Submitted by योकु on 25 December, 2016 - 11:16
चूक भूल द्यावी घ्यावी ही नवी मालिका झी मराठीवर १८ जानेवारी पासून चालू होतेय. तर, चर्चेकरता हा धागा...
कलाकार -
सुकन्या मोने - कुळकर्णी : मालती
दिलिप प्रभावळकर : राजाभाऊ
प्रियदर्शन जाधव : तरूणपणीचे राजाभाऊ
सायली फाटक : तरूणपणीची मालती
नयना आपटे : राजाभाऊंची आई
ही मालिका चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी विनोदी नाटकावर आधारीत आहे.
लेखक - मधुगंधा कुळकर्णी, दिग्दर्शक - स्वप्निल जयकर, निर्माती - मन्वा नाईक
विकी पेज इथे पाहाता येईल
ओझी वर सगळे भाग पाहाता येतील...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नयना आपटेंचं काम खुपच छान आहे
नयना आपटेंचं काम खुपच छान आहे...
नयना आपटे खूप जुनी
नयना आपटे खूप जुनी अभिनेत्रीला आहे. बरेच वर्ष ती काम करतेय नाटकांमध्ये . तिला भूमिका मात्र कायम अशाच मिळाल्या भोचक आणि त्यातून निर्माण होणार विनोद . पण भोचक पणाच काम ती चोख करते . आता तिला दुसऱ्या शेड्स च्या भूमिकाच नाही मिळाल्या त्यात ती तरी काय करणार. लक्ष्मीकांत बेर्डे ना पण कायम विनोदीच भूमिका मिळाल्या आणि पब्लिक पण या लोकांना त्याच भूमिकांमध्ये पसंत करत
मला वा टते त्यांना ऐकू येत
मला वा टते त्यांना ऐकू येत नाही म्हणून ही वयस्क र मंडळी स्वतःच जोरात बोलतात. तार स्वरात.
माझी चुलत आजी पण अशीच
माझी चुलत आजी पण अशीच मोठ्याने बोलायची. मला तिचा आवाज एकूनच आधी भिती वाटायची मग राग यायचा. मग कळायला लागले की तिचा आवाजच तसा आहे. अतिशय तापट आणि अगदी मरेपर्यन्त रेशमी साड्या नेसायची रोजला. वय वर्शे ९६ साली गेली. काही म्हणजे काहीच तसा आजार नाही... वयाच्या ९६ वर्षी सहा कप चहा रोज पिवून अगदी मस्त. अॅसीडिटी नाही की काही नाही.
दुसर्यांच्या साड्या चेक करायची, की तिने रेशमी नेसलीय का हिने जरीची का कॉटनची, लिपस्टिक कुठली लावलीय. तिलाही सजायची भारी हौस होती. ... क्रीम थापायची दिवसातून दोनदा चेहरा धूवून... पण नानी इतकीच भोचक होती.... कामवाल्या सोडून जायच्या.. कारण आजी भारीच कोपरानकोपरा नीट साफ करायला लावायची... इतकी स्वच्छता करायला सांगायची की बाया पळायच्या कामं सोडून. एका सकाळी उठलीच नाही. .. झोपेत हार्ट अॅटॅक.
तेव्हा त्यामानाने नानी बरीच बरी आहे....
झंपी मस्त होती की तुमची चुलत
झंपी मस्त होती की तुमची चुलत आजी.
तेच.. अशा ज्येनांना बघीतले आहे मी. त्यामुळे नयना आपटे मस्त काम करत आहेत असेच वाटले.
कापोंचे बरोबर आहे. मात्र नयना
कापोंचे बरोबर आहे. मात्र नयना आपटे मला जाम आवडते. मी, नयना आपटे आणी नयनतारा मध्ये आधी घोळ घालत होते. पण सौजन्याची ऐशी तैशी हे नाटक पाहील्यावर फरक लक्षात आला. ( सौजन्य मध्ये राजा गोसावींच्या बायकोचे काम नयनताराने केले होते, नंतर बर्याच वर्षांनी नयनताराला अशी ही बनवाबनवी मध्ये घर मालकिणीच्या भूमिकेत बघीतले).
नयना आपटे दिसायला छान असली तरी तिला भूमिका अशाच लाऊड मिळाल्यात.
झंपी भारी होती तुमची चुलत आजी
झंपी भारी होती तुमची चुलत आजी, माझ्या आजेसासुबाईपण १०३ वर्षाच्या होत्या. शेवटपर्यंत हिंडत्याफिरत्या पण स्वभावाने फार सौम्य, फक्त सुनेला कटकट करायच्या पण सुन उत्तम करायची आणि बाकी सर्वांसमोर सुनेचं खूप कौतुक. फार सकारात्मक होत्या.
नयना आपटेने खरंच १०१ वर्षाची असूनही भरभरुन जगणारी आणि तोंडावर नावं ठेवत असली तरी सुनेचं कौतुक असणारी आणि मुलाला झापणारी अशी नानी खरंच छान उभी केली आहे.
ह्या आजी नानी मुळंच त्या घरात
ह्या आजी नानी मुळंच त्या घरात चैतन्य वाटतं...सतत धड्पड त्यांची आपण कुठे मागे नाही आहोत आणि डावलले जात नाही आहोत हे पाहण्याची... लहान मुलांसारखा हट्ट मस्त दाखवतात त्या !
पण त्या कामवाल्या बाईला सतत
पण त्या कामवाल्या बाईला सतत धारेवर धरत असतात.. तीपण जायच नसतं.. पण तिला काम सोडुन जाण्याची धमकी देत असते
मला तर ती कुसुम पण आवडते .
मला तर ती कुसुम पण आवडते .
नानी म्हणतात , आज लवकर आलीस ?
मग? जाउ का?
सौजन्य मध्ये राजा गोसावींच्या
नयना आपटेने खरंच १०१ वर्षाची असूनही भरभरुन जगणारी आणि तोंडावर नावं ठेवत असली तरी सुनेचं कौतुक असणारी आणि मुलाला झापणारी अशी नानी खरंच छान उभी केली आहे.>>+१
सौजन्य मध्ये राजा गोसावींच्या बायकोचे काम नयनताराने केले होते>>>>ती तर लता थत्ते ना?
नंतर बर्याच वर्षांनी नयनताराला अशी ही बनवाबनवी मध्ये घर मालकिणीच्या भूमिकेत बघीतले>>>हो. शांतेचं कार्ट चालू आहे मधली शांता
नयना आपटे एरवी फारशी नाही
नयना आपटे एरवी फारशी नाही आवडत पण म्हातारी नानी रॉकींग एकदम.
बाय द वे, त्या जुन्या अभिनेत्री शांता आपटे ह्या नयना आपटे यांच्या मातोश्री.
मला तर ती कुसुम पण आवडते .>>>
मला तर ती कुसुम पण आवडते .>>> मलापण.
वरिजनल तरुण मालू
वरिजनल तरुण मालू
लवली गोड आहे ती, डी ३ मधे
लवली गोड आहे ती, डी ३ मधे होती आधीच्या तेव्हाही आवडली होती सर्वांना. सहज अभिनय.
वरिजनल तरुण मालू >>>> हायला
वरिजनल तरुण मालू >>>> हायला ...........
नयना आपटे आणी नयनतारा मध्ये
नयना आपटे आणी नयनतारा मध्ये आधी घोळ घालत होते. पण सौजन्याची ऐशी तैशी हे नाटक पाहील्यावर फरक लक्षात आला. ( सौजन्य मध्ये राजा गोसावींच्या बायकोचे काम नयनताराने केले होते, नंतर बर्याच वर्षांनी नयनताराला अशी ही बनवाबनवी मध्ये घर मालकिणीच्या भूमिकेत बघीतले). >>>>>> नयनतारा म्हणजे 'शांतेचं कार्ट चालू आहे' मधली शांता किंवा लक्ष्मिकांत ची आई. 'सौजन्याची ऐशी तैशी' मध्ये राजा गोसावींच्या बायकोचं काम 'लता थत्ते' यांनी केलय, निदान व्हिडिओ कॅसेट मध्ये तरी. .........
अरे वा, मालु एकदम सॉल्लिड!
अरे वा, मालु एकदम सॉल्लिड!
अरे नानी धमाल, पिझ्झा मागव
अरे नानी धमाल, पिझ्झा मागव सांगते बोक्याला.
हो ग पिझ्झा मागावं वर टॉपिंग.
हो ग पिझ्झा मागावं वर टॉपिंग. त्या नयना आपटे मस्त करतात काम . सगळेच छान करतात
पिझ्झा मागव सांगते बोक्याला.
पिझ्झा मागव सांगते बोक्याला. >>>> अगदी अगदी ..........
नानी, तरूणपणातील आणि आत्ताचे मालू आणि बोक्या ...... भट्टी मस्त जमलिये ...........
रॉकींग आहे सिरीयल. पहीले एक
रॉकींग आहे सिरीयल. पहीले एक दोन भाग आणि मधे एक तो अतिपांचटपणाचा भाग सोडला तर भारी रंगतदार आहे.
मला परवाचा भाग फार क्यूट
मला परवाचा भाग फार क्यूट वाटला. नानी मालूला अगदी लाडाने विडा देतात तो "नवर्याचा फार पुळका आहे तुला, नीट वळण लावलं नाहीस तू त्याला" >>
>>"नवर्याचा फार पुळका आहे
>>"नवर्याचा फार पुळका आहे तुला, नीट वळण लावलं नाहीस तू त्याला" --
असे सांगणारी सासु मिळणे म्हणजे भाग्यच!
हो तिचा सुनेवर जीव असतो,
हो तिचा सुनेवर जीव असतो, लेकाला खाऊ का गिळू करत असते
सून पण छान सांभाळत असते सर्वांना.
मिळाला का विडा फायनली? कसा तो
मिळाला का विडा फायनली? कसा तो? अपडेट द्या ना कुणीतरी....
ती शेजारची मैत्रीण असतेना
ती शेजारची मैत्रीण असतेना मालूची, तिने सांगितलं नानींना. मग नानींनी दिला आणि मालूला सांगू नको खरं मला कळलंय ते असं म्हणाल्या त्या. अधूनमधून पाठवत राहिल्या विडा तिला, कधी कधी मधेच बोक्याने लंपास करून खाल्ले, मालूचे विडे. हे तरुणपण असतानाचं.
ओहो मस्तच आहेत नानी!
ओहो मस्तच आहेत नानी!
वा अन्जु, सगळे अपडेट्स असतात
वा अन्जु, सगळे अपडेट्स असतात तुझ्याकडे
ही आवडीने बघतेय. ज्या बघत
ही आवडीने बघतेय. ज्या बघत नाही त्यांचे दुसरे सोर्सेस आहेत .
Pages