Submitted by पुरंदरे शशांक on 19 April, 2017 - 01:38
भरवसा
भरवसा डोळ्यांवर
भरवसा कानांवर
भरवसा दृढ थोर
माझ्याच तो बुद्धीवर
भरवसा धनावर
भरवसा लोकांवर
भरवसा असे माझ्या
मुला माणसांच्यावर
भरवसा तुटता तो
खंतावतो मनोमन
कोणी नव्हतेच माझे
फुकाचीच वणवण
सारे इथे नाशिवंत
देह जातो चितेवर
भरवसा का धरीला
व्यर्थ उगा अनावर
अाता अाशेने पहातो
दूर कुठे अज्ञातात
भरवसा वाटे जरा
पुन्हा पुन्हा त्या गर्तेत .....
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा... आशेचा किरण असतोच
वा... आशेचा किरण असतोच कुठेतरी नेहमी !
आवडली कविता
आवडली कविता
ज्या नोट्वर संपते ती नोटही
छानच
छानच
छानच !आश्वस्त करणारी कविता .
आश्वस्त करणारी कविता .
भरवसा वाटे जरा
भरवसा वाटे जरा
पुन्हा पुन्हा त्या गर्तेत .....खूप समर्पक आणि खरे.
आवडली.
आवडली.
<<<आवडली कविता
<<<आवडली कविता
ज्या नोट्वर संपते ती नोटही>>> +१
फारच छान. खूप आवडली...
फारच छान. खूप आवडली...
बरोबर....ज्या नोटवर संपते...
बरोबर....ज्या नोटवर संपते....ते छान वाटले...
आवडली...
आवडली...
सुंदर. आवडली >>> +१
सुंदर. आवडली >>> +१
सर्वांचे मनापासून अाभार.
सर्वांचे मनापासून अाभार.
अतिशय सुंदर.
अतिशय सुंदर.