नाम घेता तुकोबांचे ।

Submitted by पुरंदरे शशांक on 20 April, 2017 - 11:30

नाम घेता तुकोबांचे ।।

नाम घेता तुकोबांचे । ह्रदी रुजतसे साचे । बीज भक्ती वैराग्याचे । कैसे देणे तुकयाचे ।।१||

फिका वाटतो संसार । मुखी येते नित्य थोर । एक विठ्ठल नामाचे । कैसे देणे तुकयाचे ।।२॥

अास अंतरी जागते । ओढ विठूची लागते । अाम्ही भाग्याचे भाग्याचे । कैसे देणे तुकयाचे ।।३॥

ओढ लागतसे मना । कुणी भेटवा सज्जना । संगे गजर नामाचे । कैसे देणे तुकयाचे ।।४॥

गाथा ह्रदया निववी । हाता धरोनी चालवी । पिसे लागे अभंगांचे । कैसे देणे तुकयाचे ।।५॥

पुरे जाहला लौकिक । नसे मुक्तिचे कौतिक । द्यावे भातुके प्रेमाचे । माथा नमवूनी साचे ।।६॥

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच....
परंपरा राखली जातेय याचे सगळ्यात जास्त समाधान आणि आनंद....
हा वारसा असाच पुढे चालावा ही त्या तुकोबा रायांच्याच चरणी प्रार्थना.... _/\_ _/\_