Submitted by अत्रुप्त आत्मा on 15 April, 2017 - 14:56
आयुष्याचा हिशोब साचा
एक कप तिचा,एक माझा!
दिसायला दोन्ही एकच
फ्लेवरंही सारखाच
फक्त चाखण्याची रित
ज... रा निराळी
म्हणूनच.. एक कप तिचा,एक माझा!
माझा आधी संपेल, तिचा नंतर
चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर..
त्यातूनच घडते जादू शेवटी
टेस्टी... लज्जतदार... सुरंगी
पण तरिही..
एक कप तिचा,एक माझा!
एकत्र असून थोडं वेगळेपण
वेगळं असूनही थोडस्सं एकत्रपण..!
तिचं सावधपण माझं अंधळेपण
जगण्यातली वागण्यातली
गोडी वाढवणारं..
त्याच कारणानी..
एक कप तिचा,एक माझा!
गोडिच्या बेरजा, अजाणतेपणी केलेल्या वजा-बाक्या!
कधी गुणाकार.. कधी भागाकार
परत त्यांच्याही बेरजा वजाबाक्या!!!
पण गणित तिथेच येऊन थांबतं..
अगदी नेहेमी..
एक कप तिचा....
==०==०==०==०==०==०==
अत्रुप्त...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एकत्र असून थोडं वेगळेपण
एकत्र असून थोडं वेगळेपण
वेगळं असूनही थोडस्सं एकत्रपण..! >> मस्तच
अप्रतिम कविता आवडली. पु.ले.शु.
छान
छान
आवडली!
आवडली!
@अक्षय दुधाळ , मीरा ,
@अक्षय दुधाळ , मीरा , मंजूताई - धन्यवाद.
मस्तच लिहिलेय गुर्जी !!
मस्तच लिहिलेय गुर्जी !!
@शार्दुल हातोळकर - धन्यवाद
@शार्दुल हातोळकर - धन्यवाद हो!
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
गुर्जी, एक कप द्या हिकडं !!!
गुर्जी, एक कप द्या हिकडं !!!
@दक्षिणा, विनिता.झक्कास ›››
@दक्षिणा, विनिता.झक्कास ››› धन्यवाद.
मस्त
मस्त
सकाळचा वेळ साचा
आवडली...
छानच !
छानच !
@ राजेंद्र देवी , दत्तात्रय
@ राजेंद्र देवी , दत्तात्रय साळुंके › धन्यवाद.