Submitted by सुप्रिया जाधव. on 20 March, 2017 - 23:45
ओळीसाठी बेफिजींचे आभार !
घोकले हेच जन्मभर आहे
सर्व काही तुझेच तर आहे
वादळाला कुण्या जुमाने ना
जे तुझे ह्या मनात घर आहे
मन तिचे गांव एक भोळेसे
भाळले ज्यावरी शहर आहे
अर्थ कळला तुलाच शेराचा
केवढा रेशमी पदर आहे
चल करूया विचार त्याच्यावर
फार साधा विचार जर आहे
मीच असणे सभोवताली पण
मी न दिसणे तुला ...कहर आहे !
हे किती वाजले कळत नाही
केवढा छान हा प्रहर आहे
खोदली एकदा कबर चुकुनी
घालतो तो अजून भर आहे
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुन्दर!
सुन्दर!
धन्यवाद संतोशजी...
मीच असणे सभोवताली पण
मीच असणे सभोवताली पण
मी न दिसणे तुला ...कहर आहे !
Wah,,
हे किती वाजले कळत नाही
हे किती वाजले कळत नाही
केवढा छान हा प्रहर आहे
>>>>>>>>>>
छान !
प्रत्येक कडवं वेगळं आणि सुंदर
प्रत्येक कडवं वेगळं आणि सुंदर .......,छान
छान..
छान..
घोकले हेच जन्मभर आहे
सर्व काही तुझेच तर आहे
मीच असणे सभोवताली पण
मी न दिसणे तुला ...कहर आहे !
हे विशेष आवडले.
वाह आवडली कावेरी
वाह आवडली
कावेरी