खास तळपत्या उन्हाळ्यात! काला खट्टा सरबत!

Submitted by कृष्णा on 10 April, 2017 - 03:49

काला खट्टा सरबत.

उन्हाच्या झळाळत्या झळ्यात थंडगार सरबत घश्यालाच पोटालाच नाही तर मनालाही गारवा आणते....
बर्फगोळा खाण्याची आवड असणार्‍यांना तर कालाखट्टा चा बर्फ गोळा मिटक्या मारत खाण्यातील गोडी सांगायलाच नको.. त्या गोळ्याची आंबट गोड घरच्या घरी अनुभवण्यासाठी बर्फ नाही पण सरबताचा हा खटाटोप काल केला आणि यशस्वी देखिल झाला मग सर्वांसोबत तो का न शेअर करावा म्हणून हा अजून एक खटाटोप... गोड... आंबटगोड... चिभेला मिटक्या मारायला लावणारा काळ्या लवणाचा खरटपणा!

साहित्य ३ ग्लास सरबतासाठी मी जे वापरले ते!

१. छान पिकलेली टप्पोरी जांभळं १५-२०
२. साखर- ८-१० चमचे.. (चहाला साखर घलताना वापरतो ते)
३. काळे मीठ दळून-- ३/४ टेबल स्पून
४. साधे मीठ चवी नुसार
५. २ लिंब मध्यम आकाराची.
६. जीरपूड १/२ टेबल स्पून
७. पाणी आणि बर्फाचे तुकडे

कृती:

१. सर्वप्रथम जांभळातील बिया काढून हलकेसे मिक्सर मध्ये दळून घ्या..
२. दळलेल्या जांभळात लिंबाचा रस , साखर, मीठ, काळे मीठ घालुन थोडावेळ मुरु द्या..
३. नंतर पुन्हा मिक्सर मध्ये थोडे फिरवून नंतर गाळुन घ्या.
४. हे मिश्रण थंड करुन त्यात नंतर जीरपूड आवश्यक तेवढे पाणी घाला. वर थंड करायल ठेवा.
५. ग्लास मध्ये सरबत घेऊन वर हवे असल्यास बर्फाचे खडे टाकून गट्टम करा!
६. बर्फ गोळ्यासारखे खायचे असल्याच हीच बर्फाचा चुरा करून त्यावर पाणी न घालता वरील कॉन्सन्ट्रेट वापरून गट्टम करा! Happy

KK.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त !
हे पाककृती विभागात लिहायला हवं.

साखर न घालता चांगले लागेल का?>>>

लागेल बहुतेक! जांभूळ तसे गोड असते आणि लिम्बाचे सॉल्टी सरबत पितोच आपण बर्‍याचदा! Happy

रंग फारच मस्त आला आहे. फ्लेवर प्रोफाइल एकदम फ्रेश आहे. जामुन/मिक्स्ड बेरी--> लाइम लेमन--> शुगर--->> सॉल्ट---> रॉक सॉल्ट--> जिरेपूड.

मस्तं!
आमच्याइथे जांभळं उन्हाळ्याच्या शेवटी पावसाच्या सुरूवातीस येतात.
तोपर्यंत वाट पहावी लागेल.

धन्यवाद! नक्की करुन पहा! आवडेल ह्याची खात्री! Happy

आमच्याइथे जांभळं उन्हाळ्याच्या शेवटी पावसाच्या सुरूवातीस येतात.>>>
इकडे हैदराबादेत मिळू लागलीत. काल दिसले म्हणून तर हा उपद्व्याप करू शकलो! Happy

मस्त आहे
हे असे करू शकतो घरी हे मला पहिल्यांदाच समजले.. मला वाटले फक्त गाडीवरच्या भैय्यांनाच बनवता येते हे सरबत.. पण तिथल्या पाण्याच्या क्वालिटीमुळे हल्ली पिणे सोडलेलेच.. पण आता घरी बनवून बघायला हवे

अरे मस्त दिसतय.
फ्रोजन जांभळं आहेत. नक्की करून बघणार.

वाह!

मूड नाही खराब करायचाय.. पण
जांभळं खात्रीशीर ठिकाणाहून खा.... चकचकीत दिसण्यासाठी तेल लावलेली जांभळांनी बाधा झालेली पाहिलीय एका मैत्रीणीला.

धन्यवाद सर्वांना! Happy

ब्लू बेरीच कराव का..>>>
पण कलिंगडाचे अस करून बघेन.>>>

हरकत नाही! माझाही पहिलाच प्रयोगच होता छानच साधल्यामुळे इथे शेअर केला!
आता पुढचा प्रयोग करवंदांवर करायचायं अजुन दिसले नाहीत इथे! Happy

आमच्याइथे जांभळं उन्हाळ्याच्या शेवटी पावसाच्या सुरूवातीस येतात.>>>
इकडे हैदराबादेत मिळू लागलीत. काल दिसले म्हणून तर हा उपद्व्याप करू शकलो! >>
पुण्यात पण मिळत आहेत. महाग आहेत पण. डायबेटीसमुळे व इतर अनेक गोष्टींमुळे महाग झालेल्या गोष्टींपैके एक जांभुळ, शेवगा, हॉटेलवाल्यांमुळे श्रावणे घेवडा महाग.

यबेटीसमुळे व इतर अनेक गोष्टींमुळे महाग झालेल्या गोष्टींपैके एक जांभुळ, >>

इकडे पण ६० ते ७० रु. पावशेर. लहाणपणी पावलीला आठवाभर जांभळं आणि १० पैशाला आठवाभर करवंद घेतलेली. आता हा भाव पचतच नाही! Wink

भारी दिसतंय...
उन्हाळ्याच्या सुट्टीतले 'रसना' च्या कालाखट्टा चे दिवस आठवले Happy

Pages