उन्हाळ्यात खाता येतील अश्या पदार्थांच्या पाककृती मिळतील का?

Submitted by स्वप्ना_राज on 7 April, 2017 - 03:53

दरवर्षीप्रमाणे 'ह्या वर्षी उन्हाळा फार कडक आहे' असं सगळे म्हणायला लागलेत. मसाल्याच्या भाज्या किंवा आमट्या घशाखाली उतरेनाश्या झाल्या आहेत. 'तेच तेच आणि तेच' खाऊन कंटाळा आलाय. पण नुसतं सॅलड/सूप्स/फळं खाऊन अख्खा दिवस निभावणार नाही हेही ठाऊक आहे.

तुमच्यापैकी कोणाकडे खास उन्हाळ्यात लंच/डिनरला खाता येतील अश्या काही पदार्थांच्या - मग ते महाराष्ट्रीयन, बंगाली, पंजाबी, दाक्षिणात्य, गुजराती, परदेशी काहीही असोत - पाककृती आहेत का? असल्यास प्लीज प्लीज इथे पोस्ट करा. हा माझा SOS आहे Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझं चपाती खाणं जवळपास बंद झालंय कारण तोंडात घोळत रहाते>>>
म्हणजे काय? असं कशामुळे होते?>>+१
माझ्या सासर्‍यांना असे झाले होते, गोळ्यांच्या परिणामामुळे लाळ जास्त तयार होत नव्हती. पाणी पियुन घास पुढे ढकलावा लागत होता.

जर नेहमीचं जेवण - चपाती वगैरे - नकोसं झालय म्हणजे उन्हाने तब्येत बिघडली आहे. २-३ दिवस , २-३ आमसुलं रात्रभर ग्लासभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी ते पाण्यात कुस्करून मग दिवसभर ते पाणी dilute करून प्या. चौथ्या दिवशीपासून एखाद-दुसरं आमसूल वापरा. शरीर आतून थंड होतं, उन्हाचा थोडाफार मुकाबला करायला लागतं. tried and tasted आहे. मागच्या वर्षी मी आणि बहिणीने हाच उपाय केला होता.

मला अफगाणि पदार्थ उन्हाळ्यात छान वाटतात..
त्यांचे पराठे आणि बोरानी बंजन मी इथे लिहिले आहे. या पदार्थात मसाले नाहीत. भाज्यांचा नैसर्गिक स्वाद राखलेला असतो.

जलजिरा, अमृत कोकम. जांभूळ, जांभळाचे सरबत, भोकराचे सरबत, कच्च्या कैरीचे सरबत चांगलेच.

>>माझं चपाती खाणं जवळपास बंद झालंय कारण तोंडात घोळत रहाते>>>
>>म्हणजे काय? असं कशामुळे होते?>>

मला उन्हाचा कडाका खूप वाढला की चपातीचा घास चावायचा कंटाळा येतो. अर्धी चपाती खाल्ली की पुढे जेवण नकोसं होतं म्हणून असं म्हटलं मी.

सुलक्षणा, तुम्ही दिलेला उपाय करून पहाते. धन्यवाद!

ह्या ऋतूत लंच आणि डिनरसाठी रेसिपीज मिळाल्या तर हव्या होत्या. बाकी सरबत, फळं वगैरेंचा मारा चालूच आहे.

स्वप्ना, दही भात (दहीबुत्ती) या दिवसांत मस्त असते खायला. करून फ्रीजमध्ये ठेवता येतो. पोटभरीचा, स्वादिष्ट आणि थंड्गार खायला मजा येते. पित्ताचा वगैरे त्रासही नाही होत.

Pages