मुलाचे नाव सुचवा

Submitted by हेमदिप on 2 April, 2017 - 10:54

नमस्कार मित्रांनो,
मला माझ्या मुलाचे नाव काही अक्षरांवरून ठेवायचं आहे.
ता, दु, ज्ञा, झा अशी अक्षरं आहेत.कृपया यापैकी आपल्याला माहित असतील तशी नावे सुचवा.

धन्यवाद!

Group content visibility: 
Use group defaults

मुलाचे नाव ठेवताना ते नाव ,मधले नाव आणि आडनाव हे लिरिकल असेल असं पहा.
१.तन्मय् ,तुषार
२.दुष्यंत,देवदत्त
३.ज्ञानेश

कठीण आहेत अक्षरे,
यावरून चांगले नाव न सुचल्यास याच अक्षरावरून नाव ठेवायचा हट्ट ठेवू नका Happy

तरी काही सुचली नावे तर सांगेनच..

देवकी, त्यांनी ता, दु असे स्पेसिफिक दिलेय... देवदत्त, तन्मय, तुषार बाद आहेत असे मला वाटते.

देवदत्त, तन्मय, तुषार बाद आहेत असे मला वाटते.>>>>>> ठीक आहे रे! मी मला आवडणारी नावे दिलीत.हेमदिप, त्यांना योग्य वाटेल तेच नाव ठेवतील.हा.का.ना.का.

कठीण आहेत अक्षरे,
यावरून चांगले नाव न सुचल्यास याच अक्षरावरून नाव ठेवायचा हट्ट ठेवू नका >>> हा पण विचार आहे मनात.....पण तरी सुद्धा एकदा मायबोलीकरांची मदत घ्यावी म्हटलं!

देवकी ओके, मग मी शाहरूख आणि स्वप्निल सुचवतो Happy

जोक्स द अपार्ट,
"झा" वरून नाव विचार करूनही सुचत नाहीय. पटकन डोक्यात येणारा शब्द झारखंड. पण हे राज्याचे नाव झाले. झारखंड की शान म्हटले तर महेंद्रसिंग धोनी. यातले महेंद्रसिंग फार ओल्ड फॅशन आहे. धोनी हे हटके असले तरी ते नाव नसून आडनाव आहे.

"ज्ञा" वरून देखील ज्ञानदेव, ज्ञानेश, ज्ञानेश्वर अशी ’ज्ञान’वर्धक नावेच सुचत आहेत. खरेच या "ज्ञान" या एका शब्दासाठी आणि त्या शब्दाच्या रुपांसाठी "ज्ञ" या अक्षराची निर्मिती झाली आहे का? की अजून काही शब्द आहेत "ज्ञ" वरून?

"ता" वरून देखील पटकन एखादे नाव आठवत नाहीये. पहिला डोक्यात आलेला शब्द "ताहीर". पण हे बहुतेक परधर्मीय नाव आहे.

"दु" वरून मलाही वर दिलेले दुष्यंतच आठवले. तसेच दिलीप-दुलीप, दुर्गेश वगैरे एकदोनच टिपिकल नावे आठवलीत.

एकंदरीत या अक्षरांवरून नावे सुचवणे खरेच च्यालैजिंग आहे. कोण काही हटके पण चांगले सुचवतेय का हे बघणे रोचक राहील Happy

तारक
दुर्गेश
बाकी दोन्ही अक्षराना पास!

ता वरून तानाजी, ताराचंद, तारानाथ

झा वरून माहिती नाहीत पण जर झ ची बाराखडी चालत असेल तर हंगेरीत झोल्टन, झोलान, झ्लाटान

तारक. तारकानाथ.
दुर्गेशनंदन.

ज्ञानेश्वर. ज्ञानानंद.

तारुश
तक्ष
तमोनाश
तनय
तनिष्क
तन्मय
तनोज
तपन
तपिश

ता - तारक तारापती
ज्ञा - ज्ञानदेव, ज्ञानेश, ज्ञानसागर, ज्ञानप्रकाश, ज्ञानदीप

ता - तार्क्ष्य . Tārkṣya is the name of a mythical being in the Rigveda, described as a horse with the epithet áriṣṭa-nemi "with intact wheel-rims" (RV 1.89.6, RV 10.178.1), but alternatively taken to be a bird (RV 5.51) and later identified with Garuda (Mahabharata, Harivamsha) or Garuda's father (Bhagavata Purana 6.6.2, 21), counted among the offspring of Kashyapa in Mahabharata 1.2548, 4830 and 12468.

( तुझ नाव काय बाळा ? - लेकराला नाव सांगायला फार त्रास होणार Happy )

ज्ञा : ज्ञानिश , ज्ञात

दु : दुर्वेश

ता, दु, ज्ञा, झा

ताम्रदक्ष, तामदेव, तानसेन, ताक्षक, ताडकेश्वर,

दुर्गेश्वर, दुर्वास,

ज्ञानिन. -- ज्ञानिन: तत्त्वदर्शिन:
इन्नंत प्रत्ययाने ज्ञानिन म्हणजे ज्ञान बाळगणारा, ज्ञान असणारा, (थोडक्यात ज्ञानवाला .) ह्यातला शेवटचा न अर्धा असतो.

ज्ञानिन् ह्या मूळ शब्दाचे प्रथमा एकवचनी रूप 'ज्ञानी' असेच होते ना? वरती लिहिलेलं ज्ञानिन: हे बहुवचनी रूप आहे. गीतेत तुम्ही म्हणता तो श्लोकातील उल्लेख बहुवचनीच आहे.

होय. मूळ नाव (शब्द) ज्ञानिन (न अर्धा) आणि प्रथमा विभक्तीचे एकवचन ज्ञानी. तसेच, शशिन - शशी, रथिन - रथी, पिनाकिन -- पिनाकी वगैरे. (सगळ्यांमध्ये न अर्धा.)
दर्शिन (न अर्धा)- प्रथमा एकवचन दर्शी(जसे प्रत्यक्षदर्शी) बहुवचन दर्शिन:
राम ह्या अकारांत शब्दाचे प्रथमा एकवचन राम: आणि बहुवचन रामा:
हरि ह्या इकारांत (ऱ्हस्व इ) प्र ए हरि: प्र ब. हरय:

हीरा, सर्व रूपे बरोबर लिहिली आहेत. इतर रूपे का लिहिली आहेत कळलं नाही. संभाव्य प्रश्नांची आधीच उत्तरे लिहिली का? Happy

Pages