पांढरे कमळ! :)

Submitted by शोभा१ on 17 April, 2017 - 07:14

हे आहे आमचं पांढरं, छोटं, सुगंधी कमळ! Happy
१) DSCN2614-a.JPG
२)DSCN2615-.JPG
३) DSCN2622-.JPG
४)DSCN2606-.JPG ५)DSCN2629-.JPG
६)DSCN2638-.JPG

Group content visibility: 
Use group defaults

आहाहा, मस्तचं. Happy सगळी घरची आलेली कि काय?

ताई एकदम माहेराची आठवण करुन दिलीत. आईकडे असाच बट्मोगरा आहे आणि तो या दिवसात अस्साच भरभरुन फुलतो Happy

" बट मोगरा! " > मस्तच! २ रा फोटो अगदी कमळासारखा (मनातल्या. मला प्रत्यक्ष कमळ येवढं देखणं वाटत नाही.) !

भावना, कृष्णा, स्निग्धा, दिनेशदा, रावी, अंजू धन्यवाद!

सगळी घरची आलेली कि काय? >>>>>>>>>>>..हो. सोसायटीच्या बागेतली. पण बागेचं संगोपन दादाच (वडील) करत असल्याने पहिले २-३ दिवस खूप फ़ुले मिळाली. Happy
पण आता बाकीच्या लोकांना या फ़ुलांचा शोध लागला. तर मी जाईपर्यंत एकही फ़ुल नसतं . Sad

ताई एकदम माहेराची आठवण करुन दिलीत. >>>>>>>>.कोण ह्या ताई? Uhoh

लहानपणी टेबललँडवर पावलोपावली मोतिया रंगातली सानफुले हिनकळताना दिसत .नाव माहित नाही . अगदी चिमण्या कमळांसारखी दिसत ...खूप गोड वास होता त्यांना .

घमघमाट नुसता....!
शोभे खुप छान ग! Happy
दादांना सादर प्रणाम! केवढ्या मेहनतीने त्यांनी झाडे जोपासलीत सोसायटीच्या बागेत! __/\__

अनघा, कुंद, आर्या, धन्यवाद!
दादांना सादर प्रणाम! केवढ्या मेहनतीने त्यांनी झाडे जोपासलीत सोसायटीच्या बागेत! __/\__>>>>>>>>>>>..हो ग. ती झाडं म्हणजे त्यांना जीव की प्राण. बागेत गेले की किती वेळ गेला तरी हे तिथेच. फार काळजी घेतात. चहा, नाश्ता, जेवण कशाचही भान नसतं.
पण आता नाही जमत त्यांना. तरी घरी कुंडीत मातीत, भा़जीपाल्याचे देठ,(स्वतः बारीक करून )निर्माल्य वगैरे घालून खत तयार करून, गॅलरीतल्या कुंड्यात जीव रमवतात. Uhoh

आजच सकाळी खूप आनंदीत होऊन मला एक मजा बघायला बोलावलं, काही पाती खूप वेळा कुंडीत येत होत्या त्या कसल्या ते त्यांना कळत नव्हतं. रानटी असतील, व बाकीची रोपं मरतात म्हणून ते काढून टाकत होते. पण हल्ली त्यांच तब्बेतीमुळं जरा दुर्लक्ष झालं, तर त्या पातीतून एक कळी डोकावतेय. इतके आनंदीत झाले होते. त्यांचा आनंद बघून मी पण खूष झाले. असेच ते नेहमी आनंदात राहोत. हीच देवाकडे प्रार्थना! Happy

खुप सुंदर , शब्दात वर्णन करता येणार नाही ईतके छान वाटले.
मन अगदी भरुन आले.

मला खुप आवडतात अशी पांढरी फुले... मोगरा, बटमोगरा... ऊमललेले तगर.

Thanks.. you made my day Happy

मानिनी धन्यवाद!
त्यालाही अ‍ॅड करा वरच्या लिस्ट मध्ये >>>>>>>>केलं Proud

ओंजळीतली फुलं पाहुन वाटतं की अशीच ती ओंजळ वर करुन सगळ सुवास मनामनात भरुन घ्यावा... Happy
पण पातीतुन डोकावणारी कळी कसली मग?

ओंजळीतली फुलं पाहुन वाटतं की अशीच ती ओंजळ वर करुन सगळ सुवास मनामनात भरुन घ्यावा... Happy>>>>>.
घे की मग. Lol
पण पातीतुन डोकावणारी कळी कसली मग?>>>>>>>>>>>>>.अग, अजून 'गर्भात' आहे. थोडेच दिवसात समजेल. मग नक्की सांगेन. (आमचा अंदाज, लिली, किंवा गुलछडी असेल्.) Happy

Lol घेतला आभासी सुवास Happy
वा मस्त तुमच्या दादांची मेहनत हि अशी कळी/फुलातुन दिसतेय!

घेतला आभासी सुवास>>>>>>>>>.अग, सुगंध भरून साठवून ठेवण्याची, काही युक्ती माझ्याकडे असती तर, जरूर तुला पाठवला असता. Happy

Pages