आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२०००-२०१०
अल्बम नाही,मुव्हीचै

डिरेक्टरनी हा अर्धा चित्रपट,अजारी असताना,हाॅस्पिटलच्या बेडवरुन डिरेक्ट केला!
नंतर काही वर्षांनी 'आॅटिजम'सारख्या विषयास धरुन एक यशस्वी चित्रपट दिग्दर्शीत केला,असं वाचनात आहे माझ्या!

म्युझिकचा संदर्भ म्हणजे,एकूण आठ गाणी आहेत सदर सिनेमात,जवळपास सर्वच हिट!

डिरेक्टरनी हा अर्धा चित्रपट,अजारी असताना,हाॅस्पिटलच्या बेडवरुन डिरेक्ट केला!
नंतर काही वर्षांनी 'आॅटिजम'सारख्या विषयास धरुन एक यशस्वी चित्रपट दिग्दर्शीत केला,असं वाचनात आहे माझ्या!>>> हे नाही माहित मला...

१) black
2)barfi
3)taare jamin par
4)koi mil gaya
5)my name is khan

यातल कोनत्या मुवि चे director??
१दा क्ल्यु त्याचा

उदीत-श्रेया चा आवाज आहे गाण्याला

बाकी खरंच ही कोडी सोडवण्याचा इतका मनापासून प्रयत्न करणारं तुमच्यासारखं दुसरं कुणी पाहिलं नाही!
सांगा बरं अता उत्तर!

१)my name is khan >>>बाद! करण जोहर
२)तारे ज प>>> ३ directors दाखवतायत..
३)बर्फि>> अनुराग बसू.. ह्याची history माहित नाही ब्वॉ!
४)को इ....>>> त्याचे पप्पा च आहेत..
५) ब्लॅक>> स.ल.भन्साली

क्ल्यु समजण्यासाठी पण क्ल्यु हवे आहेत!!!

बरोबर स्निग्धाजी!
कावेरीजी साॅरी,त्यांनी ओळखलं बरोबर तुमच्या आधी!
तुम्ही पुढचे गाणे ओळखा अता,शुभेच्छा!

डिरेक्टरनी हा अर्धा चित्रपट,अजारी असताना,हाॅस्पिटलच्या बेडवरुन डिरेक्ट केला! >>>>> Uhoh

मुव्हीचा क्लु देता का जरा...

आता मला ही मुव्हीच माहिती नाही तर.. काय करणार???

मी चालले होते ना स्तेप बाय स्तेप... Sad
स्निग्धा ताई . थोद नही थम्बू शकल्या...

व्हीचा क्ल्यु होता...तुमसा नहीं देखा!>>>>

सिनेमाचे नांव जुने असल्याने प्रोब्लेम झाला सिनेमा नवा होता तरी! Light 1

तुमच्यासारखं दुसरं कुणी पाहिलं नाही>>>हा मुव्हीचा क्ल्यु होता...तुमसा नहीं देखा!>>> मी स्टॉप पर्यन्त पोहचणार ...तेच..... Sad

बरं ...तुम्हाला थन्कू.. हां...खुपच मदत करत होतात माझी... Happy

६८५. हिंदी, घ्या बाई तुमच्यासाठी सोप आणि नवीन
स स प स द न य क क
च ल च ल त द न च ल
द त अ अ र अ म ब क स
य म म क ग र ह स स ध
ब द त ठ ह ब ब द य त ज
ब द म स न ज प अ

Pages