२६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिन परेड @ राजपथ,दिल्ली , भाग १५

Submitted by sariva on 4 April, 2017 - 09:42

आता सगळ्यांचे लक्ष लागले होते मोटार सायकल display कडे.
सेनेचे CMP (Core of Military Police) दल; जे 'श्वेत अश्व टीम' म्हणून ओळखले जाते; ते मोटर सायकलवरील चित्तथरारक कसरती सादर करते.त्यामुळे सर्वांचे लक्ष विजय चौकाकडे लागले होते.अशा कसरतींसाठी खास धाडस,उत्कृष्ट balancing वdriving skills लागतात.

1) प्रथम मोटर सायकलवर आगमन झाले ते या टीमचे नेतृत्व करणारे एस्.सतिशकुमार यांचे.

2) मग शिडीवर तोल सावरत,सर्वांना चकित करत मोटरसायकलवर आले हवालदार सुखदेवसिंग! (ते ब्रेक लावून शिडीवरून कसे उतरणार हा प्रश्र मला पडला.)


3) डबल बार formation
8- 8 जणांनी दोन मोटरसायकल्सवर याचे स्वतंत्रपणे सादरीकरण केले.



4) उत्कृष्ट बॅलन्स व उत्तम co-ordinationसह 10 जणांनी lotus formation केले.


5)ख्रिसमस ट्री फॉर्मेशन: 3 मोटरसायकल्सवर दलातील 20 सदस्यांनी हे सुंदर सादरीकरण केले.


6) सुदर्शन चक्र फॉर्मेशन: हे प्रदर्शन चकित करणारे होते.

7) फ्लॉवर पॉट फॉर्मेशन: हेही प्रशंसनीयच होते.

8) पिरॅमीड फॉर्मेशन: 15 मोटरसायकल्सवर बनवलेला हा सर्वात मोठा पिरॅमीड! कौशल्य,निर्धार व संतुलनाचे उत्कृष्ट उदाहरण.या अद्भुत सादरीकरणाला प्रेक्षकांनी प्रोत्साहन व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.




9)लान्सनायक संतोष यांनी फक्त मागच्या चाकावर balancing करत मोटरसायकल चालविली.त्यांच्या कौशल्यालाही सलाम!
1

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे भाग वाचले सरिवा...
छान्च वर्णन आणि फोटोसुद्धा...
सगळीकडे प्रतिसाद देणं होत नाही त्यामुळे एकसाथ पूर्ण वाचल्यावर यावर प्रतिसाद देतेय Happy