होळीला शिव्या देण्यामागे काय शास्त्र आहे?

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 March, 2017 - 03:04

संतांची भूमी आहे महाराष्ट्र. तिथे एखादा सण असंस्कृत पद्धतीने साजरा केला जात असेल असे वाटत नाही. पण होळीला शिव्या देतात असे म्हणत सकाळपासून सर्व व्हॉटसपग्रूपवर नुसते शिव्यांची बरसात होताना दिसतेय. कुठे पारंपारीक शिव्या तर कुठे प्रतिभेला उधान आलेय. वर बुरा न मानो होली है आलंच.
मी नम्रपणे याला विरोध करताच तू सणांच्या दिवशी मांसाहार करतोस ते चालते असा आरसा दाखवण्यात आला. असो, तो मांसाहार वेगळा विषय झाला. पण एखादा सण शिव्या देत साजरा करणे ही खरेच प्रथा आहे की मूळ प्रथा वेगळी असून हे तिचे भ्रष्ट स्वरूप आहे. कृपया जाणकारांनी प्रकाश टाका.

धन्यवाद,
ऋन्मेष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.sanatan.org/mr/a/574.html

१. अर्वाच्च उच्चारण करण्याचा अर्थ

"अ. `मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरिता हा विधी आहे.

आ. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येते. त्या नक्षत्राची देवता ‘भग’ ही आहे. तेव्हा भगाच्या नावाने बोंब ठोकायची, ही एकप्रकारची पूजाच होय. तो त्या देवतेचा सन्मानच समजावा. काही ठिकाणी होळीची रक्षा आणि शेण, चिखल यांसारखे पदार्थ अंगाला माखून नृत्यगायन करण्याची प्रथा आहे.’

इ. हुताशनी निनादाचे स्थुलातून प्रकटीकरणाचे प्रतीक म्हणून सध्याच्या काळातही होळीच्या भोवती मोठ्या घोळक्याने एकत्रित धावत बोंबाबोंब केली जाते. (उंचावरून प्रचंड वेगाने हेलकाव्यांसहित खाली खाली येतांना आपोआपच बाहेर पडलेल्या किंकाळीला ‘हुताश्‍न’ असे म्हणतात, उदा. गोल फिरणार्‍या झोपाळ्यात उंचावर गेल्यानंतर वेगाने खाली येतांना पोटात कलकल होते, म्हणजेच पोटातील वायू-पोकळीत काही ठिकाणी दाब निर्माण होतो आणि त्यामुळे काही ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात. निर्माण झालेल्या पोकळ्या भरून निघतांना पोटातील वायूपोकळीतील प्रचंड वेगाने होणार्‍या वायूच्या हालचालींमुळे आपल्याही पोटात सूक्ष्म निनाद निर्माण होतो. या नादाला शब्द नसल्याने त्याला ‘सूक्ष्म हुताश्‍न’ म्हणतात. सूक्ष्म हुताश्‍न स्थुलातून किंचाळण्याच्या माध्यमातून बाहेर पडतो.’

व्हॉट्स अ‍ॅपवर अर्वाच्य लिहून चालणार नाही, बहुतेक. त्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने(च) बोंब(च) मारावी लागेल.

होळी ला शिव्या देतात??(जसे ऋन्मेष "ला" शिव्या देतात चतुर्थी प्रत्यय)
कि शिव्या देऊन होळी साजरी करतात?( कुठलासा समास)

रुन्म्या तु खाजगी कंपनीत आहे ना?
मग तुला काय शिव्यांचे इतके अप्रुप ? Uhoh प्रायव्हेट वाल्यांची तर दरदिवशी "होळी" असते. Biggrin

शिव्या दिल्याने मनातील मळमळ बाहेर पडते व मन स्वच्छ होते. सामूहिक मन स्वच्छ होण्यासाठी शिव्या देण्याची परंपरा असावी. काही मनोविकारात सभ्य समजल्या जाणार्‍या लोकांच्या तोंडून घाण घाण शिव्या बाहेर पडतात. सुप्तावस्थेत असलेली मळमळ बाहेर पडते.

शिव्या दिल्याने मनातील मळमळ बाहेर पडते व मन स्वच्छ होते. >>>>>>> मनुष्य अखेर सभ्यतेच्या आवरणाखालचा प्राणीच आहे.हे त्याचे आदिमत्व बर्‍याचवेळा बाहेर पडते.वर घाटपांडेंनी म्हटल्याप्रमाणे अतिशय घाणेरड्या शिव्या , बरीच सभ्य म्हणून ओळखली जाणारी माणसे देताना ऐकिवात आहेत.
होळीच्या सणात अर्वाच्य शिव्या देऊन मानसिक विरेचन हा हेतू असावा.

पण ज्योतिबा फुले यांनी ह्या घाणेरड्या पद्ध्तीवर मस्त कोरडे ओढले आहेत..आपल्याच लोकांना ही गरज का भासावी,इतर धर्मियांना ही गरज भासत नाहीअशा अर्थाचा,शाळेत असताना धडा होता.

प्रत्येक गोष्टीला कसलं आलय शास्त्र? वळायची मुठ, करायचा उलटा हात, न्यायचा तोंडाजवळ आणी सुरू...."!@#$^% च्या बैलाला ......"

अनेक प्रथांमागे प्राचीन काळात घडलेली एखादी घटना कारणीभूत असते. कालांतराने फक्त प्रथाच सुरु राहते आणि घटना विसरली जाते. त्यामुळे होळीला बोंब मारण्यामागे नेमकी काय घटना घडली आणि प्रथेचे भ्रष्टीकरण झालेय का याची माहिती मिळणे केवळ अशक्य आहे. आपण भारतीय लोक डॉक्युमेंटेशन बाबत अत्यंत उदासीन आहोत. आपल्या बहुतांश पूर्वजांनी ते कधी केलेले नाही. ज्यांनी थोडेफार केले त्यांनी ते नीट आणि विश्वासार्ह केलेले नाही.

तात्पर्य: प्रथांमागचा नक्की इतिहास काय होता हे समजणे केवळ अशक्य.

(बाकी, आजकाल कोणीही उपटसुंभ काहीही बरळत असतात . देवतेचा सन्मान काय, काळे आवरण काय, चैतन्याचे वलय काय, शक्ती काय. बोंबलल्यामुळे म्हणे चैतन्य निर्माण होते. आता काय बोंबलायचे का यावर? निव्वळ फालतू करमणूक)

प्रत्येक गोष्टीला कसलं आलय शास्त्र?
खरे आहे,
काही काही गोष्टी गंमत म्हणून करायच्या असतात.
नुसते मंत्र (नि तेहि संस्कृतमधे, जे एक दोघे सोडून कुणालाहि समजत नाहीत!) म्हणत बसले तर कंटाळा येऊन लोक निघून जातील, म्हणून ओढून ताणून त्याला प्रथा , शास्त्र म्हणायचे. अगदी जुन्या ग्रंथात सुद्धा याच उद्देशाने सांगितले असावे. पूर्वी फक्त संस्कृत बोलत म्हणून काही संस्कृतमधे लिहीलेले सगळे धार्मिक, शास्त्रीयच असते असे नाही! त्यांनाहि विनोद बुद्धी असण्याची शक्यता आहे.

रुन्म्या तु खाजगी कंपनीत आहे ना?
मग तुला काय शिव्यांचे इतके अप्रुप ? प्रायव्हेट वाल्यांची तर दरदिवशी "होळी" असते.
>>>>>

काहीही हं
मी एमेनसीत आहे. रिलायन्स वगैरे किंवा एखाद्या कन्स्ट्रंक्शन कंपनी मध्ये नाही. बॉसला नावाने हाक मारायचे कल्चर आहे आमच्याईथे. त्यातही याचा फायदा ऊचलत बॉसला एकेरी हाक मारणारा आमच्या डिपार्टमेंटमध्ये मी एकटाच. शिव्या देणे घेणे तर दूरची गोष्ट.

गावी शिमग्याची सोंगे घरावरुन जातात. घाबरवतात पण शिव्या नाही देत. मी कधी पाहिली नाहीत सोंगं घरच्यांनी वर्णन करुनच घाबरवल्यामुळे. कुणाला माहिती आहे का या सोंगांबद्दल.

सोंगे माहीत नाही. पण तो अश्वत्थामा येतो ना होळीला पुण्यात. माझे तेथील मित्र सांगायचे. आम्ही बघितला, आम्ही बघितला.