रामकृष्ण हरी

Submitted by अक्षय. on 25 February, 2017 - 07:48

रामकृष्ण हरी

फिनोलेक्स ने आणलं पाणी
शेती पिकली सोन्या वाणी
भले Brand ambassador आसेल यांचा धोनी
दलाल खातोय शेतकऱ्यांच्या टाळू वरच लोणी
नेता नाही, नेतृत्व नाही, नाही कोणी सरदार
स्वतःच्या कष्टावर निसर्गाच्या अवक्रूपेवर शेतकरी आहे निराधार
म्हणे लोकशाहीचा ध्यास हा सर्वांचा समान विकास
देशाचा अन्नदाता कवटाळतोय मृत्यूचा फास ...
मान नाही, सन्मान नाही, सत्ता नाही, नाही कसला ताज
पडला दुष्काळ काढले कर्ज आता भरतोय फक्त व्याज
शेतकऱ्यांची लेकरं आम्ही
सरकार काढेना रोजगार हमी
बाप आमचा शेतकरी
नुसताच म्हणे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे...

ह्या कविता कश्या काय सुचत असतील...