विकावं लागतं (स्फुट)

Submitted by विद्या भुतकर on 5 April, 2017 - 00:03

विकावं लागतं रोज उठून स्वतःला

मुलगी म्हणून, योग्य वधू म्हणून

कधी चांगली बायको म्हणून

तर कधी चांगले मित्र म्हणून.

दाखवावा लागतो

आपला चांगुलपणा, आपली योग्यता

आणि पात्रता पदोपदी.

बरं माझ्यापाशीच ते थांबत नाही.

तुलाही झगडावं लागतं

स्वतःला सिद्ध करण्यासाठी,

एक पती म्हणून, मुलगा म्हणून,

वडील तर कधी यशस्वी पुरुष म्हणून.

विकावं लागतं रोज उठून

आपलं कौशल्य, कला, अनुभव,

स्वाभिमान,स्वत्व आणि मूल्यंही

रोजची भाकरी मिळवायला

तर कधी मोठं नाव कमवायला.

आज सकाळी उठल्यावर

यातलं काहीच नकोसं वाटलं

नकोच ती तुलना

कुणाशीही, कशाशीही

नकोच तो हव्यास

नात्यांचा, पैशाचा, प्रसिद्धीचा

नकोच तो कोलाहल

शब्दांचा, इतरांना समजून देण्याचा

पण तू विचारलंस,"काय केलंस आजपर्यंत माझ्यासाठी?"

आणि कळलं, यातून सुटका नाही....

या जन्मीतरी ....

विद्या भुतकर.

17796183_1305073479572184_6240445279390290461_n.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण तू विचारलंस,"काय केलंस आजपर्यंत माझ्यासाठी?"
आणि कळलं, यातून सुटका नाही....
या जन्मीतरी ....>>> सुंदर अप्रतिम सर्व बाजू कमी शब्दांत चांगल्या मांडल्यात.

छान !!

मस्तच