Landmark forum बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by जयु on 15 April, 2017 - 23:53

Landmark forum बद्दल माहिती आहे का?कोणी हा कोर्स केला असल्यास तुमचे अनुभव शेअर करा प्लीज.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या लॅन्डमार्कचा कोर्स केलेले बरेच जण अवतीभवती आहेत. माझ्या निरिक्षणानुसार जे मिळालेल्या माहितीचा, ज्ञानाचा उपयोगी वापर करण्यात जन्मतःच हुशार असतात ते लोक अशा गोष्टींचा फायदा करुन घेतात, असे लोक बोटावर मोजण्यासारखे असतात व त्यांचाच अ‍ॅम्बेसेडोर म्हणून वापर करुन अशा कोर्सेसचा धंदा चालू असतो.

आर्थिक नियोजन क्षेत्रात प्रदिर्घ अनुभव असलेल्या माझ्या एका क्लायंटच्या मते असे कोर्सेस फक्त उत्साहवर्धक असतात, ग्लुकोज-बूस्टर.

आयुष्यात आमूलाग्र बदल घडवण्याची, चमत्कार घडवण्याची ते फक्त जाहिरात करतात, त्यात येणारे यश हे व्यक्तिपरत्वे अवलंबून असते. अशा कोर्सेस ना जाणारे बहुसंख्य पब्लिक हे क्विकफिक्स सोलुशनच्या शोधात असते. प्रत्यक्षात हे लूजर्स असतात ज्यांना एखादा चमत्कार यशस्वी करेन असे त्यांना वाटत असते. अशा कोर्सेस मधून आलेली उसना उत्साह, उर्जा वगैरे चार दिवस, आठ दिवस, महिनाभर टिकतो. शेवटी जीवनात बदल आपल्या आपण करायचा असतो. व आपल्या स्वतःच्या जीवनात बदल केला तरी आजूबाजूच्या परिस्थितीने, माणसांनी असले कोर्स केलेले नसल्याने त्यांची आपल्या बदलास स्विकारायची तयारी नसते, त्यामुळे विपरित परिस्थितीत व्यक्तीच्या रेटून धरण्याच्या क्षमतेनुसार हे बदल टिकतात असे निदर्शनास येते.

धन्यवाद बेफिकीर,नानाकळा. ३ दिवसात जीवनात आमूलाग्र बदल घदवणे हे काही माज्या पचनी पडत नाही. शेजारी फारच मागे लागलाय - हा कोर्स करा म्हणुन. कोर्सची फी फारच जास्त आहे. खरच ह्यातून काही आउटपु ट मिळेल का?

एखादा कोर्स केलेल्याने आपल्या ओळखीच्यांच्या, मित्रांच्या मागे लागणे ह्याचे दोन प्रकार असतात.
१. तो कोर्स खरंच चांगला असून कोर्स केलेल्याला खरोखर फायदा झाल्याने तो आपल्या मित्रांनाही त्याचा फायदा व्हावा म्हणून प्रयत्न करतो.
२. कोर्सच्या काळात ब्रेनवॉश करुन उमेदवारात फीलगुड भावना(रासायनिक परिणाम - जास्त काळ टिकत नाही) निर्माण करुन प्रभावित करणे व त्याला इतरांना त्या कोर्सला आणण्यासाठी उद्युक्त करण्यास तयार करणे.

या दोन प्रकारात निर्णय घेण्यासाठी कोर्सची फी व त्याच्या परिणामाची शाश्वतता ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. महागड्या कोर्सेसना कुणी मागे लागल्यास किमान वर्षभर अजिबात दाद देऊ नये. अशा लोकांना 'तू आधी वर्षभर हे करुन दाखव, मग बघू' असे म्हणून वाटेला लावावे. काही लोक इतके प्रभावित असतात की स्वतः मित्राचे पैसे भरतात, अशा मित्रांना खरोखर असे करण्यापासून परावृत्त करावे, तुमच्यासाठी फुकट असले तरी तुम्हीही त्याच जाळ्यात अडकण्याचे चान्सेस असतात.

दुसरा प्रकार मोफत कोर्सेस चा, ह्यात करुन पाहण्यात गमावण्यासारखे काही नसते, केवळ वेळ जातो एवढेच.तेव्हा तेही जरा माहिती काढून, इतिहास तपासून, उमेदवारांच्या आयुष्यातला बदल बघून करावेत.

लॅन्डमार्क फोरम ही माझ्या वैयक्तिक मतानुसार मल्टीलेवल मार्केटींग सारखी योजना आहे.

जिच्यात पैसे भरावे लागतात अशा कोणत्याही योजनेबद्दल विचार करतांना 'विमा ही आग्रहाची विषयवस्तु आहे... इन्वेस्टमेन्ट्स आर सब्जेक्ट टु मार्केट रिस्क" वगैरे वाले डिस्क्लेमर लक्षात ठेवावे अशी माझी सुचवणी आहे.

बेफिकिरांनी दिलेली लिंक वाचली. या प्रॅकारच्या जाहिराती पेपरात बघितल्या आहेत.त्यांना हल्ली personality development असंही नाव असतं. म्हणजे एखादा माणूस येऊन तुम्हाला लेक्चर देणार ज्यायोगे तुम्ही अनोख्या(!)पद्धतीने विचार करू लागता आणि आयुष्यात यशस्वी होता .तुम्हाला positively प्रभावित करून आयुष्यात काहीतरी करून दाखवायचा रस्ता दाखवला जातो. मग त्यात यशस्वी झालेल्या माणसांची उदाहरणे येतात . त्यात स्टीव्ह जॉब पासून टाटा बिर्ला /डेव्हिल वेअर्स प्रादा /तेंडुलकर /पण येतात. ट्रेनर राजकीय वाचत असला चर्चिल /मार्गारेट थॅचर पण येतात .तर बरं हे सगळं तुमच्या पैशाने एखाद्या पंचताराकनित हॉटेल मध्ये आयोजित होतं. कॉर्पोरेट्समध्येही एम्प्लॉयी development च्या नावाखाली असा प्रकार होतो. या सगळ्यात कॉमन शब्द 'think different, think positive, act smartly ' असे असतात. त्याला फोडणी म्हणून time management, body language, Gray cells इत्यादी उप प्रकार हि असतात.थोडक्यात तुम्हाला तुमच्या आयुष्याला या सेशन मुळे वेगळं चांगलं वळण द्यायचा दावा केला जातो.

मला मात्र हे प्रकार जाम विनोदी प्लस वैतागवणे वाटतात.एकतर अश्या सेशनमुळे व्यक्ती प्रभावित होऊन लगेच आयुष्य बदलत यावर विश्वास नाही. तसेच बोलणारा माणूस गोल गोल बोलून ग्राउंड रियलिटीपासून कोसो दूर आहे हे लगेच जाणवतं. ती सेल्फ हेल्प प्रकारात मोडणारी पुस्तके याची मुद्रण आवृत्ती !

Positive राहायचे ,वेगळा विचार करण्याचे, आयुष्यात पुढे जायचे यापेक्षा दुसरे चांगले मार्ग आहेत.

याची जाहीरात खुप होते ते खरे आहे. मी नाही केला पण माझ्या एका भूलतज्ञ ( डॉक्टर ) मित्राने केला. तो
एका लहान गावातून आला होता त्यामूळे बोलायला थोडा घाबरत असे. पण हा कोर्स केल्यानंतर तो
प्रचंड बोलघेवडा झाला आहे. अक्षरशः कुणाशीही तो संवाद साधू शकतो.

आम्ही बरोबर असताना आमचा ड्रायव्हर, टॅक्सी वाली ( प्रियदर्शिनी ) अश्या कुणाशीही तो गप्पा मारताना
बघितलं आहे मी, आणि ती माणसे पण दिलखुलासपणे बोलतात त्याच्याशी.

त्याला त्याच्या क्षेत्रात याचा उपयोग होतो. पेशंटशी बोलता बोलता तो कधी भुलीचे इंजेक्शन देतो, ते
त्यांना कळतही नाही.

हा कोर्स त्याने औरंगाबाद ला केला. दहा आठवड्याचा ( प्रत्येक रविवारी ) असा होता तो.

ही जाहीरात नाही, माझा अनुभव आहे. प्रत्यक्ष कोर्स चा उपयोग व्हायला अनेक घटक कारणीभूत असावेत आणि
प्रत्येकाला त्याचा उपयोग होईल याची मी खात्री देऊ शकत नाही.

मी पण हा कोर्स केला आहे, मलाही असंच कुणितरी फोर्स केला आणि तेव्हा मी खरंच मनाने अतिशय खचलेली आणि डिप्रेस्ड वगैरे होते. मी कोर्स केला तेव्हा ३ दिवसांचे ७ हजार रुपये मोजले होते त्यात जेवण वगैरे काहीच नाही.
पुस्तकं किंवा व्याख्यानं ऐकून किंवा असे क्रॅश कोर्सेस करून आपलं आयुष्य सुधारत नाही अशा मताची मी होते आणि कोर्स केल्यावर तर माझं ते मत अजूनच ठाम झालं.
सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत फक्त बॉम्बार्डिंग केल्यासारखे आपल्या डोक्यात विविध प्रकारचे विचार घुसवले जातात. खूप वर्ष झाल्याने मला फार काही आठवत नाहिये पण अख्ख्या सभागृहाला डोळे मिटायला लावून आता तुम्हाला हलकं वाटेल आणि जादू घडेल अशी बालिश वाक्य ऐकल्याचं मात्र ठळक आठवतंय.
त्यातूनच काही लोक जे या गृप हिप्नॉटिझम ला बळी पडत ते पुढे येऊन सर्व लोकांसमोर आपले प्रॉब्लेम सांगत. आणि त्यातून ब्रेक थ्रु वगैरे असे काही शब्द वापरून आपली रिलेशन्शिप लगेच दुरूस्त कशी झाली ते पण सांगत.
एक मुलगी होती तिचे तिच्या सख्ख्या बहिणीशीच जवळ जवळ १०-१२ वर्ष म्हणे भाषण बंद होते आणि या कोर्समध्ये ते ब्रेक थ्रु का काय ती अ‍ॅक्टिव्हिटी केल्यावर तिला तिची किंमत कळली आणि तिने तिच्या अमेरिकेतल्या बहिणीला लगेच फोन केला आणि म्हणे त्यांची गट्टी झाली. मान्य गट्टी झाली, पण ती पुढे टिकली का? Uhoh हे कळलंच नाही.
मला एक साम्य दिसलं की तिथे ते लोक जे काही शिकवतात ते थोडं थोडं बेसिक लेव्हल चं कौन्सेलिंगच असतं. पण मी गेली १० वर्ष कौन्सेलिंग ला जात असल्याने ते अत्यंत बेसिक लेव्हलचं होतं हे मला जाणवलं... शिवाय हा शिकण्याचा प्रवास धीमा असतो तो वर्षानुवर्षे चालतो, ३ दिवसात इन्संट आयुष्य बदलून देणारा कोणताही फॉर्म्युला या जगात उपलब्ध नाही.
टाकिचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण नाही म्हणतात ते काही खोटं नाही.
लँडमार्क फोरम हा पैसे काढण्याचा धंदा वाटतो मला तरी. मला चांगलं आठवतंय की शेवटच्या दिवशी लंच नंतरच्या सेशन ला मी चक्क दांडी मारली आणि घरी निघून गेले होते. माझ्या बरोबर अजून एक जण त्या कोर्स ला आलेले ते तर बिझनेसमॅन होते त्यांना ही ते असह्य झालं होतं त्यांनीही त्या दिवशी काढता पाय घेतला होता. मी तर पहिले दोन दिवस आशा लावून बसले होते की खरंच काही जादू होते का काय.. पण अजिबात घडली नाही. Sad

या कोर्स बद्दल माझ्या एका मुंबईच्या मित्राने ही त्या अगोदर मला सुचवले होते, कोर्स नंतर माझं जेव्हा त्याच्याशी बोलणं झालं तेव्हा मी चिक्कार शिव्या घातल्या... तेव्हा त्यांचं म्हणणं पडलं की मेंटॉर बरोबर नसेल ... Uhoh
मग आता काय करायचं... आमचं फुटकं नशिब.....

सल्ला मागत नाही आहात तरीही सांगते की असले कोर्स करू नका, फुकट पैसे गेल्याचं दु:ख होईल त्या पेक्षा त्या ८ हजारात हवं ते करा ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल, पार्टी करा, ड्रेस खरेदी करा, शिलकित टाका... हवं तर कुणाला तरी दान करा...
असं ३ आणि ४ दिवसात कुणाचं आयुष्य बदलत नसतं..