चूक भूल द्यावी घ्यावी - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 25 December, 2016 - 11:16

चूक भूल द्यावी घ्यावी ही नवी मालिका झी मराठीवर १८ जानेवारी पासून चालू होतेय. तर, चर्चेकरता हा धागा... Happy
कलाकार -
सुकन्या मोने - कुळकर्णी : मालती
दिलिप प्रभावळकर : राजाभाऊ
प्रियदर्शन जाधव : तरूणपणीचे राजाभाऊ
सायली फाटक : तरूणपणीची मालती
नयना आपटे : राजाभाऊंची आई

ही मालिका चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी विनोदी नाटकावर आधारीत आहे.
लेखक - मधुगंधा कुळकर्णी, दिग्दर्शक - स्वप्निल जयकर, निर्माती - मन्वा नाईक

विकी पेज इथे पाहाता येईल

ओझी वर सगळे भाग पाहाता येतील...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नयना आपटे खूप जुनी अभिनेत्रीला आहे. बरेच वर्ष ती काम करतेय नाटकांमध्ये . तिला भूमिका मात्र कायम अशाच मिळाल्या भोचक आणि त्यातून निर्माण होणार विनोद . पण भोचक पणाच काम ती चोख करते . आता तिला दुसऱ्या शेड्स च्या भूमिकाच नाही मिळाल्या त्यात ती तरी काय करणार. लक्ष्मीकांत बेर्डे ना पण कायम विनोदीच भूमिका मिळाल्या आणि पब्लिक पण या लोकांना त्याच भूमिकांमध्ये पसंत करत Happy

माझी चुलत आजी पण अशीच मोठ्याने बोलायची. मला तिचा आवाज एकूनच आधी भिती वाटायची मग राग यायचा. मग कळायला लागले की तिचा आवाजच तसा आहे. अतिशय तापट आणि अगदी मरेपर्यन्त रेशमी साड्या नेसायची रोजला. वय वर्शे ९६ साली गेली. काही म्हणजे काहीच तसा आजार नाही... वयाच्या ९६ वर्षी सहा कप चहा रोज पिवून अगदी मस्त. अ‍ॅसीडिटी नाही की काही नाही.
दुसर्‍यांच्या साड्या चेक करायची, की तिने रेशमी नेसलीय का हिने जरीची का कॉटनची, लिपस्टिक कुठली लावलीय. तिलाही सजायची भारी हौस होती. ... क्रीम थापायची दिवसातून दोनदा चेहरा धूवून... पण नानी इतकीच भोचक होती.... कामवाल्या सोडून जायच्या.. कारण आजी भारीच कोपरानकोपरा नीट साफ करायला लावायची... इतकी स्वच्छता करायला सांगायची की बाया पळायच्या कामं सोडून. एका सकाळी उठलीच नाही. .. झोपेत हार्ट अ‍ॅटॅक. Sad

तेव्हा त्यामानाने नानी बरीच बरी आहे....

झंपी मस्त होती की तुमची चुलत आजी. Happy

तेच.. अशा ज्येनांना बघीतले आहे मी. त्यामुळे नयना आपटे मस्त काम करत आहेत असेच वाटले.

कापोंचे बरोबर आहे. मात्र नयना आपटे मला जाम आवडते. मी, नयना आपटे आणी नयनतारा मध्ये आधी घोळ घालत होते. पण सौजन्याची ऐशी तैशी हे नाटक पाहील्यावर फरक लक्षात आला. ( सौजन्य मध्ये राजा गोसावींच्या बायकोचे काम नयनताराने केले होते, नंतर बर्‍याच वर्षांनी नयनताराला अशी ही बनवाबनवी मध्ये घर मालकिणीच्या भूमिकेत बघीतले).

नयना आपटे दिसायला छान असली तरी तिला भूमिका अशाच लाऊड मिळाल्यात.

झंपी भारी होती तुमची चुलत आजी, माझ्या आजेसासुबाईपण १०३ वर्षाच्या होत्या. शेवटपर्यंत हिंडत्याफिरत्या पण स्वभावाने फार सौम्य, फक्त सुनेला कटकट करायच्या पण सुन उत्तम करायची आणि बाकी सर्वांसमोर सुनेचं खूप कौतुक. फार सकारात्मक होत्या.

नयना आपटेने खरंच १०१ वर्षाची असूनही भरभरुन जगणारी आणि तोंडावर नावं ठेवत असली तरी सुनेचं कौतुक असणारी आणि मुलाला झापणारी अशी नानी खरंच छान उभी केली आहे.

ह्या आजी नानी मुळंच त्या घरात चैतन्य वाटतं...सतत धड्पड त्यांची आपण कुठे मागे नाही आहोत आणि डावलले जात नाही आहोत हे पाहण्याची... लहान मुलांसारखा हट्ट मस्त दाखवतात त्या !

पण त्या कामवाल्या बाईला सतत धारेवर धरत असतात.. तीपण जायच नसतं.. पण तिला काम सोडुन जाण्याची धमकी देत असते Happy

नयना आपटेने खरंच १०१ वर्षाची असूनही भरभरुन जगणारी आणि तोंडावर नावं ठेवत असली तरी सुनेचं कौतुक असणारी आणि मुलाला झापणारी अशी नानी खरंच छान उभी केली आहे.>>+१
सौजन्य मध्ये राजा गोसावींच्या बायकोचे काम नयनताराने केले होते>>>>ती तर लता थत्ते ना?
नंतर बर्‍याच वर्षांनी नयनताराला अशी ही बनवाबनवी मध्ये घर मालकिणीच्या भूमिकेत बघीतले>>>हो. शांतेचं कार्ट चालू आहे मधली शांता Happy

नयना आपटे एरवी फारशी नाही आवडत पण म्हातारी नानी रॉकींग एकदम.

बाय द वे, त्या जुन्या अभिनेत्री शांता आपटे ह्या नयना आपटे यांच्या मातोश्री.

नयना आपटे आणी नयनतारा मध्ये आधी घोळ घालत होते. पण सौजन्याची ऐशी तैशी हे नाटक पाहील्यावर फरक लक्षात आला. ( सौजन्य मध्ये राजा गोसावींच्या बायकोचे काम नयनताराने केले होते, नंतर बर्‍याच वर्षांनी नयनताराला अशी ही बनवाबनवी मध्ये घर मालकिणीच्या भूमिकेत बघीतले). >>>>>> नयनतारा म्हणजे 'शांतेचं कार्ट चालू आहे' मधली शांता किंवा लक्ष्मिकांत ची आई. 'सौजन्याची ऐशी तैशी' मध्ये राजा गोसावींच्या बायकोचं काम 'लता थत्ते' यांनी केलय, निदान व्हिडिओ कॅसेट मध्ये तरी. ......... Happy

पिझ्झा मागव सांगते बोक्याला. >>>> अगदी अगदी .......... Happy

नानी, तरूणपणातील आणि आत्ताचे मालू आणि बोक्या ...... भट्टी मस्त जमलिये ........... Happy

मला परवाचा भाग फार क्यूट वाटला. नानी मालूला अगदी लाडाने विडा देतात तो Happy "नवर्‍याचा फार पुळका आहे तुला, नीट वळण लावलं नाहीस तू त्याला" >> Lol

>>"नवर्‍याचा फार पुळका आहे तुला, नीट वळण लावलं नाहीस तू त्याला" --
असे सांगणारी सासु मिळणे म्हणजे भाग्यच!

ती शेजारची मैत्रीण असतेना मालूची, तिने सांगितलं नानींना. मग नानींनी दिला आणि मालूला सांगू नको खरं मला कळलंय ते असं म्हणाल्या त्या. अधूनमधून पाठवत राहिल्या विडा तिला, कधी कधी मधेच बोक्याने लंपास करून खाल्ले, मालूचे विडे. हे तरुणपण असतानाचं.

Pages