मालिकांना प्रेक्षकांनी झिडकारलंच आहे. दिल दोस्तीचा नवा सिझनही फ्लॉप आहे.
त्यामुळे सुधारणेला वाव असला तरी सरसकट टीका नको.

काहे दिया परदेस >>>>>>>>>>

मला तर इतके दिवस हि हिंदी मालिका वाटत होती... मराठी आहे हि ??

Pages