द परस्युट ऑफ हॅप्पीनेस........!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

काल द परस्युट ऑफ हॅप्पीनेस हा विल स्मिथ चा ख्रिस गार्डनर या गुंतवणुक क्षेत्रातील व्यक्तीमत्वावर आधारीत चित्रपट पाहिला.
(संदर्भासाठी लिंक http://en.wikipedia.org/wiki/The_Pursuit_of_Happyness#Critical_reception)
नोकरीचा पत्ता नसताना अन लहान मुल वाढवण्याची जबाबदारी असताना, त्याने केलेला संघर्ष अगदीच मनाला भिडला! घरभाड्याला पैसे नसल्याने स्टेशनवर किंवा चर्च मधील फुकट खोली मध्ये राहणारा ख्रिस पाहिला कि, टाटा मेमोरियल हॉस्पीटल ला असताना चे दिवस आठवायचे. अनेक लोक रात्री झोपायला जागा नसेल तर हॉस्पीटलच्या बाहेर फुट्पाथवर झोपायचे..अन सकाळी शेजारील सार्वजनीक स्वच्छतागृहाचा आसरा घ्यायचे!

र्डिव्हीडीच्या स्पेशल फिचर मध्ये तर स्वतः ख्रिस गार्डनर ने स्वतः बद्द्ल काही माहिती दिली अन तो स्वतः हा चित्रपट बनवताना पुर्ण वेळ दिग्दर्शकांना उपलब्ध राहीला. त्याचे गतजीवन अन काही विशेष क्षण तो पुन्हा जगला Happy
********
आज संध्याकाळी टीव्ही वर हॉंगकाँग मधील केज हाउस अर्थात झोपडपट्टी सदृष्य पिंजर्‍याच्या घरात राहणार्‍या गरीब कष्टकरी लोकांवर एक डॉक्य्मेंट्री पाहिली..... उज्ज्वल भविष्याच्या आशेने गावाकडील वा मागास भागातील अनेक लोक शहरांमध्ये कसे जीवन जगतात....अंगावर काटा येतो...... मुंबईत लोकलच्या बाजुच्या झोपड्यांकडे चुकुन जरी नजर गेली तरी........ Sad
********
.. क्षणभर असा विचार आला कि, ह्या केज हाउस वा झोपड्यां मध्ये भविष्यातील अनेक ख्रिस गार्डनर राहत असतील.......:)

प्रकार: 

फार प्रभावी चित्रपट वाटला मला.गुणवत्ता असुनही स्वत:ला सिद्ध करण्याचा त्याचा struggle पाहताना खुप अस्वस्थ होत.विल स्मिथ ने ही जीव ओतुन अभिनय केलाय.

मला अतिशय आवडतो तो मुव्ही!! दर वेळेला पाहताना पाणी आणतो पण तरी पाहतेच.. !
एक से एक सीन्स आणि विल स्मिथ ची अ‍ॅक्टींग आहे !!

ख्रिस गार्डनर आणी त्याच्या मुलाचा चित्रपट रीलीज होण्या आधी interview झाला होता तो हि प्रभावी होता... चित्रपटात विल स्मीथ आणी त्याच्या मुलाने काम केलय Happy

सुरेख चित्रपट आहे हा. मलाही खूप आवडला. विल स्मिथ चे कामही मस्त आहे. ते स्पेशल फीचर पाहायचे राहिले.

चित्रपट आवडला म्हणुन ते पुस्तक आणुन वाचले आणि ते जास्त चित्तथरारक आहे Happy हे ऑडिओ बुक स्वरुपात पण उपलब्ध आहे नक्की 'वाचुन पहा'.

superb सिनेमा आहे.
" Changling" नावाचा अन्जेलिना जोली चा असाच मस्त सिनेमा आहे.अर्थात त्याचा विषय वेगळा आहे.